बुधवार, २८ ऑक्टोबर, २०२०

कलश हे भारतीय संस्कृतीचे अग्रगण्य प्रतीक आहे

कलश हे भारतीय संस्कृतीचे अग्रगण्य प्रतीक आहे


कलश

कलश


भ्रातः काश्वनलेपगोपितवहिस्ताम्राकृते सर्वतो ।

      मा मैषीः कलशः स्थिरो भव चिरं देवालयस्योपरि ।:

    ताम्रत्वं गतमेव काञ्चनमयी कीर्ती:  स्थिरो तेधुना   ।

 नान्तस्तत्त्वविचारणप्रणयिनो लोका बर्हिबुद्धयः ॥

                                            ( शाङ्गधरपद्धती:  )


" चारही बाजूंनो सुवर्णाचे लेपन केल्यामुळे ज्याचा ताम्रपणा झाकला  गेला आहे, अशा हे कळसा ! तू घाबरू नकोस. मंदिरावर तू कायमचा स्थिर हो. तुझी कांचनमयी कीर्ति आता  स्थिर झालेली आहे आणि त्यामुळे जले ताम्रपण निघून गेलेलेचे आहे; असे समज. आतील  तत्वांचा विचार करण्यावर ज्यांचे प्रेम आहे असे लोक बहिर्बुद्धी म्हणजे केवळ बाहेरचे पाहणारे असत नाहीत. अर्थात्‌ लोक तुझे महत्व जाणतात. तेव्हा तू उघडा पडशील. तुझे ताम्रपण जाहीर होईल हयाची तू भीती बाळगू नकोस."'

कांचनापेक्षा कीर्ति महान आहे आणि सुवर्णापेक्षा सोनेरी जीवन श्रेष्ट आहे. मंदिराच्या शिखरावर स्थान प्राप्त केलेला कळस ती कीर्ति व  तसले जीवन पाप्त करून चुकलेला आहे. आता त्याने स्वतःच्या बाबतीत हीन भाव राखण्याचे काही कारण नाही. लहान माणूसही महान कार्यात निमित्त बनला तर तो जीवनातील महान शिखरे गाठू शकतो. त्यानंतर त्याने स्वतःला लहान मानायचे किंवा न्यूनगंडाने दुःखी होण्याचे कारण नाही. प्रभुकार्यात निमित्त बनलेला वाल्या कोळी हा सोने आहे की नाही ते पाहा चे कारण नाही. राम-जीवनाचा महिमा गाणारा वाल्या सोनेरी जीवनाचा महर्षी वाल्मीकि बनला, आणि राम-जीवन-मंदिराच्या उन्नत शिखरावर सुवर्ण कळसासारखा शोभू लागला. त्याचे नाव इतिहासात अमर झाले. त्याच्या कीतींने अनेक कांचन-मुगुटांना निस्तेज बनवले, त्याच्या वाणीत वेदांचे वैभव व स्वरात कोकिळेचे माधुर्य  येऊन राहिले.

आपले पूर्वन जीवनात भावनेला प्राधान्य देत होते. भावपूर्ण  जीवन म्हणजेच भारतीय जीवन, भावना बदलताच जीवनाचा व्यवहार बदलून जातो. दगडाला सिंदूर लावताच भावना बदलून जाते; तो दगड न राहता हनुमान बनतो. भावना म्हणजेच जीवन व भावनाशून्यता म्हणजे मृत्यु.

आपले पूर्वज सूर्याला  नुसता जड गोळा न समजता देव समजून त्याची उपासना करीत होते. वरुणाला फक्त पाऊस न समजता त्याला  देव समजून त्याचे पूजन करीत होते आणि कळस हे वरुण-पूजनाचे प्रतीक आहे. 

संस्कृती जेव्हा सुरू झाली असेल  त्यावेळी मानवाला  वाटले असेल की पाऊस आहे म्हणून तर जीवन आहे. जर पाऊस नसता तर जीवन सुकून गेले असते. पाऊस आपली सेवा करतो, आपल्याला जीवनदान देतो तेव्हा आपणही त्याचे पूजन केले पाहिजे. परंतु त्यात एक अडचण आली पाऊस तर फक्त चारच महिने येतो तोही रोज नाही. आपल्या पूर्वजांनी त्यातून रस्ता काढला, विहीर, तलाव, नदी सर्वांचे पाणी पावसानेच दिले आहे. एखाद्या लोट्यात-कलशात ते भरून घ्यावे आणि त्याचे पूजन करावे. हया मंगल  भावनेसह कालक्रमाने रसाधिराज भगवान वरुणाची त्याच्यात स्थापना करून संस्कृतीच्या गौरववान भव्य प्रतीकांचे सर्जन केले आणि त्या कलशाचे पूजन केले,


कलशाचे पूजन

कलश हे भारतीय संस्कृतीचे अग्रगण्य प्रतीक आहे. म्हणूनच तर प्रत्येक महत्वाच्या शुभ प्रसंगी पुण्याहवाचन, कलशाच्या साक्षीत व सानिध्यात होते.

प्रत्येक शुभ प्रसंगात, कार्याच्या आरंभी जशी विघ्नहर्ता गणपतीची पुजा करण्यात येते तशी कलाशाची ही पूजा होते. उलट, देवपूजेपेक्षा अग्रस्थान ह्या कलशाला मिळते. पहिले त्याचे पुजन, पहिला  नमस्कार त्याला आणि नंतर विघ्नहर्त्या गणपतीला. असे प्राधान्य प्राप्त झालेला  कलश आणि त्याचे पुजन ह्यांच्या मागे अतिशय सुंदर भाव आहे. 

स्वस्तिक चिन्ह काढताच जसा सूर्य त्याच्यावर येऊन आसनस्थ होतो त्याचप्रमाणे कलश सजवताच वरुणदेव त्याच्यांत येऊन विराजमान होतो. जो संबध कमळ-सूर्याचा, तोच संबंध कलश वरुणाचा !

वास्तविक लोट्यात भरलेले, घड्यात भरलेले साधे पाणी. पण कलशाच्या स्थापनेनंतर, त्याचे पुजन झाल्यावर ते पाणी सामान्य पाणी न राहता दिव्य, ओजमय बनते.

तत्त्वायामी ब्रह्मणा वंदमानस्तदाशास्ते यजमानो हावोर्भ ।

अहेळमानो वरुणोहबोध्यु रुहसं मा न आयुः प्रमाषीः ॥

“हे वरुणदेवा ! तुला नमस्कार करून मी तुझ्याजवळ येत आहे. यज्ञात आहुती देणारा तुझ्याकडे याचना करीत आहे कीं, तू आमच्यावर राग धरू नकोस, आमचे आयुष्य कमी करू नकोस ' वगैरे वैदिक दिव्य मंत्रांनी भगवान वरुणाचे आवाहन करून त्याची प्रस्थापना करण्यात येते आणि त्या जलाचा अंगावर अभिषेक करून रक्षणासाठी प्रार्थना केली जाते. 

कलशपूजेच्या वेळचे प्रार्थनेचे श्लोक देखील भावपूर्ण आहेत. त्या प्राथनेनंतर तो कलश, कलश न राहता त्याच्यात पिंड ब्रह्मांडाची व्यापकता जन्म घेते. 

कलशस्य मुखे विष्णुः कंठे रुद्र समाश्रितः ।

मूले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणाः स्मृताः ॥

कुक्षौ तु  सागरा: सर्वे सप्तद्विपा वसुंधरा ।

ऋग्वदो$थ यजुर्वेद: सामवेदो ह्यथवर्ण : ॥

अंगै  साहितः सर्वे कलश तु समाश्रेताः

अत्र गायत्री सावित्री शांतिपुष्टीकरी तथा

आयांतु मम शांत्यर्थ्य  दुरितक्षयकारकः ॥

सर्वे समुद्राः सरितस्तीर्थांनि जलद नदाः

आयांतु मम शांत्यर्थ्य  दुरितक्षयकारकः

आपल्या ऋषींनी पाण्याच्या लहानशा लोट्यात सर्वच देव, वेद, समुद्र, नद्या, गायत्री, सावित्री वगैरेची प्रस्थापना करून पापक्षय व शांतीच्या भावनेने सर्वांना एकाच प्रतीकात आणून जीवनात समन्वय साधला. बिंदूमध्ये सिंधूचे दर्शन घडविले. 

कलशाला जरा व्यापक करा म्हणजे तो कुंभ बनेल. नव्या घरात प्रवेश करण्यापूर्वी कुंभ ठेवण्याची प्रथा देखील  प्रसिद्ध आहे. जलपूर्ण कुंभाप्रमाणे घरही भावपूर्ण आणि नवपल्लवित राहावे अशी मंगळल कामना त्याच्या पाठीमागे आहे. कळशावर किंवा  कुंभावर श्रीफळ ठेवल्याने त्याची शोभा द्विगुणीत होते. श्रेष्ठ व्यक्तीच्या आगमनाच्या वेळी माथ्यावर श्रीफलयुक्त कलश घेऊन उभ्या राहणाऱ्या कुमारिकांना आपण खूप वेळा पाहातो. भावार्द्र आतिथ्य सत्काराचा हा एक आगळा प्रकार आहे.

गुजरातमध्ये नवरात्राच्या निमित्ताने ठेवण्यात येणारा ' गरबा ! हे कलश किंवा कुंभाचेच स्वरूप आहे. मात्र तो सजल असायच्या ऐवजी सतेज असतो. स्थापत्यशास्त्रातही कलशाचे आगळे महत्व आहे. मंदिर आले की, कलश असणारच. कलश म्हणजे शेवटचे दिखर, पूर्णतेचे प्रतीक. भगवंताचे दर्शन घेऊन कलशाचे दर्शन घेतले नाही तर दर्शन अपुर्ण राहाते. ज्ञानेश्वरांनी गीतेला मंदिर व शेवटच्या अध्यायाला ' कलशाध्याय ' म्हटले आहे. 

कलश हे  मानव देहाचे प्रतीक आहे. शरीर पवित्र आहे, सुंदर आहे, दर्शनीय आहे, पण कोठपर्यंत जोपर्यंत जीवनरूपी जल व प्राणात्मक ज्योतआहे तोपर्यत. निष्प्राण शरीर म्हणजे मूर्तिहीन मंदिर !  अमांगलिक, अभद्र! कलशामधील पाणी जसे विशाल  जलराशीचा अंडा आहे तसेच देहरूपी कलशात राहाणारा जीवात्मा व्यापाक चैतन्याचा एक अंश आहे. भगवंताने गीतेत सांगितले की, 'मैमवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः।'  संत तुलसीदासांनीही म्हटले आहे की, देहरूपी घटात राहणारा हा जलरुपी जीवात्मा घट फुटताच जर बाहेरील  विशाल  जल्राशी-रूप चैतन्य प्रवाहात मिसळून गेला तर त्याच्या जीवनाची इतिकर्त्यव्यता समजावी. अश्या प्रकारची मुक्तीच मानवाची परमोच्च सिद्धी अथवा त्याच्या जीवन मंदिराचा कळस मानतात. पूर्णतेच्या अनुभूतीचे प्रतीक अशा ह्या कलशाचे सार्थक दर्शन न घेऊन आपणही पूर्ण बनावे हीच अभिलाषा !


***

(पुढील लेखात  आपण "स्वस्तिक " या प्रातिकाबद्दल माहिती जाणून घेऊया....)

संदर्भ : संस्कृती  पूजन पुस्तक  


मंगळवार, २७ ऑक्टोबर, २०२०

भारतीय संस्कृतीच्या विभिन्न प्रतीकांमध्ये कमळाला सर्वांत अग्रस्थान आहे.

 भारतीय संस्कृतीच्या विभिन्न प्रतीकांमध्ये कमळाला सर्वांत अग्रस्थान आहे.

"कमळ"

नालस्य प्रसरो जलेष्वपि कृतावासस्य कोशेरुचिर्दंडे 
कर्कशता मुखे5तिमृदुता मित्रे महान्प्रश्रयः ।
आमूलं  गुणसंग्रहव्यसनिता देषश्च   दोषाकरे
यस्येैषा  स्थितिरम्बुजलस्थ वसतियुक्तैवतत्र श्रियः॥ '

ज्याची नाळ जळात असूनही खूप लांबवर कित्येक कोस ज्याचा सुवास पसरला आहे, ज्याचा देठ कडक आहे, मुख अतिशय कोमल आहे, जो मित्रांना आश्रय देणारा आहे; पहिल्यापासूनच ज्याला गुणसंग्रहाचे व्यसन आहे आणि दोषांचा ज्याला द्वेष आहे. अशा पाण्यात जन्मलेल्या कमळात लक्ष्मीचा वास आहे, ते योग्यच आहे. '

भारतीय संस्कृतीच्या विभिन्न प्रतीकांमध्ये कमळाला सर्वांत अग्रस्थान आहे. भारतीय संस्कृतीची श्रेष्ठ विचारधारा आणि अनुपम जीवनश्रेणीचा सुभग समन्वय कमळात पाहायला मिळतो. म्हणून भारतीय संस्कृती म्हणजेच कमळ; असे म्हटले तर ते अनुचित होणार नाही. भगवान विष्णूच्या हातात कमळ पाहून संत ज्ञानेश्वरांनी अतिशय मधूर कल्पना केली की,  प्रभूला  ह्या कमळाने खऱ्या ज्ञानी भक्ताची पूजा करण्याची अभिलाषा आहे ! भक्त भगवंताची पूजा करतो ही तर सहज व स्वाभाविक घटना आहे, परंतु भगवंताला भक्ताची पूजा करावी असे वाटणे हयात भक्ताच्या जीवनाची कृतकृत्यता साठलेली आहे. ' भगवंताच्या हातातील  हे कमळ आपल्याला प्राप्त व्हावे ही कल्पना अतिशय रम्य, मधुर ब आकर्षक वाटते. परंतु सुंदर वस्तु प्राप्त करण्यापूर्वी प्रथम स्वतः सुंदर बनावे लागते, तसे कमलासारखे जीवन जगणारालाच ते कमळ प्राप्त होते.

भारतीय वाङ्मय कमळाचे गुणगान करताना थकत नाही, भगवान श्रीकृष्णानेही गीतेमध्ये कमळाला जीवनाचा आदर्श मानून तसे जीवन जगण्याचा आदेश दिलेला आहे.

' बह्मण्याध्याय कर्माणि सङ्ग त्यक्त्वा करोति यः।
लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवास्भसा ॥ '

जो आसक्तीरहित तसाच ब्रम्हार्पण वृत्तीने कर्मे करतो तो पाण्यापासून अलिप्त राहणाऱ्या कमळाप्रमाणे पापापासून अलिप्त राहतो. अनासक्तीचा आदर्श  म्हणजे कमळ. संसारात राहूनही संसाराच्या दोषांपासून मुक्‍त राहण्याची जीवन- दृष्टी कमळ देते. 

जलकमलवत्‌ संसारात राहण्याची कला कमळाकडून शिकण्यासारखी आहे. करूनही न करण्याची किमया ही गीतेची अकर्मण्यावस्थेची पराकाष्टा आहे. एक पौराणिक दंतकथा आहे की, दुर्वासाचे भोजन बनवायला जाणाऱ्या गोपींचा मार्ग पूर आलेल्या यमुनेने अडवला. गोपीनी  कृष्णाला विनंती केली. कृष्णाने सांगितले : ' यमुनेच्या किनाऱ्यावर उमे राहून सांगा की, ' जर कृष्ण ब्रह्मचारी असेल तर हे नदी आम्हाला मार्ग दे! ' गोपींनी तसे सांगितले. नदीने मार्ग दिला. दुर्वासाला आकंठ भोजन करवून परत फिरतांना गोपींना पुन्हा तीच अडचण आली. दुर्वासाने सांगितले : ' नदीला सांगा की, दुर्वास पूर्णतः  उपाशी असेल  तर आम्हाला  मार्ग दे. ' क्रीडा करूनही क्रीडा  न करणारा कृष्ण, जेऊनही न जेवलेले दुर्वास आपल्याला संसारामध्ये जलकमलवत् राहण्याचे शिक्षण स्वतःच्या  जीवनाद्वारे देतात.

कमळाला चिखलात निर्माण करून प्रभूने आपल्याला परिस्थिती निरपेक्ष जीवन जगण्याच्या प्रेरणेचे आगळे दर्शन घडवले आहे. स्वतःच्या आजुबाजूला  चिखल पसरलेला हे, ह्याबद्दल  रडत न बसता कमळ स्वतःचा विकास  साधते. कमळाची दृष्टी नेहमी वर असते. सूर्याकडे पाहून ते स्वतःचे जीवन फुलवते. सूर्यप्रकाश हाच कमळाचे जीवन आहे, सूर्योदयाच्या वेळी उमलायचे आणि सूर्यास्ताच्या वेळी मिट्रन जायचे. केवढी आगळी सूर्यभक्ती ! आपल्या जीवनातही अशी  अनन्य ईशभक्ती असेल  तर वाटेल तसल्या दूषित  वातावरणातही आपला यथोचित विकास साधू शकतो.
मानव परिस्थिती-परवश  किंवा योगायोगाचा गुलाम आहे हि  निराशाजनक विचारधारा भारतीय संस्कृतीला मान्य नाही, योगायोगाने परिस्थितीमुळे वाईट वातावरणात जन्म झाला असेल पण मानव स्वतःचे उच्च ध्येय व दृष्टी उन्नत ठेवील  तर तो मांगल्याकडे जाऊ शकतो अशी भारतीय संस्कृतीची धारणा आहे. चिखलात राहूनही उर्ध्व दृष्टी राखून सूर्योपासना करणारे कमळ ही गोष्ट किती सरळपणे समजावते आहे ! अंधारात वाढलेला मानव प्रकाश प्राप्त करू शकतो ह्या गोष्टीची प्रचीति कमळाशिव्राय दुसरा कोण देऊ शकणार?

कमळ शतदल किंवा सहस्त्र दल असते, भारतीय संस्कृतीला अनेक पाकळ्या आहेत. विभिन्न संप्रदाय, जाती किंवा पंथ ह्यांनी शोभणारी हि संस्कृती आहे. पद्मपरागावर आकृष्ट होऊन विश्वातील मानव-भ्रमर भारतीय संस्कृतीच्या आसपास फिरत आहेत. ह्या संस्कृतीचे अमृतपान करणारे नरवीर, विश्वाच्या कोनाकोपऱ्यातही तिचे महिमागान करताना थकले नाहीत आणि म्हणून भारतीय संस्कृतीला आत्मलाघेचा आत्मश्लाघेचा दोष स्वतःवर घ्यावा लागत नाही. 

कमळ हे सौंदर्याचे प्रतीक आहे, कवींनी प्रत्येक अंगाला कमळाची उपमा दिलेली आहे. भगवंताच्या अवयवांनाही कमळाची उपमा देऊन ऋषी  मुनींनी त्याचे पुजन केले  आहे. जसे : हस्तकमल, चरणकमल, हृदयकमल, नयनकमळ, वदनकमळ वगैरे. भारताच्या स्थापत्य वास्तुशात्रात राहून राहून कमळ नजरेला पडते साहित्यातूनही जर कमळाला बाद करण्यात आले तर सरस्वतीचा एक महत्त्वाचा दागिना हरवला गेला आहे असे वाटेल, ज्याच्या उपमांचे कौतुक केले जाते. अश्या महाकवी कालिदासाने अनेक ठिकाणी कमळाचा आधार घेतलेला आहे. पंडितराज जगनाथ स्वतःच्या अन्योक्तीमध्ये  कमळाला  वगळू शकले नाहीत. राजर्षि मर्तृहरी तर सांगतात : कमळाशिताय असलेले सरोवर माझ्य़ा हृदयाला शूळासारख्या वेदना देते. पाणी व  कमळ ह्यांची शोभा अन्यन्याश्रयी आहे.

पयसा  कमलं कमलेन पयः ।
पयसा कमलेन विभाति सर: ॥

पाण्यामुळे कमळ शोभते, कमळाने "पाणी; आणि पाणी व  कमळ ह्या दोषांमुळे सरोवर शोभते. !
सारांश, कमळ म्हणजे अनासक्तीचा आदर्श, मांगल्याचा महिमा, प्रकाशाचे परजन, सौंदर्याची निर्मिती आणि जीवनाचे दर्शन ! म्हणूनच कदाचित्‌ आपल्या देवांनी कमळाचा पूर्णतः स्वीकार केला असावा. ब्रह्मा कमलासन आहे, विष्णु कमलहस्त आहे, लक्ष्मी कमळजा आहे आणि सूर्य तर स्वतःच्या नभाच्या नील  सरोवरात असलेले रक्तकमळ आहे.

एका कवीने कमळाला उद्देशून यथार्थच म्हटले आहे कीं ' हे पुंडरीक ! लोकधात्री लक्ष्मी तुझ्यात निवास करते, जगन्मित्र  सूर्याची तुझ्यावर अपार प्रीती आहे आणि भ्रमर एखाद्या बंदीजनाप्रमाणे तुझे यशोगान गात असतात. तुझ्याशी दुसऱ्या कोणत्याही फुलाची तुलना होऊ शकत नाही.तुझ्यासारखा तूच आहेस !

***

(पुढील लेखात  आपण "कलश " या प्रातिकाबद्दल माहिती जाणून घेऊया....)

संदर्भ : संस्कृती  पूजन पुस्तक  सोमवार, २६ ऑक्टोबर, २०२०

ओंकार हा फक्त एक ध्वनीच प्रतीक नाही हे संपूर्ण विश्व आहे

 ओंकार हा फक्त एक ध्वनीच प्रतीक नाही, हे संपूर्ण विश्व आहे.

 ( ओंकार )  

ओंकारः सरमंत्रणामुत्तम: परिकीर्तितः ।
ओंकारेण  प्लवैनैव संसाराब्धि तरिस्यसि ॥


सर्व मंत्रांमध्ये ओंकार उत्तम रीतीने ख्याति पावलेला आहे. ओंकाररूपी होडीनेच संसार-सागर तरू शकू.  

जगामध्ये जन्म घेणारा प्राणीमात्र मर्त्य आहे. मृत्यूच्या पाशातून सुटण्यासाठी देवानी वेद-त्रयीचा आश्रय घेतला, "छद" -घातु आच्छादनार्थक आहे. देव वेदांच्या गुहेत लपले म्हणून वेदांना “ छन्दस्‌ ' अशी संज्ञा प्राप्त झाली. परंतु तेथेही मृत्यूने देवाचा पिच्छा केला तेव्हा देवानी ओंकाराचा आश्रय घेतला. हा ओंकार वेदांच्या किल्ल्यात असलेले  दुरीम व अभेद्य स्थान. तेथे मृत्यूला प्रवेश मिळाला नाही, देव अमर झाले. ओंकाराचे हे सामर्थ्य ध्यानात घेऊन उपनिषदांच्या ऋषींनी माणसाला सल्ला दिला की, “ज्याला मृत्यूच्या भयापासून सुटायचे असेल त्याने ओंकाराची उपासना करावी, ओंकाराचा महिमा  उद्घोषित  करणारी ही आख्यायिका छांदोग्य उपनिषदात सांगण्यात आलेली आहे. ओंकार  म्हणजे वेदत्रयीचे सार. ओंकाराची विद्याही अक्षरविद्या आहे, अक्षर म्हणजे अविनाशी व अविनाशी म्हणजे परब्रह्म,। ओमित्येकाक्षरं ब्रह्म ' ह्या शब्दानी भगवंताने त्याचा महिमा वर्णन केला आहे. वेदांच्या उपासनेपासून फार फार तर स्वर मिळेल. पण ओंकाराच्या उपासनेपासून साक्षात अमृतत्वाची प्राप्ती होते,. 

ओंकाराचीच ' प्रणव '  ' उद्‌गीथ ' अशी दुसरी दोन नावे आहेत. ' नु ' घातूचा अर्थ आहे, स्तुती करणे. ह्या धातुला ' प्र ' उपसर्ग लावून  प्रणव ' शब्द बनला आहे, त्याचा अर्थ प्रकर्षरित्या केलेली स्तुती किंवा उत्तम स्तोत्र असा होऊ शकतो. उत्तम स्तोत्र परब्रम्हाची स्तुतीच असते. परब्रम्हाची स्तुती करताना सर्वच वाङ्मय अपुरे असल्याचे सिद्ध होते. तेथे शब्द-चापल्य कामाला  येत नाही. ' यतो वाचो निर्वतनते मनसा सह। '

ओंकाराचे दुसरे नाव ' उद्गीध ' आहे. “गै ' धातूचा अर्थ आहे  गाणे. ! त्याला  ' उत्‌ ' उपसर्ग लावून हा  शब्द बनवला आहे. त्याचा अर्थ देखील उच्च गीत किंवा उत्तम स्तुती असाच होतो. शब्द जेथे पोचत नाहीत अशा त्या परब्रम्हाचे उत्तम स्तवन करण्याच्या हेतूने ऋषींनी सर्व संकेत ज्याच्या साडेतीन मात्रामध्ये सामावले जातील अशा ओंकाराचा प्रयोग केला. ' तस्य वाचकः प्रणवः '  हा ध्वनी परब्रह्माचा वाचक बनला. छांदोग्य उपनिषदात अशीच एक दुसरी कथा आहे. देव व दानव ह्यांच्यात झालेल्या संग्रामात असुरांचा पराभव करण्यासाठी देवांनी 'उद्गीथ'चा आश्रय घेतला, परंतु * उद्गीथ "चा स्पष्ट अर्थ ध्यानात न असल्यामुळे त्यांनी श्वाशोच्छ्वास, वाणी, डोळे, कान, मन वगैरेंची अनुक्रमाने ' उद्गीथ 'समजून उपासना केली.  पण त्यात त्यांचे जमले नाही. असुरांनी इंद्रियांवर पापाचा मारा करताच नाक सुगंधाबरोबर दुर्गधही घेऊ लागले. डोळे शुभाबरोबर अशुभही पाहू लागले, कान न ऐकायचे तेही ऐकू चागले. वाणी सत्याबरोबर असत्यही बोलू  लागली आणि मन संकल्प- विकल्पात भटकू लागले. 

शेवटी देवांनी हृदयस्थ प्राणाची ' उद्गीथ ' रूपात  उपासना सुरू केली. त्याच्यावर केलेले  असुरांचे प्रहार निष्फळ ठरले  आणि शेवटी असुरांचा नाश झाला. ह्याप्रमाणे निःस्वार्थ रीत्या इंद्रियांचे रक्षण करणारा प्राण निष्पाप आहे आणि 'प्रणव ' हे प्राणाचे प्रतीक आहे. माणसाच्या जीवनाला  आवश्यक अशी ऊब प्राणापासून मिळते व विश्वाच्या जीवनाला आवश्यक अशी उष्णता सूर्यापासून प्राप्त होते. सूर्य हा  विश्वाचा प्राण आहे. अशा दृष्टीने पाहता अमृतत्वाच्या प्राप्तीची इच्छा  करणाऱ्याने प्राण व सूर्य ह्यांची उपासना ओंकार रूपात केली पाहिजे.

छांदोग्य उपनिषदात एक मूलभूत दांपत्याची कल्पना आहे. हे दांपत्य वाणी व  प्राणाचेच आहे आणि दोहोंचे मिलन ओंकारातच होते. वाणी व प्राण ह्यांच्या विशिष्ट संयोगानेच ओंकाराचा उच्चार होतो. दुसऱ्या भाषेत सांगायचे झाले तर ओंकाररूपी बालकाला जन्म देऊन वाणी व प्राण ह्यांचे दाम्पत्य-जीवन कृतार्थ  बनले, बृहस्पतीने देखील त्याची  उद्‌गीथ ' रूपाने उपासना केली  आहे. 'बृहत'  म्हणजे वाणी आणि तिचा “पति म्हणजे, “ प्राण. ' वेदांमधील तो बृहस्पती तोच पुराणातील 'गणपती'.

 साडेतीन अक्षरांचा बनलेला आहे. त्यातील पहिली मात्रा “अ'कार आहे. दुसरी मात्रा ' उ 'कार आहे, तिसरी मात्रा “म 'कार आहे. आणखी अर्धी मात्रा हे सर्व मिळून असा ओंकार  झालेला आहे. प्रत्येक मात्रा भिन्न भिन्न  क्षेत्रातून वेगळे वेगळे सुचवते. जर सृष्टीच्या व्यापकतेचा  विचार केला तर “अ 'कार ह्या पहिल्या मात्रेत पृथ्वी व्यापक आहे, 'उ' कारात अंतरिक्ष आणि “म 'कारात देवलोक व्याप्त आहे. सृष्टीची उत्पत्ती, स्थिती व लय ह्यांचा विचार केला तर 'अ 'कार हा उप्पत्ती सूचक आहे, 'उ 'कार हा स्थिती सूचक आहे व “प्र 'कार हा लायचे सूचक आहे. 

जीवात्माच्या तीन स्थितीत विश्व, तेजस्‌, आणि प्राज्ञ ही अनुक्रमें “अ कार, “उ 'कार आणि 'म 'कार ह्यांनीच व्याप्त होतात, ओंकारात “अ 'कारावर भर दिला तर अधिभौतिक ऐश्वर्याची प्राप्ती होते, 'उ कारा - वरचा भर आधिदैविक  सामर्थ्याचे सूचक आहे आणि तिसरी मात्रा “म "कारावर ध्यान केंद्रित करण्यात आले तर ब्रम्हाच्या  साक्षातकारात साहाय्यभूत होते. त्याच्याद्वारे जीवनाची सार्थकता साधता येते. जीवन अमृतमय बनते. 

ह्या तिन्ही मात्रा मानवी शक्तीचे प्रतीक आहे. इंद्रियांकडून होणारी कर्मे, मनाकडून होणारी कर्मे व बौद्धिक कर्मे, ह्या तीनही कर्मांना  कार प्रभावी व तेजस्वी बनवतो.  अर्थात्‌ मानवाने त्याचा अंतरबाह्य योग्य रीतीने विनियोग करणे आवश्यक आहे.

शेवटी राहिली अर्धी मात्रा. ही मागील  तिन्ही मात्रा-'अ 'कार, “उ कार व “म कार ह्यांच्या सहयोगाची सूचक आहे. ती भूतमात्र प्रत्येकाची सहिष्णुता व  सर्वव्यापी भगवत्‌ तत्त्वाची सूचना देते. तेजस्वी व पाप-पुण्यापासून अलिप्त अशा शांत आत्म्याचे ती प्रतीक आहे.

ब्रह्मवादी लोकांच्या यज्ञ, दान, तप इत्यादि क्रिया ओंकाराचा उच्चार करूनच सुरू होतात, असे भगबान अर्जुनाला  सांगतात,

तस्मादोभित्युदाह्रत  यज्ञदानतपः क्रिया: ।

प्रवर्तन्ते  विघानोक्ताः सततं ब्रम्हवादिनाम्‌ ॥ '

वेदमंत्र  कारपूर्वकच उच्चारले जातात. ओंकाराशिवाय वैदिक मंत्र लंगडे गणले जातात, ओंकारपूर्वक केलेली कोणतीही कर्मे सात्विक बनतात.  कार हा कर्माच्या प्रारंभात, अंधारात दीपक किंवा  वाळवंटात वाट दाखविणाऱ्या माहितगारासारखा आहे. आरंभलेल्या कामाला शेवटपर्यंत पोचविण्यात तो मदत करतो. एवढेच नाही तर कर्मात असलेले दोषदेखील तो दूर करतो. कर्माच्या बंधनातून सुटण्यासाठी ऋषीनी एक युक्ती शोधून काढली आणि ती युक्ती आहे ओंकाराची. कर्माच्या आरंभात “ तत्सत्' म्हटल्यानंतर यज्ञ, दान इत्यादि कर्मे बाधक न बनता मोक्षदायके बनतात. 

कार बिन्दु सयुंक्तम   नित्यं ध्यायन्ति योगिनः।

कामदं मोक्षदं चैव  काराय  नमो नमः| "

समग्र  विश्व  कारात सामावले जाते. इच्छासिद्धी व मोक्षप्राप्ती सर्वच ज्यात  समाविष्ट होते, अशा  काराचे योगीजन सतत ध्यान करतात.

काराची उपासना करण्यासाठी योग्य अधिकार असला पाहिजे. दृश्य किं श्राव्य जगाच्या विषयासाठी संपूर्ण विरक्ती निर्माण होत नाही तोंपर्यंत काराची उपासना करणे हा अनधिकारी प्रयत्न आहे. दृष्टानुश्रविक विषय वितृष्णस्य वशिकार संज्ञा चेराग्यम्‌ । ( योगसूत्र ) ज्याने जीवनात दंद्वामध्ये संतुलन ठेवण्याचे शिक्षण घेतले आहे, ज्याची वृत्ती अनासक्त बनली आहे, वैराग्यमय बनली आहे तोच काराच्या उपासनेचा अधिकारी गणला जातो. कार उच्चारण्यातील काही शारीरिक लाभ ध्यानात घेऊनही तो उपास्य म्हणून सार्वजनिक होऊ शकत नाही. म्हणून तशा लोकांना काराचा जप करायळा न सांगता सगुण-साकार भगवंताची उपासना समजावली पाहिजे. आणि म्हणूनच सामान्य लोकात केवळ चा जप न करता हरि नमः शिवाय किंवा  नमो भगवते वासुदेवाय वगैरेचा  जप करण्याची पद्धती आहे. जुन्या काळात तर फक्त खऱ्या अर्थाने संन्यासी झालेले लोकच चा जप करीत होते. 

 हे अनुभूतीसूचक प्रतीक आहे. ते ओंकाराचे सूचक आहे आणि म्हणून  द्वारा प्राप्त होणाऱ्या उत्तरात आपल्या वृत्तीचे प्रप्रतिबिंब पडते. तसाच आपल्या विचारांचा प्रतिध्वनी ऐकायला मिळतो. आपण जर विचारले :  भगवान आहे का ' तर “  उत्तर देईल, ' होय आहेच ! ' ' भगवान  आपल्याला  भेटेल का! ' “  ' सांगेल; ' हां; भेटेलच ! ' ' भगवान भेटणे कठीण आहे का? '  सांगेल  : ' हो; कठीण आहे. ' ह्याप्रमाणे निराश झालेल्याला तो हिम्मत देतो आणि उताविळ बनलेल्याना साधना व  तपश्‍चर्या ह्यांचे महत्व समजावतो.  कार आपल्याला वेडा आशावाद व दुर्बल निराशावाद ह्यांच्यात संतुलन ठेवायला  शिकवतो.

सारांश, कार परब्रह्माचे प्रतीक आहे. ब्रह्मविदयेचा समग्र अर्थ  कारात संकलीत झालेला आहे. म्हणून तीन मंत्रांनी समग्र सृष्टीला सामावून घेतो, तर शेष उरलेल्या अर्ध्या मात्रेने सृष्टिकार्याला स्वतःमध्ये समाविष्ट करून घेतो. तो आसक्तीचे भरतवाक्य आहे आणि अनासक्तीची नांदी आहे. तो प्राण, वेद व परब्रह्म ह्यांचे तेजःपुंज असे प्रतीक आहे. काराला जर त्याच्या खऱ्या अर्थात आत्मसात करून घेतले  तर विश्वंभर स्वतः आपल्या हृदयांगणात येऊन खेळू लागेल. म्हणूनच उपनिषदांनी उद्घोष केला आहे की, 

 ओंकारप्रभवा देवा आओंकारप्रभवाः स्वरा: ।

 ओंकोरप्रभवं सर्व त्रेलोक्यं सचराचरमू ॥

*****

(पुढील लेखात  आपण "कमळ" या प्रातिकाबद्दल माहिती जाणून घेऊया....)

संदर्भ : संस्कृती  पूजन पुस्तक 


शनिवार, २४ ऑक्टोबर, २०२०

दसरा म्हणजे भक्ती व शक्ती ह्यांचे पवित्र मिलन

दसरा म्हणजे भक्ती व शक्ती ह्यांचे पवित्र मिलन !

' यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर:।

तत्र श्रीर्वीजयो भूतीर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम ॥ '

जेथे योगेश्वर कृष्ण आहे, धनुर्धंर पार्थ आहे तेथेच विजय आहे. लक्ष्मी आहे, कल्याण आहे आणि शाश्वत शान्ती आहे असे माझे मत आहे; असे संजयाने गीतेच्या अंतिम श्लोकात  म्हटले आहे. योगेश्वर कृष्ण म्हणजे ईशकृपा, आणि धनुर्धर  पार्थ म्हणजे मानव प्रयत्न ह्या  दोहोंचा जेथे संगम होतो तेथे काय असंभव आहे ? वाढता मानव प्रयत्न आणि अवतरत्या ईशकृपेचे जेथे मिलन होते तेथे विजयाचाच धंटानाद संभवतो ही निर्विवाद घटना आहे. दसऱ्याचा उत्सव म्हणजे भक्ती व शक्ती ह्यांचा समन्वय समजावणारा उत्सव.  नवरात्राचे नऊ दिवस जगदंबेची उपासना करून शाक्ति प्राप्त केलेला मनुष्य विजय प्राप्तीसाठी येथे नाचू लागणे अगदी स्वाभाविक आहे. ह्या दृष्टीने पाहता दसऱ्याचा उत्सव म्हणजे विजय प्रस्थानाचा उत्सव. 

भारतीय संस्कृती वीरतेची पूजक आहे. शोर्यांची उपासक आहे. व्यक्ती व समाज ह्यांच्या रक्तात वीरता प्रगटावी ह्यासाठी दसऱ्याचा उत्सव आहे. जर युद्ध अनिवार्यच असेल  तर शत्रूच्या हल्ल्याची वाट न पाहाता त्याच्यावर चढाई करून त्याचा पराभव करणे ही कुशल राजनीती आहे. शत्रूने आपल्या राज्यात घुसून लुटमार केल्यानंतर त्याच्याशी लढाईची तयारी करण्याएवढे आपले पूर्वज नादान नव्हते ते तर शत्रूचा दुर्व्यवहार कळताच त्याच्या सीमेवर अचानक हल्ला करीत. रोग व शत्रू द्याना उत्पन्न होताच दाबले पाहिजे. एकदा जर त्याचे पाय पसरले  गेले  तर मग त्याच्यावर ताबा मिळविणे मुश्‍किल बनते. 

प्रभु रामचंद्राच्या वेळेपासूनच हा दिवस विजय प्रस्थानांचे प्रतीक बनला आहे. भगवान रामचंद्राने रावणावर मात करण्यासाठी ह्याच दिवशी प्रस्थान केले  होते. छत्रपती शिवाजीनेही औरंगजेबाला जेरीस आणण्यासाठी ह्याच दिवशी प्रस्थान करून हिन्दु धर्माचे रक्षण केले होते. आपल्या इतिहासात अशी अनेक उदाहरणे आहेत की, हिंदु राजे ह्या दिवशी विजय प्रस्थान करीत होते.

पावसाच्या कृपेने मानव धनधान्याने समृद्ध झालेला असतो, त्याच्या मनात आनंद मावत नसतो, नसानसात उत्साहाची कारंजी उसळत असतात अशा वेळी व्याळा विजय प्रस्थान करावे असे वाटते हे अगदी स्वाभाविक आहे. शिवाय पाऊस संपलेला असल्यामुळे रस्त्यावरीळ चिखल वाळलेला असतो, हवामान अनुकूल असते, आकाश  स्वच्छ असते. असे वातावरण युद्धाला अनुकूलता प्राप्त करून देणारे असते. नऊ-नऊ दिवस जगदंबेची उपासना करून प्राप्त केलेली ठाक्तीही शात्रचा संहार करायला प्रेरक होत असते.

रघुराजावरही सीमोल्लंघन करण्याचा प्रसंग आला होता. रघुराजाकडे वरतंतूचा शिष्य कौत्स गुरुदक्षिणेसाठी सोन्याच्या चौदा कोटी मोहरा मागायला आला होता. सर्व दक्षिणा दान करून शरदाच्या मेघाप्रमाणे रघुराजा निष्कांचन झालेला होता. रघुराजांला वाटले, वेदविद्या व्रतस्नातक गुरुदक्षिणेसाठी आपल्याजवळ आला आणि तो रिकाम्या हातानी आपल्या आंगणातून परत गेला  तर आपल्या सात पिढ्या लज्जित होतील, हा अध:पात आपण होऊ देणार नाही.

रघूने कुबरे, जो नेहमी धन-संग्रह करूनच बसलेला असतोसीमोल्लंघनाचे 'अल्टीमेटम ' पाठविले. घाबरून कुबेराने शमी वृक्षावर सोन्याच्या मोहरांचा पाऊस पाडला . शमी वृक्षाने वैभव दिले म्हणून त्यांचे पूजन होऊ लागले. पांडवानी आपली दिव्य अस्त्रे  शमी - वृक्षावर लपवून ठेवली होती म्हणूनही त्यांचे माहात्म्य वाढलेले आहे.

रघूने शमीवृक्षावर पावसाच्या रूपात पडलेल्या सोन्याच्या मोहरा कोत्साला दिल्या. चौदा कोटीपेक्षा अधिक घेणार नाही असा त्याने आग्रह धरला आणि तुझ्या निमित्ताने आलेली ही संपत्ती आहे तेव्हा अधिक झालेल्या संपत्तीने मी माझी तिजोरी भरणार नाही असा आग्रह्म रघुने धरला, वैभव न घेण्यासाठी धरलेला आग्रह कदाचित्‌ केवळ भारतातच, पाहायला  मिळेल , जादा असलेल्या सोन्याच्या मोहरा लोकांकडून लुटविल्या गेल्या.

सुवर्णमोहरांचे प्रतीक म्हणून आम्ही शमीूजनानंतर शमीची पाने आपण एकमेकांना देतो. जे वैभव  मिळाले  आहे ते मी एकटा भागणार नाही,आपण सर्वे मिळून भोगू या. आपण वाटून खाऊ. केवढा उदात्त भाव ! 

दसऱ्याचा दिवस म्हणजे समाजात असलेल्या दीन, हीन, लाचार तसेच भोगवृत्तीचा संहार करण्यासाठी कटिबद्ध होण्याचा दिवस. बाह्य शत्रूबरोबरच  आत बसलेल्या षडरिपूवर विजय मिळविण्यासाठी कृतनिश्चयी बनण्याचा  दिवस! दसरा म्हणजे वीरतेचे वैभव, शौर्याचा शुंगार व पराक्रमाची पूजा ! दसरा म्हणजे भक्ती व शक्ती ह्यांचे पवित्र मिलन !

संदर्भ : संस्कृति पूजन पुस्तक 
शुक्रवार, २३ ऑक्टोबर, २०२०

प्रतीके ही आपली सांस्कृतिक सूत्रे आहेत

प्रतीके ही आपली सांस्कृतिक सूत्रे आहेत 

प्रतीक दर्शन 

 

    प्रतीके ही आपली सांस्कृतिक सूत्रे आहेत. सूत्रे थोडक्यात असतात, असंदिग्ध असतात, सारगर्भित व

 व्यापक अर्थ प्रगट करणारी असतात. प्रतिकाबद्दल तसेच आहे. जसा एका लहानशा सूत्रात अनंत अर्थ

 सामावलेला असतो, एका लहानश्या बी मध्ये विशाल  वृक्षाचा विस्तार सामावलेला  असतो तसा प्रत्येक 

प्रतीकामागे भव्य भावनांचा सुगंध  लपलेला असतो. हो भावनाच प्रतीकांना अर्थवान, सार्थथ्यशील व जीवंत

 बनवते. 

  भौतिकरीत्या पाहता राष्ट्रध्वज  हा कापडाचा लहानसा तुकडा आहे. याचे काही विशेष मूल्य नाहो, परंतु

 सांस्कृतिक भावनेच्या दृष्टीने पाहता तो अमूल्य आहे. राष्ट्रातील  कोट्यावधी  जनतेच्या प्राणापणानेही त्याचे

 रक्षण केलेच पाहिजे. बांगड्या व कुकू ह्याच्यासारख्या सामान्य वस्तू जेव्हा स्रीच्या सौभाग्याचा विषय बनून

 उम्या राह्वातात त्यावेळी त्यांच्यामागे असलेली भावना ही लहानशा वस्तूंचे मूल्य अनेकपटीने वाढविते.

 सामान्य दगडाला शेंदूर फासताच तो दगड न राहाता तो देव बनतो. त्याची पुजा होते. प्रतीक ही मौनाची

 भाषा आहे. शान्तीचे संगीत आहे. संस्कृतीच्या महिम्याचे मूकगीत आहे. प्रतीकोपासना म्हणजे बिन्दुमध्ये 

सिंधू पाहाण्याची हिम्मत किंवा घागरीत सागर सामावण्याची शक्ती, प्रतीक म्हणजे भाषेशिवाय भाव व्यक्त

 करण्याची कला, प्रतीक म्हणजे शब्दांच्या गैरहजेरीत विचार व्यक्त करण्याची व्यवस्था, प्रतीक म्हणजे

 संकेतात शास्त्ररहस्य समजावण्याचे आगळे विज्ञान. 

    प्रवृत्तीमध्ये गळ्यापर्यंत बुडालेल्या आजच्या काळातील प्रत्येक मानवाचा व्यवहार वरवरचा बनला आहे.

 त्याच्या हास्यात प्रसन्नता नाही किंवा त्याच्या रुदनात अंतःकरणाची खरी व्यथा नाही, त्याच्या सेवेत प्रेम

 नाही की, त्याच्या कृतीत तत्परता नाही. त्याच्या अभ्यासात एकाग्रता नाही किंवा भक्तीत तल्लीनता नाही. 

त्याच्या संसारात अनुरक्ती नाही, त्याच्या संन्यासात विरक्ती नाही. सारांश, ह्याच्या जीवनाचा विस्तार

 वाढलेला आहे? पण त्याने जीवनाची खोली  गमावलेली आहे. ती खोली  पुन्हा प्राप्त करण्यासाठी मानवाने

 प्रतीकामागे लपलेला दिव्य अर्थ समजून घेण्यासाठी शाखांचे सखोल अध्ययन केले पाहिजे, मनमंदिरात

 दिवा पेटवला पाहिजे, तसेच हृदय सागराचे मंथन करण्यासाठी अविश्रान्त परिश्रम केले पाहिजेत.

    प्रतीकाच्या माध्यमातून महान सांस्कृतिक विचारधारा सहज व  सरळ रीतीने संक्षेपात व्यक्त होऊ

 शकते. विरक्त वृत्तीने संसारात राहून संन्यस्त जीवन जगणाऱ्या माणसाचे वर्णन करायचे असेल  तर

 त्यासाठी लांबलचक व्याख्यान देण्याएवजी कमळाची आठवण केली तर " जलकमलवत " एवढेच बोलून

 आपले काम पुरे होईल. जीवनात पाळावयाच्या विविध सूचना ' उंबरठा ' सहज रीतीने करून देतो.  तिलक

 बुद्धिपूजेचा महिमा समजावतो. स्मशानघट ' नश्वर जीवनाकडे आपले लक्ष खेचून घेतो. संस्कृत नाटककार

 स्वतःच्या नाटकाच्या सुरुवातीला मांगल्यमूलक ' नांदी ' लिहीत असत, परंतु एवढी साहित्यसाधना किंवा

 कविताशक्ति ज्याच्या जवळ नाही तो केवळ " स्वस्तिक" चे प्रतीक काढून स्वतःच्या कार्याचे शुभ किंवा

 मांगल्य सहजपणे प्रकट करू शकतो. अशिक्षित माणूसदेखीळ निशाणी पाहून मतदान करू शकतो

 त्याच्यासारखे हे आहे.

    ह्याप्रमाणे प्रतीकांची उपासना जर जागृत ज्ञानपूर्वक करण्यात आली तर हे सांस्कृतिक संकेत आपल्या

 जीवनात प्रेरक, पोषक, प्रोत्साहक तसेच कार्यसाधक बनतील, संस्कृतीची सर्वच प्रतीके आपण संपूर्णरीत्या 

समजलो आहोत असे म्हणणे ही बौद्धिक बालिशता समजली जाईल. त्यांची उपासना किंवा यथाशक्ती पूजा

 करता येते. तशीच बुद्धीची कृतज्ञता हे जीवनाचे किंचित साफल्य समजता येईल. प्रतीकोपासना आपल्या

 जीवनात अशा प्रकारची कृतार्थता व अशा प्रकारचे साफल्य निर्माण करो.  


(पुढील लेखात  आपण ओंकार या प्रातिकाबद्दल माहिती जाणून घेऊया....)

संदर्भ : संस्कृती  पूजन पुस्तक 

सोमवार, १९ ऑक्टोबर, २०२०

नवरात्राचे दिवस म्हणजे शक्तीची उपासना

नवरात्राचे दिवस म्हणजे शक्तीची उपासना


 नवरात्रीचे महत्व 

नवरात्राचे दिवस म्हणजे शक्तीची उपासना करण्याचे दिवस. जगामध्ये कोणतीही  नैतिक मूल्ये केवळ  

चांगली  आहेत म्हणून टिकत नाहीत; तर त्यांचे अस्तित्व टिकवून धरण्यासाठी त्यांच्या पाठीमागे समर्थ 

लोकांच्या तपश्चर्येचे पाठबळ असणे आवश्यक असते. जगात तपश्चर्येला यश मिळते, हि  गोष्ट सत्याच्या 

उपासकानी विसरता कामा नये. तपश्चर्येच्या बळाने जगात पुष्कळ वेळा असत मूल्ये देखील विजयी 

झाली  आहेत, ही गोष्ट आपल्याला उपरोक्त सत्याची अंधुक कल्पना देते. दुर्बळ लोकांचे सत्य, संस्कार 

किंवा संस्कृती ह्यांची कोणी पूजा करीत नाही. 


आश्विन महिन्यात येणाऱ्या ह्या नवरात्र उत्सबाबाबत एक पौराणिक कथा प्रसिद्ध आहे. महिषासुर 

नावाचा एक राक्षस अतिशय प्रभावी बनला होता. त्याने स्वतःच्या सामर्थ्याच्या बळावर सर्वच  देवांना 

व मनुष्यांना 'त्राही माम्‌ ' करून सोडले होते. दैवी विचारांची प्रभा अस्पष्ट बनली होती व 

दैवी लोक भयग्रस्त झाले होते. धैर्य घालवून बसलेल्या देवांनी ब्रह्या, विष्णु व महेश ह्यांची आराधना केली. 


देवांच्या प्रार्थनेने प्रसन्न  झालेल्या आद्य देवांना महिषासुराचा राग आला. त्यांच्या पुण्यप्रकोपातून एक 

दैवीशक्ती  निर्माण झाली. सर्व देवांनी  जयजयकार करून ती  सांभाळली, तिचे पुजन केले, तिला 

स्वतःच्या दिव्य आयुधानी मंडित केली, हृया दैवी शक्तीने नऊ दिवस अविरत युद्ध करून  

महिषासुराला मारले, आसुरी वृत्तीला दाबून, दैवी शक्तीची पुन्हा स्थापना करून देवांना अभय 

दिले. ही दैवी शक्ती तीच आपली जगदंबा .ह्या दिवसात आईजवळ शक्ती मागायची व 

आसुरीवृत्तीवर विजय मिळवायचा, आजही महिषासुर प्रत्येकाच्या हृदयात स्वतःचे स्थान जमवून बसला 

आहे आणि आत असलेल्या दैवी वृत्तीना गुदमरवून सोडले आहे. हा महिषासुराच्या मायेला ओळखले 

पाहिजे. तिच्या आसुरी जुलमा- पासून मुक्त होण्यासाठी आवश्यकता आहे, दैवी शक्तीच्या आराधनेची  

नऊच्या नऊ दिवस अखंड दीप तेवत ठेऊन आई जगदंबेची पूजा  करून तिच्यापासून शक्ती प्राप्त 

करण्याचे दिवस तेच नवरात्राचे दिवस | आपली भ्रान्त समजूत आहे की, असुर म्हणजे मोठ्या दाताचे, 

मोठ्या नखांचे, लांब केसांचे, मोठे डोळे असलेले कोणी भयंकर राक्षस! खरे पाहता असुर म्हणजे 

“असुपु रमन्ते इति असुरः ' प्राणातच रममाण होणारे, भोगातच रममाण होणारे. तसेच मद्दिष म्हणजे  

रेडा, त्या दृष्टीने पाहाता रेड्याची वृत्ती बाळगणारा तो महिषासुर, रेडा नेहमी स्वतःचेच सुख पाहाती. 

समाजात  ही रेड्याची  वृत्ती पसरत चाळली आहे. परिणामतः संपूर्ण समाज स्वार्थी, प्रेमविरहित व 

भावशून्य बनला आहे. समाजात आज व्यक्तिवाद व  स्वार्थेकपरायणता अमर्याद बनून महिषासुर 

रूपात नाचत आहे. हया महिषासुराच्या नाकात वेसण घालण्यासाठी आईजवळ सामर्थ्यं मागण्यांचे 

दिवस म्हणजे नवरात्राचे दिवस ! 

आपल्या वेदानीहि  शक्तीच्या उपासनेला फारच महत्व दिलेले  आहे. महाभारताचे पानन्‌ पान 

बलोपासना व शौर्यपूजा ह्यानी भरलेले आहे. व्यास भीष्म व कृष्ण ह्यांची सर्वच भाषणे तेज, ओज, शौर्य, 

पौरुष व  पराक्रम ह्यानी भरलेली  आहेत. महर्षी  व्यासानी पांडवाना शक्ती उपासनेचे महत्त्व 

समजावले आहे. त्यानी पांडवाना उपदेश केला आहे. की, तुम्हाला जर धर्माची मूल्ये टिकवायची 

असतील  तर हात जोडून, बसून राहून चालणार नाही. शक्तीची उपासना करावी लागेल, अर्जुनाला  

दिव्य अस्त्र प्राप्त करण्यासाठी व्यासानीच स्वर्गात जाण्याची सूचना केली  होती.

अनादि कालापासून आसुरीवृत्ती  सद्विचारावर, देवी विचारावर मात करीत आलेली आहे, आणि देवी 

विचार अडचणीत येताच देवानी भगवंताजवळ शक्ती मागितली आहे, सामर्थ्य मागितले आहे आणि 

आसुरीवृत्तीचा पराभव केला आहे, केवळ  सद्विचार आहेत. तेवढे  पुरत नाहीत. त्यांचे रक्षण 

होणेदेखील  आवश्‍यक आहे. आणि त्यासाठी शक्तीची उपासना आवश्‍यक आहे.

आपणही आळस झटकून, क्षणिक प्रमादाना दूर सारून पुन्हा शक्तीची उपासना सुरू केली  पाहिजे.  

'संघे शक्तिः कळो युगे।' ही गोष्ट ध्यानात ठेवून नवरात्राच्या दिवसात देवी विचारांच्या लोकांची संघटना 

करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, ह्या संघटनेत प्रमुखस्थानी जगदंबा असेल आणि तिच्या भक्तीनेच 

आपल्यात शक्ती प्रगट होईल हे सुचविण्यासाठीच नवरात्राच्या दिवसात गरबा किंबा रास ह्यांच्या 

रूपात देवीच्या भोवती फिरायचे असते. देवीच्या सभोवती फिरता 'फिरता तिला सांगितले  पाहिजे की, 

“माते ! तू आम्हाला सद्बुद्धी दे , आम्हाला संघबळ दे. आमच्या संघबळाच्या आड आमचा अहंकार 

येता, आमची महिषवृत्ती जागृत होते, आमचे द्वेष उफाळून येतात त्याना तू खाऊन टाक.'

आई जगदंबेची आपली  ही उपासना नवरात्रात सुरू होते. पण ती केवळ नऊ दिवसापुरती सीमित 

राहू  नये हे ध्यानात ठेवण्याची गरज आहे. क्षणाक्षणाची शक्ति-उपासना आपल्याला जडवादी जगात 

उभे राहायला शक्ती प्रदान करील, नवरात्राचे दिवस म्हणजे शक्तीच्या उपासनेचे दिवस. आईच्या 

पूजेचे दिवस, 'खा, प्या व  मजा  करा' अश्शा आसुरी विचारश्रेणीवर विजय मिळविण्याचे दिवस. 

संघशक्तीचे महत्व व भक्तीची महत्ता समजावण्याचे दिवस तसेच तपश्चर्येचा महिमा व  एकता ह्यांचे 

महत्त्व समजावणारे दिवस! ह्या दिवसात घुमत असलेला साधनेचा सूर पकडून जीवन समर्पणाच्या 

संगीताने भरून टाका. 

संदर्भ : संस्कृती  पूजन पुस्तक 


रविवार, ४ ऑक्टोबर, २०२०

मध्ययुगीन महाराष्ट्रातील धार्मिक जीवन

मध्ययुगीन महाराष्ट्रातील धार्मिक जीवन

मध्ययुगीन महाराष्ट्रातील धार्मिक जीवन

मध्ययुगात सर्वत्र माणसाचे जीवन हे धार्मिक श्रद्धा, रूढी, आचार यांच्यात पूर्णपणे गुरफटलेले होते. मध्ययुगीन 

मराठी समाज याला अपवाद नव्हता. मात्र या समाजाची निष्ठा कोणत्या तरी एका तत्त्वावर किंवा पंथावर केंद्रित 

झालेली नव्हती तर अनेक पंथोपंथांनी आपापली वेगळी चूल मांडली होती, आपापले स्थान प्रस्थापित केले होते. 

इस्लामी राज्यकर्त्यांच्या अधूनमधून उद्‌भवणाऱ्या अतिरेकाचा अपवाद सोडला तर या विविध पंथात संघर्ष झाला 

नाही. मतभेद जरूर होते, एकमेकांना उघड वा प्रच्छन्न विरोधहि हे पंथ करीत होते परंतु एकूण समाजस्थिती ही

शांततापूर्ण सहजीवनाची होती. याला प्रमुख कारण म्हणजे बहुसंख्य समाजाचे पंथोपपंथ हे प्राचीन भारतीय 

विचारधारातून उद्भवलेले होते. राष्ट्रकूट-यादव यांच्या राजवटींबरोबर वैदिक धर्माला विहीत असे यज्ञयागादि आचार 

लुप्न झाले होते. त्यांची जागा पौराणिक धर्माने--भक्ती मार्गाने घेतली होती. पंढरपूरचा विठ्ठल संप्रदाय, दत्त संप्रदाय, 

रामभक्ती, हे या परंपरेतील. 

वीरशैव हे  शिवाचे उपासक, वेदप्रामाण्य न मानणारे. महानुभाव पंथ हा असाच सीमारेषेवरील. जैन पंथ हा

स्पष्टपणे अवैदिक. इस्लाम हा भारतबाह्य जन्माचा आणि सूफी संप्रदाय हे इस्लामचेच अपत्य. 

या सगल्यया धर्मात व पंथात या काळात मोठमोठे साधुसंत होअून गेले, त्यांनी विपुल वाड्मयनिर्मिती

केली, त्यांची देवालये, दर्गे भक्तमंडळींचे आकर्षण झालेली होती. अशा तर्‍हेचे वैभव न लाभलेला एक धर्म बहुजन 

समाजाच्या आचारविचारावर अधिराज्य करीत होता. याची पाळेमुळे अतिप्राचीन परंपरात रुजलेली होती. त्याचा प्र

भाव जबरदस्त होता, तरीहि आजवरच्या मराठी धार्मिक इतिहासात त्याची दखल घेण्यात आलेली नाही. हा धर्म 

म्हणजे 'लोकधर्म' याचे वाड्मय मुख्यत: मौखिक स्वरूपात होते व तसेच हस्तांतरित होत होते-- ते म्हणजे पदे, 

कहाण्या इ. या सर्वांचा उल्लेख तत्कालीन वाड्मयात, संतसाहित्यात केवळ निषेधपरच आहे पण त्यावरून 

लोकधर्माचा प्रभाव किती जबरदस्त होता याची कल्पना येते. त्याची सविस्तर चर्चा पुढे केली आहे.

धार्मिक जीवनाचा विचार करताना प्रथम विचारात घ्यावा लागतो तो वैष्णव पंथ, त्यातल्या त्यात वारकरी पंथ . 

श्रीविष्णूचे, त्याहिपेक्षा श्रीकृष्णाचे 'विठ्ठल' स्वरूपातील ध्यान हे या पंथाचे केंद्रस्थान -विठ्ठलाचा निवास भीमा तीरावर 

पंढरपूर येथे. विठ्ठल हा बालकृष्णाचे, 'गोपाल' कृष्णाचे रूप आहे अशी सर्वसाधारण समजूत आहे. परंतु 

विठ्ठलमूर्तीचे स्वरूप, तिचा अर्थ आणि काळ याविषयी संशोधकात एकमत नाही. भक्तजनातही निरनिराळी मते

आढळतात . एक गोष्ट जाणवते ती अशी की या पंथाची स्थापना अकराव्या-बाराव्या शतकात झाली असली तरी 

त्याला विशेष मान्यता व लोकप्रियता तेराव्या शतकापासून लाभली. महामुभावांच्या वाड्मयात बीर विठ्ठलाचा 

उल्लेख  आहे असे एक मत आहे--ते या पंथाचे महत्त्व दर्शविते. ज्ञानदेवांच्या, पण मुख्यत: नामदेवाच्या अभंगात 

विठ्ठलाची भक्ती ओतप्रोत भरलेली आहे. यादव नृपती रामचंद्र हा, 'चौऱ्याशीचा लेख' म्हणून प्रसिद्ध असलेल्या 

शिलालेखात स्वत:ला 'पांडरीफडमुख्य' असे म्हणवून घेतो. 

 या पंथाला अफाट लोकप्रियता लाभली ती त्याने सांगितलेल्या ईशप्राप्नीच्या सुलभ मार्गामुळे आणि केंद्रस्थानी 

 असणाऱ्या देवतेच्या “मानवी रूपामुळे  त्यांनी महानुभव पंथासारखी आत्यंतिक संन्यासाची आवश्यकता सांगितली 

नाही, नाथ पंथीयांसारखी खडतर योगसाधना सांगितली नाही. संसारात राहून, रोजचे व्यवहार सांभाळून इष्ट देवतेचे 

भजन, पूजन, स्मरण. दर्शन असे सोपे आचार सांगितले आणि त्या देवतेवर निष्ठा, तिची भक्ती ही मुक्ती मिळवून 

देण्यास पुरेशी आहेत  असे आश्‍वासन दिले. देवताही सुलभ, सुगम अशी होती-आकर्षक होती. श्रीकृष्ण हा माणूस 

म्हणून वागत होता, सगळ्या गोष्टी करत होता. 

कुसूक्षेत्रावरील तत्त्वज्ञ श्रीकृष्ण एवढेच त्याचे रूप राहिले असते तर त्याला इतकी 

लोकप्रियता मिळाली असती असे वाटत नाही. बालकृष्ण म्हणून त्याच्या लीला, गोपालकृष्ण म्हणून त्याचे साहस, 

गोपीसखा हा प्रेमभाव या सगळ्या गोष्टींपर्यंत सामान्य माणसे सहज पोचू शकत होती. महाभारतातील गीतेचा 

प्रवक्ता श्रीकृष्ण हा बुद्धिगम्य होता तर भागवत पुराणातील कृष्णरूप हे भावगम्य होते. या काळात भारतात भक्ती 

संप्रदायाची जी लाट आली तिचे श्रद्धास्थान श्रीकृष्णच होता तो यामुळे. वारकरी पंथाच्या वाढीमध्ये आणखी एक गोष्ट 

ध्यानात घ्यावी लागते--त्याची सामाजिक बाजू. या देवतेचे भक्त हे मुख्यत: एका विशिष्ट समाजगटातून आलेले 

दिसतात. तसेच या देवतेचे मुख्य उत्सव किंवा उपासना दिवस हे या वर्गाची ऐहिक सोय बघूनच उत्पन्न झालेले 

आहेत. हे उत्सव म्हणजे आषाढी आणि कार्तिकी एकादशी. शेतकीच्या कामात उसंत मिळण्याचेच हे महिने

आहित-वारकरी पंथाच्या अनुयायात संख्येने सर्वांधिक आहेत शेतकरी. त्याखालोखाल. त्या व्यवसायाशी संबंधित 

असे “गोपाल' (मेंढपाळ धनगर नव्हेत ! ) दिसतात. ड्तर समाजांना, जातींना त्यांची विशिष्ट दैवते आहेत, संबंधित 

यात्रा, उत्सव आहेत. धनगर मंडळी ही खंडोबाची-त्यातल्या त्यात जेजूरीच्या खंडोबाची उपासक आहेत तर मातंग 

समाजाची यात्रा पालीच्या खंडोबाच्या मंदिरात भरते.

वैष्णव पंथापैकी आणखी दैवते म्हणजे नृसिंह, रामचंद्र आणि दत्तात्रे. रामचंद्राला बरे दिवस येण्यासाठी मध्ययुगाच्या 

शेवटापर्यंत थांबावे लागले. बहुतेक मराठी कवींनी व संतकवींनी रामायणाच्या आवृत्त्या काढल्या असल्या तरी समर्थ 

रामदासांचे कार्य सुरू होईपर्यंत 'राम-संप्रदाय' उत्पन्न झाला नव्हता. नंतर्रह त्याला फारशी लोकप्रियता लाभली 

नाही. 

दत्तात्रेयाला अनुयायी अवश्य होते, जनार्दनस्वामी, एकनाथ, मुक्तेश्‍वर ही सगळी मंडळी दत्तात्रेयाचा अनुग्रह झालेली

 होती. श्रीपाद-श्रीवळुभ आणि श्रीनरसिंह सरस्वती हे प्रख्यात दत्तभक्त, महाराष्ट्रातील दत्तोपासनेचे प्रवर्तक म्हणता

 येतील असे. मात्र दत्तात्रेय हा कधीही खऱ्या अर्थाने बहुजनांचे उपास्य दैवत झाला नाही. कदाचित, सोवळ्या- 

ओवळ्याच्या कडक कल्पना, वर्ण व जाति यांचे स्तोम या सगळ्यांमुळे दत्तपंथीयांची संख्या मर्यादितच राहिली. 

नरसिंह आदि अवतारांची स्थिती याहूनही वाईट होती. देवीची उपासना सर्वत्र होत असे, माहूर (मातापूर),

कोल्हापूर, तुळजापूर, सप्तशृंगी अशा पीठातून भाविकांचा ओघ असला तरी तो मुख्यत: कौटुंबिक, कुळाचाराचा 

भाग म्हणून, शिवाय ती बऱ्याच अंशी कामनिक उपासना होती. देवीच्या भगतांची (भुते इ.) वेगळी जात असली तरी 

वारकरी  पंथासारखा एखादा पंथ, समाजगट उत्पन्न झालेला दिसत नाही. गणेश दैवत प्राचीन काळापासून ज्ञात 

असले तरी  त्याच्या पूजाअर्चेला मोठ्या प्रमाणाबर सुरवात झाली ती पेशवेकाळानंतर. महादेव, शिव, शंकर 

यासारख्या अनेक नावाने भगवान शंकराची पूजाअर्चा प्राचीन काळापासून चालू होती. गावोगाव शिवाची मंदिरे 

होती. किंबहुना यादव  काळात निर्माण झालेली अंबरनाथ, बळसाणे, सिन्नर अशासारख्या ठिकाणची प्रमुख मंदिरे 

शिवाचीच होती.

वैष्णवांचा जसा वारकरी पंथ तसा केवळ शिवाचीच उपासना करणारा पंथ महाराष्ट्रात निर्माण झाला नाही. 

कर्नाटकामध्ये श्रीबसवेश्‍वरांनी स्थापन केलेल्या वीरशैव किंवा लिंगायत पंथाचे अनुयायी मराठवाडा, सोलापूर 

यासारख्या कर्नाटकाच्या नजीकच्या भागात प्रामुख्याने आढळतात. परंतु एकूण लोकसंख्येच्या मानाने त्यांची संख्या 

कमीच आहे. जैन धर्मीयांची संख्या कमीच होती परंतु या 'धर्माला राजमान्यता, राजाश्रयही लाभलेला दिसतो. 

राज्यकर्त्यांचा धर्म म्हणजे इस्लाम, या धर्माचे दोन पंथ म्हणजे सुन्नी आणि शिया. या दोघांचे नित्याचे आचार बरेचसे 

सारखेच होते परंतु सुन्नी हे परधर्मीयांविषयी कडवे तर शिया हे तुलनेने मवाळ म्हणावेत असे. निजामशाहीत व 

कुतुबशाहीत शिया पंथीयांना महत्त्वाचे स्थान होते. शाह ताहीर यांच्या प्रभावामुळे निजामशहांनी शिया पंथ हा 

अधिकृत शासकीय पंथ ठरविला होता ” करबलच्या लढाईत हौतात्म्य प्राप्र झालेल्या हसन व हुसेन यांचे ताजिये 

काढून शोकदिन पाळण्याची प्रथा सगळ्याच सलतनतीत मान्यता पावली. हे झाले विशिष्ट तत्त्वज्ञान वा देवता यांना 

मानणाऱ्या विविध पंथांचे ढोबळ चित्र, या सर्वांपलिकडे जाणारा धर्म, वर सांगितल्याप्रमाणे 'लोकधर्म'. समाजाचा एक 

फार मोठा वर्ग असा होता की ज्याला यापैकी कोणत्याच एका पंथामध्ये विशेष स्वारस्य नव्हते. शिवाय अनेक लोक 

असेहि होते की ज्यांनी यापैकी 'सबादा पंथ स्वीकारला असला तरी परंपरागत लोकधमांचे आचार, कुलाचार ते 

पाळतच होते. घरात पिढ्यान्‌पिढ्या चालत आलेल्या आचारांचा त्याग करणे त्यांना मानवणारे नव्हते, या धर्माचे 

उपासक हे मुमुक्षु- मोक्षप्राप्रीची अपेक्षा करणारे नव्हते. त्यांना परमेश्वरप्राप्तीची ओढ नव्हती. त्यांची अपेक्षा आणि 

त्यांच्या देवदेवता अगदी खर्‍याखऱ्या 'इहवादी' होत्या. त्या लौकिक जीवनाशी दृढपणे बांधलेल्या होत्या, त्यातूनच 

उद्‌भवलेल्या होत्या. त्यांना कुलदेवता, ग्रामदेवता, क्षेत्रपाल, यक्ष अशी अनेक नावे होती किंवा त्यांच्या अनेक कोटी 

होत्या. माणसाच्या रोजच्या जीवनाशी त्यांचे अतूट नाते होते. रोज उठून अनपेक्षित संकटे येत, कधी अतिवृष्टी तर 

कधी अवर्षण; विहीरीचे पाणी अचानक आटे, शेजारून एरवी शांतपणे वहात असणार्‍या ओढ्याला एकाएकी पूर 

लोटे आणि काठावरचे एखादे गुरू, मूल ओढून नेई, पटकी, देवी यासारख्या रोगराया पसरत आणि हे सगळे 

कोणत्या ना कोणत्या देवतेच्या 'अवकृपे' मुळे होई. त्यातल्या त्यात एक बरे होते की देवतेचे जसा कोप होई तशी ती 

प्रसन्नहि होत असे ! जे जे आपल्याला प्रिय ते आपल्या देवतांनाहि प्रिय असणारं, निदान असायला हवे, अशा गाढ 

विश्वासामुळे, श्रद्धेमुळे, भाजीभाकरीपासून तो बोकडारेड्यापर्यंत सर्व तऱ्हेचे नैवद्य दिले जात. शिवाय पितर होते- 

त्यांच्या इच्छा अपूर्ण, अतृप्त राहिलेल्या असत त्या पूर्ण करून त्यांना संतुष्ट करणे भाग होते. अन्यथा ते शाप देत, 

भूतपिशाच्च बनून छळ करीत. या सगळ्या मंडळींनी आपल्या मनाप्रमाणे वागावे म्हणून त्यांना प्रसन्न करून घेणे 

भाग होते. पण नेमक्‍या कोणत्या देवतेचा कोप झाला आहे आणि तिला कसे प्रसन्न करून घ्यावे याची कल्पना 

सगळ्यांना कशी असणार ? त्यांची मागणी काय आहे, त्या कशामुळे कोपल्या हे सामान्य माणसाला समजण्यासारखे

 नव्हते. यासाठी कोणीतरी माहितगार, वाटाड्या हवाच. प्रत्येक देवतेचा 'प्रवक्ता' हवा-भगत हवा. तो तज्ज्ञ. त्याच्या 

अंगच्या शक्तीमुळे तो देवतेशी बोलू शकत असे, त्यांना प्रसन्न करून घेत असे. त्याच्या सांगण्याप्रमाणे नैवेद्य, बळी 

द्याबयाचे, दानधर्म करावयाचा, नवस करायचा आणि फेडायचा. पुष्कळ देवता लहरी असत, आपली जागा सोडून 

एखाद्याच्या शरीरात प्रवेश करीत, त्यांच्या अंगात संचार करीत आणि त्याच्या तोंडून आपल्याला काय हवे नको ते 

वदवीत. या मध्यस्थाचा महिमा मोठा - 1) देवतेचा हा खास विश्‍वातला माणूस, त्याच्या सांगण्याप्रमाणे करणे, त्याचा 

मान राखणे, त्याला प्रसन्न ठेवणे भाग असे. या सर्व देवदेवता अगदी खऱ्या अर्थाने 'अनादि' होत्या. त्यांचा जन्म केव्हा, 

कोठे झाला याचे कोणालाच स्मरण नाही. समाजाची सामूहिक स्मृती पोचते तेथपासून त्यांचा वावर चालू असलेला 

दिसतो. समाजाला त्यांचा दृढ असा परिचय होता. लोकमानसात त्यांचे स्थान पक्के होते. याचा परिणाम असा झाला 

की जे 'उच्च' 'अभिजात' असे धर्मपंथ उत्पन्न झाले. त्यांना या देवदेवतांचा स्वीकार करणे भाग पडले. बौद्ध, जैन, 

हिंदू, कोणताहि धर्म वा पंथ असो, या लोकदेवतांना बाजूला सारणे अशक्यच झाले. त्यांच्याशी काहीतरी संबंध 

जोडून दाखबिल्याशिवाय या नव्या पंथांविषयी लोकांना *आपुलकी' वाटणे शक्‍य नव्हते. मग त्यांना यक्ष, यक्षी, वृक्षी, 

अशी नावे देवून, आणि कोणाला आपल्या देवतेचे द्रारपाल, रक्षक असे स्थान देवून तर कोणाला वहान तर कोणाला 

लांछन (चिन्ह) बनवून आपापल्या देवताकुलात स्थान दिले. परंतु त्यामुळे त्यांचे लोकमानसातले, आचारातले त्यांचे 

स्थान यत्किंचितही कमी झाले नाही. उलट जनक आणि दत्तक अशा दोन्ही घरात त्यांचे माहात्म्य वाढत गेले. त्यांची 

संख्या अपरंपार वाढत गेली.  वारकरी पंथाच्या संतांनी तसेच समर्थ रामदासांनी या देवतांना 'क्षुद्रदेवता' संबोधून 

त्यांचा वारंवार निषेध केला आहे. या निषेधवचनांची पुनरूक्ती आणि त्यांची धार लक्षात घेतली तर या 'क्षुद्र' देवताचा 

समाजजीवनावर केवढा जबरदस्त पगडा मध्ययुगात होता हे स्पष्ट होते. आजही तो तेवढाच दृढ आहे.  थोडे 

घराबाहेर, गावाच्या शिवेबाहेर पडून पाचदहा खेडेगावात हिंडून पाहिले तर, वीर, जाखाई, जोखाई आणि त्यांचे 

असंख्य नातेवाईक यांचे दर्शन घडू शकते. त्यांच्या आसपास वावरणारे भगत, भुते, पोतराज यांची गाठ पडते. 

चारपाचशे वर्षांपूर्वी या 'लोकधर्माचे' सामाज्य किती विस्तृत होते याची कल्पना यावयाची असेल तर मोठाल्या 

संतांची निषेध-वचने पहावीत.

माझी मूर्ती निफजवी । ते घराचे कोनी बैसवी ।

आपण देवोदेवी । यात्रे जाय ॥

नित्य आराधन माझे । काजी कुळदेवता भजे ।

पर्वविशेष कीजे । पूजा आना ॥।

माझे अधिष्ठान घरी । आणि बोवसे आनाचे करी ।

पितृकार्यावसरी | पितरांचा होय |

एकादशीच्या दिवसी । जेतुला पाडु आम्हासी ।

तेतुलाचि नागांसी । पंचमीच्या दिवसी |

चौथ मोटकी पाहे । आणि गणेशाचाचि होये ।

चाबदसी म्हणे माये । तुझाचि बो दुर्गे ॥।

नित्य नैमित्तिके कर्मे सांडी । मग वैसे नवचंडी ।

आदित्यवारी वाढी । बहिरा पात्री ॥

पाठी सोमवार पावे । आणि बेलेसी लिंगा धावे ।

ऐसा एकलाचि आघवे । जोगबी जो ॥

ऐसा अखंड भजन करी । उगा नोहे क्षणभरी ।

अवघेन गावद्वारी । अहेव जैसी ॥

-- संत ज्ञानेश्‍वर


हे झाले ज्ञानेश्‍वरांचे बोल. एकनाथ महाराज म्हणतात--

“ देव म्हणती मेसाबायी । पूजाअर्चा करिती पाही ।

नैवेद्य बाहती नारळ । अवघा करिती गोंधळ ।

मेंढरे बोकडे मारिती । सुकी रोटी तया म्हणती ।

बळेचि आणिताती अंगी । नाचतात शिमगा सोंगा ।

आलो ऐकोनी खंडोबाची थोरी ।

वाघा होवोनी मज मागा म्हणती वारी ।

एका जनार्दनी मज भेटवा पंढरीराव ।

-- संत एकनाथ


यानंतर साक्ष तुकाराम महाराजांची, ती आणखीच तिखट--

नव्हे जाखाई जोखाई । मायराणी मेसाबाई ।

वळिया माझा पंढरीराव । जो या देवांचाहि देव ॥

रंडीचंडी शक्ती । मद्यमांसे भक्षिती ।

बहिरब खंडेराब । रोटी सुकीसाठी देव ।

गणोबा विक्राळ । लाडुमोदकांचा काळ ।

मुंजा म्हैसासुरे । हे तो कोणी लेखी पोरे ।

बेताळे फेताळे । जळो त्यांचे तोंड काळे ।

तुका म्हणे चित्ती । धरा रखुमाईचा पती ॥'

--संत तुकाराम

बर म्हटल्याप्रमाणे या देवतांची उपासना कामनिक, विशिष्ट हेतूच्या पूर्ततेसाठी आणि त्यांची पूजाअर्चा ही 

प्रसंगविशेषी, कारणपरत्वे होत असे. गुरूपूजा, पितरपूजा ही नैमित्तिकातून नित्यात येत असे. या पूजा, ही 

व्रतवैकल्ये  ही एकेका घरात चालत आलेली असत आणि त्यांना “कुलाचार' ही पदवी प्राप्त होई. एकदा ही प्रतिष्ठा 

प्राप्र झाली की त्यातून कोणाचीही सुटका नसे.

सर्वाधिक वाचलेले लेख