गुरुवार, १७ सप्टेंबर, २०२०

पाषाणयुगीन महाराष्ट्र

 पाषाणयुगीन महाराष्ट्र

महाराष्ट्राला 'दगडांचा देश' असे कवीने नाव दिलेले आहे आणि ते महाराष्ट्राची भूरचना लक्षात घेता यथार्थही आहे. त्यामुळेच कदाचित पाषाणयुगीन मानव महाराष्ट्राकडे आकृष्ट झाला असावा. कोकणपट्टी सोडली तर महाराष्ट्राच्या निरनिराळ्या भागामध्ये पाषाणयुगाच्या विविध कालखंडाची दगडाची बनवलेली निरनिराळ्या प्रकारची हत्यारे विपुल प्रमाणात सापडली आहेत

पाषाणयुगीन मानव किंवा त्याचे अस्तित्व दाखविणारा इतर पुरावा मिळविण्याच्या दृष्टीने जवळजवळ सव्वाशे वर्षापासून निरनिराळ्या संशोधकांनी प्रयल केल्याचे दिसून येते. त्यादृष्टीने पाहता पाषाणयुगाचा पहिला पुरावा १८६३ साली मराठवाड्यातील गोदावरीच्या काठी असलेल्या मुंगीपैठण येथे वायने  यांना सापडला. या ठिकाणी त्यांना 'अकीक' वर्गाच्या पाषाणाच्या छिलक्यापासून केलेले एक हत्यार गोदावरीकाठच्या थरांच्या छेदामध्ये आढळून आले. सुमारे सात सें. मी. लांब आणि अडीच सें. मी. रूंद असलेले हे हत्यार काहीसे वक्र असून त्याचे एक टोक बहिर्वक्र होते, दुसरे टोक काहीसे दांड्याच्या स्वरूपातले असून हे हत्यार हाडाच्या किंवा लाकडाच्या तुकड्यात बसवून त्याचा चाकूसारखा उपयोग केला जात असावा, असे वायने यांनी मत मांडले आहे. अर्थात सुरूवातीच्या मतामध्ये नंतरच्या काळामध्ये झालेल्या विस्तृत संशोधनामुळे बदल करणे अपरिहार्य ठरले.

या शोधाने संशोधनाला फारशी चालना दिल्याचे दिसून येत नाही, कारण या क्षेत्रातला दुसरा शोध लागण्यासाठी जवळजवळ चोळीस वर्षांचा अवधी जावा लागला. हा दुसरा शोध १९०४ साली पैठणजवळ गोदावरीकाठी - घट्ट वाळूच्या थरात जंगली हत्तीचे (एलेफस नॅमॅडिकस) अश्मीभूत झालेले अवशेष सापडले. हा हत्ती महाकाय स्वरूपाचा असावा हे, या हत्तीचा जो अश्मीभूत सुळा सापडला त्याचा परीघ १४५ सें. मी. होता यावरून स्पष्ट झाले. याच वर्षी आणखी एका पुराव्याचा शोध महत्वपूर्ण ठरला.

पैनगंगेच्याकाठी अश्मीभूत झालेली प्राचीन जनावरांची हाडे सापडली. याचवेळी भारतीय भूविज्ञान सर्वेक्षण खात्यामधील पिलग्निम यांना नाशिक जिल्ह्यातील नांदूर - मधमेश्‍वर येथे हत्ती आणि पाणघोड्याची अश्मीभूत स्वरूपातील हाडे उपलब्ध झाली. हाही हत्ती प्रचंड स्वरूपाचा असावा हे सुळ्याच्या १२५ सें.मी. परीघावरून सिद्ध झाले. नांदूरमधमेश्‍वरचा हत्ती आणि पैठण येथे सापडलेला हत्ती आकाराने एकाच वर्गाचे असावेत असे सूचित केले गेले. पिलग्निम यांच्या मते या हत्तीची उंची सुमारे ५ मीटर असावी. हा हत्ती एलेफस अँन्टीकस (नॅमॅडिकस) या वर्गांचा असावा असे मत पिलग्निम यांनी व्यक्‍त केले. त्यांनी या हत्तीचे मूळ युरोपमध्ये शोधले. नर्मदाकाठी सापडलेल्या अश्मीभूत पुराव्यानुसार या हत्तीचा काळ पुर्व - प्लायस्टोसीन ' असावा असेही मत त्यांनी व्यक्‍त केले. गोदावरीकाठी सापडलेली पाषाणाची हत्यारे आणि नामशेष झालेल्या प्राणीवर्गाची अश्मीभूत हाडे यावरून महाराष्ट्रामध्ये प्राचीन अश्मयुगामध्ये मानवाचेही अस्तित्व असावे, असे अनुमान करता आले.

या शोधांनी पाषाणयुगीन महाराष्ट्रावद्दल नवीन माहिती उपलब्ध केली तरी पाषाणयुगीन संशोधनाला फारशी चालना मिळालेली दिसत नाही. मात्र $९४० पासून गेल्या पन्नास वर्षात महाराष्ट्रामध्ये पाषाणयुगीन मानवी जीवनावद्दल त्याचप्रमाणे पुरापर्यावरणावद्दल विस्तृत पुरावा शोधण्याचे श्रेय प्रामुख्याने प्रा. सांकलिया आणि त्यांच्या सहकाऱ्यांना दिले पाहिजे. गेल्या पन्नास वर्षामध्ये महाराष्ट्रातील विविध भागामध्ये लहानमोठ्या नद्यांच्या काठी आणि काठाच्या परिसरामध्ये पाषाणयुगाची शेकडो हत्यारे त्याचप्रमाणे नामशेष झालेल्या प्राण्यांची अश्मीभूत हाडे सापडली आहेत. त्याचप्रमाणे ज्याठिकाणी अशी हत्यारे पाषाणयुगीन मानव बनवीत होता अशीही काही कार्यशाळांची (वर्क शॉप) स्थले सापडली आहेत. तापी, गोदावरी, प्रवरा, भीमा, मुळा, घोड,कृष्णा, पूर्णा, पैनगंगा, वैनगंगा, वर्धा, कन्हान, मांजरा इत्यादी नद्यांच्या आणि त्यांच्या उपनद्यांच्या तसेच काही प्राचीन नाल्यामध्ये पाषाणयुगीन हत्यारे फार मोठ्या प्रमाणावर सापडलेली आहेत. यामुळे असे म्हणता येते की कोकण विभागः वगळता महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये मानवाच्या अस्तित्वाचा पुरावा उपलब्ध झालेला आहे. 

महाराष्ट्रातील पाषाणयुगाचे कालखंड वर्गीकृत करण्याच्या दृष्टीने १९३९ साली मुंबईजवळ कांदीवली येथे टॉड यांनी केलेले काम आणि त्यामध्ये प्रा. सांकलियांनी अव्याहतपणे घातलेली भर यामुळे पाषाणयुगाचे निरनिराळे खंड करण्यात आले आणि ते आता पाषाणयुगाच्या अभ्यासात रूढ झाले आहेत. याचे विवेचन करण्याआधी एक गोष्ट स्पष्ट करणे जरूर आहे, ती ही की पाषाणयुगाच्या मानवाची हत्यारे फार मोठ्या संख्येने वरवर पृष्ठसंशोधनामध्ये सापडली आहेत. मात्र जी काही स्तरीय संदर्भामध्ये यथार्थजागी मिळालेली आहेत त्यामुळे या वर्गीकरणाला शास्त्रीय बैठक प्राप्त झाली आहे.तेथ पासूनूचा काळ इतिहासामध्ये जमा होतो. याआधीचा सगळा काळ स्थूलमानाने प्रागितिहासामध्ये समाविष्ट होत असला तरी प्रागितिहासामध्ये बहुतांशी पाषाण अथवा अश्मयुगीन कालखंडांचा अंतर्भाव होतो. या कालखंडाची कालमर्यादा इतिहासकालाच्या कितीतरी पट मोठी आहे.

भारतापुरते बोलावयाचे झाल्यास या युगाची कालदृष्ट्या व्याप्ती १ लक्ष ते  १० हजार वर्षे (सध्यापासून मागे) अशी स्थूलमानाने मांडली गेली आहे. पाषाणयुगाचा अभ्यास भूवैज्ञानिकांनी मांडलेल्या कालखंडाशी निगडीत आहे.या पाषाणयुगातील मानवी जीवनावर 'प्लायस्टोसीन' कालखंडात झालेली 'हिमयुगे' आणि त्यांचा हवामान आणि समुद्राच्या पाण्याच्या पातळीत झालेल्या बदलाचा प्रभाव पडला. अर्थात अशातर्‍हेचे निष्कर्ष युरोपखंडाशी जास्त निगडीत आहेत. 'हिमयुगे' आणि त्यांच्याशी संबध असलेल्या घटनांचा भारताशी कितपत संबंध आला याबद्दल निरनिराळ्या विद्दानात एकमत नाही.

काहींच्या मते काश्मीरसारख्या प्रदेशात या प्रकारचा पुरावा सापडतो.महाराष्ट्रापुरते बोलायचे झाल्यास अशातऱहेच्या घटनांचा महाराष्ट्राच्या भूप्रदेशाशी संबंध आला असावा, असे समजणे धाडसाचे ठरेल.अश्मयुगाचा पुरावा भारतात आणि महाराष्ट्रात तत्कालीन मानवाने वापरलेल्या हत्यारांच्या रूपात आणि त्यांच्याशी निगडीत असलेल्या पण आता नामशेष झालेल्या प्राण्यांच्या अश्मीभूत हाडांच्या स्वरूपात मिळतो. महाराष्ट्रातही अशा तऱ्हेचा पुरावा उपलब्ध झाल्याचे त्याआधी उल्लेखले आहे.

पाषाणयुगाचे तीन प्रमुख खंड पाडले जातात -

१) पुराश्मयुग (Paleolithic)

२) मध्याश्मयुग ( Mesolithic)

३) नवाश्मयुग ( Neolithic )


यातील पूर्व-पुराश्मयुगाची प्राचीनत्व कार्बन - १४ त्याचप्रमाणे युरेनियमथोरियम आयसोटोप पद्धतीचा वापर करून सुमारे १ लक्ष २० हजार वर्षांहूनही प्राचीन असावी असे सिद्ध करता आले आहे. महाराष्ट्रातही अशा तर्‍हेचे शास्त्रीय कालमापन करण्यात आलेले आहे, त्याचा उल्लेख योग्य संदर्भात पुढे करण्यात येईल. महाराष्ट्रात बहुतेक सर्व नद्यांच्या परिसरात पाषाणथुगाच्या विविध कालखंडातील हत्यारे सापडलेली आहेत. नवाश्मयुगाचा अंतर्भाव तांत्रिकदृष्ट्या पाषाणयुगात केला असला तरी या कालातील मानवी जीवन स्थिर होऊन पशुपालन आणि अनोोत्पादन या वैशिष्ट्यांमुळे पुरापाषाणयुगापासून हा कालखंड सांस्कृतिकदृष्ट्या वेगळा आहे. लेखनाचा अभाव आणि दगडी हत्यारांचा वापर यामुळेच या कालखंडाला 'नवाश्मयुग'  असे नाव दिले गेले आहे. महाराष्ट्रामध्ये केवळ नवाश्मयुगाचे विशुध्द स्वरूपाचे स्थल अजून उपलब्ध नाही.

पूर्व - पुराशमयुग ( लोअर पॅलिओलिथिक )

या कालखंडाशी निगडीत दगडाची हत्यारे महाराष्ट्रातील बहुतेक मोठ्या आणि मध्यम स्वरूपाच्या नद्यांच्या परिसरामध्ये गेल्या पन्नास वर्षांमध्ये सापडली आहेत. या कालखंडाचे ' अथवा त्यातील हत्यारांचे वर्णन करण्याआधी एक बाब  स्पष्ट करणे आवश्यक आहे. त्याआधी उल्लेखिलेले पाषाणयुगाचे कालखंड म्हणजे एकमेकांशी संबंध नसलेले बंद कप्पे आहेत असे मात्र नाही.

हत्यार बनविण्याच्या तंत्रामध्ये त्याचप्रमाणे त्यांच्या आकारात आणि प्रकारात बदल आढळून येत असला तरी पुराश्मयुगातील विशिष्ट कालखंडातील हत्यारे एकदम उपयोगातून पार गेली आणि नव्या तर्‍हेची हत्यारे निर्माण झाली अशा तर्‍हेचा समज करून घेणे वरोवर ठरणार नाही. पाषाणयुगातील हत्यारे प्रामुख्याने दोन वर्गाची आढळतात. यातील पहिला प्रकार मूळ गोट्यावर प्रक्रिया करून वनविलेली दगडगोट्यांची हत्यारे आणि दुसरा प्रकार म्हणजे गोट्यांचे .छिलके काढून त्या छिलक्यापासून वनविलेली हत्यारे. या दोन्ही प्रकारची हत्यारे महाराष्ट्रात सापडली आहेत. महाराष्ट्राच्या पाषाणयुगाचा अभ्यास, महाराष्ट्राचा अलग विचार करून करता येणे चूक ठरते. महाराष्ट्रात सापडलेली हत्यारे इतर प्रदेशातील नद्यांच्या परिसरात सापडलेल्या हत्यारांशी मिळतीजुळती आहेत.

पाषाणयुगीन कालखंडाचा अभ्यास करताना एक बाव लक्षात घेणे आवश्यक आहे. ही बाब महाराष्ट्रालाही लागू आहे. भारतापेक्षा कितीतरी आधी पाषाणयुगाचा शोध आणि अभ्यास युरोपमध्ये सुरू केला गेल्याने त्या संदर्भात युरोपमध्ये वापरल्या जाणाऱ्या संज्ञा आणि तंत्र - वैशिष्ट्यांची नावे भारतातही अशा अभ्यासामध्ये उपयोगात आणली गेली. त्यामुळे त्यांचा वापर करणे अपरिहार्य ठरले आहे. अर्थात अलीकडे यावद्दल विचारमंथन सुरू झाले आहे. १८६३ साली तामिळनाडूतील पल्लावरम येथे रॉवर्ट व्रुस फूट यांना भारतात पहिल्याप्रथम पाषाणयुगीन हत्याराचा शोध लागला. याआधीही युरोपमध्ये पाषाणयुगाची हत्यारे सापडली असल्याने .फूट आणि त्यांच्या नंतरच्या संशोधकांनी युरोपात असलेल्या संज्ञा वापरल्या यात नवल नाही.किंवहुना आजही त्याच संज्ञा पाषाणयुगाच्या संदर्भात प्रचलित आहेत.

यादृष्टीने पाषाणयुगाचा महाराष्ट्रातील आढावा घेताना अशा संज्ञाचा वापर करून घेणे अपरिहार्य झालेले आहे.महाराष्ट्रामध्ये कोकणपट्टीतील कुलावा आणि रत्नागिरी  हे प्रदेश सोडल्यास जवळपास सर्व नद्यांच्या खोऱ्यात पूर्व - पुराश्मयुगाचा ( अर्ली / लोअर पॅलिओलिथिक ) हत्यारांच्या रूपामध्ये पुरावा सापडलेला आहे. विशेषतः नाशिकजवळ गोदावरीकाठचे गंगापूर, अहमदनगर जिल्ह्यातील नेवाशाजवळील चिरकी - नाला, मुळा-मुठेच्या काठी पुण्याच्या डेक्कन कॉलेजचा परिसर व दत्तवाडी विभाग आणि धुळे जिल्ह्यातील धावरापाडा ही या दृष्टीने महत्वाची स्थळे ठरलेली आहेत. चिरकी - नाला या ठिकाणी या कालखंडातील हातकुऱ्हाड, फरश्या, तासण्या आणि तोडहत्यारे, ही या कालाच्या मानवी जीवनाची निदर्शक दगडी हत्यारे, 'स्वस्थानी' सापडली. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे म्हणजे ही हत्यारे नदीच्या प्रवाहातून. दुसरीकडून येऊन ती येथे पडली असे नव्हे. याचाच अर्थ याठिकाणी पूर्व - पुरामयुगाचा मानव काही काळ तरी वास्तव्य करून होता असे सूचित होते. 

पुण्याच्या डेक्कन कॉलेजच्या परिसरामध्ये अशा प्रकारची वनविलेली हत्यारे आणि त्याचबरोबर हत्यारांच्या बनावटीत उपयोगी ठरतील असे मोठे गोटे सापडले. हा पुरावा ट्रॅप या खडकामध्ये जी दुसऱ्या प्रकारची धमनी (डाईक ) डेक्कन कॉलेजच्या  परिसरामध्ये आहे तिच्या शेजारीच मिळाला. यावरून पूर्व - पुराशमयुगीन मानव या भागामध्ये काही काळ राहात असून त्याने आपल्या वास्तव्यामध्ये ही हत्यारे बनविली, असे स्पष्ट दिसून येते; कारण मोठमोठे छिलके काढलेले गोटेही “या स्थळी सापडलेले आहेत. अशाच प्रकारचा कार्यशाळेचा (वर्कशॉप ) पुरावा धुळे जिल्ह्यातही उपलब्ध झालेला आहे. हत्यारांचे प्रकार आणि महाराष्ट्रामध्ये या कालखंडातील निक्षेपात नामशेष झालेल्या प्राण्यांच्या अश्मीभूत अवशेषांचा आढळ यावरून महाराष्ट्रातील पूर्व - पुराश्मयुगीन मानवाचे अस्तित्व सुमारे एक ते दीड लाख वर्षपूर्व असावे असे तीलनिकदृष्ट्या अनुमानित केले गेले आहे.

पूर्व - पुराश्मयुगीन हत्यारे सर्वसामान्यपणे तीन - चार प्रकारची आढळून आली आहेत. ( फलक ३) त्यातील पहिला प्रकार फरशीसारख्या आकाराच्या हत्याराचा आहे. त्याला इंग्रजीमध्ये 'क्लीव्हर असे नाव दिले आहे. हे हत्यार बहुतांशी मोठ्या आकाराच्या गोट्यापासून काढलेल्या छिलक्यावर संस्करण करून बनवीत असत. याची एक बाजू रूंद, धारदार, सरळ असून धारेच्या विरूध्द बाजूचा भाग जाडसर, हातात पकडता येण्यासारखा केलेला असतो.

रूंद धारदार कड कठीण वस्तू - कच्चे मांस अथवा हाडे - तोडण्यासाठी वापरली जात असे. काही वेळा मोठ्या आकाराचा झाडझाडोरा तोडण्यासाठीही अशा, लोखंडी कुऱ्हाडीसारख्या दिसणाऱ्या, दगडी फरशांचा वापर करण्यात येत असावा. दुसऱ्या प्रकाराच्या हत्याराला हातकुऱ्हाड - 'हॅण्ड अँक्स ' - असे , नाव दिलेले आहे. दिलेल्या नावावरून या हत्याराचा उपयोग हातात धरून कुऱ्हाडीसारखा केला जात असावा असा समज होतो, परंतु फरशी आणि कुऱ्हाड यांच्यामध्ये फरक आहे. या “ हातकुऱ्हाडी ' एका बाजूला टोकदार तर दुसर्‍या बाजूला जाड, फुगीर आणि रूंद असतात. आकाराने यात काही प्रकार आढळून .येत असले तरी ही हत्यारे लंवगोल किंवा लंबत्रिकोण या आकाराची सर्वसाधारणपणे आढळून येतात. टोकदार बाजू आणि खटूंद - काहीशी बहिर्गोल - विरूध्द बाजू, या व्यतिरिक्त असलेल्या दोन कडावरही लहानलहान छिलके काढून या दोन्ही बाजू काहीशा नागमोडी आणि धारदार करीत असत.

कातडी फाडणे अथवा जमीन खणणे यासाठी या हातकुऱ्हाडींचा वापर केला जात असावा असा समज आहे. तिसऱ्या प्रकारचे हत्यार “तोड-हत्यार' ( चॉपर) या नावाने ओळखले जाते. हे प्रामुख्याने चपट्या गोट्यापासूनं केलेले असून त्याच्या कडा छिलके काढून अर्धगोलाकृती बनविल्या जात.

शिकार केलेल्या जनावराच्या मांसाचे लहानलहान तुकडे करण्यासाठीं याचा वापर करण्यात येत असावा, असा अंदाज केला गेला आहे.

महाराष्ट्राचा बराच, विशेषतः पठाराचा, भाग 'बसाल्ट' या प्रकारच्या खडकांनी व्यापलेला आहे. या दगडाचा पोत फारसा चांगला नसल्याने याच्यावर जसे पाहिजे तसे छिलके काढून संस्कार करता येत नाहीत. इतर प्रदेशात ज्याप्रमाणे 'क्वार्टझाईट' या उत्तम प्रतीच्या दगडाचा आढळ होतो, तसा महाराष्ट्रात फारसा होत नाही. म्हणून 'बसाल्ट' खडकामध्ये ज्या उत्तम पोताच्या दगडांचा धमन्या किंवा 'कारी' महाराष्ट्रात उपलब्ध आहेत त्यांचा उपयोग हत्यार बनावटीमध्ये मानवाने केला.ही हत्यारे बनविणारा मानव कसा होता हे सांगणे शक्‍य होत नाही.

कारण या कालातील वर उल्लेखिलेली हत्यारे शेकड्यांच्या संख्येने उपलब्ध असली तरी ज्या मानवाने ही बनविली आणि वापरली त्याचे कोणत्याही स्थितीतले अवशेष अद्याप मिळालेले नाहीत. त्यामुळे त्याचे केवळ अस्तित्व जाणवते. परंतु हा मानव तोडणे, फोडणे, घासणे इत्यादी कामांना उपयुक्त ठरतील अशी हत्यारे बनविण्यात वाकवगार होता यात शंका नाही.

पुरापर्यावरण शास्त्रज्ञांनी या कालखंडातील हवामानावद्दल असे मत दिले आहे की या कालखंडात महाराष्ट्रामध्ये पावसाचे प्रमाण बरेच होते, झाडझाडोरा विपुल होता आणि हवेमध्ये आर्द्रता जास्त होती. या कालातील नद्यांची पात्रे विस्तृत असून त्यामध्ये खूप दगडगोटे होते. या दगडगोट्यापासूनच या कालातील मानवाने हत्यारे तयार केली. ही हत्यारे गुजरात, मध्यप्रदेश, आंध्र, तामिळनाडू आणि कर्नाटक या प्रदेशात सापडलेल्या समकालीन हत्याराप्रमाणेच आहेत.

पूर्व-पुराश्‍्मयुगात हत्यार बनावटीची स्थूलमानाने दोन तंत्रे आढळून येतात. यातील एक 'अँबीव्हीलियन' या नावाने ओळखले जाते. फ्रान्समध्ये सोम नदीच्या काठी असलेल्या 'अँवीव्हिले' या गावी ओबडधोबड हातकुऱ्हाडी प्रथम सापडल्याने या गावाचे नाव या तंत्राला देण्यात आले.

यामध्ये हत्यार बनविण्याकरिता काढलेले छिलके काहीसे मोठे आणि अनियंत्रित असतात. दुसऱ्या प्रकारचे तंत्र 'अँश्युलियन' या नावाने ओळखले जाते. अशाप्रकारची हत्यारे फ्रान्समध्ये सॉ-अश्यूल याठिकाणी सापडल्याने हे स्थलनाम या तंत्राला किंवा या तंत्राने वनविलेल्या हत्यार-वर्गाला दिले जाते.

यामध्ये अगदी पातळ आणि लहानलहान छिलके काढून हत्यार कलात्मक केल्याचे दिसून येते. असे छिलके लाकूड, हाड किंवा सांबरशिंगाच्या साहाय्याने काढले जात. यातील काही छिलके तर माश्याच्या खवल्या इतके पातळ आणि लहान असतात. तंत्रदृष्ट्या या दोन प्रकारात फरक आहे.

'अँश्युलियन ' तंत्राची नगर जिल्ह्यातील नेवासे येथे सापडलेली हातकुऱ्हाड प्रख्यात आहे.पूर्व-पुराशमयुगाचा काल निश्‍चित करणे अवघड आहे. परंतु सर्वसाधारणपणे दीड लाख ते पन्नास हजार वर्षपूर्व असा तो मानला जातो.

मध्य - पुराश्‍मयुग (मिडल पॅलिओलिथिक )

पूर्व-पुराश्‍मयुगाचा शेवट, हवामानात झालेल्या वदलामुळे झाला असावा, असे पुरापर्यावरणशास्त्रज्ञांचे मत आहे. या नंतरच्या काळातील हत्यारांमध्ये बदल घडून आल्याचे दिसून येते. अर्थात याचा अर्थ पूर्व-पुराशमयुगातील सर्व हत्यारांचा किंवा तंत्राचा वापर पूर्णपणे थांवला असे मात्र नव्हे. उदाहरणार्थ, * अँश्युलियन ' तंत्राने सुवक आणि कलात्मक बनविलेल्या परंतु लहान आकाराच्या हातकुऱ्हाडी या कालामध्येही वापरात होत्या. मात्र या कालखंडामध्ये हत्यारांच्या वनावटीसाठी उत्कृष्ट पोताचा जास्पर वगैरे सारखा . दगड वापरण्यात आला. हत्यारांचे आकार खूपच लहान झाले, हत्यार. निर्माण करण्याच्या तंत्रामध्ये वदल झाला आणि छोट्या तासण्या,* गिरमिटे आणि वाणाग्रे यांच्यासारख्या हत्यारांची निर्मिती झाली. 

या हत्यारांचा शोध महाराष्ट्रामध्ये प्रथम अहमदनगर जिल्ह्यातील प्रवराकाठी नेवाश्याच्या परिसरामध्ये १९५४ साली लागला. त्यावेळी त्यांना *वर्ग-२' ची हत्यारे ( सिरीज-टू) असे नाव दिले गेले. परंतु त्यानंतर

झालेल्या विस्तृत पाहाणीमध्ये या वर्गाच्या हत्यारांचा आढळ अनेक ठिकाणी नदीच्या काठच्या स्तरीय संदर्भात झाल्याने, या वर्गाच्या हत्यारांची उत्कांती (७५०॥७॥७॥) आणि त्यांचे स्तरसंवध्दस्थान ( आतटात॥10 ७९५) याबद्दल निश्‍चिती झाली व त्यांना 'मध्य-पुराश्मयुगीन' असे नाव रूढ झाले आहे. प्रव्राकाठी प्रथम सापडलेल्या या हत्यारांचा आढळ आता महाराष्ट्रामध्ये तापी, गिरणा, वर्धा, पूर्णा, वैनगंगा, मांजरा, भीमा, घोड, कृष्णा, गोदावरी व त्यांच्या अनेक उपनद्यांच्या परिसरामध्ये झाला आहे. मुंबई जवळ कांदिवली-वोरीवली येथेही ही मिळालेली आहेत.

वर उल्लेखिल्याप्रमाणे या कालखंडातील हत्यारांमध्ये प्रामुख्याने तासण्या, गिरमीटे, वाणाग्रे आणि भोके पाडण्यासाठी वनविलेले टोकदार टोचे सापडतात. ही आकाराने लहान तर आहेतच परंतु त्यांच्यावरील काढलेले छिलके अत्यंत वारीकवारीक आहेत. पूर्व-पुराश्‍्मयुगाच्या वनावटीमध्ये “बसाल्ट' आणि डोलेराईट' यांचा वापर होत होता, परंतु मध्य - पुराश्मयुगाच्या हत्यारांसाठी जास्पर, चर्ट, कार्नेलियन, अँगेट, व्लडस्टोन इत्यादी उत्कृष्ट पोताच्या दगडाचा वापर केला जाई. दक्खनच्या कातळामध्ये वर उल्लेखिलेल्या दगडांच्या 'धमन्या' आढळून येतात. त्यांचाच वापर या हत्यारांच्या बनावटीमध्ये केलेला आहे. याप्रकारचे दगड मूलतः लहान आकारात उपलब्ध असल्याने हत्यारांचे आकार लहान असणे अपरिहार्य होते. या हत्यार निर्मितीच्या काही जागाही महाराष्ट्रामध्ये सापडलेल्या आहेत. त्यापैकी अहमदनगर जिल्ह्यातील पेठणगुंजाळे आणि नागपूर जिल्ल्यातील कोराडी या उल्लेखनीय आहेत. औरंगावाद जिल्ह्यातील वाघोडी-वडोळी येथे या कालखंडातील मानवाचे काही काळ तरी वास्तव्य असावे, असा पुरावा उपलब्ध झालेला आहे.

या हत्यारांच्या तंत्रामध्ये एक नाविन्य आढळून येते. ही हत्यारे सपाट परंतु काहीशा टोकदार गोट्यापासून केलेली आढळतात. गाभ्यापासून छिलका काढण्याच्या आधी वरीच प्रक्रिया करून योग्य असा पातळ छिलका काढला जाई आणि अशा छिलक्यावर संस्करण करून त्यापासून वर उल्लेखिलेली हत्यारे बनविली जात. दुसरे असे की पूर्व - पुराश्‍्मयुगाची हत्यारे घट्ट झालेल्या मोठ्या दगडगोट्यांच्या थरामध्ये आढळतात, तर मध्य - पुराश्मयुगातील हत्यारे जाड्याभरड्या वाळूच्या आणि लहान गोट्यांच्या घट्ट झालेल्या थरामध्ये आढळतात. याचा अर्थ या काळी पर्जन्यमान वाढले तरी ते पूर्व - पुराश्मयुगाइतके नव्हते. 

हत्यारांच्या प्रकारावरून असे अनुमान करता येते की ही हत्यारे कातड्यात भोके पाडण्यासाठी त्याचप्रमाणे लाकूड अथवा हाड तासण्यासाठी वापरली जात असावीत. वाणाग्रांचा वापर शिकारीसाठी केला जात असला पाहिजे. या कालातील मानवाचे अवशेष कुठल्याही स्वरूपामध्ये अद्याप उपलब्ध झालेले नाहीत. परंतु रानटी वैलाची अश्मीभूत झालेली हाडे गोदावरीकाठी काळेगाव आणि गंगापूर, 'घोडकाठी इनामगाव, प्रवराकाठी नेवासे, येथे त्याचप्रमाणे वर्धा आणि पूर्णा या विदर्भातील नद्यांच्या आणि मराठवाड्यातील मांजरा नदीच्या परिसरातही सापडली आहेत.या कालखंडाची कालमर्यादा सर्वसाधारणपणे सुमारे ४० ते २० हजार वर्षपूर्वी अशी अनुमानित करण्यात आलेली आहे. 

उत्तर - पुराश्मयुग ( अपर पॉलिओलिथिक )

पातळ छिलक्यापासून हत्यारे बनविण्याचे तंत्र आणि कौशल्य मध्य - पुराश्‍्मयुगीन मानवाने आत्मसात केले होते याचा उल्लेख वर आला आहे. उत्तर - पुराश्मयुगात या तंत्रामध्ये आणखी प्रगती झाली. या 'कालाचे वैशिष्ट्य म्हणजे , चाल्सीडोनी, अँगेट, कार्नेलियनसारख्या उत्तम पोताच्या दगडापासून समांतर बाजू असलेली पाती, त्याचप्रमाणे एका विशिष्ट तर्‍हेने (काटकोनात) छिलका काढून कोरण्यासाठी कोरके (ब्यूरीन ) तयार करण्याची. प्रथा रूढ झाली. त्यामुळे या कालखंडातील गारगोटीच्या छिलक्यांच्या हत्यारांना 'ब्लेड अँण्ड ब्यूरीन इंडस्ट्री' असे नाव दिले गेले आहे. अशी धारदार पाती लाकडाच्या किंवा हाडाच्या खोबणीत सलग बसवून त्यांचा कापण्यासाठी उपयोग करण्यात आला असावा. याप्रकारच्या हत्यारांच्या वापरांच्या मर्यादा लक्षात घेता, अशी हत्यारे अवजड कामासाठी वापरणे शक्य नव्हते. त्यामुळे ही हत्यारे कोरड्या हवामानामध्ये उगवणारा विरळ व हलका झाडोरा अथवा गवत कापण्यासाठी केला जात असावा. ही हत्यारे सर्वसाधारणपणे नदीकाठच्या स्तरीय छेदामध्ये ( सेक्शन ) आढळून येणाऱ्या बारीक वाळूच्या थरामध्ये सापडतात.

ही हत्यारे महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी उपलब्ध झाली असली तरी त्यांचे विशुद्ध स्वरूपातील निक्षेप फारसे स्पष्ट नाहीत. मात्र अशा तर्‍हेची हत्यारे गोदावरीकाठी पैठण, घोडकाठी इनामगाव, प्रवरेकाठी संगमनेर येथे आणि चंद्रपूर जिल्ह्यात खोलरा गोडी या ओढ्याच्या काठी त्याचप्रमाणे भंडारा जिल्ह्यात वैनगंगेच्या काठी सापडलेली आहेत. मुंबईजवळ कांदिवली येथेही अश्मयुगाच्या विविध कालखंडातील हत्यारे टॉड यांना १९३६ साली मिळालेली होती. परंतु या हत्यार समूहाबद्दल विविध मते प्रचलित आहेत.

या कालखंडाशी निगडीत दोन महत्वाच्या स्थलांचा उल्लेख करणे जरूर आहे. गोदावरीकाठी पैठण येथे आणि पुणे जिल्ल्यात घोडनदीवरील इनामगावजवळ या कालखंडातील हत्यारांवरोवरच इतर महत्वाचा पुरावा मिळालेला आहे. या ठिकाणी हत्यारांच्या वरोवर शिंपले त्याचप्रमाणे शहामृगाच्या अंड्यांचे कवच ( पाटणे, जिल्हा जळगाव ) आणि इनामगावजवळ नामशेष झालेला प्राचीन बैल  या प्राण्याचे अश्मीभूत अवशेष मिळाले. उत्तर - पुराश्मयुगावद्दल वर उल्लेखिलेला पुरावा मांडला असला तरी याबद्दलचे संपूर्ण चित्र फारसे स्पष्ट नाही. ही अवस्था 'मध्य - पुराश्मयुग' आणि 'मध्याश्मयुग' यामध्ये सांस्कृतिक क्रमाच्या दृष्टीने येत असली तरी, याबद्दल हत्यारांचा पुरावा ज्या स्तरीय संदर्भात उपलब्ध होणे आवशयक आहे तसा पुरावा महाराष्ट्रामध्ये फारसा उपलब्ध नाही. या आधी गुजराथ, राजस्थान, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, तामिळनाडू इत्यादी ठिकाणी तो एका विशिष्ट संदर्भामधे उपलब्ध झालेला आहे. महाराष्ट्रात प्रवरेच्या काठी नेवासे, वर्धा जिल्ह्यात झारपट नाला, पुणे जिल्ह्यात इनामगाव, अहमदनगर जिल्ह्यात, ढवळापुरी आणि जळगांव जिल्ह्यात गिरणा नंदीच्या काठी पाटणे या ठिकाणी तो मिळाल्याचा उल्लेख याआधी केलेला आहे. या कालखंडाचे वैशिष्ट्य ठरलेली गारगोटींची हत्यारे - लांव पाती, कोरके, लहान तासण्या, - नोक असलेली हत्यारे आणि वेधण्या - एका वैशिष्ट्यपूर्ण तंत्राने दगडी गाभ्यावर प्रक्रिया करून आणि. लाकडी दांडक्याचा ( सिलिंडर हॅमर ) वापर करून बनविण्यात आली होती याचाही उल्लेख आधी आलेला आहे. ऱ्या भागामध्ये आणि ज्या संदर्भामध्ये ही हत्यारे उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, तामिळनाडू आणि महाराष्ट्रामध्ये सापडली आहेत त्यावरून या कालात हवामान काहीसे कोरडे असावे असा निष्कर्ष काढला गेला आहे. या हत्यारांवरोवर घोंडनदीवरील इनामगाव येथे पाणघोडा, घोडा, बैल, रेडा आणि सांवर यांची अश्मीभूत हाडे अलीकडे सापडली आहेत.

यावरून इनामगाव परिसरात तरी वराच झाडझाडोरा आणि काहीशी दलदलीची स्थिती असली पाहिजे असे मत मांडले गेले आहे. कारण त्या शिवाय पाणघोड्यासारखा प्राणी जगू शकणार नाही. महाराष्ट्रात गोदावरीच्या दक्षिणेस सापडलेला पाणघोड्याचा हा पहिला अवशेष आहे. महाराष्ट्रात या कालखंडाचे कार्वन-१४ पद्धतीने करण्यात आलेले कालमापन भारतातील इतर स्थलांशी (उत्तर प्रदेश : वेलन नदी : सुमारे १९,०००) मिळते जुळते आहे.

मध्याश्मयुग (मेसोलिथिक)

उत्तरपुराश्मयुगाच्यानंतर सांस्कृतिक उत्कमाच्या दृष्टीने मध्याश्मयुग येते. या कालखंडाचे वैशिष्ट्य म्हणजे अतिशय लहान आकाराची, बहुतांशी भीमितिक आकाराची वनविलेली (त्रिकोण, समान्तर  द्विभुजचौकोन, चंद्रकोर वगैरे ) हत्यारे. ही हत्यारे चाल्सिडोनी, अँगेट, कार्नेलियन यासारख्या उत्तम पोताच्या गारंगोटीच्या छिलक्यापासून वनविली जात.यांचे सविस्तर वर्णन देण्याआधी एक वाव स्पष्ट करणे आवश्यक आहे.

मध्याश्मयुग कालदृष्ट्या आणि सांस्कृतिक उक्कमांच्या संदर्भात पुराश्मयुंग आणि नवाश्मयुग यांच्यामध्ये येते. म्हणून “पुराशमयुग' आणि 'नवाश्मयुग'या एका अर्थाने सांस्कृतिक संदर्भाच्या संज्ञा आहेत. परंतु 'मध्याश्मयुग' ही संज्ञा कालनिवध्द म्हणजे 'पुराश्मयुग॑ आणि नवाश्मंयुग “यांच्यामध्ये असणारा कालखंड' या अर्थाने रूढ झालेली आहे. खापरांचा वापर नसलेली, परंतु शेती व पशुपालन यावर आधारीत ग्रामसंस्कृतीच्या आधीची ही अवस्था आहे. या कालखंडाचे आणखी एक वैशिष्ट्य असे की यात वापरली जाणारी हत्यारे अश्मयुगाच्या कोणत्याही अवस्थेमध्ये सापडलेल्या हत्यारांच्या संख्येपेक्षा कितीतरी पटीने विपुल आहेत.

म्रध्याशमयुगाची स्थले भारतामध्ये गंगा-यमुनादुआव, आसाम आणि कोकणपट्टी सोडून, जवळपास सर्वत्र सापडली आहेत. या कालातील लोक घट्ट झालेल्या वाळूच्या लहान लहान टेकड्यावर (गुजरात, मारवाड ) नैसर्गिक गुहात (मध्यप्रदेश ), नदीच्या गाळाच्या मैदानावर ( पश्‍चिम बंगाल ), खडकाळ परंतु सपाट प्रदेशावर (राजस्थानातील मेवाड), तळ्यांचे काठी (अलाहाबाद आणि प्रतापगढ़ : उत्तर प्रदेश) त्याचप्रमाणे काही वेळा समुद्रकाठी (सालसेट बेट : महाराष्ट्र ; तामिळनाडू : मद्रास जवळील “तेरी” स्थळे) - अशा विविध ठिकाणी वस्ती करून राहात असल्याचा पुरावा उपलब्ध झालेला आहे. या कालखंडाची भीमबेटका, आदमगड . (मध्यप्रदेश ), बागोर (राजस्थान ), बिरभानपूर (प. बंगाल), लांघणज ( गुजरात ), सराई नहर राय (उत्तर प्रदेश) ही महत्वाची ठिकाणे आहेत.

या कालखंडातील मानवी जीवन या आधीच्या कालखंडापेक्षा तौलनिकदृष्ट्या सुस्थिर झाल्याचे दिसते. या कालखंडात मेंढ्या, चितळ, नीलगाय, काळवीट इत्यादी प्राणी अस्तित्वात होते. मृताला पुरण्याची पद्धती या काळात प्रचलित झाली. काही ठिकाणी झोपड्यांचे अवशेष व त्यातील बनविलेली जमीन उत्खननामधे सापडली (पश्‍चिम बंगाल ). परंतु या कालखंडातील मानवाची साधनसामग्री मात्र अत्यंत मर्यादित असल्याचे आढळून येते. तोडण्या-फोडण्याकरिता आणि पिसण्याकरिता खोलगट पाटे आणि लंबगोल गोट्यांचा वापर करण्यात येत असे. *

या काळातील गारगोटीच्या छिलक्यापासून बनविलेली हत्यारे आकाराने लहान असली तरी त्यामध्ये खूप विविधता दिसून येते. उत्कृष्ट पन्हाळीदारू छिलके काढलेले गाभे (कोअर) आणि समांतर बाजू असलेले सुबक, पातळ छिलके हे या कालातील वैशिष्ट्य समजले जाते.

लहानलहान छिलक्यावर अत्यंत सूक्ष्म छिलके काढून त्यापासून विविध तर्‍हेची पाती, वेधण्या, त्रिकोण इत्यादी हत्यारे वनवीत असत. या हत्यारांची लांबी सर्वसाधारणपणे १ ते ३ सें. मी. आढळून येते आणि ही लाकडाच्या क्रेंवा हाडाच्या खाचेमध्ये नैसर्गिक गोंदाच्या साहाय्याने पक्की बसवून त्यांचा विळे वगैरेसारखा उपयोग केला जाई. महाराष्ट्रात अशा हत्यारांचा आढळ पुणे, जळगाव, धुळे, चंद्रपूर, अहमदनगर, नांदेड या जिल्ह्यात व इतर अनेक ठिकाणी झालेला आहे.

सर्वसाधारणपणे तापी, गोदावरी, प्रवरा व इतर अनेक नद्यांच्या खोऱ्यामध्ये या कालखंडाची ' हत्यारे सापडली आहेत. त्यांचा काळ कार्बन- १४ कालमापनानुसार १२ ते 9३ हजार वर्षे इतका प्राचीन (घोड काठच्या इनामगाव येथील शिंपल्यांच्या कालमापनावर आधारित ) असल्याचे सिद्ध झाले आहे. परंतु सर्वसाधारणपणे या कालखंडाची व्याम्ती ५२ हजार ते ५ हजार वर्षपूर्व मानली जाते.

'नवाश्मयुग' 

अश्मयुगातील ही शेवटची अवस्था. हिला 'नवाश्मयुग' असे नाव देण्याचे कारण असे की या युगामध्ये मानवी जीवनात क्रांतीकारक बदल झाले. केवळ दगडी हत्यारांच्या दृष्टीने पाहावयाचे झाल्यास या कालातील दगडी हत्यारांचे तंत्र या आधीच्या अश्मयुगाच्या हत्यारांपेक्षा अत्यंत वेगळे दिसून येते. 'डोलेराईट* या उत्तम पोताच्या काळ्याशार दगडापासून ही हत्यारे बनविली जात. गोट्यावर छिलके काढून योग्य तो आकार दिल्यानंतर या हत्यारांची वापरण्यास योग्य अशी वाजू खडकातील खाचात घासून धारदार करण्यात येत असे. किंबहुना सध्या वापरात असलेल्या लोखंडी कुऱ्हाडी व छिन्या इतक्याच नवाश्मयुगातील दगडी कुऱ्हाडी व छिन्न्या उपयोगी ठरतात.

भारतातील नवाश्मयुगाचा पुरावा काही विभागीय वैशिष्ट्ये असलेला आहे. त्यामुळे उत्तर भारत, मध्य भारत, पूर्व भारत आणि दक्षिण भारत असा सापडलेला पुरावा वर्गीकृत करता येतो. महाराष्ट्राच्या निकट असलेल्या आंध्र आणि कर्नाटकामध्ये नवाश्मयुगाचा पुरावा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाला असून या संस्कृतीच्या लोकांच्या वस्त्यांचे अवशेष त्याचप्रमाणे त्यांच्या जीवनाचे विविध पैलू स्पष्ट करणारा पुरावाही. सापडलेला आहे. महाराष्ट्रात मात्र विशुद्ध उरे स्वरूपातील नवाश्मयुगीन संस्कृतीचा किंवा तिच्या स्थलाचा शोध अद्याप तरी : लागलेला नाही.

या कालखंडामध्ये मानवी जीवनामध्ये क्रांतीकारक बदल झाला असे वर उल्लेखिले आहे. एके ठिकाणी झोपड्या बांधून स्थिर जीवनाची सुरूवात, पशुपालन, शेतीद्वारे धान्योत्पादन, घासून धारदार वनविलेल्या दगडी हत्यारांचा वापर आणि हातवनावटीच्या राखी रंगाच्या मडक्यांची निर्मिती - या क्रांतीकारक घटना या युगाशी निगडीत आहेत. धान्योत्पादनामुळे या युगात मानव भटके जीवन सोडून स्थिर जीवन जगू लागला. या आधीच्या अश्मयुगीन अवस्थांमध्ये तो “अन्नोत्पादक' नसून 'अन्न गोळा करणारा ', भटका होता.

नवाश्मयुगाचा व्यापक आढावा घेण्याचे प्रयोजन येथे नाही. आंध्र कर्नाटकामध्ये संगलकल, टेक्कलकोटा, पिकलीहाळ, हल्लूर, नागार्जुनकोण्डा, पालावाय, ब्रह्मगिरी, कोडेकल, उटनूर, इत्यादी ठिकाणी नवाश्मयुगीन अवशेष उत्खननामध्ये विस्तृत स्वरूपामध्ये सापडले आहेत. गोल झोपड्यांची घरे, गायी - बैल, म्हैस, वकऱ्या, डुकरे यांचे कळप पाळणे, हुलगे, रागी इत्यादी धान्याचे उत्पादन करणे, जमिनीवर फरे पाडण्यास योग्य अशा गोल दगडी कडी वसलेल्या काठ्यांचा वापर करणे, काही वेळा (उत्तर काळात ) सोने आणि तांब्याचा वापर करणे त्याचप्रमाणे शंख, माती आणि दगडाचे मणी वापरणे, करड्या मडक्‍्यावर लाल गेरूचे पट्टे देऊन रंगकारी करणे. त्याचप्रमाणे (काही ठिकाणी) काळी - आणि - तांवडी मडकी वापरणे ही यांची वैशिष्ट्ये आंध्र - कर्नाटकामध्ये दिसून आली आहेत.

आंध्र-कर्नाटकातील नवाश्मयुगाची कालव्याप्ती सर्वसाधारणपणे इसवी पूर्व २४०० ते १००० अशी कार्बन - 9१४ पद्धतीनुसार निश्‍चित करण्यात आली आहे. महाराष्ट्रामध्ये या संस्कृतीची निदर्शक घासून धारदार केलेली हत्यारे, राखी रंगाचे दफनकुंभ इत्यादी वैशिष्ट्ये ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीच्या अवशेषांवरोवर सापडलेली आहेत. यावरून सध्याच्या महाराष्ट्राचा आंध्र -कर्नाटकावरोवर संपर्क असावा असे स्पष्ट होते. नवाश्मयुगामध्ये मानव स्थिर जीवनाचा असला तरी, मोठ्या प्रमाणावर शेतीतून 

धान्योत्पादन, स्थिर स्वरूपाच्या खेड्यांची स्थापना, तांव्याचा तौलनिकदृष्ट्या मोठ्या प्रमाणावर वापर आणि उत्कृष्ट वनावटीची चाकावर घडवलेली, चित्रकारी असलेली आणि उत्तम भाजणीची मडकी - ही सर्व वैशिष्ट्ये, या. नंतरच्या, म्हणजे ताम्रपाषाणयुगामध्ये दिसून येतात. शेती उद्यादनावर आधारीत स्थिर खेड्याची स्थापना ताम्रपाषाणयुगात महाराष्ट्रात इसवी पूर्व सुमारे. १५०० च्या आसपास झाली आणि हे कर्तृत्व 'आद्य शेतकर्‍यांचे' होते. धातुयुगाची सुरूवात याचवेळी झाली.

सोमवार, ७ सप्टेंबर, २०२०

महाराष्ट्रातील वास्तुकलेचा इतिहास

महाराष्ट्रातील वास्तुकलेचा इतिहास 

फार प्राचीन काळापासून वास्तुशिल्प हे आपल्या सामर्थ्याचे आणि त्या सामर्थ्याच्या चिरंतन अस्तित्वाचे मूर्त आहे अशाच भावनेने सगळीकडच्याच सत्ताधीशांनी भव्य अशा वास्तूंची उभारणी केली. राजप्रासाद, दुर्ग, मंदिरे, प्रार्थनामंदिरे, स्मारके अशा विविध रुपाने वास्तुशिल्प प्रगट झालेळे आहे. सत्ताधीशांचा आणि धनिकांचा उत्तम आश्रय लाभल्याने प्राय: सर्वच देशात आणि सर्वच काळात या कलेचा परिपोष झाला. मात्र राजप्रासाद, हवेल्या या वैयक्तिक मालकीच्या असल्याने मालकाबरोबर किंवा घराण्याबरोबर त्या लयाला गेलया. 

स्तूप, मंदिरे अशासारख्या धार्मिक स्वरुपाच्या वास्तूंना धर्माचा म्हणजे पर्यायाने समाजाचा आधार व आश्रय लाभलेला असल्याने त्यांचे जतन झाले, जीर्णोध्दार झाला. यापैकी बर्‍याच प्राचीन वास्तू आजही बऱ्यावाईट अवस्थेत तग धरून आहेत. त्याचा अप्रत्यक्ष  परिणाम असा झाला की वास्तुशिल्प म्हणजे मंदिरशिल्प, धार्मिक स्वरूपाच्या इमारती अशी समजूत रुढ झाली. जे प्राचीन वास्तूंबाबत तेच मध्ययुगीन वास्तूंबद्दलही झाले. सुलतानांचे राजप्रासाद, सरदार-दरकदार यांच्या हवेल्या बहुतेक ठिकाणी नामशेष झाल्या. परंतु त्यांची थडगी, त्यांनी बांधविलेल्या मशिदी शिल्लक गहिल्या. नागरी स्वरुपाच्या शिल्पाची कल्पना तत्कालीन वाड्मयीन वर्णने आणि क्वचित कोठे शिल्लक असणारे अवशेष यावरुनच बांधावी लागते.

मध्ययुगीन सल्तनतीचा पाया दौलताबादेला घातला असला तरी थोड्याच काळात सुलतानांनी राजधानी महाराष्ट्राबाहेर, गुलबर्गा येथे हलवली. मंतर बिदर येथे गेली. पुढे एकाच्या पाच सल्तनती झाल्या आणि एलिचपूर, अहमदनगर, बिदर, विजापूर आणि गोवळकोंडा या राजधान्या झाल्या. पैकी बिदर, विजापूर आणि गोवळकोंडा येथे मोठ्या प्रमाणावर न्नांथकाम झाले. विशेषत: आदिलशाही ब कुतुबशाही घराण्यांनी प्रेक्षणीय वास्तू उभारल्या. इमादशाही व निजामशाही यांची सांपत्तिक स्थिती आणि राजकीय जीवन भव्य वास्तुकामाच्या निर्मितीला पोषक नव्हते. तरीही त्यांच्या वास्तुशिल्पाचे ही काही अवशेष शिल्लक आहेत. त्यावरून गुणवत्तेच्या बाबतीत येथील शिल्पकार फारसे मागासलेले नव्हते - किंबहुना चांगले वाकबगार असावेत असे दिसते. तत्कालीन सांस्कृतिक जीवनाचे अंग म्हणूनही या बास्तुशिल्पाचा परिचय आवश्यक ठरतो.

वास्तुशिल्पाची अगदी प्राथमिक पायरी म्हणजे नगररचना. भारतीय वास्तुशास्त्रात नगररचनेचे तपशीलवार नियम ग्रथित केलेले होते. तशाच प्रकारे इस्लामी विचारवंतानी आदर्श नगरसंयोजन कसे असावे याविषयी काही कल्पना मांडलेल्या आहेत. नव्या नगराची उभारणी करावयाची असेल तर नियोजित क्षेत्राच्या मध्यवर्ती ठिकाणी शुक्रवारच्या सामूहिक प्रार्थनेची 'जामी मशीद* उभारणे हे आद्य कर्तव्य ठरते. ही नगराची अत्यावश्यक वास्तू. पुढे तीच, मध्यबिंदूच्या ठिकाणी कल्पून तिच्याभोवती मद्रसे (पाठशाला) राजप्रासाद, सरकारी कार्यालये असावीत. या इमारती याच क्रमाने जामी मशिदीपासून दूरदूर असाव्यात. त्या पलिकडे बाजार, त्याच्याही पलिकडे कारागिरांची वस्ती ठेवण्यात यावी. 

साधारण नागरिकांची घरे या सगळ्यांपासून अलग, रोजच्या व्यवहाराला पुरेसा आडोसा राहील अशा बेताने वसवावीत. पडद्याची चाल असल्यामुळे असा अलगपणा आवश्यक होता. अहमदनगरसारखी दोनतीन शहरे नन्याने बसविण्यात आली तर इतर ठिकाणी जुन्याच नगराची वाढ करण्यात आली. स्वाभाविकच अशा नगरांमधे आमूलाग्र बदल करणे अशक्य होते. नव्या नगरांची रचना कशी झाली ते आज कळणे अशक्य झाले आहे कारण गेल्या दीडशे वर्षात इतके बदल झाले आहेत की ''हेच जुने गाव" असा निर्वाळा देणे अवघड झालेले आहे. तरीही वाड्मयीन वर्णने आणि काही अवशेष यांच्या साहाय्याने मध्ययुगीन नगररचना कशी होती याची आणि परंपरागत इस्लामी संकल्पनांशी ती कितपत मिळती जुळती होती याचे विवेचन पुढे केळे आहे.

मध्ययुगीन नगरात आणि थोड्या मोठ्या खेडेगावात हमखास आढळणारी एक गोष्ट म्हणजे गावाभोवतीची तटबंदी-साधारण कमरेइतक्या उंचीपर्यंत दगडाची, त्याच्यावर बारा ते पंधरा फूट इतक्या उंचीची पक्क्या वा कच्च्या विटांची भिंत उभारण्यात येई. दरवाजे पूर्ण दगडी बांधणीचे, कमानदार असत. कित्येक ठिकाणी तटबंदी जमीनदोस्त झाली आहे पण दरवाजे-म्हणजे त्याभोवतीची गोपुरे-शिल्लक आहेत. दरवाजा, त्याच्या आत रखवालदारांसाठी खोल्या, वरच्या बाजुला गॅलरी अशी रचना असे. निजामशाही सरदार सलाबतखान याने तिसगाव या गावाभोवती बांधलेल्या तटबंदीची गोपुरे अलिकडेपर्यंत चांगल्या अवस्थेत होती आणि तत्कालीन वास्तुशिल्पाचे उत्तम नमुने म्हणता येण्यासारखी होती.

मध्ययुगीन सल्तनतीच्या नगर संयोजनाची पहिली ओळख होते ती देवगिरी-दौलताबाद येथे. अल्लाउद्दीन खलजीच्या स्वारीच्या वेळी देवगिरीभोवती तटबंदी बांधून झालेली नव्हती असे फेरिश्त्याने नमूद केले आहे. खलजींच्या काळात नगराच्या रचनेत काही बदल  झाल्याची नोंद नाही. महंमद तघलकाने राजधानी दिल्लीहून हलवून दौलताबादेला आणली. त्यानंतर काही बांधकाम सुरू झाले असावे परंतु साडेतीन वर्षातच राजधानी परत  दिल्लीला गेल्यामुळे नगराची रचना अर्धवटच सोडण्यात आली असावी. मात्र इ. स. १३८९ मधे म्हणजे महंमद तघलकानंतर पन्नासच वर्षानी एका अरब प्रवाशाने तूघलकाच्या दौलताबादेचे वर्णन लिहून ठेवळे आहे. 

समाजातील प्रत्येक गटासाठी स्वतंत्र पेठ असावी अशी योजना होती-सैनिकांसाठी एक, वजिरांसाठी एक, कारभार्‍यांसाठी एक, काझी आणि उलेमा यांच्यासाठी एक आणि दरवेशी, सूफी यांच्यासाठी वेगळी-प्रत्येक पेठेत मशिदी, बाजार, हमाम, पिठाच्या चक्क्या, भटारखाने अशा अत्यावश्यक गोष्टींची तरतूद केलेली होती. शिवाय व्यापारी, कारागीर, सोनार, लोहार अशांच्या राहण्याची सोय केलेली होती. खरेदी-विक्री यासाठी कोणालाही आपल्या पेठेतून उठून दुसर्‍या पेठेत जाण्याची गरज पडू नये अशासाठी ही योजना होती. त्यामुळे प्रत्येक पेठ म्हणजे जणू काही एक स्वतंत्र व स्वयंपूर्ण नगरच होते''. ही योजना प्रत्यक्षात उतरलेली नसली तरी चौदाव्या शतकामधे शासंकांच्या मनात नगररचनेविषयी काय कल्पना होत्या ते यावरून समजू शकते. 

या योजनेची इस्लामी नगररचनेच्या संकल्पनेशी तुलना केली तर योजकांच्या विचारसरणीतील किंवा त्यांच्या भोवतालच्या परिस्थितीतील वेगवेगळेपणा स्पष्ट होतो. मध्यवर्ती म्हणता येथील अशा ठिकाणी जामी मशीद आधीच तयार झालेली होती. परंतु बाकी तपशील-मुख्यत: वस्तीच्या पेठवार विभागणीचा तपशील बराचसा निराळा दिसतो. तघलकाच्या संयोजकांनी, व्यवसायवार विभागणी केलेली आहे. ही गोष्ट प्राचीन भारतीय परंपरेनुसार झाली.

बहमनींच्या काळात तसेच निजामशाहीत दौलताबादच्या वस्तीत आणि आकारात मोठीच वाढ झाली. डोंगराच्या माथ्यावर फारशा वस्तीला जागाच नव्हती, यादव काळात आणि नंतर बहमनींच्या काळात वस्ती होती ती डोंगराच्या पायथ्याशी, पूर्वबाजूला. याच भागाला आज 'महाकोट' म्हणतात. महाकोटाच्या सर्व बाजूला खंदक आहेत. खंदकांना लागून तटबंदी आहे आहे आणि तटबंदीच्या आतल्या बाजूला, लागूनच सलग स्स्ता आहे. वस्तीमधे, पूर्वपश्चिम व उत्तरदक्षिण असे, एकमेकांना काटकोनात छेदणारे दोन दोन रस्ते आहेत. रस्त्यांची रुंदी शक्‍यतो सारखी ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे, ती चार मीटर एवढी. यांना समांतर पण रुंदीने लहान असे उपरस्तेही होते . निजामशाहीमधे वस्ती वाढल्यामुळे महाकोटाच्या बाहेर वसाहत वाढू लागली. मलिक अंबरने या वस्तीभोवती कोट घातला आणि त्यामुळे या नव्या वस्तीला 'अंबरकोट' म्हणू लागले. ही नवी वस्ती महाकोटाच्या बाहेर पण पूर्व-उत्तर-दक्षिण अशा बाजूंना होती. 

इमादशहांनी एलिचपूर येथे राजधानी केली. महाराष्ट्राच्या उत्तरसीमेच्या अगदी नजीक असे हे गाव, आज त्याच्या मुसलमानपूर्व नावाने 'अचलपूर' म्हणून ओळखले जाते. यादवांच्या काळात अचलपूर हे प्रादेशिक शासनाचे केंद्र होते, येथेच अल्लाउद्दिनने दोन दिवस मुक्काम केला होता आणि यादव सुभेदाराचा पाहुणचार घेऊन देवगिरीवरील हल्लयाला रवाना झाला होता. एके काळी या गावाचा आकार बराच मोठा होता, गावात चाळीस हजार उंबरे होते अशी आख्यायिका आहे. आजमितीला कसेबसे दीडदोन हजार असतील. नगररचनेच्या दृष्टीने अचलपूराची माहिती उद्बोधक ठरते. गावाचे अकरा विभाग असून प्रत्येक भागाला त्या त्या भागाच्या पाटलाच्या नावावरून ओळखतात. या भागांना 'खेल' असे स्थानिक नाव आहे, आणि विभाग-नाबे, 'खेल-जपमाळी' 'खेल-त्रिंबक-नारायण' अशासारखी आहेत. या पेठांचे पूर्वी चोपन्न उपविभाग होते, आता पस्तीस शिल्लक आहेत. हे उपविभाग, ते ते विभाग वसविणाराच्या किंवा त्याच्या कारभार्‍याच्या नावाने ओळखले जातात, जसे सुलतानपुरा, अन्वरपुरा, नसीबपुरा इ. मात्र हे 'पुरे' जाती किंवा व्यवसाय यानुरूप वसविलेले असावेत असे दिसत नाही तसेच त्यांच्या वसाहतीचा कालक्रमही सांगता येत नाही.

बहमनींच्या काळात महत्त्वाचे सरकारी ठाणे असणारे दुसरे गाव म्हणजे 'जुन्नर' “ही फार मोठी व्यापारी पेठ होती आणि सातवाहन कालापासून प्रसिध्द होती. कोकणातून देशावर येण्याच्या रस्त्यावरचे हे नाक्‍याचे ठाणे असल्याने सल्तनतींच्या काळीही ते मुलकी व  लष्करी ठाणे होतेच. या गावाची वस्ती पस्तीस भागात विभागलेली होती आणि या भागांना 'पुरा' किंवा “वाडा' म्हणत. येथे मात्र या पेठा व्यवसाय व जाती यांच्या आधारावरच वसलेल्या दिसतात. आज त्यांना सय्यदपुरा, मन्सूरपुर अशी नावे असली तरी आणि हे 'पुरे सल्तनतींच्या काळातले असले तरी इतर पेठा पूर्वीच्या काळातील होत्या. 

सगळ्यात महत्त्वाचे ठरलेले शहर म्हणजे अहमदनगर. अहमद निजामशाहाचे मूळ ठाणे जुत्रर येथे होते. परंतु दौलताबादेचे ठाणे ताब्यात आणण्यासाठी किंवा त्याच्यावर दबाव ठेवण्यासाठी त्याच्या जवळ आपले ठिकाण असले पाहिजे असे ठरवून अहमदशाहाने सध्याच्या अहमदनगरची निवड केली. इतर बहुतेक मध्ययुगीन नगरांप्रमाणे या नगराच्या बाबतीत अशी आख्यायिका आहे की सुलतान शिकारीला गेला असताना, या ठिकाणी कोल्हा उलटून शिकारी कुत्र्यांच्या अंगावर धावून गेला तो या जागेचा गुण आहे असे समजून सुलतानाने हे ठिकाण निवडले. वस्तुत: या जागेची निवड त्याने अतिशय विचारपूर्वक, संरक्षणाला उपयुक्त, वस्तीला योग्य म्हणून केलेली होती. उत्तेकंडे व ईशान्येकडे जेञूर- पिंपळगाव टेकड्या होत्या म्हणजे त्या दिशेने येणार्‍या सैन्याला (शत्रूला) घाटातच गाठता येण्यासारखे होते. 

दक्षिणेकडेही डोंगरांची रांग होती आणि डोंगरमाथा धरून ठेवला तर तिकडूनही शत्रूला अडवता येण्यासारखे होते. या जागेचा दुसरा गुण असा की ती खोलगटात असल्याने भोवतालच्या उंचवट्यावरून पाणी वाहून आणणे सोपे होते. नगर शहराचा सल्तनतीच्या काळातला विस्तार कसकसा होत गेला हे पाहिले तर या गोष्टीचे महत्त्व ध्यानात येते. अगदी सुरवातीला, आज *माळीवाडा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागात आणि नालेगाव या नदीच्या जवळच्या भागात वस्ती होती. ही वस्ती वाढत गेली ती माळीवाड्याच्या ईशान्येच्या दिशेने. अहमद निजामशाहाच्याच काळात ख्रिस्त आळी, वेहरामपुरा. शाहगंज, हातीमपुरा इकडे वस्ती झाली व ईशान्येच्या दिशेने वाढत गेली. या प्रत्येक पुऱ्यासाठी नळातून पाणी आणण्यात आले. लोकवस्ती वाढत गेली तशा पेठा पश्चिमेकडे सरकत सीना नदीच्या काठापर्यंत गेल्या. जामी मशीद, मदरसा, राजप्रासाद ही सगळी एकमेकाच्या आसपास होती-ती अगदी पश्चिमेच्या बाजूला. शहराभोवती तटबंदी होती, आता फक्त दरवाजे शिल्लक आहेत. आजच्या विधानावरून निजामशाही नगराचे विधान कसे होते हे सांगणे अवघड आहे. फक्त, ज्या ज्या ठिकाणी या काळात बांधलेल्या पाण्याचे नळ पोचले आहेत तेथे मोठ्या लोकांचे प्रासाद किंवा दाट वस्ती असावी एवढेच सांगता येते.

नगररचनेसंबंधी सामान्य निष्कर्ष एवढाच काढता येतो की, नगराचे आवश्यक भाग म्हणून जामी मशिदीसारख्या इमारती सोडल्या तर इस्लामी संकल्पनेचे पालन कोणा मध्ययुगीन सुलतानांनी केल्याचे दिसत नाही. यांचे मुख्य कारण म्हणजे त्यांनी आधी वस्ती असणार्‍या ठिकाणीच आपली राजधानी किंवा ठाणे वसविले. त्यांना नगरविस्तार करता आला पण नवनिर्मितीला वाव थोडा होता. दुसरीही एक गोष्ट ध्यानात ठेवावी लागते, सल्तनतींच्या अस्ताबरोबर यापैकी बहुतेक ठिकाणी उतरती कळा लागली आणि विसाव्या शतकात अहमदनगरसारख्या ठिकाणी झालेली वस्तीची वाढ अशा पध्दतीने झाली की त्यामुळे जुना चेहणमोहरा पुसून गेला आहे.

नगरांइतकेच किंबहुना काही दृष्ट्या सल्तनतींनी जास्त महत्त्व दिले ते दुर्गरचनेला. शिवकाळात प्रसिध्दीला आलेल्या बर्‍याच किल्यांची उभारणी बहपनी वा निजामशाही यांनी केली. सगळ्या किल्यांची माहिती घेणे अशक्य आणि अनावश्यक आहे म्हणून एका डोंगरी आणि एका भुईकोट किल्याचे थोडे तपशीलवार वर्णन पुढे केले आहे. डोंगरी किल्ला म्हणजे दौलताबाद. यादवकालात देवगिरीच्या डोंगराच्या माथ्यावर राजप्रासाद व निकटचे , सेवक अशा अगदी मोजक्या लोकांची वस्ती होती. शिवाय डोंगराच्या बरगड्यात हिंदू व जैन लेणीही खोदलेली होती. मुख्य वस्ती डोंगराच्या पायथ्याशी, आज 'महाकोट' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागात होती आणि अल्लाउद्दिन खिलजीच्या स्वारीच्या वेळी याही भागाभोवती तटबंदी बांधून पुरी झाली नव्हती असे फेरिश्ता सांगतो हे वर सांगितलेले आहे."

उत्तर-दक्षिण मार्गावर, विशेपत: बेरूळच्या घाटाच्या टोकावर हा डोंगर असल्याने त्याची जागा लष्करी दृष्टया मोक्याची होती. शिवाय हा डोंगर इतर रांगेपासून फटकून निखून स्वतंत्र उभा राहिला होता, याची तटबंदी करणे सोपे होते. बहुधा बहमनी काळाच्या पूर्वार्धात, किंबहुना सुरवातीलाच दोन गोष्टी करण्यात आल्या. नगराभोवतालच्या अपूर्ण अवस्थेतील यादव तटबंदीच्या ऐवजी / जागी दुहेरी रांगाचा, अर्धगोल बुरूजांचा तट उभारण्यात आला.

 दक्षिणेच्या आणि उत्तरेच्या बाजूने वाहत जाणारे ओढे रुंद व खोल करून या तटांबाहेर खंदक तयार करण्यात आला आणि खंदकाबाहेर भराव टाकून उंचवटा  तयार करण्यात आला. त्यामुळे खंदकाकडे येणारे शत्रूसैनिक, तटावरून लगेच दिसू शकतात, कोणाला गुप्तपणे तेथपर्यंत पोचणे अवघड होते. दुसरे म्हणजे देवगिरीच्या डोंगशभोवतीचा पायथ्याचा भाग खणून काढून नव्वद फूट उंचीची खडी दरड तयार करण्यात आली. ही तयार करीत असताना यादवकालात तयार झालेल्या दोन गुंफाही कापून काढण्यात आल्या. त्यांचा उरलेला भाग या दरडीच्या पूर्वकडे असलेल्या भागात आजही स्पष्ट दिसतो. केवळ दरड खडी करूनच काम भागले नाही, तिच्या पायाशी तीस फूट खोल आणि पन्नास फूट रुंद असा खंदक तयार करण्यात आला. यात पाणी आणण्यासाठी उत्तरेकडील टेकड्यांवरून नळ घातले. डोंगरमाथ्यावर जाण्यासाठी एक बोगद्याचा जिना करण्यात आला-याशिवाय वर जाण्याला मार्ग नाही. इतके झाले तरी डोंगरमाथा हा संकटकाळी वस्तीचा ही जाणीब कायमच होती आणि म्हणून महाकोटाची तटबंदी मजबूत आणि तंदुरुस्त राखण्यात आली.

रविवार, ६ सप्टेंबर, २०२०

महाराष्ट्राची चित्रकला

महाराष्ट्राची चित्रकला

चित्रकला म्हटल्याबरोबर महाराष्ट्रात प्रथम डोळ्यासमोर नाव उभे राहते ते अजिंठ्याचे. येथील बौध्द गुंफातील चित्रकाम भारतातच नव्हे तर सर्व जगात ख्यातनाम झालेले आहे. चवथ्या-पाचव्या शतकात केव्हांतरी गौतम बुध्दाच्या थोरबीचे प्रकटन करण्यासाठी ही चित्रे रंगविण्यात आली. या ठिकाणच्या एकेका गुंफेतील चित्रकामाची,प्रसंग-चित्रांची दखल येथे घेता येणार नाही, दखल घ्यावयाची आहे ती परंपरेची, अजिंठा चित्रकाम जिच्यातून निर्माण झाले त्या कलापरंपरेची. ही परंपरा दृगोचर होते तेवढ्या पुरताचा अजिंठ्याचा निर्देश करता येतो. आज क्रमांक एक, दोन, सोळा व सतरा या गुंफातील चित्रकाम अवशिष्ट आहे. यापैकी क्रमांक एकच्या लेण्यातील काम बरेच टिकून आहे. या लेण्यातील भिंती, खांब, छत हे सगळे भाग रंगकामाने मढविलेले आहेत. 

भितींवरील चित्रे ही बोधिसत्वाच्या, गौतमाच्या चरित्रातील प्रसंगांची असली तरी स्तंभ व छत यावरील रंगकाम केवळ अलंकरणात्मक आहे, शोभेसाठी केलेले आहे. काहीशामातकट दिसणाऱ्या गुलब्राक्षी रंगाच्या पृष्ठभूमीवर, फळेफुले, भौमितिक आकृती, पशुपक्षी,यक्ष-यक्षी यांची चित्रे आहेत. पुढे वेरुळच्या कैलास लेण्याच्या मंडपात चित्रे रंगविण्यात आली. ती बरीचशी नष्ट झाली असली तरी दोन्ही जैन लेण्यातील चित्रकाम अजूनहि चांगल्या स्थितीत आहे. येथेहि भिंती, छत हे सगळे भाग चित्रांनी मडविलेले आहेत. यावरून, वास्तुशोभनासाठी, इमारती सुशोभित करण्यासाठी रंगकामाचा, चित्रकामाचा उपयोग सरसहा करण्यात येत होता हे स्पष्ट होते. इतर प्रदेशांप्रमाणे महाराष्ट्रातही ही प्रथा प्राचीन काळी अस्तित्वात होती, गुणवत्तेमध्ये श्रेष्ठ होती. पुढे मराठेशाहीत तिचा सर्वत्र बापर झालेला दिसतो. तिथेहि गुलबाक्षी रंगाच्या पृष्ठभूमीवर नाना विषय चित्रित केलेले दिसतात. मध्ययुगाच्या आधी आणि नंतर वास्तूच्या सजावटीसाठी हे एकच माध्यम वापरलेले होते यावरून मध्ययुगातही घरेदारे रंगवीत असत, त्यावर चित्रे काढीत असत असा अंदाज केल्यास फारसे चुकणार नाही. दुर्दैवाने आज या काळातले राहते वाडे, राजप्रासाद अशासारख्या वास्तू कोठे शिल्लक राहिलेल्या नाहीत. एकदोन ठिकाणी अवशिष्ट रुपात  आहेत. 

दौलताबादेच्या परिसरात एकदोन आहेत आणि विजापूरजवळ कुमटगी येथे आदिलशाहीतील जलमंदिराचा काही भाग पाऊणशे वर्षापूर्वी उभा होता. त्याचे वर्णन नोंदविण्याऱ्या अभ्यासकांनी या महालातील चित्रकामाची नोंद घेतली आहे. त्यावरून या काळात इमारतींच्या सजावटीसाठी रंग-चित्रे यांचा उपयोग करण्यात येत असे हे स्पष्ट होते. भित्तिचित्रे हे भारतीय चित्रकलेचे सर्वात महत्त्वाचे अंग होते, प्राचीन काळापासून तो थेट अठराव्या शतकापर्यंत ही प्रथा रुढ होती. 

मात्र मध्ययुगातील कामाचे नमुने उपलब्ध नसल्याने मध्ययुगीन चित्रकलेचा मागोवा घेण्यासाठी एका निराळ्या माध्यमाकडे वळावे लागते. ते माध्यम म्हणजे कापडी पट आणि कागद. या काळातले पटही उपलब्ध नाहीत म्हणून फक्त कागदावर काढलेली चित्रे व त्यांची परंपरा ध्यानात घेता येते. परंतु अशी चित्रे संख्येने फारच थोडी आहेत. तीही काहीशी फुटकळ, तुटक स्वरुपाची. खानदेश, एलिचपूर इकडे झालेले चित्रकाम अद्याप मिळालेले नाही. अहमदनगर येथे झालेले काम शिल्लक आहे. त्यात एकच संग्रह असा आहे की ज्याच्या काळाविषयी काही निश्चित सांगता येते कारण ही चित्रे ग्रंथबध्द आहेत. 

भारतातील सगळ्याच सल्तनतीत ग्रंथलेखन आणि ग्रंथसजावट या कलांना महत्त्व होते. दिल्ली, गुजरत, माळवा इकडे चित्रकलेचा मुख्य अविष्कार झाला तो ग्रंथातील चित्रांच्या रुपाने. महाराष्ट्रातही याच प्रकारे चित्रकलेचा आरंभ (मध्ययुगापुरता) झाला. आज उपलब्ध असलेला आणि प्रसिध्द झालेला सर्वप्राचीन चित्रयुक्त ग्रंथ म्हणजे 'तारीफ-इ-हुसेनशाह इ. '* या ग्रंथाची रचना हुसेन निजामशाहाच्या कारकीर्दीच्या शेवटी-शेवटी सुरू झालेली असली तरी तो पूर्णत्वाला त्यांच्या मृत्यूनंतर गेला. ग्रंथ पूर्ण करून घेण्याचे व त्यातील चित्रे काढविण्याचे काम हुसेनची पत्नी हुमायूँशा हिने केले असावे. त्याच्या मृत्यूनंतर काही काळ निजामशाहीची सत्ता तिच्या हाती होती व त्याकाळात हे काम पूर्णत्वाला गेले असावे. म्हणजेच या ग्रंथाचा आणि त्यातील चित्रकामाचा काळ इ. स. १५६५ ते १५७० असा असावा. चित्रव्रिषय हे ग्रंथाला अनुसरून आहेत. फारसी काव्यग्रंथाच्या प्रथेप्रमाणे याचे दोन ठळक भाग आहेत, एकात त्याच्या पराक्रमाचे वर्णन आहे, वीरगाथा 'बझमनामा' तर दुसऱ्यात त्याच्या प्रणयाराधनेचे *र्झमनामा', बीर आणि शृंगार हे दोन रस प्रमुख असल्याने चित्रकाराला सुयोग्य वर्ण्यविषय मिळालेले आहेत. पुस्तकाचे संपूर्ण पान भरेल अशी तेरा चित्रे या हस्तलिखित ग्रंथात आहेत.

“दख्खनी कलम' म्हणून पुढे प्रसिध्दीस आलेल्या चित्रशैलीचे उगमस्थानी असल्याने या चित्रांना विशेष महत्त्व आलेले आहे. याच रोपट्याचा मोठा वृक्ष होऊन विजापूर, गोवळकोंडा येथे अत्यंत उच्च प्रतीची आणि विलोभनीय अशी चित्रशैली उत्पन्न झाली. “तारीफ च्या चित्रांची निर्मिती अर्थातच अचानक झालेली नाही. त्यांना पूर्वपीठिका आहे आणि ती अनेक पदरी आहे. या चित्रातील तपशील नीट पाहिला तर हे सहज ध्यानात येते की यापूर्वीच्या इराणी, माळवा दरबारातील तसेच विजयनगरमधील (लेपाक्षी) चित्रकलेशी या चित्रकाराचा चांगलाच परिचय होता. त्यातील रंगरेषांच्या बारकाव्याची उत्तम माहिती होती. या सर्वांपासून त्याने काहीना काही बारकावे, तपशील उचलला पण सबंध चित्र मात्र असे तयार केले की चित्रांना स्वत:चे निराळेपण, वैशिष्ट्य प्राप्त झाले. इतरांशी नाते ठेवून असणारी पण त्यांच्यापेक्षा भिन्न अशी चित्रशैली त्याने निर्माण केली.

ही चित्रे आहेत तरी कशाची ? तेरापैकी चार चित्रे ही हुसेन निजामशाह आणि त्याची प्रिय बेगम हुमायूशा यांची एकत्र आहेत. एकात निजामशाह एकटाच आहे. सहा चित्रे तालिकोटच्या रणसंग्रामाची आहेत तर एक चित्र आहे एका युबतीचे. फुलांनी बहरलेल्या वृक्षाची फांदी हातात धरून ती उभी आहे आणि शेजारी तिच्या सखी दिसतात. हे चित्र प्राचीनकाळी प्रचलित असणाऱ्या 'दोहदपुरण' नावाच्या विधीचे आहे. पहिले पान सजावटीच्या चित्राचे अशी तेरा होतात.

हुसेन निजामशाह आणि हुमावूँशा यांची चित्रे अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण, एका अर्थाने अद्वितीय म्हणावीत अशी आहेत. दोन चित्रात राजाराणी एकाच मंचकावर पण शेजारी-शेजारी बसली आहित. दोन चित्रांमध्ये राणी, राजाच्या मांडीवर बसलेली असून दोघांचे हात एकमेकांच्या खांद्यावर ठेवलेले आहेत. या चारही चित्रातील निजामशाहचे चित्र एकसारखे आहे, इतकेच नव्हे तर पाचव्या, म्हणजे ज्यात सुलतान एकटा आहे त्यातील चित्र त्याच माणसाचे आहे हे सहज जाणवते, याचा अर्थ असा की ही अगदी खऱ्याखुऱ्या अर्थाने व्यक्तिचित्रणे आहेत. यावरून बेगमची चित्रे तशीच, व्यक्तिचित्रणे असावीत हे उघड आहे. परंतु पुढच्या काळात कोणी तरी पुन्हा रंगकाम करून राणीचे चित्र झाकून टाकले आहे. असे करताना, राजाचा जो हात तिच्या खांद्यावर होता त्याची फेरमांडणी किंवा फेरआखणी करावी लागली आहे. चारही चित्रात, नंतर लावलेला रंग फिकट तरी झाला आहे किंवा उडून तरी गेला आहे त्यामुळे राणीची आकृती दिसू लागली आहे. 

इराणी किंबहूना अन्य कोणत्याच देशातील इस्लामी चित्रकारांनी एखाद्या विशिष्ट स्त्रीचे व्यक्तिचित्रण शखाटलेले नाही. निदान असे चित्र कोठे प्रसिध्द तरी झालेले नाही. काव्यामधे, कथेमधे येणार्‍या स्त्रीपात्रांची चित्रे आहेत. ळैला-मजनू किंवा शिरीन-फरहाद यांच्या चित्रात त्या काव्यांच्या नाविकांची चित्रे आहेत पण स्त्रियांची न्यक्तिचित्रणे अजिबात नाहीत. येथे मात्र राणीचे व्यक्तिचित्रण आहे. निजामशाह आणि त्याची बेगम अशा पध्दतीने बसली आहेत की त्यांना पाहिल्यावर विष्णू-लक्ष्मी किंवा शिव-पार्वती यांच्या मूर्ती ज्या पध्दतीने घडवितात त्याचीच आठवण यावी. चित्राचा आशव हा केवळ भारतीयच मव्हे तर हिंदू परंपरेतील आहे. अहमदनगरच्या राजघराण्याचा संस्थापक मलिक निजाम हा जन्माने हिंदू होता, पुढे मुसलमान झाला. 

नगर-वऱ्हाड यांच्या जवळजवळ हद्दीवर असणाऱ्या पाथरी गावी कुलकर्णीपणाचे काम करणाऱ्या कुटुंबातील होता. पाथरीचे कुलकर्णी आणि नगरचे “बहरी' (बहिरोपंताचे) राजघराणे यांचे नाते पुढे कित्येक पिढ्यापर्यंत दोन्ही बाजूंच्या, या स्मरणात होते. पाथरी गाव आपल्या ताब्यात आणण्यासाठी निजामशाहांनी सतत प्रयत्न केले होते. तो थोडा निसळा भाग म्हणून सोडून दिला तरी, या घराण्याची हिंदू पूर्वपीठिका विसरता येत नाही. त्यामुळेच, राजाराणी ही साक्षात विष्णुलक्ष्मीच असे समजण्याच्या हिंदू परंपरेतूनच हुसेन निजामशाह आणि हुमायूँशा यांची ही चित्रे निर्माण झाली आहेत असे म्हटलेतर वावगे ठरणार नाही.

“दोहदपूरण' या नावाने ओळखले जाणारे चित्र याहीपेक्षा जास्त लक्षवेधक ठरते. फुलांनी बहरलेल्या वृक्षाची फांदी हातात धरून उभी असणारी राजस्त्री आणि तिच्या चारपाच सख्या असे हे चित्र आहे. एखाद्या सुंदर स्त्रीने अशोकाच्या झाडाला आपल्या पायाने स्पर्श केला असता त्या वृक्षाला फुलांचा वहर येतो असा प्राचीन कविसंकेत आहे. त्याचा वापर संस्कृत वाडमंयात अनेकदा केलेला आहे.-: 'मालविकाग्रिमित्र' नाटकात याच संकेताचा उपयोग केलेला आहे. प्राचीन शिल्पात वृक्षाला पायाने विळखा घालणारी, आलिंगन देणारी, त्याच्या फांदीला लोंबकळणारी तरूण स्त्री सर्वत्र आढळते. तिला 'वृक्षी' म्हणूनच ओळखतात. या विशिष्ट शिल्पाचा प्रजननाशी संबंध आहे. आणि सुंदर स्त्रीच्या पदस्पर्शनि नहर येतो तसा या वृक्षस्पर्शाने स्त्रीची अपत्यप्राप्रीची इच्छा सफल होते ! अशोकाच्या झाडाची इच्छा पुरविली की त्या स्त्रीची पुत्रप्राप्तीची कामना पूर्ण होते, म्हणून स्त्रिया हा विधी करीत असत. तोच विधी हसेनशाहाची रुपवती बेगम येथे करीत असावी. दोहदपूरण स्त्री अन्य कोणी नसून हुमायूँनशाहच आहे. हे तिचेच व्यक्तिचित्रण आहे. हा संकेत समजल्यामुळे सुधारणावाद्यांनी या चित्राला हरताळ फासला नाही. मात्र हे बेगमचेच आहे याची जाणीव त्यांना झाली नसावी. माही तर इतर चित्रातल्याप्रमाणे नेगमचे हेही चित्र त्यांनी “मिटवले असते. परंतु हे चित्र जर बेगमचे नसेल तर या पुस्तकात त्याचे प्रयोजनच उरत नाही, ते इथे कशासाठी रंगविण्यात आले आहे याचा उलगडाच होवू शकत माही. ग्रंथातील प्रत्येक चित्र हे निजामशाहाशी संबंधित आहे हे ध्यानात घेतले म्हणजे त्याच्याशी अथवा त्याच्या प्रियतमेशी संबंध नसणारे चित्र या ग्रंथात येऊ शकणार नाही हे स्पष्ट होते. बरोबर बेगम नसलेला, एकटाच मंचकावर बसलेला हुसेनशाह एकाच चित्रात आहे. हा देखावा आहे दरबारात चाललेल्या नृत्यगायनाचा. ह्याच्या डाव्या हाताला जमिनीवर दोघे नसलेले आहेत त्यापैकी एकजण हातवारे करून काहीतरी सांगतो आहे किंवा गातो आहे. त्यांच्यामागे वीणा व टाळ घेतलेले दोघे साथीदार उभे आहेत. चित्रात खालच्या पट्ट्यात दोघी नर्तिका आणि त्यांचे साजिंदे दिसतात. निजामशाहाची चेहरेपट्टी आधीच्या चार चित्रांसारखी, त्याचे न्यक्‍तित्व सहज ओळखू येईल अशी आहे. आतापर्यंतच्या सगळ्याच चित्रात दोन्ही बाजूला रुमालाने वारा घालणाऱ्या दासी उभ्या आहेत. त्यांच्या आकृती उभट, काहीशा सडपातळ आहेत, चेहे जवळजवळ एकसारखे आहेत आणि अंगाखांद्यावर दागंदागिने आहेत.

चित्रातील आकृतींचे संयोजन आणि पृष्ठभूमी जवळपास सारखीच आहे. बादशहा व बेगम ही मध्यभागी, इतरांपेक्षा, थोड्या मोठ्या आकाराची. त्यांच्या भोबती कमानी, खिडक्या अशी वास्तुरुप चौकट आहे. त्यातून फुलझाडे डोकावतात. वरच्या बाजूला कापडी छत आहे व त्यावर नक्षीकाम. एका चित्रात त्याच्याही वर घुमटकार छप्पर दिसते. मात्र हे सगळे भाग आखीव, वेगवेगळ्या आकाराचे तुकडे कापून एकमेकाशेजारी चिकटवावेत तसे दिसतात. पृष्ठभूमीच्या निरनिराळ्या पातळ्या एकमेकात मिसळून गेल्याचा भास कोठेही होत नाही. त्यामुळे एखाद्या रंगपटावरचा प्रसंग बघतो आहे असा भास होतो. 

रणसंग्रामाच्या सहा चित्रात खूपच सारखेपणा आहे. सैनिक, घोडेस्वार, हत्ती हे सगळे तीन आडव्या पट्टयात, एकावर एक असे मांडले आहेत. त्यांच्या हालचालीत गती, जिवंतपणा निश्चितच आहे, पण तरीही एकूण चित्रसंयोजन फार आखीव असे वाटते. यातल्या एका चित्राचा विशेष उल्लेख करावयास हवा. यात रामराजाचा शिरच्छेद करणारा बादशहा दाखविला आहे.

चित्रांची रंगयोजना गडद, काहीशी भडक म्हणावी अशी आहे. सगळ्याच चित्रांना गडद निळ्या किंवा दाट हिरव्या रंगाची पृष्ठभूमी आहे. स्त्रियांची वसे अशाच हिरव्या, निळ्या आणि लाल रंगाची आहेत, त्यावर सोनेरी रंगाने नक्षी किंबा दागिने दिसतात. पुरूष आकृती सहसा पांढर्‍या स्वच्छ कपड्यात आहेत. छतासाठी व कनातींसाठी काहीशा फिकट निळसर रंगाचा उपयोग केला आहे, तसा एका चित्रात निजामशाहाचा अंगरखा किंचित गुलाबी रंगाचा दिसतो.या चित्रांना पूर्वपीठिका आहे आणि ती अनेक पदरी आहे याचा उल्लेख वर केला आहे. त्याचे थोडे विवेचन करता येईल. चित्र संयोजन, त्यातील वास्तुखंड, कमानी, फुलझाडे ही इराणी चित्रात दिसतात तशी आहेत. पुरूषमाणसांच्या आकृती व चेहरेपट्टी (निजामशाह सोडून इतरांची) ही मांडूच्या चित्रातल्या पुरुषांसारखी आहे. दासींची आणि दोहदपूरणाच्या-चित्रातील बेगमेची आकृती, त्यांची वस्रे ही सगळी विजयनगरच्या चित्रांशी नाते सांगतात. विशेषत: त्या दोन नर्तकी खास दक्षिण भारतीयच दिसतात. चित्रांची रंगसंगतीसुध्दा विजयनगर. परंपरेतील आहे, असे टीकाकार समजतात. इतके सगळे घटक एकत्र आणून एक निराळेच रसायन तयार करणारे हे चित्रकार कोठून आले आणि हुसेनशाहाच्या मृत्यूनंतर त्यांचे काय झाले, या परंपरेतील चित्रे फारशी का निघू शकली नाहीत याचा नीटसा उलगडा इतिहास करू शकत नाही.

निजामशाहाचे एक रेखाचित्र उपलब्ध झाले आहे. त्यात हुसेन निजामशाह उभा असून समोर छोटेखानी हत्ती व त्यावर माहुत दिसतो. एका बाजुला फुलझाड आहे. या चित्रातील चेहऱ्यात आणि तारीफ मधील त्याच्या चेहऱ्यात इतके साम्य आहे की हे चित्र त्याच कल्मकाराच्या हातचे असावे असे वाटते. याशिवाय मूर्तजा निजामशाहाची दोन आणि तिसऱया बुऱ्हाण निजामशाहाचे एक अशी चित्रे संग्रहालयातून सुरक्षित आहेत. एकात, मोठ्या शोभिवंत खुर्चीत सुलतान बसला असून त्याच्या डाव्या हाताला दोन व समोर एक सेवक उभे आहेत. दुसर्‍या चित्रात हाच सुलतान, एका छप्परपलंगावर लोडाला टेकून विसावा घेत असलेला दिसतो. दोन्ही चित्रातील सुलतानांच्या चेहऱ्यात साम्य आहे. सर्वच माणसांचे चेहेरे साधारण तीनचतुर्थांश दिसतात- एकचप्म नाहीत. दोन्ही चित्रांची पृष्ठभूमी सपाट रंगाने आच्छादलेली आहे-तीत कसलाही तपशील नाही-इमारती, कनाती, झाडेझुडपे काहीही नाहीत. तारीफच्या चित्रात करण्यात आलेले बारकाव्याचे काम पाहता ह्या चित्रातील तपशीलाचा पूर्ण अभाव काहीसा चमत्कारिक वाटतो. तिसर्‍या बुऱ्हाणशाहाचे म्हणून जे चित्र दाखवितात ते आणखीनच निराळे दिसते. हे चित्र एकचष्म पध्दतीचे आहे आणि हातात भलीमोठी तलवार घेतलेला एक मध्यमवयीन राजपुरुष रेखाटलेला आहे. याही चित्राला म्हणावी तशी पृष्ठभूमी नाही. वाखेरीज मलिक अंबर व त्याचा मुलगा फत्तेखान यांची व्यक्तिचित्रणे बोस्टनच्या संग्रहात आहेत, दोन्हीतही- एकचष्म पध्दतीचे गेखाटन आहे आणि चेहरेपट्टीत, व्यक्‍्तिचित्रणाचा हेतू स्पष्ट जाणवतो-वेगवेगळी माणसे आहेत हे ओळखू येते. अहमदनगरच्या संग्रहालयातही मलिक अंबरचे एक चित्र आहे, मात्र या तीनही चित्रांचा, तारीफच्या चित्रांशी कसलाच संबंध दिसत नाही- चित्रसंयोजन. रंगयोजना या सर्वस्वी भिन्न आहेत.

यांशिवाय निरनिराळ्या संग्रहालयात असणारी दहाबारा रागमाला चित्रे, खुद्द अहमदनगरमधे किंवा आसपासच्या भागात तयार झाली असावीत. काही चित्रातील पृष्ठभागातील इमारती, कनाती, घुमट यांचा वापर, पुरुष आकृतींचे चेहरे व शिरस्त्राणे आणि काहीशा उंच सडपातळ अशा स्त्रीआकृती व त्यांचे पेहराव याचे तारीफमधील तत्सम तपशीलाशी निश्चितच साम्य आहे. परंतु इतर गोष्टी-विशेषत: चित्रसंयोजन, वृक्षवल्लीचे रेखाटन आणि रंगयोजना यांचे मुगळ चित्रकामाशी जास्त जवळचे नाते आहे. ती चित्रे. त्या दरबाराशी संबंध आलेल्या किंवा त्याच परंपरेत वाढलेल्या एखाद्या कलाकाराने काढलेली असावीत, मात्र त्याचा अहमदनगर चित्रकलेशी चांगला परिचय असावा.

निजामशाही चित्रकला बहुगुणी असली तरी अत्यंत अल्पजीवी ठरली, त्याचे मुख्य कारण सोळाव्या शतकाच्या शेवटी-शेवटी झालेला त्या सत्तेचा ऱ्हास हेच होय. ज्याप्रमाणे अनेक साहित्यिक हा दरबार सोडून विजापूर-गोवळकोंडा इकडे गेले तसे. चित्रकारही गेले असावेत. सतराव्या शतकाच्या पहिल्या चरणात तर या सल्तनतीची वाताहातच झाली व दख्खनी चित्रकलेचा हा पहिला अध्याय समाप्र झाला. 

शुक्रवार, २१ ऑगस्ट, २०२०

हडप्पा संस्कृती

हडप्पा संस्कृती

मूळ आणि उत्क्रांती

गेल्या अनेक दशकांपासून उत्खनन केलेल्या पुरातत्व संशोधनात हडप्पा संस्कृतीचा हळूहळू विकास दिसून येतो. उत्क्रांतीच्या चार महत्त्वपूर्ण टप्पे किंवा टप्पे आहेत आणि त्यांना पूर्व-हडप्पा संस्कृती , सुरवातीची -हडप्पा संस्कृती, परिपक्व-हडप्पा संस्कृती आणि नंतरची हडप्पा संस्कृती अशी नावे देण्यात आली आहेत.

पूर्व-हडप्पा संस्कृती चे अवशेष पूर्व बलुचिस्तानमध्ये आहेत . मेहरगड येथे मोहनजोदारोच्या वायव्य दिशेला १ मैलांवरील उत्खननात हडप्पापूर्व संस्कृतीचे अस्तित्व दिसून आले . या अवस्थेत भटक्या विमुक्त लोकांनी शेती-शेतीमध्ये राहण्यास सुरवात केली असे आढळते. 

हडप्पाच्या सुरुवातीच्या काळात लोक मैदानावरील मोठ्या खेड्यात राहत असत. सिंधू खोऱ्यात  शहरांची हळूहळू वाढ झाली. तसेच, ग्रामीण ते शहरी जीवनात संक्रमण या काळात झाले.

परिपक्व-हडप्पाच्या अवस्थेत महान शहरे उदयास आली. कालीबंगानमधील उत्खननानुसार त्याच्या विस्तृत नगररचना आणि शहरी वैशिष्ट्यांसह उत्क्रांतीचा हा टप्पा सिद्ध होतो.

हडप्पाच्या उत्तरार्धात सिंधू संस्कृतीचा नाश होऊ लागला. लोथल येथील उत्खननात उत्क्रांतीच्या या अवस्थेचा उलगडा होतो. लोथल त्याच्या बंदराच्या स्थापनेची स्थापना नंतर झाली. हे पूर संरक्षण म्हणून विटांच्या भिंतीभोवती घेरले होते. हडप्पा संस्कृती आणि भारताचा उर्वरित भाग तसेच मेसोपोटामिया दरम्यान लोथल व्यापाराचे केंद्र बनले.


हडप्पा संस्कृतीच्या  तारीखा 

१९३१ मध्ये सर जॉन मार्शल यांनी मोहनजोददारोचा कालावधी  इ .स.  पूर्व  ३२५० ते २७५०  दरम्यान काढला होता. त्यानंतर, जेव्हा आणि नवीन साइट्स सापडल्या तेव्हा हडप्पा संस्कृतीच्या तारखामध्ये बदल करण्यात आला. रेडिओकार्बन पद्धतीचे आगमन जवळजवळ अचूक तारखा निश्चित करण्यासाठी मार्ग तयार करते. १९५६ पर्यंत फेअर्सर्विस यांनी हडप्पा संस्कृतीची तारीख इ .स.  पूर्व  २००० ते १५०० दरम्यान आणली. त्याच्या निष्कर्षांच्या रेडिओकार्बन तारखांच्या आधारे. १९६४ मध्ये डी.पी. अग्रवाल असा निष्कर्ष काढला की या संस्कृतीचे एकूण कालखंड इ .स.  पूर्व  २३०० ते १७५०  दरम्यान असावे. अद्याप या तारखांमध्ये आणखी बदल करण्याची संधी आहे


हडप्पा संस्कृतीची ठळक वैशिष्ट्ये

नगररचना

हडप्पा संस्कृती ग्रीड सिस्टमच्या धर्तीवर शहर नियोजन करण्याच्या पद्धतीने ओळखली गेली - म्हणजे रस्ते व गल्ल्या एकमेकांना काटकोनात होत्या . शहराचे अनेक आयताकृती विभागात  विभाजन केले जाते. हडप्पा, मोहनजोदारो आणि कालीबंगन या प्रत्येकाचे स्वतःची एक गडवजा  रचना  आहे. प्रत्येक शहराच्या तटबंदीच्या खाली विटा घरे असलेले एक खालचे शहर आहे, ज्यात सामान्य लोक रहात होते. जवळजवळ सर्व प्रकारच्या बांधकामांमध्ये भाजलेल्या  विटाचा मोठ्या प्रमाणात वापर आणि दगडांच्या इमारतींचा अभाव हे हडप्पा संस्कृतीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहेत. आणखी एक उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे भूमिगत गटार प्रणाली जी सर्व घरे दगडांच्या स्लॅब किंवा विटाने झाकलेल्या रस्त्यांच्या नाल्यांशी जोडत होती.

३९ फूट लांबी, २३ फूट रुंदी आणि ८ फूट खोलीचे  सार्वजनिक स्नान गृह ( ग्रेट बाथ ) हे मोहेंजोदारो मधील सर्वात महत्वाचे सार्वजनिक ठिकाण आहे. कपडे बदलण्यासाठी बाजूला खोल्या आहेत. स्नानगृहाच्या वरचा  मजला भाजलेल्या  विटांनी बनविला होता. लगतच्या खोलीत मोठ्या विहिरीतून पाणी ओतले जात होते आणि बाथच्या एका कोपऱ्यातून बाहेर पडणा्या पाण्याचे निचरा होण्यामुळे व्यवस्था होती. मोहनजोदारो मधील सर्वात मोठी इमारत १५०  फूट लांबी आणि ५० फूट रुंदीचे धान्य कोठार आहे. पण हडप्पाच्या किल्ल्यात आपल्याला तब्बल सहा धान्य कोठारे  मिळतात. 

आर्थिक जीवन

शेती, उद्योग आणि हस्तकला आणि व्यापार या सर्व आर्थिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात प्रगती झाली होती असे दिसून येते . गहू आणि बार्ली हे तीळ, मोहरी आणि कापूस याशिवाय मुख्य पीक होते. अतिरिक्त धान्य कोठारात साठवले जात असे . मेंढ्या, शेळ्या, म्हैस यासारख्या प्राण्यांचे पाळीव प्राणी होते. घोडा वापरला जात होता का नाही हे अजून स्पष्ट नाही. मृगा सह  इतरही अनेक प्राण्यांच्या  अन्नासाठी शिकारी  करण्यात येत. 

कारागीरांच्या विशेष गटांमध्ये सोनार , वीट बनविणारे, दगड कोरणारे , विणकर, जहाज बनवणारे आणि मातीच्या वस्तू उत्पादक यांचा समावेश होता . कांस्य आणि तांबे भांडी हडप्पा धातूच्या हस्तकलेची उत्कृष्ट उदाहरणे आहेत. अनेक ठिकाणी सोन्याचांदीचे दागिने सापडतात. मातीची भांडी चांगल्या स्थितीत आढळली आहेत आणि काही ठिकाणी लाल आणि काळा रंगकाम  केलेली  भांडी आढळली  आहेत . वेगवेगळ्या  मौल्यवान दगड मणी पासून दागिने तयार केली गेली होती असे आढळून येते. 

मंगळवार, ४ ऑगस्ट, २०२०

मधुबनी चित्रकला

मधुबनी चित्रकला 

मधुबनी चित्रकलेची उत्पत्ती प्राचीन काळाने झाली आहे आणि परंपरेनुसार असे म्हटले आहे की, चित्रकला ही पध्दत रामायणच्या वेळी घडली होती, जेव्हा राजा जनक यांनी आपली मुलगी सीता हिच्या विवाहाच्या वेळी चित्रकारांना भगवान रामाला चित्रित करण्यास सांगितले होते.

मधुबनी  चित्रकला  सध्याच्या मधुबनी शहराच्या आसपासच्या गावांमधील महिलांनी पारंपारिकरित्या जतन  केली आहे .मधुबनीचा शाब्दिक अर्थ मधमाशी आणि मिथिलाचा परिसर होतो. 

१९३४ मध्ये बिहारच्या भूकंपानंतर  आय.सी.एस चे तत्कालीन एस.डी.ओ, श्री. डब्ल्यू.जी.आर्चर,यांनी ही मधुबनी  चित्रे बाहेरील जगाच्या नजरेत आणली.

अखिल भारतीय हस्तशिल्प मंडळाने मधुबनीच्या क्षेत्रात काम करणाऱ्या श्रीमती जगदंबा देवीसारख्या उत्कृष्ट कलाकारांच्या चित्रांची विक्री सुलभ करण्यासाठी वॉल्स अँड फ्लोरऐवजी कागदावर रंगविण्यासाठी प्रोत्साहित केले.

सीता देवी, महासुंदरी देवी, ओखा देवी, बौआ देवी आणि कर्पूरी देवी आणि बरेच महिला कलाकार समोर आले . 

पिपुल जयकर, भास्कर कुलकर्णी, उपेंद्र महारथी आणि ललित नारायण मिश्रा यांना देश-विदेशात चित्रकला लोकप्रिय करण्याचे श्रेय जाते.

मधुबनी, दरभंगा, सीतामढी, श्योहर, समस्तीपूरचा एक भाग, पूर्णिया आणि मुझफ्फरपूर येथे भारतीय चित्रांची संस्कृती आहे . 

निसर्ग आणि पौराणिक घटनांचे चित्रण  या कलेचा मूळ गाभा आहे. सामान्यत: सर्व चित्रांची पार्शवभूमी कृष्ण, राम, शिव, दुर्गा, लक्ष्मी, काली आणि सरस्वती अशा हिंदू देवतांच्या आसपास फिरते. 

सूर्य, चंद्र यासारख्या नैसर्गिक वस्तू आणि तुळशीसारख्या धार्मिक वनस्पती आणि लग्नासारखे सामाजिक कार्यक्रम देखील रंगविले गेले आहेत. 

उत्सव आणि धार्मिक कार्यक्रम आणि जन्म, उपनयन (पवित्र धागा सोहळा) आणि विवाह यासारख्या जीवनचक्रातील घटना भिंतींवर चित्रित केलेली आहेत. 

Madhubani different pattern 1


१९६० च्या दशकात हे आर्ट ड्रॉईंग पेपरवर साकारले गेले. यामुळे या कलेला एक नवीन स्वातंत्र्य आणि सर्जनशीलता आली .आता बिहारी महिला फॅब्रिक पेंटसह मधुबनी पेंटिंग्जची शैली साडी, दुपट्ट इत्यादींवर वापरतात.

madhubani different pattern 2


कलाकार नैसर्गिक स्त्रोतांकडून रंग तयार करतात. काळा  रंग शेणाच्या सोबत मिसळून प्राप्त केला जातो;
हळद किंवा परागकण पासून पिवळा, निळी पासून निळा,फुलापासून विविध रंग  किंवा लाल रंग चंदनापासून ,झाडाच्या पानांचा हिरवा, तांदळाच्या पावडरचा पांढरा, पलाशाच्या फुलांपासून केशरी,बकरीचे दुध,अरबी आणि बीनच्या वनस्पतींमधील रस मिसळून इतर कच्चा माल तयार केले जातो. 

रंग न छापता सपाट लावले जातात. तिरप्या किंवा सरळ लहान रेषांनी भरलेल्या रेषांमधील अंतर बाह्यरेखासाठी सहसा एक दुहेरी रेखा तयार केलेली असते.

मधुबनी चित्रकले मध्ये  कोणत्याही अत्याधुनिक साधनांची आवश्यकता नाही. कलाकार अद्यापहि  आधुनिक पेंटब्रशशी परिचित नाहीत.बांबूच्या लाकडापासून बनविलेले एक ब्रश, जाड भरण्यासाठी वापरलेला इतर ब्रश जो एका लहान काठीला जोडलेल्या कपड्याच्या छोट्या तुकड्याने तयार केला जातो.


हिंदू महाकाव्य रामायण 

Ramayana scene

हिंदू महाकाव्य रामायण 

हिंदू हिंदू महाकाव्य रामायण मध्ये, शक्तिशाली राजा रावण रामाची पत्नी सीतेचे अपहरण करतो.  तिला  विचलित करण्यासाठी  सोन्याचे हरिण बनून मारीच येतो. व राम हरीण शिकारी साठी जातो. व रावण सितेच अपहरण करतो हा याप्रसंगी वरील चित्रात साकारलं आहे. 

कालिया मर्दन 


kaliya mardan

कालिया मर्दन 

युवा कृष्णाने नदीच्या शांततेत भंग  निर्माण करणाऱ्या सर्प कालिया ला ठार केले.  हा प्रसंग वरील चित्रात साकारला आहे . 

कालीमाता 

kalimata

कालीमाता 

सिंह वर विराजमान होऊन राक्षसांचा विनाश करण्यास निघालेल्या कालीमातेला वरील चित्रात साकारले आहे . 

मधुबनी चित्रकला हि ग्रामीण भागातील कलाकारांचे व्यासपीठ आहे. या कलेचा जगातील स्तरावर प्रसार करण्यासाठी अनेकांनी प्रयत्न देखील केले आहेत . या कलेत पारंगत असलेले ४००० पेक्षा जास्त नोंदणीकृत कलाकार आज काम करत आहेत. अनेक महिला बचत गट यात काम करत आहेत . अनेक स्वयंसेवी संस्था देखील या कामात मदत करीत आहेत. 

या कलेत पारंगत चित्रकारांना अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत. 

राष्ट्रीय पुरस्कार विजेते :

श्रीमती जगदंबा देवी - १९७०
श्रीमती सीता देवी - १९७५
श्रीमती गंगा देवी - १९७६
श्रीमती गोदावरी दुट्टा - १९८०
श्रीमती महसूंदरी देवी - १९८१

राज्य पुरस्कार विजेते :

श्रीमती महसूंदरि देवी - १९७८-७९
श्रीमती कार्पोरी देवी - १९८०-८१
श्रीमती शशिकला देवी - १९८०-८१
श्रीमती हीरा मिश्रा - १९८१-८२

सोमवार, ३ ऑगस्ट, २०२०

भारत - भौगोलिक वैशिष्ट्ये आणि इतिहासावर त्यांचा प्रभाव

भारत - भौगोलिक वैशिष्ट्ये आणि इतिहासावर त्यांचा प्रभाव

पर्वतराज हिमालय 

हिमालय पर्वत रांग  भारताच्या उत्तरेस पसरली  आहे. भारताच्या अत्यंत वायव्य भागात पामीर पर्वतापासून  सुरू होणारी हि हिमालयीन पर्वत रांग  इशान्य दिशेकडे गेली आहे. तिची लांबी सुमारे २५६० किलोमीटर आहे आणि सरासरी रूंदी २४० ते ३२० किलोमीटर आहे. हिमालयातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट  समजला जातो त्याची उंची ८८६९ मीटर आहे. हि पर्वत रांग  एक भारतासाठी एक नैसर्गिक भिंत म्हणून कार्य करते आणि संरक्षण करते सायबेरिया पासून मध्य आशिया मार्गे येणारे थंड आर्क्टिक वारे यापासून भारतचे रक्षण करते . त्यामुळे  उत्तर भारतातील हवामान वर्षभर बर्‍यापैकी उबदार राहते. हिमालयीन प्रदेश सामान्यत: हिवाळ्यामध्ये बर्फाच्छादित असतो.

हिमालयात अनेक खिंडी आहेत . प्रागैतिहासिक काळापासून वाहतुकीचा सतत प्रवाह या खिंडी द्वारे सुरु आहे.या खिंडी मार्गे  बरेच लोक भारतात आले . आक्रमणकर्ते आणि स्थलांतरितांनी,  इंडो-आर्य, इंडो-ग्रीक, पार्थियन, कुशाण, हूनास आणि तुर्क  अशा अनेक  लोकांनी यामार्गे भारतात प्रवेश केला. मॅसेडोनचा अलेक्झांडर यामार्फत भारतात आला . या मार्गाने आक्रमण करणाऱ्या सैन्याव्यतिरिक्त अनेक  मिशनरी आणि व्यापारी आले  म्हणून, म्हणून या हिमालयीन खिंडी व मार्गाना इतिहासात खूप महत्व आहे . 

काश्मीरच्या उत्तरेस काराकोरम पर्वत रांग आहे. जगातील दुसरा सर्वात उंच शिखर, माउंट गॉडविन ऑस्टिन येथे आहे. हिमालयातील हा भाग व तिचे भाग उंच आणि बर्फाच्छादित आहेत हिवाळ्यात. गिलगिटमार्गे काराकोरम महामार्ग जोडला गेला आहे. 

हिमालयात काश्मीरचे  खोरे उंच पर्वतांनी वेढलेले आहे. तथापि, तेथे अनेक खिंडी द्वारे पोहोचले जाऊ शकते. काश्मीर खोरे त्याची परंपरा आणि संस्कृती अनन्य आहे. नेपाळ देखील एक लहान देश आहे . हिमालयाच्या पायथ्याखाली अनेक दऱ्या आहेत  आणि तिथून प्रवेशयोग्य अनेकखिंडी आहेत  त्यामार्गे  गंगेचे मैदान लागते. 

पूर्वेकडे हिमालय आसामपर्यंत पसरला आहे.या प्रदेशातील पर्वत म्हणजे कोट, नागाई आणि लुशाई पर्वत आहेत. मुसळधार पावसामुळे आणि बहुतेक ठिकाणी डोंगराळ भागात घनदाट जंगले आहेत . ईशान्य भारतातील पर्वत  कठीण आहेत. त्यामुळे या भागातील अनेक प्रदेश अलिप्त राहिले आहेत. 

गंगा, सिंधू आणि ब्रह्मपुत्र खोरे 

गंगा खोरे  मैदानावर तीन महत्त्वपूर्ण नद्यांद्वारे सिंचनाची गरज पूर्ण केली गेली आहे. गंगा,सिंधू आणि ब्रह्मपुत्र या नद्यांचे विस्तीर्ण मैदान पसरले आहे व  ते  सर्वात सुपीक आहे.  या नद्यांच्या प्रवाहांनी आणलेल्या गाळ युक्त मातीमुळे या भागाची उत्पादकता वाढली आहे. 

सिंधू नदी हिमालयाच्या पलिकडे उगम पावते आणि झेलम, चिनाब, रवी, सतलज आणि बियास या तिच्या उपनद्या आहेत. सिंधू नदी प्रणालीमुळे पंजाब प्रदेशातील  मैदानाचा फायदा झाला आहे . ‘पंजाब’ हा शब्द म्हणजे पाच नद्यांची भूमी होय . सिंध तळाशी वसलेले आहे सिंधूची दरी. सिंधूचे  मैदान सुपीक मातीसाठी ओळखले  जाते .  

सिंधू आणि गंगेचे मैदान यांच्या मध्यभागी थर वाळवंट आणि अरवल्ली टेकड्यां आहेत . माउंट अबू हे सर्वात उच्च शिखर  ( ५६५० फूट ) अरावली टेकड्यामध्ये आहे . 

गंगा नदी हिमालयात उगम पावते  व , दक्षिणेस वाहते आणि मग पुढे पूर्वेकडे. गंगा नदी  व यमुना नदी जवळजवळ समांतर वाहते . यमुना आणि नंतर गंगेत सामील होते. या दोन नद्यांच्या दरम्यान असलेल्या सुपीक भागास  'डोआब' म्हणतात - म्हणजे दोन नद्यांमधील जमीन. गंगेच्या महत्त्वाच्या उपनद्या ह्या गोमती, सरयू, घागरा आणि गंडक आहेत. 

ब्रह्मपुत्र नदी हिमालयाच्या पलिकडे वाहते, आणि तिबेट ओलांडून आणि नंतर ईशान्य भारतातील मैदानावरुन वाहते  ही एक विशाल पण हळु वाहणारी नदी आहे ज्यामुळे  तिच्या पात्रात अनेक बेटांची निर्मिती झाली आहे. 

गंगेच्या सुपीक मैदानाने मानवी वस्ती वाढण्यास हातभार लावला आहे. अनेक धार्मिक केंद्रे, विशेषत: नदीकाठी किंवा नद्यांच्या संगमावर आहेत . 

सिंधू खोऱ्यात हडप्पा संस्कृती भरभराट झाली. वैदिक संस्कृती पश्चिम गंगेच्या मैदानात समृद्ध पावली . बनारस, अलाहाबाद, आग्रा, दिल्ली आणि पाटलिपुत्र ही गंगेच्या काठावरील  काही महत्त्वाची शहरे आहेत. पाटलीपुत्र हे प्राचीन  शहर गंगा नदी सोन नदीच्या संगमावर वसलेले होते . 

प्राचीन काळी पाटलिपुत्र  मध्ये मौर्य, शुंग, गुप्ता राहिले होते.तसेच अनके राज्यांसाठी राजधानी असलेले 
दिल्ली गंगेच्या मैदानाच्या पश्चिमेस सर्वात महत्वाचे शहर आहे. भारतीय इतिहासातील बहुतेक निर्णायक लढाया जेथे झाल्या असे कुरुक्षेत्र, तारिन आणि पानिपत  हे दिल्लीजवळ आहेत. 

हा प्रदेश नेहमी परकीयांच्या मोह आणि आकर्षण एक विषय होता .या भागची सुपीकता आणि उत्पादक  क्षमता यामुळे परकीय आक्रमणकर्ता  यांनी नेहमी हा भाग ताब्यात घेण्यासाठी शक्तींनी लढा दिला. या प्रदेशातील नद्या वाणिज्य धमन्या  म्हणून काम करतात. प्राचीन काळी रस्ते तयार करणे कठीण होते, त्यामुळे  माणसे आणि माल वाहतूकल  बोटीने होत असे . नद्यांचे महत्त्व ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता येईपर्यंत कायम होते . 

दक्षिणी द्वीपकल्प

विंध्य व सातपुडा पर्वत, नर्मदा ,ताप्ती नद्या उत्तरेकडील भारत व  दक्षिण भारत या दरम्यान महान विभाजक रेषा तयार करतात.  विंध्य पर्वताच्या दक्षिणेस पठार दख्खन (डेक्कन) पठार म्हणून ओळखले जाते. यात ज्वालामुखीचा खडक आहे, जो  उत्तर पर्वतांपेक्षा वेगळा आहे. हे खडक कमी कठीण  आहेत.आपणास या भागात अनेक पाषाण कोरीव मंदिरे सापडतात. दक्षिणे  मध्ये पठार सपाट आहे. पश्चिम घाट व   पूर्व किनारपट्टी दरम्यान हा भाग पसरला आहे. पश्चिम घाट व अरबी समुद्र  दरम्यानच्या जमिनी कोकण किनारपट्टी  म्हणून ओळखल्या जातात.

जुन्नरसारख्या पश्चिम घाटातील कान्हेरी आणि कार्ले  या व्यापारी मार्गांनी दख्खन पठार हे पश्चिम बंदरांशी जोडले गेले. दख्खन  पठार उत्तर भारत आणि दक्षिण भारत दरम्यान एक पूल म्हणून काम करते. तथापि, विंध्या पर्वतातील दाट जंगले यामुळे हा प्रदेश उत्तर भारतात पासून अलग आहे. भाषा आणि संस्कृती बाबतीत 
दक्षिणेकडील द्वीपकल्प बर्‍याच काळापासून  संरक्षित आहे. 

दक्षिणेकडील प्रख्यात पालघाट आहे.या घाटातून कावेरी पासून मलबार किनारपट्टी पर्यंत पोहचता येते. पालघर घाट हा एक भारतातील महत्त्वाचा व्यापार मार्ग होता.प्राचीन काळी रोमन व्यापार या मार्गाने चालत असे . 

अनाईमुडी हे  दक्षिण द्वीपकल्पात सर्वात उंच शिखर आहे.डोडापेटा हे पश्चिम घाट.मधील आणखी एक सर्वोच्च शिखर आहे. 

पूर्व  घाट फारसे उंच नाही. त्यामुळे बऱ्याच नद्या या मार्गाने बंगालच्या उपसागरास मिळतात. बंगाल. अरिकेकमेडू, ममल्लापुरम आणि कावेरीपट्टणम कोरामंडल किनारपट्टीवर  वसलेले आहेत . दक्षिणेकडील द्वीपकल्पातील प्रमुख नद्या जवळजवळ व समांतर वाहतात  महानदी प्रायद्वीपच्या पूर्वेकडील टोकावर आहे. नर्मदा आणि ताप्ती पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात . गोदावरीसारख्या इतर नद्या, कृष्णा, तुंगभद्र आणि कावेरी पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात. या
नद्या पठाराला सुपीक बनवतात. त्यामुळे या भागात तांदूळ उत्पादक माती जास्त आहे. 

इतिहासात कृष्णा आणि तुंगभद्र (रायचूर) दक्षिणेकडील या दोन नद्यांनी बनविलेले व्दिभुज  प्रदेश हे  प्रमुख राज्यांमधील मतभेदाचे कारण  ठरत राहिले. 

बिटिश सत्तेच्या  सुरुवातीच्या काळात या मैदानावर बंदरे वाढल. कावेरी व्दिभुज  प्रदेश एक वेगळा भौगोलिक विभाग आहे. याभागात समृद्ध परंपरा, भाषा आणि संस्कृती विकसित झाली आहे. प्राचीन काळात या प्रदेशातील लोकांनी सागरी मोहिमांमध्ये  उत्सुकता दर्शविली. 

फार पूर्वीपासून  व्यापार मोठ्या प्रमाणात समुद्रीमार्गावरुन चाले. जवा, सुमात्रा, बर्मा आणि कंबोडिया या देशात सागरी मार्गाने व्यापार वाढला होता. या मार्गाने जगाच्या या भागात भारतीय कला, धर्म आणि संस्कृतीचा प्रसार झाला. 

दक्षिण भारत आणि ग्रीक-रोमन दरम्यानचे व्यावसायिक संपर्क वाढला होता सांस्कृतिक संबंधांसह  उभय देशांची भरभराट झाली होती. 

भारत - विविधतेत एक भूमी

प्राचीन भारताचा इतिहास रंजक आहे कारण भारताने पूर्व आर्य, इंडो- आर्य, ग्रीक, सिथियन्स, हूना, तुर्क इ.परकीयांना आकर्षित केले.  

भारत त्यांचे घर बनला . प्रत्येक पारंपारीक गटाने आपल्या शक्तीचे योगदान दिले भारतीय संस्कृतीला समृद्ध  बनवणे. हे सर्व लोक इतके सहजपणे भारतातीय संस्कृतीत मिसळले गेले. अनेक वेगवेगळ्या संस्कृती एकमेकांशी मिसळल्या गेल्या. 

प्राचीन भारतात आर्य किंवा द्रविड संस्कृती, वैदिक ग्रंथ,त्याचप्रमाणे, पाली आणि संस्कृत भाषेत अनेक  साहित्य व  दक्षिणेत  संगम साहित्य.आढळते. 

प्राचीन काळापासून भारत अनेक धर्मांची भूमी आहे.प्राचीन भारतामध्ये हिंदू, जैन आणि बौद्ध धर्माचा जन्म झाला.या सर्व संस्कृती आणि धर्म एकमेकांशी संलग्न झाल्या . 

भारतीय लोक वेगवेगळ्या भाषा बोलतात. विविध धर्म आणि वेगवेगळ्या सामाजिक चालीरिती पाळतात. देशभरात महान विविधता असूनही एक मूलभूत ऐक्य आहे. खरं तर, पूर्वजांनी ऐक्यासाठी प्रयत्न केला. 

आमचे प्राचीन कवी, तत्वज्ञ आणि लेखकांनी देशाला एक अविभाज्य घटक म्हणून पाहिले. मौर्य आणि गुप्त काळात भारत  राजकीय दृष्ट्या एक विशाल साम्राज्य.बनला होता. 

परकीयांनीही भारताची ऐक्य मान्य केले. हिंद हा शब्द संस्कृत शब्द सिंधूपासून निर्माण झाला आहे. कालांतराने हा देश ग्रीक भाषेत ‘भारत’ म्हणून ओळखला जाऊ लागला आणि पर्शियन आणि अरबी भाषांमध्ये ‘हिंद’.

देशाच्या भाषिक आणि सांस्कृतिक ऐक्यासाठी अनेक प्रयत्न केले गेले . तिसर्‍या शतकात प्राकृत भाषेने देशाची भाषा  म्हणून काम केले.अशोकच्या काळात शिलालेख प्राकृतमध्ये लिहिलेले होते. 

प्राचीन महाकाव्ये, रामायण आणि महाभारत, त्याच उत्साहाने आणि निष्ठेने अभ्यासले गेले देशभर. मूळत: संस्कृतमध्ये तयार केलेली ही महाकाव्ये वेगवेगळ्या स्थानिक भाषांमध्ये अनुवादित  केली  गेली . भारतीय जरी सांस्कृतिक मूल्ये आणि कल्पना वेगवेगळ्या स्वरूपात व्यक्त करत मात्र त्याच्या मागील मूल्ये संपूर्ण देशात समान राहिले.

म्हणूनच, भारत एक बहु-धार्मिक आणि बहु-सांस्कृतिक समाज म्हणून उदयास आला आहे  तथापि, एकता आणि अखंडता आणि हि भारतीय समजासाठी शक्ती आहे. 

गुरुवार, ३० जुलै, २०२०

अहिल्या ते राज्यशासक लोकमाता

६.तेजस्विनी अहिल्याबाई होळकर - अहिल्या ते राज्यशासक लोकमाता 

तेजस्विनी अहिल्याबाई होळकर 

AhilyaLokmata

इतिहासाने पानोपानी...
जिची गाईली गाथा!
होळकरांची तेजस्वी ती...
पुण्यश्लोक माता!


अहिल्या ते राज्यशासक लोकमाता

अहिल्या ते लोकमाता

एका सामान्य कुळात जन्माला आलेल्या अहिल्यादेवींना लोकमातेची पदवी दिली ती प्रजेने! अहिल्या, अहिल्याबाई, अहिल्यादेवी, मातोश्री अहिल्यादेवी, लोकमाता हा त्यांचा जीवनाचा प्रवास आश्चर्यकारक होता. स्त्री असल्यामुळे त्यांच्यावर  स्त्रीत्वाची बंधने होती. बंधने असूनही त्यांनी आपले जीवन कर्तव्यपूर्तींनी
सफल करून टाकले.

अधिकार संपन्न आणि श्रीमंत असूनही, निर्मोही, त्यागशील, व्रतस्थ राहणे हे दिव्य अहिल्यादेवींनी जन्मभर केले. सती न जाताही त्या सती ठरल्या, ते त्यांच्या निराभिमानी वागण्यामुळेच!

त्यांच्यासमोर अनेक प्रलोभने होती. मोह होते. तिजोरी पैशांनी भरलेली होती. अनेक ऐषआरामी राज्ये त्यांच्यासमोर होती. आजुबाजुच्या राज्यात वाढते कर लादून प्रजेला पिळणारे राजे त्या पाहात होत्या. पण तरीही त्या कधीही प्रलोभनांना बळी पडल्या नाहीत. उलट त्याचे वागणे इतके चोख ठेवले की त्यांचा आदर्श इतरांनी पुढे ठेवावा. आपल्या तत्त्वांवर त्यांची अढळ अशी निष्ठा होती. आपल्या तेजस्वी
कर्मठ, आणि व्रतस्थ जीवनामुळे त्यांनी अक्षय कौर्ति प्राप्त केली.

त्यांच्या अंगी जितके सद्गुण होते तितके सर्वच्या सर्व एकाच व्यक्तिच्या ठाई असणे हा ईश्वराने केलेला एक चमत्कार होता. नाहीतर जिथे धर्मपरायणता आणि परमार्थभावना असते तिथे राजकारणी मुत्सद्देगिरोचा अंशही नसतो. आणि जिथे राजकारणी मुत्सद्दीपण असते तिथे धार्मिक सहिष्णुता आढळत नाही.

त्याचप्रमाणे धैर्य, शौर्य, पराक्रम असतो तिथे नम्रता किंवा परदु:खकातरता नसते. शक्ति आणि वैभवाला चरित्रसंपन्नतेची साथ लाभत नाही हे जगात आपल्याला सर्वत्र दिसते. परंतु अहिल्याबाईंच्या जीवनात सगळ्या चांगल्या शकुनकारक, आनंददायक गोष्टी एकत्र आल्या होत्या. सर्व सद्गुण जणु बहरास आले होते.
जेवढ्या धार्मिक तेवढ्याच मुत्सद्दी अशा अहिल्याबाईंचे जीवन भारतीय स्त्रीघर्माचे एक ज्वलंत उदाहरण होते.

धवलशुभ्र असे प्रशासन आणि काळाकुट्ट संसार अशा दोन ताण्याबाण्यावर त्यांचे जीवनवस्त्र विणलेले आहे. त्यांचा संसार संघर्षमय होता. दुःखाने भरलेला होता. प्रत्यक्ष व्यसनी पति आणि खोडकर नशेबाज अशा पुत्राने त्यांना भरपूर मनस्ताप दिला. लांबच्या नातेवाईकांनी आणि ज्याला पुढे त्यांनी सुभेदार केले त्या
तुकोजी होळकरांनी पण अहिल्यादेवींना कष्ट दिले.

एकाहून एक भयंकर असे दु:खाचे आघात त्यांना सोसावे लागले. अशा दारुण मन:स्थितीतसुद्धा त्यांचे
कर्तव्याचे भान कधीच सुरले नाही. प्रत्येक संकटाला त्या सर्व शक्ति पणाला लावून बाणेदारपणे तोंड देत राहिल्या. खंबीरपणे सामना देत राहिल्या. संकटापुढे त्यांनी कधीच मान टाकली नाही कौ, त्यांचे पाय लटपटले नाहीत. अवती भवती घनदाट अंधार पसरलेला असताना सुद्धा, आपल्या अलौकिक जीवनाचा दीप त्यांनी प्रज्वलित ठेवला. दैवाला शिव्याशाप न देता, दैवावर मात केली. निर्मळ सुखाचे शाश्वत दीप लावून त्यांनी सभोवती प्रकाश दिला.

दुःखसंकटे समर्पणाचे धडे शिकवतात, किंबहुना दुःख म्हणजे प्रभूचे आशीर्वादच विपरित वेश घेऊन येतात असे त्या समजत असत. म्हणूनच ही प्रचंड दुःखे त्यांनी धीराने स्वीकारली आणि शौर्याने त्यांच्याशी सामना दिला. प्रत्येक आघात आणि विपत्तीचे घाव सोसताना त्या जीवनाचा जयघोषच करीत राहिल्या. ईश्वराने जे दिले त्याबद्दल त्या जगन्रियंत्याची भक्ति करीत राहिल्या. कुठेही राग नाही, संताप नाही, आक्रस्ताळेपणा नाही. अविचलपणे त्या सोसत राहिल्या आणि त्यांचे व्यक्तिमत्व उंचावत गेले.

संकटांना छोटे करत त्या मोठ्या होत गेल्या. ही किमया सहज घडणारी नव्हती. अनेक गुणांचा समुच्चय असणाऱ्या अहिल्यादेवींनाच ते शक्‍य झाले. एखादी खरी कधीच तुटून पडली असती, मोडून गेली असती.

'लोकरुढीप्रमाणे त्या सती जायला निघाल्या तेव्हा मल्हाररावांने त्यांच्यापुढे पदर पसरून त्यांना जाऊ दिले नाही. त्यावेळी ते म्हणाले जीव द्यायचाच तर या प्रजेसाठी दे. खंडूबरोबर सती जाणाऱ्या नऊजणी आहेत पण या प्रजेसाठी फक्त तूच आहेस. त्या खरंच प्रजेची आई झाल्या. मातोश्री झाल्या. आपल्या वागणुकीने
देवतास्वरुप झाल्या आणि लोकमाताही झाल्या. अहिल्यापासून लोकमातेपर्यंतचा त्यांच्या चरित्राचा  विकास अद्वितीय आहे.

अहिल्या ते राज्यशासक 

अस्सल कागदोपत्रानिशी असे सिद्ध करता येते की अहिल्यादेवी या अव्वल दर्जाच्या मुत्सद्दी होत्या. म्हणूनच त्यांनी इतक्या हिरिरीने महादजी शिंद्यांचा पाठपुरावा केला. त्यांच्या सहकार्याशिवाय महादजींना औत्तरीय राजकारणातले श्रेष्ठत्व मुळीच लाभले नसते. त्यांच्याविषयीचा माझा आदर अमर्याद वाढला आहे.'' हो वाक्ये आहेत कै. जदुनाथ सरकार यांनी रियासतकारांना लिहिलेल्या पत्रातील!

त्यांच्या कालखंडातील काही  पत्रे  आहेत . त्यावरून त्यांची योग्यता किती थोर होती हे लक्षात येईल. हे पहिलं पत्र मल्हाररावांनी अहिल्याबाईंना लिहिलं आहे.

चिरंजीव अहिल्याबाईंना मल्हाररावांचा आशीर्वाद. येथे कुशल आहे. आपला हाल लिहावा. सेंधवाच्या किल्ल्याच्या कारखानदाराला खर्चाची सर्व व्यवस्था करून दिली होती. जे रुपये पाठविण्यात आले होते. ते सर्व खर्च झाले आहेत. त्याचा हिशोबही आला आहे. तो तुमच्याकडे पाठविण्यात येत आहे. पुढील खर्चासाठी व्यवस्था करून दिली पाहिजे. तुम्ही माळवा प्रांतात गेला आहात म्हणून तुम्हाला हे पत्र लिहिले आहे. किल्ल्याच्या कारखानदाराला खर्चासाठी सर्व मदत पाठवून यथायोग्य प्रबंध करावा वारंवार त्याची तक्रार येणार नाही याकडे लक्ष द्यावे. इंदूरला पोचल्यावर कधी कधी तिथून माणूस पाठवून सेंधवाच्या किल्ल्याची देखरेख करून घ्यावी. ज्यामुळे काम लवकर संपेल. किल्ल्याच्या बुरुजाचे काम पूर्ण झाल्यावर त्याच्या आजुबाजूच्या खंदकाचे काम सुरु करावे. येथून चिरंजीव संताजी होळकरास पत्र लिहिले आहे. त्याच्याकडे खर्च लवकर पाठवावा. त्याच्याशिवाय काम थांबून राहू नये याचे ध्यान ठेवावे.अधिक काय लिहावे? आशीर्वाद (मोर्तबखुद्द) ”.

एकदा अहिल्याबाईंनी तीर्थयात्रेला जायचा मनसुबा बोलून दाखवताच मल्हारराव म्हणाले होते कि हि तीर्थयात्रेची वेळ नव्हे, राजकारण काय, मसलत काय, मनसुबे  काय येवढे आपणास कळू नये? आमच्या छावणीस पैसा, बारूद पुरवायचे काम सोडून तीर्थयात्रेस? इंदोर, ग्वाल्हेर येथून आम्हास कुमक पाठवण्याचे प्राप्तकर्तव्य सोडून यात्रा? हे आमच्या कामास येणार नाही. आमच्या मर्जीचा प्रकार तुम्हास विदित आहेच. फौज लवकर तयार राखा.” 

मल्हाररावांना अहिल्याबाईंचा खूप मोठा आधार 'होता. त्यांच्यावाचून मल्हारराव युद्धे करू शकले नसते. अहिल्याबाईंच्या कर्तृत्वावर त्यांचा दांडगा विश्वास होता. त्यांनी राजकारणाचे अनेक पदर, अहिल्याबाईंना शिकवलें होते. इतिहासात मल्हाररावांनी काही चुका केल्याही आहेत, परंतु अहिल्याबाईंना सती
जाण्यापासून त्यांनी रोखले, हे फार मोठे श्रेय त्यांच्याकडे आहे. 

पुढील पत्र अहिल्याबाईंच्या मोडी लिपीतील पत्राचे देवनागरीत रुपांतर आहे. 
राव सीवलाल कोतवाल कसबे इंदूर यासी अहिल्याबाई होळकर सुमासित सवेनम या व अलफ दुलेराव मंडलोई प। मजकूर याचे दुकान आहे. ते तुम्ही जबरदस्तीने घेतलेत म्हणोन मशारनिलेने हुजूर येऊन विदित केले. एसी यासी तुम्ही दुसर्‍याचे दुकान जबरदस्तीने घेतले याचे कारण काय? त्यावरून हे पत्र सादर केले असे. तरी मशारनिलेचे दुकान जबरदस्तीने घेतले असेल त्याचे त्यास माघार देणे. ये विषयोची फिरून बोभाट आलिया उपेगी पडणार नाही. दक्ष समजून वर्तणूक करणे जाणीजे. छ २६ रबिलावल मोर्तब खुद्द- ”.
                                                                                         (श्री. नि. छ. जमींदार यांच्या संग्रहातून)

यावरून राज्यशासक म्हणूनही त्यांनी केवढे कर्तृत्व मिळवले होते ते लक्षात येईल. दुकान बळकावण्यासारख्या अगदी किरकोळ गोष्टींसाठी सुद्धा त्या स्वत: तडजोडी घडवून आणण्यात पुढाकार घेत. त्यांची न्यायबुद्धी अत्यंत कार्यक्षम होती. आणि राज्यशासक म्हणून त्यांची फार आवश्यकता असते. त्यांना उत्कृष्ठ राज्यशासक म्हणून कोौर्ति लाभली त्यात त्यांच्या विलक्षण अशा न्यायनिर्णय शक्तिचा फार मोठा भाग आहे. एका विशाल राज्याचे कुशल संचलन करून त्यांनी इतरही अनेक अनन्यसाधारण कामे करून दाखवली. त्यांचे जीवन म्हणजे एक प्रेरणादायी ग्रंथच आहे. त्या ग्रंथाच्या पानापानावर सुखशांतीचा, कर्तव्याचा, शौर्याचा, खंबीरपणाचा, न्यायप्रियतेचा, औदार्याचा धार्मिकतेचा अपूर्व असा संदेश लिहिलेला आहे. त्याचं वाचन आणि मनन करून आपल्याही मनावर अत्यंत शुभ असे परिणाम होतात.

 त्यांचे राज्य हे खऱ्या अर्थाने रामराज्य होते. राज्यकारभाराची आदर्श अशी व्यवस्था होती. त्यांची राज्यव्यवस्थेची, भोवतालीच्या राजकौय परिस्थितीची जाण तीक्ष्ण होती. त्यांचे एखादे पत्र सुद्धा याची साक्ष देईल. 

त्या एका पत्रात लिहितात, 

“चारही बाजूंनी आपला प्रसार करण्याची योजना फिरंग्यांनी आखली आहे. कुठे दोन तर कुठे तीन पलटणी उभ्या करून फिरंगी डोके वर काढतो आहे. अशा वेळी फौजा पाठवून त्याला त्या त्या ठिकाणीच गारद केले पाहिजे म्हणजे त्यालाही चांगली जरब बसेल आणि पुढे पाय पसरण्याची त्याला हिंमत होणार नाही. नबाब, भोसले सर्वांनी मिळून फिरंग्याला पराभूत केले पाहिजे.”

त्या विदेशी शक्तीच्या  प्रभावामुळे अत्यंत चितित होत्या. त्यांना राजे सरदारांची स्वस्थता अनुचित वाटत होती. एकमुद्ठीने फ्रेंच फिरंगी गारद करावा' हेच वाक्य, हाच संदेश त्यांच्या मुखात होता.

एक राज्यशासक या नात्याने त्यांनी सुरु केलेले अनेक प्रकल्प आपण आजही राबवतो आहोत हे केवढे आश्चर्य? जिल्हापरिषदांच्या पद्धतीने खेड्यापर्यंत न्याय ही त्यांचीच कल्पना! मुलींना शिक्षण, स्त्रियांना सैनिकी शिक्षण, हुंडाबंदी, दारुबंदी, झाडे तोडण्यास बंदी, कुटीरोद्योग या योजना आजही त्यांच्या
बुद्धीवैभवाची साक्ष देत आहेत.

अहिल्याबाईंच्या ठाई देशवासियांनी अगाध श्रद्धा बाळगली. आजही ती श्रद्धा अधिकाधिक गडद होत आहे. या श्रद्धेमुळे त्यांना देवत्व लाभले. गयेच्या विष्णुमंदिरत आणि महेश्वरमध्ये त्यांची मूर्ती स्थापण्यात आली असून तिची पूजा भक्तिभावाने केली जाते. अशी ही त्यांची स्फूर्तिदायक गाथा प्रत्येकाने मनन केली पाहिजे.

अहिल्यादेवींनी बांधलेल्या वास्तू  व धार्मिक  कार्याचा आढावा 

अहिल्याबाईंनी तीस वर्षे राज्य तर सांभाळलेच पण अनेक राज्यात सुंदर वास्तू उभारून देशाचे सौंदर्य
वाढवले आणि जनतेच्या हिताची कामे करून फार मोठे जनहित साधले. इतर राजांना स्फूर्तो दिली. त्यांचा आदर्श पुढे ठेवून अनेक सत्तांधारी दानाला महत्त्व देऊ लागले. त्यांनी सत्ताधाऱ्यांपुढे एक आदर्श ठेवला.

अहिल्याबाई नेहेमी म्हणत स्नानाने देहशुद्धी, ध्यानाने मनशुद्धी आणि दानाने धनशुद्धी होते. आपल्या संस्कृतीतही त्याग आणि दानधर्म याला फार महत्त्व आहे. आपली संस्कृती भोगापेक्षा त्यागावर उभी आहे. सर्वांमध्ये देवाचा अंश आहे असे मानून प्राणीमात्रांना सुख देणे, सेवा करणे, मदत करणे हाही भक्तिचाच प्रकार मानलेला आहे. 

अहिल्याबाईंचे सारे जीवन त्याग आणि सेवा यासाठीच होते असे म्हटले तर त्यात काही चूक नाही. त्याग आणि सेवा हा त्या ईश्वरभक्तिचाच प्रकार मानीत असत. त्यांचे कार्यक्षेत्र फक्त त्यांची प्रजा वा राज्य इतकेच नव्हते तर संपूर्ण मानव समाजापर्यंत ते विस्तारले होते. आज आपण सर्वधर्मसमभाव जो म्हणतो तो अहिल्यादेबींनी दोनशे वर्षांपूर्वी कृतीत आणला होता. त्यांच्या प्रेमाला, मायेला, वात्सल्याला आणि दानधर्मालाही जातीधर्माच्या सोमा कधीच नव्हत्या. आपल्या कर्तव्याचे पालन करणे हाच त्यांचा महान कर्मयोग होता. हेच त्यांचे कल्याणाचे मर्म होते.

त्यांनी आपली खाजगी संपत्ती दानधर्मात आणि अनेक देवळे घाट बांधण्यात खर्च केली याचंही कारण त्यांना पारलौकिक सुख हवे होते असे नाही तर प्रजेला सुखी करायचे होते. त्यांनी या दानाचा कधीच गाजावाजा केला नाही की समारंभ करून कौतुक करून घेतले नाही.आतापर्यंत मिळालेली माहिती पुढे आहे-

१) त्र्यंबकेश्वर : नाशिक या शहरापासून १८ मैलांवर हे बारा ज्योतिलिंगापैकी एक आहे. इथे कुशावर्त नावाचे कुंड आहे. अतिशय सुंदर असे दगडी मंदिर आहे. इथे अहिल्याबाईंनी विहिर, धर्मशाळा बांधली.

२) नंदुबार : इथे विहिर खोदली. ती आजही अहिल्याबाई विहिर म्हणून ओळखतात.

३) नाशिक  : येथे श्रीराम मंदिर बांधले आहे. त्यांचे बांधकाम मजबूत आहे.

४) अयोध्या : येथे एक राममंदिर बांधले आहे.

५) उज्जयिनी : येथे चिंतामणी गणपती मंदिर बांधले आणि महाकालेश्वराच्या पूजेची व्यवस्था करून ठेवली.

६) ओंकार : अहिल्याबाईंच्या सासूबाई गौतमाबाई यांनी बांधकाम सुरू केले होते. ते गौरी सोमनाथ मंदिर अहिल्याबाईंनी पूर्ण केले. अंमलेश्वर मंदिर बांधले. एक बाग करून त्यात छत्री उभारली.

७) कर्नाटक : गरीब लोकांच्या सहाय्यासाठी काही रक्‍कम उभारून ठेवली.

८) काशी : सुप्रसिद्ध मनकर्णिका घाट ऑक्टोबर १७८५ मध्ये बांधला. त्या कामासाठी २५००० रुपये खर्च आला होता. त्याच वर्षी तेथे दशाधमेध घाट बांधला. काशी विश्वेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करवला. गौतमेश्वर आणि अहिल्योद्धारकेश्वर ही विशाल मंदिरे उभारली.

९) कुरुक्षेत्र : घाट आणि मंदिर बांधले.

१०) केदारनाथ : एक धर्मशाळा बांधली. जमिनीपासून सुमारे तीनशे फूट उंचीवर पाण्याचे एक सुंदर कुंड बांधले. त्यामुळे यात्रेकरूंची खूप सोय झाली.

११) कोल्हापूर : अंबाबाईच्या पूजेसाठी व्यवस्था करून ठेवली.

१२) गंगोत्री : येथे विश्वनाथ, केदारनाथ, भैरव, अननपूर्णा अशी चार मंदिरे बांधली. यात्रेकरूंसाठी सहा चिरेबंद धर्मशाळा बांधल्या. शिवाय पर्वतावर उंच ठिकाणी विश्रामस्थाने बांधली.

१३) अमर्कटक : इथे अहिल्याबाईंनी धर्मशाळा बांधली आहे.

१४) आनंद कानन : येथील विश्वेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराचा जीर्णोद्धार केला.

१५) आलमपूर : इथे मल्हारणवांचा देहांत झाला होता. तेथे हरिहरेश्वराचे मंदिर बांधले. मल्हाररावांच्या स्मृतिप्रित्यर्थ सुंदर छत्री उभारून, छत्रीसमोर खंडेराव मार्तंडाचे मंदिर उभारले. एक
सदावर्त चालू केले.

१६) गया : विष्णूमंदिराचा जीर्णोद्धार केला.

१७) चिखलदरा : नर्मदेची परिक्रमा करणाऱ्यांसाठी एक अन्नछत्र ठेवले होते.

१८) चौंडी चापडगाव : येथे महादेवाचे मंदिर आणि एक घाट बांधला. मंदिराचे नाव अहिल्येश्वर आहे. त्याच्या खर्चासाठी वार्षिक आठशे रुपये इंदूर राज्यातून दिले जातात. हे अहिल्यादेवींचे जन्मगाव!'

१९) जगनाधपुरी  : मुख्य मंदिरातील पूजेसाठी मंदिरास काही गावे धर्मादाय देऊन टाकली.

२०) जांब गाव : रामदास स्वामींच्या मठास मदत केली.

२१) जामघाट : एक सुंदर महाद्वार बांधले.

२२) चांदवड  : येथे सुंदर महाल बांधला असून तिथे त्यांची टांकसाळ होती.

२३) जेजुरी :मार्तडाचे मंदिर बांधले.

२४) ताना : येथे तिळभांडेशवराचे मंदिर बांधले.

२५) देवप्रयाग : हे स्थान हिमालयात गंगोत्रीच्या वाटेवर आहे. येथे अलकनंदा नावाची नदी गंगेला मिळाली आहे. तिथे अहिल्यादेवींचे एक सदावर्त आहे.

२६) द्वारका : पुजाअर्चा करण्यासाठी काही गावे दान दिली आहेत.

२७) दारुकवन : नागेश्वरातील देवतेच्या पूजेची कायम व्यवस्था केलेली आहे.

२८) नाथद्वारा : एक धर्मशाळा बांधली आहे.

२९) निफाड : निफाड ते दिंडोशी रस्त्यावर पाण्याचे कुंड तयार करविले.


३०) नीलकंठ महादेव : याच नावांचे सुंदर मंदिर बांधले. एक गोमुख तयार केले आहे.

३१) परळी : येंथील परळी वैजनाथ देवळाचा जीर्णोद्धार केला.

३२) पंढरपूर : श्रीराम मंदिर बांधले. होळकरवाडा आणि घाट बांधला

३३) प्रयाग : मोठा विशाल घाट बांधला.

३४) पुष्कर : एक मंदिर आणि धर्मशाळा बांधली.

३५) पैठण : येंथे यात्रेकरूंसाठी अन्नछत्र सुरू केले.

३६) पुणतांबे : एक वाडा बांधला. एक घाट आहे.

३७) बद्रीनारायण : श्रीहरीचे मंदिर बांधले. धर्मशाळा बांधून अनेक कुंडे तयार केली. देवीच्या नावाने एक सदावर्त चालू केले.

३८) बिदूर : ब्रह्माघाट बनवला.

३९) मंडलेश्वर  : खरगोण जिल्ह्यात नर्मदाकाठी हे नगर आहे. येथे देवींनी एक घाट आणि मंदिर बांधले.

४०) मथुरा : येथे चिरबंद धर्मशाळा बांधल्या:

४९) महेधर : ही अहिल्यादेवींची राजधानी होती. इथे अप्रतिम घाट आहेत. डौलदार मंदिरे आहेत; सदावर्ते आहेत.  हातमाग आहेत. तिथे अजूनही 'कामे चालू आहेत. अहिल्यादेवींचा वाडा; देवघर, त्यांची दरबाराची जागा सर्व पाहता येते.

४२) रामेश्वर : एक धर्मशाळा असून अनछत्र आहे.

४३) रावेर : येथे पाण्याचे कुंड आहे.

४४) वृंदावन : अन्नछत्र स्थापन केले. लाल दगडांची एक विहिर बांधली.

४५) वेरूळ : गौतमाबाईंनी बांधलेल्या पृष्णेश्वंर मंदिराचा जीर्णोद्धार केला, पाण्यासाठी एक कुंड तयार केले.

४६) श्री शैल : मल्लिकार्जुन शिवमंदिर बांधले.

४७) संगमनेर : येथे राममंदिर बांधून घेतले.

४८) सातारा : विहिर बांधली.

४९) सप्तशृंगगड :एक धर्मशाळा बांधलेली आहे.

५०) सुलपेश्वर : अन्नछत्र स्थापन केले. या ठिकाणी प्रवाशास एक घोंगडी आणि तांब्या दिला जात असे.

५१) सोमनाथ : सोममनाथंचे महादेव मंदिर इंतिहास प्रसिद्ध आहे. १०२४ मध्ये महंमदगझनीने. स्वारी करून याची मोडतोड केली होती.अहिल्यादेवींनी या मंदिरांचा जीर्णोद्धार केला आणि शिवलिंगाची प्रतिष्ठापना केली. 

५२) हरिद्वार : या ठिकाणी पश्चिमोत्तर दिशेला कुशावर्त, हरकी पेडीच्या दक्षिणेस गंगेकाठी घाट आहे. या घाटावर अहिल्यादेवींनी विशाल धर्मशाळा बांधली. 

५३) हंदिया : इथे अहिल्यादेवींनो एक धर्मशाळा बांधली. अन्नछत्र कायमचे सुरू केले. ६०-७० फुटांचे सिद्धनाथ मंदिर बांधले. विशाल घाट बांधला.

याशिवाय कित्येक ठिकाणी विहिरी, धर्मशाळा बांधल्या. अन्नछत्रे उभी केलो. देवालयांचे जीर्णोद्धार केले. 
अन्नछत्रे, विहिरी, धर्मशाळा बांधण्यामागे त्यांचा सामाजिक दृष्टिकोन होता. अन्न, पाणी आणि निवारा या
माणसांच्या प्रमुख गरजा पुरविण्यासाठी त्यांनी केलेली ही प्रचंड धंडपड होती.

प्रत्येक कार्यासाठी स्वतंत्र अर्थव्यवस्था असल्यामुळे पुढे राज्यकर्ते बदलले तरी कुणालाही पदर पसरत मदत मागायला यावे लागले नाही. व्यवस्था सुरळित चालत राहिली. त्यांची नि:स्वार्थ सेवा मानवतेला वाहिलेली होती. जातिधर्मांच्या सीमा ओलांडून जाणारी होती.

 कला आणि साहित्य याकडे सुद्धा त्यांचे लक्ष होते. त्यांनी उभ्या केलेल्या वास्तू, घाट अत्यंत कलात्मक आहेत. 

                                       संदर्भ : महाराष्टाचे शिल्पकार तेजस्विनी अहिल्याबाई होळकर,महाराष्ट राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ,मुंबई.