गुरुवार, ३० जुलै, २०२०

अहिल्या ते राज्यशासक लोकमाता

६.तेजस्विनी अहिल्याबाई होळकर - अहिल्या ते राज्यशासक लोकमाता 

तेजस्विनी अहिल्याबाई होळकर 

AhilyaLokmata

इतिहासाने पानोपानी...
जिची गाईली गाथा!
होळकरांची तेजस्वी ती...
पुण्यश्लोक माता!


अहिल्या ते राज्यशासक लोकमाता

अहिल्या ते लोकमाता

एका सामान्य कुळात जन्माला आलेल्या अहिल्यादेवींना लोकमातेची पदवी दिली ती प्रजेने! अहिल्या, अहिल्याबाई, अहिल्यादेवी, मातोश्री अहिल्यादेवी, लोकमाता हा त्यांचा जीवनाचा प्रवास आश्चर्यकारक होता. स्त्री असल्यामुळे त्यांच्यावर  स्त्रीत्वाची बंधने होती. बंधने असूनही त्यांनी आपले जीवन कर्तव्यपूर्तींनी
सफल करून टाकले.

अधिकार संपन्न आणि श्रीमंत असूनही, निर्मोही, त्यागशील, व्रतस्थ राहणे हे दिव्य अहिल्यादेवींनी जन्मभर केले. सती न जाताही त्या सती ठरल्या, ते त्यांच्या निराभिमानी वागण्यामुळेच!

त्यांच्यासमोर अनेक प्रलोभने होती. मोह होते. तिजोरी पैशांनी भरलेली होती. अनेक ऐषआरामी राज्ये त्यांच्यासमोर होती. आजुबाजुच्या राज्यात वाढते कर लादून प्रजेला पिळणारे राजे त्या पाहात होत्या. पण तरीही त्या कधीही प्रलोभनांना बळी पडल्या नाहीत. उलट त्याचे वागणे इतके चोख ठेवले की त्यांचा आदर्श इतरांनी पुढे ठेवावा. आपल्या तत्त्वांवर त्यांची अढळ अशी निष्ठा होती. आपल्या तेजस्वी
कर्मठ, आणि व्रतस्थ जीवनामुळे त्यांनी अक्षय कौर्ति प्राप्त केली.

त्यांच्या अंगी जितके सद्गुण होते तितके सर्वच्या सर्व एकाच व्यक्तिच्या ठाई असणे हा ईश्वराने केलेला एक चमत्कार होता. नाहीतर जिथे धर्मपरायणता आणि परमार्थभावना असते तिथे राजकारणी मुत्सद्देगिरोचा अंशही नसतो. आणि जिथे राजकारणी मुत्सद्दीपण असते तिथे धार्मिक सहिष्णुता आढळत नाही.

त्याचप्रमाणे धैर्य, शौर्य, पराक्रम असतो तिथे नम्रता किंवा परदु:खकातरता नसते. शक्ति आणि वैभवाला चरित्रसंपन्नतेची साथ लाभत नाही हे जगात आपल्याला सर्वत्र दिसते. परंतु अहिल्याबाईंच्या जीवनात सगळ्या चांगल्या शकुनकारक, आनंददायक गोष्टी एकत्र आल्या होत्या. सर्व सद्गुण जणु बहरास आले होते.
जेवढ्या धार्मिक तेवढ्याच मुत्सद्दी अशा अहिल्याबाईंचे जीवन भारतीय स्त्रीघर्माचे एक ज्वलंत उदाहरण होते.

धवलशुभ्र असे प्रशासन आणि काळाकुट्ट संसार अशा दोन ताण्याबाण्यावर त्यांचे जीवनवस्त्र विणलेले आहे. त्यांचा संसार संघर्षमय होता. दुःखाने भरलेला होता. प्रत्यक्ष व्यसनी पति आणि खोडकर नशेबाज अशा पुत्राने त्यांना भरपूर मनस्ताप दिला. लांबच्या नातेवाईकांनी आणि ज्याला पुढे त्यांनी सुभेदार केले त्या
तुकोजी होळकरांनी पण अहिल्यादेवींना कष्ट दिले.

एकाहून एक भयंकर असे दु:खाचे आघात त्यांना सोसावे लागले. अशा दारुण मन:स्थितीतसुद्धा त्यांचे
कर्तव्याचे भान कधीच सुरले नाही. प्रत्येक संकटाला त्या सर्व शक्ति पणाला लावून बाणेदारपणे तोंड देत राहिल्या. खंबीरपणे सामना देत राहिल्या. संकटापुढे त्यांनी कधीच मान टाकली नाही कौ, त्यांचे पाय लटपटले नाहीत. अवती भवती घनदाट अंधार पसरलेला असताना सुद्धा, आपल्या अलौकिक जीवनाचा दीप त्यांनी प्रज्वलित ठेवला. दैवाला शिव्याशाप न देता, दैवावर मात केली. निर्मळ सुखाचे शाश्वत दीप लावून त्यांनी सभोवती प्रकाश दिला.

दुःखसंकटे समर्पणाचे धडे शिकवतात, किंबहुना दुःख म्हणजे प्रभूचे आशीर्वादच विपरित वेश घेऊन येतात असे त्या समजत असत. म्हणूनच ही प्रचंड दुःखे त्यांनी धीराने स्वीकारली आणि शौर्याने त्यांच्याशी सामना दिला. प्रत्येक आघात आणि विपत्तीचे घाव सोसताना त्या जीवनाचा जयघोषच करीत राहिल्या. ईश्वराने जे दिले त्याबद्दल त्या जगन्रियंत्याची भक्ति करीत राहिल्या. कुठेही राग नाही, संताप नाही, आक्रस्ताळेपणा नाही. अविचलपणे त्या सोसत राहिल्या आणि त्यांचे व्यक्तिमत्व उंचावत गेले.

संकटांना छोटे करत त्या मोठ्या होत गेल्या. ही किमया सहज घडणारी नव्हती. अनेक गुणांचा समुच्चय असणाऱ्या अहिल्यादेवींनाच ते शक्‍य झाले. एखादी खरी कधीच तुटून पडली असती, मोडून गेली असती.

'लोकरुढीप्रमाणे त्या सती जायला निघाल्या तेव्हा मल्हाररावांने त्यांच्यापुढे पदर पसरून त्यांना जाऊ दिले नाही. त्यावेळी ते म्हणाले जीव द्यायचाच तर या प्रजेसाठी दे. खंडूबरोबर सती जाणाऱ्या नऊजणी आहेत पण या प्रजेसाठी फक्त तूच आहेस. त्या खरंच प्रजेची आई झाल्या. मातोश्री झाल्या. आपल्या वागणुकीने
देवतास्वरुप झाल्या आणि लोकमाताही झाल्या. अहिल्यापासून लोकमातेपर्यंतचा त्यांच्या चरित्राचा  विकास अद्वितीय आहे.

अहिल्या ते राज्यशासक 

अस्सल कागदोपत्रानिशी असे सिद्ध करता येते की अहिल्यादेवी या अव्वल दर्जाच्या मुत्सद्दी होत्या. म्हणूनच त्यांनी इतक्या हिरिरीने महादजी शिंद्यांचा पाठपुरावा केला. त्यांच्या सहकार्याशिवाय महादजींना औत्तरीय राजकारणातले श्रेष्ठत्व मुळीच लाभले नसते. त्यांच्याविषयीचा माझा आदर अमर्याद वाढला आहे.'' हो वाक्ये आहेत कै. जदुनाथ सरकार यांनी रियासतकारांना लिहिलेल्या पत्रातील!

त्यांच्या कालखंडातील काही  पत्रे  आहेत . त्यावरून त्यांची योग्यता किती थोर होती हे लक्षात येईल. हे पहिलं पत्र मल्हाररावांनी अहिल्याबाईंना लिहिलं आहे.

चिरंजीव अहिल्याबाईंना मल्हाररावांचा आशीर्वाद. येथे कुशल आहे. आपला हाल लिहावा. सेंधवाच्या किल्ल्याच्या कारखानदाराला खर्चाची सर्व व्यवस्था करून दिली होती. जे रुपये पाठविण्यात आले होते. ते सर्व खर्च झाले आहेत. त्याचा हिशोबही आला आहे. तो तुमच्याकडे पाठविण्यात येत आहे. पुढील खर्चासाठी व्यवस्था करून दिली पाहिजे. तुम्ही माळवा प्रांतात गेला आहात म्हणून तुम्हाला हे पत्र लिहिले आहे. किल्ल्याच्या कारखानदाराला खर्चासाठी सर्व मदत पाठवून यथायोग्य प्रबंध करावा वारंवार त्याची तक्रार येणार नाही याकडे लक्ष द्यावे. इंदूरला पोचल्यावर कधी कधी तिथून माणूस पाठवून सेंधवाच्या किल्ल्याची देखरेख करून घ्यावी. ज्यामुळे काम लवकर संपेल. किल्ल्याच्या बुरुजाचे काम पूर्ण झाल्यावर त्याच्या आजुबाजूच्या खंदकाचे काम सुरु करावे. येथून चिरंजीव संताजी होळकरास पत्र लिहिले आहे. त्याच्याकडे खर्च लवकर पाठवावा. त्याच्याशिवाय काम थांबून राहू नये याचे ध्यान ठेवावे.अधिक काय लिहावे? आशीर्वाद (मोर्तबखुद्द) ”.

एकदा अहिल्याबाईंनी तीर्थयात्रेला जायचा मनसुबा बोलून दाखवताच मल्हारराव म्हणाले होते कि हि तीर्थयात्रेची वेळ नव्हे, राजकारण काय, मसलत काय, मनसुबे  काय येवढे आपणास कळू नये? आमच्या छावणीस पैसा, बारूद पुरवायचे काम सोडून तीर्थयात्रेस? इंदोर, ग्वाल्हेर येथून आम्हास कुमक पाठवण्याचे प्राप्तकर्तव्य सोडून यात्रा? हे आमच्या कामास येणार नाही. आमच्या मर्जीचा प्रकार तुम्हास विदित आहेच. फौज लवकर तयार राखा.” 

मल्हाररावांना अहिल्याबाईंचा खूप मोठा आधार 'होता. त्यांच्यावाचून मल्हारराव युद्धे करू शकले नसते. अहिल्याबाईंच्या कर्तृत्वावर त्यांचा दांडगा विश्वास होता. त्यांनी राजकारणाचे अनेक पदर, अहिल्याबाईंना शिकवलें होते. इतिहासात मल्हाररावांनी काही चुका केल्याही आहेत, परंतु अहिल्याबाईंना सती
जाण्यापासून त्यांनी रोखले, हे फार मोठे श्रेय त्यांच्याकडे आहे. 

पुढील पत्र अहिल्याबाईंच्या मोडी लिपीतील पत्राचे देवनागरीत रुपांतर आहे. 
राव सीवलाल कोतवाल कसबे इंदूर यासी अहिल्याबाई होळकर सुमासित सवेनम या व अलफ दुलेराव मंडलोई प। मजकूर याचे दुकान आहे. ते तुम्ही जबरदस्तीने घेतलेत म्हणोन मशारनिलेने हुजूर येऊन विदित केले. एसी यासी तुम्ही दुसर्‍याचे दुकान जबरदस्तीने घेतले याचे कारण काय? त्यावरून हे पत्र सादर केले असे. तरी मशारनिलेचे दुकान जबरदस्तीने घेतले असेल त्याचे त्यास माघार देणे. ये विषयोची फिरून बोभाट आलिया उपेगी पडणार नाही. दक्ष समजून वर्तणूक करणे जाणीजे. छ २६ रबिलावल मोर्तब खुद्द- ”.
                                                                                         (श्री. नि. छ. जमींदार यांच्या संग्रहातून)

यावरून राज्यशासक म्हणूनही त्यांनी केवढे कर्तृत्व मिळवले होते ते लक्षात येईल. दुकान बळकावण्यासारख्या अगदी किरकोळ गोष्टींसाठी सुद्धा त्या स्वत: तडजोडी घडवून आणण्यात पुढाकार घेत. त्यांची न्यायबुद्धी अत्यंत कार्यक्षम होती. आणि राज्यशासक म्हणून त्यांची फार आवश्यकता असते. त्यांना उत्कृष्ठ राज्यशासक म्हणून कोौर्ति लाभली त्यात त्यांच्या विलक्षण अशा न्यायनिर्णय शक्तिचा फार मोठा भाग आहे. एका विशाल राज्याचे कुशल संचलन करून त्यांनी इतरही अनेक अनन्यसाधारण कामे करून दाखवली. त्यांचे जीवन म्हणजे एक प्रेरणादायी ग्रंथच आहे. त्या ग्रंथाच्या पानापानावर सुखशांतीचा, कर्तव्याचा, शौर्याचा, खंबीरपणाचा, न्यायप्रियतेचा, औदार्याचा धार्मिकतेचा अपूर्व असा संदेश लिहिलेला आहे. त्याचं वाचन आणि मनन करून आपल्याही मनावर अत्यंत शुभ असे परिणाम होतात.

 त्यांचे राज्य हे खऱ्या अर्थाने रामराज्य होते. राज्यकारभाराची आदर्श अशी व्यवस्था होती. त्यांची राज्यव्यवस्थेची, भोवतालीच्या राजकौय परिस्थितीची जाण तीक्ष्ण होती. त्यांचे एखादे पत्र सुद्धा याची साक्ष देईल. 

त्या एका पत्रात लिहितात, 

“चारही बाजूंनी आपला प्रसार करण्याची योजना फिरंग्यांनी आखली आहे. कुठे दोन तर कुठे तीन पलटणी उभ्या करून फिरंगी डोके वर काढतो आहे. अशा वेळी फौजा पाठवून त्याला त्या त्या ठिकाणीच गारद केले पाहिजे म्हणजे त्यालाही चांगली जरब बसेल आणि पुढे पाय पसरण्याची त्याला हिंमत होणार नाही. नबाब, भोसले सर्वांनी मिळून फिरंग्याला पराभूत केले पाहिजे.”

त्या विदेशी शक्तीच्या  प्रभावामुळे अत्यंत चितित होत्या. त्यांना राजे सरदारांची स्वस्थता अनुचित वाटत होती. एकमुद्ठीने फ्रेंच फिरंगी गारद करावा' हेच वाक्य, हाच संदेश त्यांच्या मुखात होता.

एक राज्यशासक या नात्याने त्यांनी सुरु केलेले अनेक प्रकल्प आपण आजही राबवतो आहोत हे केवढे आश्चर्य? जिल्हापरिषदांच्या पद्धतीने खेड्यापर्यंत न्याय ही त्यांचीच कल्पना! मुलींना शिक्षण, स्त्रियांना सैनिकी शिक्षण, हुंडाबंदी, दारुबंदी, झाडे तोडण्यास बंदी, कुटीरोद्योग या योजना आजही त्यांच्या
बुद्धीवैभवाची साक्ष देत आहेत.

अहिल्याबाईंच्या ठाई देशवासियांनी अगाध श्रद्धा बाळगली. आजही ती श्रद्धा अधिकाधिक गडद होत आहे. या श्रद्धेमुळे त्यांना देवत्व लाभले. गयेच्या विष्णुमंदिरत आणि महेश्वरमध्ये त्यांची मूर्ती स्थापण्यात आली असून तिची पूजा भक्तिभावाने केली जाते. अशी ही त्यांची स्फूर्तिदायक गाथा प्रत्येकाने मनन केली पाहिजे.

अहिल्यादेवींनी बांधलेल्या वास्तू  व धार्मिक  कार्याचा आढावा 

अहिल्याबाईंनी तीस वर्षे राज्य तर सांभाळलेच पण अनेक राज्यात सुंदर वास्तू उभारून देशाचे सौंदर्य
वाढवले आणि जनतेच्या हिताची कामे करून फार मोठे जनहित साधले. इतर राजांना स्फूर्तो दिली. त्यांचा आदर्श पुढे ठेवून अनेक सत्तांधारी दानाला महत्त्व देऊ लागले. त्यांनी सत्ताधाऱ्यांपुढे एक आदर्श ठेवला.

अहिल्याबाई नेहेमी म्हणत स्नानाने देहशुद्धी, ध्यानाने मनशुद्धी आणि दानाने धनशुद्धी होते. आपल्या संस्कृतीतही त्याग आणि दानधर्म याला फार महत्त्व आहे. आपली संस्कृती भोगापेक्षा त्यागावर उभी आहे. सर्वांमध्ये देवाचा अंश आहे असे मानून प्राणीमात्रांना सुख देणे, सेवा करणे, मदत करणे हाही भक्तिचाच प्रकार मानलेला आहे. 

अहिल्याबाईंचे सारे जीवन त्याग आणि सेवा यासाठीच होते असे म्हटले तर त्यात काही चूक नाही. त्याग आणि सेवा हा त्या ईश्वरभक्तिचाच प्रकार मानीत असत. त्यांचे कार्यक्षेत्र फक्त त्यांची प्रजा वा राज्य इतकेच नव्हते तर संपूर्ण मानव समाजापर्यंत ते विस्तारले होते. आज आपण सर्वधर्मसमभाव जो म्हणतो तो अहिल्यादेबींनी दोनशे वर्षांपूर्वी कृतीत आणला होता. त्यांच्या प्रेमाला, मायेला, वात्सल्याला आणि दानधर्मालाही जातीधर्माच्या सोमा कधीच नव्हत्या. आपल्या कर्तव्याचे पालन करणे हाच त्यांचा महान कर्मयोग होता. हेच त्यांचे कल्याणाचे मर्म होते.

त्यांनी आपली खाजगी संपत्ती दानधर्मात आणि अनेक देवळे घाट बांधण्यात खर्च केली याचंही कारण त्यांना पारलौकिक सुख हवे होते असे नाही तर प्रजेला सुखी करायचे होते. त्यांनी या दानाचा कधीच गाजावाजा केला नाही की समारंभ करून कौतुक करून घेतले नाही.आतापर्यंत मिळालेली माहिती पुढे आहे-

१) त्र्यंबकेश्वर : नाशिक या शहरापासून १८ मैलांवर हे बारा ज्योतिलिंगापैकी एक आहे. इथे कुशावर्त नावाचे कुंड आहे. अतिशय सुंदर असे दगडी मंदिर आहे. इथे अहिल्याबाईंनी विहिर, धर्मशाळा बांधली.

२) नंदुबार : इथे विहिर खोदली. ती आजही अहिल्याबाई विहिर म्हणून ओळखतात.

३) नाशिक  : येथे श्रीराम मंदिर बांधले आहे. त्यांचे बांधकाम मजबूत आहे.

४) अयोध्या : येथे एक राममंदिर बांधले आहे.

५) उज्जयिनी : येथे चिंतामणी गणपती मंदिर बांधले आणि महाकालेश्वराच्या पूजेची व्यवस्था करून ठेवली.

६) ओंकार : अहिल्याबाईंच्या सासूबाई गौतमाबाई यांनी बांधकाम सुरू केले होते. ते गौरी सोमनाथ मंदिर अहिल्याबाईंनी पूर्ण केले. अंमलेश्वर मंदिर बांधले. एक बाग करून त्यात छत्री उभारली.

७) कर्नाटक : गरीब लोकांच्या सहाय्यासाठी काही रक्‍कम उभारून ठेवली.

८) काशी : सुप्रसिद्ध मनकर्णिका घाट ऑक्टोबर १७८५ मध्ये बांधला. त्या कामासाठी २५००० रुपये खर्च आला होता. त्याच वर्षी तेथे दशाधमेध घाट बांधला. काशी विश्वेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करवला. गौतमेश्वर आणि अहिल्योद्धारकेश्वर ही विशाल मंदिरे उभारली.

९) कुरुक्षेत्र : घाट आणि मंदिर बांधले.

१०) केदारनाथ : एक धर्मशाळा बांधली. जमिनीपासून सुमारे तीनशे फूट उंचीवर पाण्याचे एक सुंदर कुंड बांधले. त्यामुळे यात्रेकरूंची खूप सोय झाली.

११) कोल्हापूर : अंबाबाईच्या पूजेसाठी व्यवस्था करून ठेवली.

१२) गंगोत्री : येथे विश्वनाथ, केदारनाथ, भैरव, अननपूर्णा अशी चार मंदिरे बांधली. यात्रेकरूंसाठी सहा चिरेबंद धर्मशाळा बांधल्या. शिवाय पर्वतावर उंच ठिकाणी विश्रामस्थाने बांधली.

१३) अमर्कटक : इथे अहिल्याबाईंनी धर्मशाळा बांधली आहे.

१४) आनंद कानन : येथील विश्वेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराचा जीर्णोद्धार केला.

१५) आलमपूर : इथे मल्हारणवांचा देहांत झाला होता. तेथे हरिहरेश्वराचे मंदिर बांधले. मल्हाररावांच्या स्मृतिप्रित्यर्थ सुंदर छत्री उभारून, छत्रीसमोर खंडेराव मार्तंडाचे मंदिर उभारले. एक
सदावर्त चालू केले.

१६) गया : विष्णूमंदिराचा जीर्णोद्धार केला.

१७) चिखलदरा : नर्मदेची परिक्रमा करणाऱ्यांसाठी एक अन्नछत्र ठेवले होते.

१८) चौंडी चापडगाव : येथे महादेवाचे मंदिर आणि एक घाट बांधला. मंदिराचे नाव अहिल्येश्वर आहे. त्याच्या खर्चासाठी वार्षिक आठशे रुपये इंदूर राज्यातून दिले जातात. हे अहिल्यादेवींचे जन्मगाव!'

१९) जगनाधपुरी  : मुख्य मंदिरातील पूजेसाठी मंदिरास काही गावे धर्मादाय देऊन टाकली.

२०) जांब गाव : रामदास स्वामींच्या मठास मदत केली.

२१) जामघाट : एक सुंदर महाद्वार बांधले.

२२) चांदवड  : येथे सुंदर महाल बांधला असून तिथे त्यांची टांकसाळ होती.

२३) जेजुरी :मार्तडाचे मंदिर बांधले.

२४) ताना : येथे तिळभांडेशवराचे मंदिर बांधले.

२५) देवप्रयाग : हे स्थान हिमालयात गंगोत्रीच्या वाटेवर आहे. येथे अलकनंदा नावाची नदी गंगेला मिळाली आहे. तिथे अहिल्यादेवींचे एक सदावर्त आहे.

२६) द्वारका : पुजाअर्चा करण्यासाठी काही गावे दान दिली आहेत.

२७) दारुकवन : नागेश्वरातील देवतेच्या पूजेची कायम व्यवस्था केलेली आहे.

२८) नाथद्वारा : एक धर्मशाळा बांधली आहे.

२९) निफाड : निफाड ते दिंडोशी रस्त्यावर पाण्याचे कुंड तयार करविले.


३०) नीलकंठ महादेव : याच नावांचे सुंदर मंदिर बांधले. एक गोमुख तयार केले आहे.

३१) परळी : येंथील परळी वैजनाथ देवळाचा जीर्णोद्धार केला.

३२) पंढरपूर : श्रीराम मंदिर बांधले. होळकरवाडा आणि घाट बांधला

३३) प्रयाग : मोठा विशाल घाट बांधला.

३४) पुष्कर : एक मंदिर आणि धर्मशाळा बांधली.

३५) पैठण : येंथे यात्रेकरूंसाठी अन्नछत्र सुरू केले.

३६) पुणतांबे : एक वाडा बांधला. एक घाट आहे.

३७) बद्रीनारायण : श्रीहरीचे मंदिर बांधले. धर्मशाळा बांधून अनेक कुंडे तयार केली. देवीच्या नावाने एक सदावर्त चालू केले.

३८) बिदूर : ब्रह्माघाट बनवला.

३९) मंडलेश्वर  : खरगोण जिल्ह्यात नर्मदाकाठी हे नगर आहे. येथे देवींनी एक घाट आणि मंदिर बांधले.

४०) मथुरा : येथे चिरबंद धर्मशाळा बांधल्या:

४९) महेधर : ही अहिल्यादेवींची राजधानी होती. इथे अप्रतिम घाट आहेत. डौलदार मंदिरे आहेत; सदावर्ते आहेत.  हातमाग आहेत. तिथे अजूनही 'कामे चालू आहेत. अहिल्यादेवींचा वाडा; देवघर, त्यांची दरबाराची जागा सर्व पाहता येते.

४२) रामेश्वर : एक धर्मशाळा असून अनछत्र आहे.

४३) रावेर : येथे पाण्याचे कुंड आहे.

४४) वृंदावन : अन्नछत्र स्थापन केले. लाल दगडांची एक विहिर बांधली.

४५) वेरूळ : गौतमाबाईंनी बांधलेल्या पृष्णेश्वंर मंदिराचा जीर्णोद्धार केला, पाण्यासाठी एक कुंड तयार केले.

४६) श्री शैल : मल्लिकार्जुन शिवमंदिर बांधले.

४७) संगमनेर : येथे राममंदिर बांधून घेतले.

४८) सातारा : विहिर बांधली.

४९) सप्तशृंगगड :एक धर्मशाळा बांधलेली आहे.

५०) सुलपेश्वर : अन्नछत्र स्थापन केले. या ठिकाणी प्रवाशास एक घोंगडी आणि तांब्या दिला जात असे.

५१) सोमनाथ : सोममनाथंचे महादेव मंदिर इंतिहास प्रसिद्ध आहे. १०२४ मध्ये महंमदगझनीने. स्वारी करून याची मोडतोड केली होती.अहिल्यादेवींनी या मंदिरांचा जीर्णोद्धार केला आणि शिवलिंगाची प्रतिष्ठापना केली. 

५२) हरिद्वार : या ठिकाणी पश्चिमोत्तर दिशेला कुशावर्त, हरकी पेडीच्या दक्षिणेस गंगेकाठी घाट आहे. या घाटावर अहिल्यादेवींनी विशाल धर्मशाळा बांधली. 

५३) हंदिया : इथे अहिल्यादेवींनो एक धर्मशाळा बांधली. अन्नछत्र कायमचे सुरू केले. ६०-७० फुटांचे सिद्धनाथ मंदिर बांधले. विशाल घाट बांधला.

याशिवाय कित्येक ठिकाणी विहिरी, धर्मशाळा बांधल्या. अन्नछत्रे उभी केलो. देवालयांचे जीर्णोद्धार केले. 
अन्नछत्रे, विहिरी, धर्मशाळा बांधण्यामागे त्यांचा सामाजिक दृष्टिकोन होता. अन्न, पाणी आणि निवारा या
माणसांच्या प्रमुख गरजा पुरविण्यासाठी त्यांनी केलेली ही प्रचंड धंडपड होती.

प्रत्येक कार्यासाठी स्वतंत्र अर्थव्यवस्था असल्यामुळे पुढे राज्यकर्ते बदलले तरी कुणालाही पदर पसरत मदत मागायला यावे लागले नाही. व्यवस्था सुरळित चालत राहिली. त्यांची नि:स्वार्थ सेवा मानवतेला वाहिलेली होती. जातिधर्मांच्या सीमा ओलांडून जाणारी होती.

 कला आणि साहित्य याकडे सुद्धा त्यांचे लक्ष होते. त्यांनी उभ्या केलेल्या वास्तू, घाट अत्यंत कलात्मक आहेत. 

                                       संदर्भ : महाराष्टाचे शिल्पकार तेजस्विनी अहिल्याबाई होळकर,महाराष्ट राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ,मुंबई. 

बुधवार, २९ जुलै, २०२०

सदगुणांची खाण - अहिल्या

५. तेजस्विनी अहिल्याबाई होळकर - सदगुणांची खाण - अहिल्या

तेजस्विनी अहिल्याबाई होळकर 

AhilyaNature

इतिहासाने पानोपानी...
जिची गाईली गाथा!
होळकरांची तेजस्वी ती...
पुण्यश्लोक माता!


सदगुणांची खाण - अहिल्या


हे त्या अहिल्यादेवींचं चरित्र  आहे , ज्या  सत्याला सामोरे गेल्या  ज्यांनी चोख न्याय केला, ज्यांनी दुर्बळांची पाठ राखली, ज्यांनी सत्ताधिशांना त्यांच्या चुका दाखवल्या, ज्यांनी इतरांचा पैसा विषसमान मानला. अहिल्याबाईंनी या सार्‍यासाठी आपल्या आयुष्याचा क्षणक्षण वेचला. त्यातल्याच काही ठळक गोष्टी मी आपल्याला सांगणार आहे. या कथा इतिहासात नमूद झालेल्या आहेत. त्यांच्या चरित्राचे मनमोहक रूप दाखवणाऱ्या आहेत.

एकदा फडनिशीत हिशोब बघता बघता त्यांना पति खंडेरावांचे खाते दिसले. त्याचा वर्षाचा तनखा दोंन' महिन्यातच संपला होता. आता जर पति पैशांसाठी आले तर त्यांना नकार द्यावा लागणार होता. अन्‌ तो प्रसंग आलाच. नशापाणी केलेले खंडेराव अहिल्येसमोर उभे होते. अहिल्येने पैसे देण्यास नम्रपणे नकार देताच ते म्हणाले, ''मला पैसे हवेत, सल्ला तर मुळीच नको. हवेत ते पैसे अन्‌ ते आम्ही 'नेणारच. बघुया तुम्ही आमचे काय करता ते!'' त्यावर अहिल्याबाई शांतपणे म्हणाल्या, ''मी जे काय करवे ते दौलतीच्या, राज्याच्या हिताचे करावे, अशी मामंजींची आज्ञा आहे. आपल्या नांवे रुपये नाहीत. अर्थात आपली सेवा होऊ शकणार नाही.'* हे ऐकताच खंडेरावांनी अहिल्यादेवींसमोरची हिशोबाची वही घेतली अन्‌ कोपऱ्यात भिरकावली. 

अहिल्याबाईंच्या डोळ्यातून ठिणग्या उडू लागल्या. त्या संतापून कारभारी गंगोबातात्यांना म्हणाल्या, "तात्या, खतावणीची बेअब्रू करणाऱ्याचा जबाब लिहून घ्या, अन्‌ त्यांना पंचवीस मोहरांचा दंड ठोका.
वसूल करून घ्या, आम्ही सुभेदारीत जातो.'' मागे वळूनही न पाहाता अहिल्याबाई तिथून निघून गेल्या. गंगोबातात्या थक्क झाले. 'असे तेज पाहिले नाही' असे शब्द त्यांच्या मुखातून निघून गेले. प्रत्यक्ष पतीलाही दंड ठोकून वसूल करणारी कठोर शिस्तीत राज्यकारभार राबवणारी अशी होती अहिल्या.

एकदा अहिल्याबाई फडणिशीत गेल्या तोच सांडणीस्वार पत्र घेऊन आला. त्यात फार दु:खद वार्ता होती. श्रीमंत बाजीराव पेशवे यांचा नर्मदातिरी मृत्यू झाला होता. बाजीरावांचे प्राण जाताच त्यांचा आवडता हत्ती आणि कुत्रा टाहो फोडत मरून गेले. सगळं राज्य शोकात बुडालं. मल्हारराव आले ते हृदय फुटल्याप्रमाणे
रडत राहिले. बाजीरावांना परलोकी शांती लाभावी म्हणून ब्राह्मणांना दाने दिली गेली. वस्त्रे , मुद्रा यांचे दान, धर्मकार्ये यांच्यावर भरपूर खर्च झाला.

काही दिवसांनी अहिल्याबाई हिशोब तपासायला बसल्या तेव्हा धर्मकार्याचा सर्व खर्च सरकारी खर्चात टाकलेला बघून चकित झाल्या. त्यांनी गंगोबातात्यांना हाक मारली. म्हणाल्या, ''तात्या, आपण थोर. बाजीराव श्रीमंतांच्या मुक्तीसाठी केलेल्या विधींचा खर्च आपण सरकारी तिजोरीवर टाकला? अहो काय म्हणावे याला?" गंगोबातात्या चाचरत म्हणाले, ''बाईसाहेब, श्रीमंतांच्या पारलौकिक शांतीसाठी
त्यांच्या सुभेदाराने  केलेली कार्ये... म्हणजे ती सरकारीच नव्हे काय? मग ती खाजगी खर्चात कशी टाकावी?” यावर तेजस्वी, निर्लोंभी, अहिल्याबाई म्हणाल्या, “तात्या, मामंजी काय फक्त सुभेदारच होते? अहो नाती काय  फक्त रक्‍तातूनच येतात? काही नाती जिवाशिवाची, त्याची मोजमापे कशी घ्यावी? मामंजी आठ दिवस अन्नाला शिवले नव्हते, बाजीराव मामंजींचे शपथबंधू होते. तात्या, हा सर्व खर्च खाजगी खर्चाकडे टाका. यापुढे ही गोष्ट खंबीरपणे पाहा. कुठल्याही प्रकारच्या खाजगी खर्चाची पैसुद्धा सरकारी तिजोरीतून येता कामा नये, याची पक्की जरब ठेवा. खाजगीतून एखादे सरकारी काम झाले तर ते आम्हास चालेल पण खाजगी कामासाठी पैचा एक हिस्साही सरकारवर पडता कामा नये यासाठी पंचागे सावध रहावे.' अहिल्याबाईंच्या स्वराला तिखट धार होती. त्यांचा धाक जबर होता. सोसायला जड होता.

एक दिवस एक विधवा स्त्री  पहारेकऱ्यांचे  कडे तोडून थेट आत आली. सांगू लागली, “बाईसाहेब, मज अभागिनीस पुत्र नाही. सगळे नातलंग आपापली पोरे घेऊन दारी ठाण मांडून बसले आहेत. हे पैशांसाठी मला विषही घालतील. मला यांची पोरे दत्तक नकोत. माझ्या दासीचा पुत्र मला दत्तक घ्यायचा आहे तर 
नातेवाईकांनी दंगा माजवला आहे. बाईसाहेब, नको मला ही संपत्ती. दान करू द्या मला आपल्या पायाशी. कु्त्र्याच्या  मौतीने मरण्यापेक्षा आपल्या पायाशी राहीन तर प्रतिष्ठा पावेन. माझी संपत्ती, वाडा सारं सरकारात जमा करून घ्या!'' यावर अहिल्याबाई म्हणाल्या, ''मातोश्री, नातलगांच्या रेट्यासमोर हार न घेता, तुम्हास मान्य असेल त्यास दत्तक घ्या. माझ्या राज्यात विधवेला दत्तक घेता येईल!'' यावर गंगोबा तात्या हळूच अहिल्याबाईंना म्हणाले, “बाईसाहेब, अनायसे संपत्ती सरकारी तिजोरीत येते आहे, दत्तकाची परवानगी देणं म्हणजे आपलं नुकसान करून घेणं नाही का?'' 

यावर आपला राग आवरत आवाज हलका करीत त्या म्हणाल्या, “तात्या, आपण काय हे बोलता? माळव्यातल्या विधवांना पतिच्या संपत्तीचा सुखाने उपभोग घेता यायला हवा. या विधवेच्या नातलगांना समज द्या. वाड्यावर सैनिक तैनात करा. तात्या, लक्षात ठेवा. स्त्रीयांचा सन्मान हा माळव्याचा महालौकिक व्हायला हवा.” मग त्या विधवेकडे वळत म्हणाल्या, ''मातोश्री, तुमच्या पसंतीचा दत्तक घ्या. दंगाफसादाची भाषा करणाऱ्या नातलगांना समज दिली जाईल. समारंभात संकट येवू नये म्हणून, आमचे नजरबाज तिथे राहातील. यावर गंगोबातात्या म्हणाले, “बाईसाहेब, दत्तकाचा नजराणा किती मागायचा?'' यावर संतापाने अहिल्याबाई म्हणाल्या, ''विधवेचा नेकबंद गुजारा व्हावा हे बघायचं का नजराणा मागायचा? अशा  नजराण्याला दरोडा मानते मी तात्याबा! होळकरांचं राज्य प्रजेची सेवा करण्यासाठी आहे. दत्तकाला आमच्या खाजगीतून पोशाख द्या!''

प्रजेच्या सुखासाठी अहिल्याबाई जागरूक होत्या. विघवांचा, खियांचा छळ करणाऱ्यांना क्षमा नव्हती. खाजगी खर्चाच्या पैचाही भार सरकारी तिजोरीवर पडू नये यासाठी त्या डोळ्यांत तेल घालून दक्ष राहात. अशा होत्या अहिल्याबाई.
 

संदर्भ : महाराष्टाचे शिल्पकार तेजस्विनी अहिल्याबाई होळकर,महाराष्ट राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ,मुंबई. 

                                                                                   पुढील लेख : अहिल्या ते राज्यशासक लोकमाता

अहिल्येचा गृहप्रवेश

४. तेजस्विनी अहिल्याबाई होळकर - अहिल्येचा गृहप्रवेश

तेजस्विनी अहिल्याबाई होळकर 

Ahilya Holkar Marriage

इतिहासाने पानोपानी...
जिची गाईली गाथा!
होळकरांची तेजस्वी ती...
पुण्यश्लोक माता!


अहिल्येचा गृहप्रवेश


गौतमाबाई आणि मल्हारराव  यांचा संसार सुरू झाला. मल्हाररावांचे शौर्य चारी दिशांना तळपत होते. त्यांना उसंत नव्हती. अनेक चढाया, युद्धे यातून त्यांच्या शौर्याच्या कथा पुढे येत होत्या.

गौतमाबाईंना पुत्र झाला आणि सगळीकडे आनंदीआनंद पसरला. त्याला आजोबांचे खंडेराव हेच नांव ठेवण्यात आले. खंडेराव हळूहळू मोठे होऊ लागले. त्याच्या शिक्षणाची चोख व्यवस्था केली. पण या मुलाची लक्षणे विपरीत होती . त्याला राज्यकारभार, लढाया, घोडे वगैरेमध्ये अजिबात रस नव्हता. 

खंडेराव अतिशय भांडकुदळ, उद्धट, तापट होता. तारुण्यात पदार्पण केल्यावर तर दुर्गुण अधिकच उसळू लागले. नशापाणी करण्याचं त्याला व्यसन लागलं. त्याची राहाणी फारच डामडौलाची असे. आचारविचार मात्र हीन होते. साठमारी, कोंबड्यांची झुंज, शिकार असले खेळ त्यांना आवडत. त्यांचे शौर्य अशाप्रकारे वाया जात असलेले बघून मल्हारराव दुःख, चिंतेत बुडून गेले होते. आपल्या पुत्राचे जीवन मार्गी कसे लागेल याची चिंता त्यांना लागली.

'एकदा बाजीरावांबरोबर लढाईहून परत येतांना सैन्याचा तळ चौंडी गावातील सीना नदीच्या काठी पडला. नदीकाठी महादेवाचं देऊळ होतं. तिथे अहिल्या आपल्या आईबरोबर दर्शनाला आली होती. मैत्रिणींबरोबर नदीकाठच्या वाळूत शिवलिंग तयार करत होती. शाळुंकेवर वाळूचे लहान लहान गोळे ठेवून नक्षो काढत होती. तोच सैन्यातला घोडा उघळला. मैत्रिणी ओरडल्या 'अहिल्ये, पळ घोडा उधळला. मैत्रिणी पळाल्या सुद्धा. पण अहिल्या? तिने आपले सर्व शरीर त्या पिंडीवर झाकले. भरधाव सुटलेला घोडा अहिल्येच्या बाजूने निघून गेला. त्याचवेळी मल्हारराव अन्‌ बाजीराव धापा टाकत तिथे पोहोचले.

तिला संतापाने खसकन्‌ उभे  करीत बाजीरावांनी ओरडून विचारले, ''पोरी, इथे कां थांबलीस? उधळता घोडा तुला तुडवून गेला असता तर?” त्यावर मुळीच न घाबरता, आपले तेजस्वी डोळे बाजीरावांच्या डोळ्याला भिडवत ती म्हणाली, जे आपण घडवावें ते जीवापाड, प्रसंगी जीव सांडूनही रक्षण करावे असंच सगळी वडील माणसे सांगतात. मी तेच केले. मी घडवलेल्या पिंडीचे रक्षण केले! माझे काही चुकले का?”

त्या तेजस्वी चिमुरडीचे शब्द ऐकून बाजीराव थक्क झाले. तिच्या डोळ्यात विलक्षण तेज होते. तिचा बाणेदारपणा बघून मल्हाररावही आनंदाने बघत राहिले. बाजीराव मल्हाररावांकडे वळत उत्स्फूर्तपणे म्हणाले, “'मल्हारबा, या पोरीस तुमची सून करून घ्या. तिला राज्याच्या लायक करा. ही राज्य नांवारुपास आणेल. राज्याचं प्राणपणानं रक्षण करेल. हिचे डोळे रतनासारखे तेजस्वी आहेत. तुमचा कुळपुत्र खंडेराव त्याला राज्याच्या लायक हिच करू शकेल. हिला सून करून घ्या आणि राज्यकारभाराच्या अनेक पदरांचं शिक्षण द्या."

बीड जिल्ह्यातील, जामखेड तालुक्यातलं चौंडी हे एक लहान गांव. माणकोजी शिंदे आणि सुशीला या मातापित्यांच्या पोटी -अहिल्येने जन्म घेतला. तिला दोन भाऊ होते. चौंडोची हो अहिल्या बघताच बाजीराव आणि मल्हाररावांनी तिच्या आईवडिलांची गाठ घेऊन अहिल्येला मागणी घातली. थाटात लग्नसमारंभ
पार पडला. अहिल्या होळकरांची सून झाली. १७३३ मध्ये हा विवाह झाला आणि अहिल्या भाग्याची सोनपाऊले घेऊनच होळकरांच्या घरात आली. मल्हाररावांचे ऐश्वर्य वाढत चालले. अहिल्येच्या लग्नाबरोबरच तिचे शिक्षण सुरू झाले.

पेशवे यांची राजधानी पुणे इथे होती. परंतु त्यांचं काम मात्र उत्तर हिंदुस्थानातच बहराला आलं. होतं. मल्हार रावांच्या मदतीने बाजीराव पेशवे उत्तर हिंदुस्थानातील सूत्रे हलवीत होते. अनेक लहानमोठ्या लढाया चालू होत्या. १७३० मधे माळव्यावर जे आक्रमण केले होते त्याचं सेनापतीपद मल्हाररावांकडेच होते. त्यावेळचे मोगल सरदार पळून गेले: २ ऑक्टोबर १७३० रोजी मल्हाररावांना माळव्यातील सर्व परगण्यांचा सर्व अधिकार मिळाला. नंतर महंमद बंगशनेही माळवा परत काबीज करण्याचा प्रयत्न केला; पण त्याला मल्हाररवांच्या शौर्यापुढे हार पत्करावी लागली. 

आता माळव्यावर मराठ्यांची सत्ता स्थापन करण्यासाठी पेशव्यांनी जहागीरदारी आणि वतनदारीची प्रथा गमविली. आपल्या प्रमुख सरदारांना वतने दिली: याच प्रथेनुसार राणोजी शिंदे यांना उज्जैन, आनंद पवार यांना धार आणि जिवाजी पवारास देवास मिळाले. त्यानंतर २० जानेवारी १७३४ रोजी पेशव्यांनी होळकरांना माळव्यात वंशपरंपरा चालणारी वतने, परगणे, इनाम दिले.

मल्हाराावांचा खास गौरव करून होळकर राज्याची रीतसर स्थापना करण्यात आली. हे वैभव अहिल्यादेवोंच्या पायगुणामुळे, त्यांच्यातील असामान्य कर्तृत्वामुळे प्रतिदिन वाढतच गेले.

लग्न झाले तेव्हा अहिल्या केवळ दहा वर्षांची होती. परंतु मल्हाररावांनी तिच्यातलं तेज, हुशारी जाणून, तिच्या शिक्षणासाठी गुरू नेमले. तिची बुद्धी प्रखर होती. असा उल्लेख आहे कौ, दूध घटाघटा प्यावे त्याप्रमाणे ती ज्ञान पिवून टाकीत होती. गणित; वाचन याप्रमाणेच भूगोलाचं शिक्षणही त्यांना देण्यात येत होते.
आपल्या गोड स्वभावाने आणि सेवावृत्तिने ती सर्वांची लाडकी झाली. 

मल्हाररावांना त्या काळच्या प्रथेप्रमाणे आणखी दोन बायका होत्या. बनाबाई आणि द्वारकाबाई. या तिन्ही सास्वांची उत्तम सेवा करीत असे अहिल्या. सगळ्यांचा प्रेमवर्षावही अहिल्येवर होई. मल्हारराव आणि गौतमाबाई आपल्या या सुनेची अपार काळजी घेत: अहिल्येच्या 'पायगुणाने वैभवाची कमान उंच उंच जात होती. तिची अभ्यासातली प्रगती चकित करणारी होती.

सात आठ वर्षातच ती केवळ एका नजरेने हिशोबातली चूक काढू लागली चौदिशेस घोडासवारी करू लागली. जिल्हे, तालुके, वाटा, क्षेत्रे सर्व माहिती घेतली. रामायण, महाभारत  वाचून संपलं. स्तोत्रे तोंडपाठ झाली. रोज फडनिशीत जावे, हिशोब बघावे, वसूल जमा बघावी, त्यासाठीं माणसं पाठवावी, न्यायनिवाडे
करावे, सरदारांना पत्रे पाठवावी, फौजा तयार ठेवाव्या, खाजगी उत्पन्न आणि सरकारी उत्पन रोखठोकपणे वेगळे ठेवावे, खातेनिहाय पैशांचे वाटप करावे, गोळाबारुदा बाणभाते, ढालीतलवारी सज्ज राखाव्या, सासऱयांच्या पत्राबरुकूम सर्व रवाना करावे. मल्हारराव म्हणत, आम्ही तलवार गाजवतो ती सूनवाईंच्या
भरोशावर. मार्तंडांनेच हे रतन आम्हास दिले. अवघी वीस बावीस वर्षांची अहिल्या कुशल प्रशासक होऊ लागली. इतिहासात याचे दाखले आहेत.

खंडेरावांची व्यसने वाढत होती. खंडेराव स्वतंत्र वाड्यात राहात. त्यांना आणखी बायका होत्या. त्या काळी    ' पतिव्रता ' शब्दाचा इतका धाक होता की दुर्गुणी  नवऱ्यालाही काही बोलणे हे धर्माविरुद्ध वर्तत समजले जाई. तरीही अहिल्याबाई शांतपणे खंडेरावांना रणविद्या शिकण्यासाठी प्रेरणा देत. युद्धावर जाण्यासाठी प्रोत्साहन देत. परंतु त्यांचा फारसा उपयोग होत नसे. त्यांना रेड्यांची झुंज, कोंबडाझुंज, शिकार यातच रुची होती.

१७४५ साली अहिल्याबाईंना पुत्र झाला. त्याचे नांव मालेराव  ठेवण्यात आले. राज्यात सर्वत्र आनंदीआनंद झाला. परंतु मल्हाररावांना खंडेरावांच्या वागण्याची खंत वाटे. अहिल्येसारखे रत्न लाभूनही खंडेरावात काहीही फरक पडत नाही हे बघून त्यांना अपरंपार दु:ख होई. हळूहळू खंडेराव सुधारेल ही आशाही
त्यांनी सोडून दिली. आता अहिल्याबाई हेच त्यांचं आशेचं एकमेव स्थान होते. अहिल्याबाईंची हुशारी, बुद्धिमत्ता यांची पारख त्यांनी केली होती. 

होळकरांचे निशाण अहिल्यादेवीच उंचावर नेतील याची खात्री होती. ते अहिल्याबाईंना राजकारण, व्यवहार, देशाची स्थिती, सावधानता, गुप्तहेराचं महत्त्व, पैशांची व्यवस्था, कारभारातले प्रश्र, खाचाखोचा सारं          समजावून देत. अहिल्याबाईंची विलक्षण बुद्धी, हे सारे धडे पाठ करून टाकी. त्या दिवसेंदिवस समर्थ होत होत्या.

मल्हारराव सदैव लढायात गुंतलेले असत. दूरदूरच्या ठिकाणाहून मल्हाररावांची पत्रे येत. अहिल्याबाई पत्रातील आदेश तंतोतंत पाळून, त्यांची चोख व्यवस्था करीत. अहिल्याबाई मल्हाररावांबरोबर रणांगणावरही गेल्याचे इतिहासाने नमूद केले आहे. तिथेही त्यांनी धाडस, साहस आणि रणकौशल्य दाखवून सर्व कार्यात भाग घेतला होता. रणांगणाशी संबंध येणाऱ्या प्रत्येक गोष्टींचे त्यांना ज्ञान
होते. मल्हारणवांच्या आदेशाप्रमाणे काही ठिकाणी त्यांना स्वत: जाऊन कामे
उरकावी लागत. 

राज्यकर्त्याने देशात फिरून भूगोल पाहिला पाहिजे, सामाजिक स्थितीचे ज्ञान करून घेतले पाहिजे असं मल्हारराव त्यांना नेहमी सांगत. एकदा एका महत्त्वाच्या व्यक्तिस काशीला जायचे होते. त्यांची व्यवस्था करण्याची विनंती बाजीराव पेशव्यांनी अहिल्याबाईंना केली होती. अहिल्याबाईंनी त्यांची व्यवस्था
केली  आणि इंदौरपासून काशोपर्यंत वाटेत लागणारी गावे, नद्या, घाट वगैरे तपशोलाचा एक नकाशा स्वत: तयार केला. आपल्या : ठिकठिकाणच्या अधिकाऱ्यांना पत्रे दिली. आपल्या पराक्रमी सासऱ्याच्या सुयोग्य मार्गदर्शनाखाली, त्यांनी सर्व राज्यकारभार नांवारूपास आणला.
           
                                                                        संदर्भ : महाराष्टाचे शिल्पकार तेजस्विनी अहिल्याबाई होळकर,महाराष्ट राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ,मुंबई. 

मंगळवार, २८ जुलै, २०२०

मल्हाररावांचा परिचय

३. तेजस्विनी अहिल्याबाई होळकर - मल्हाररावांचा परिचय

तेजस्विनी अहिल्याबाई होळकर 

मल्हाररावांचा परिचय

इतिहासाने पानोपानी...
जिची गाईली गाथा!
होळकरांची तेजस्वी ती...
पुण्यश्लोक माता!


३. मल्हाररावांचा परिचय

मल्हारराव  होळकरांचे जीवन म्हणजे एक शौर्यगाथाच होती. होळकरांचे पूर्वज दक्षिण भारतातील वाफगाव इथे राहत  होते. परंतु काही काळानंतर ते पुणे  शहराजवळच्या होळ या गावी स्थायिक झाले. म्हणूनच त्यांना होळकर असे नांव पडले. होळ येथील खंडोजी होळकर गावच्या पाटलाचे मदतनीस होते. त्यांना १६९३ साली पुत्ररत्नाचा लाभ झाला. हा पुत्र म्हणजेच मल्हाराव होळकर. 

मल्हाररावांनी आपल्या पराक्रमाने, इतिहासात आपले स्वत:चे स्थान निर्माण केले. लहानपणी मेंढ्यांची राखण, करणारा मल्हार मोठेपणी इतिहासप्रसिद्ध घटनांचा साक्षीदार झाला: प्रजेचा तारणहार झाला. एका थोर सेनेचा सूत्रधार झाला. असामान्य शौर्य, निष्ठा यांच्या बळावर पेशव्यांचा विश्वासू सुभेदार आणि सल्लागार झाला. त्यांचे चरित्र अत्यंत रोचक आणि स्फूर्तिदायक आहे.


रामनवमीस जन्माला आलेले मल्हारराव, लहानपणापासूनच धाडसी होते. भीती ती हा शब्दच त्यांना माहित नव्हता. आईवडिलांना त्याचा अभिमान वाटे. हे बाळ पुढे काहीतरी कर्तृत्व करून दाखवेल अशी त्यांना खात्री होती. पण दुर्देवाने मल्हार तीन वर्षांचा होताच. त्याचे पितृछत्र हरपले. खंडोजीचा मृत्यू झाला. आई
जिवाईवर आकाश कोसळले. खंडोजीच्या कुटुंबियांनी मल्हारकडे पाठ फिरवली. उलट त्याच्या वाटेची जमीन हडप करण्याचा उद्योग चालवला. 

मल्हारच्या जिवालाही धोका होईल अशी जिवाईला भीति वाटली. म्हणून ती छोट्या मल्हारला घेऊन खानदेशातल्या नंदुरबारजवळ असणाऱ्या तळोदे या गावी, आपल्या भावाकडे आश्रयास गेली. जिवाईचे भाऊ भोजराज बारगळ हे गांवचे अधिकारी होते. कंठाजी कदमबांडे यांच्या पदरी ते पन्नास घोडेस्वारांच्या पथकाचे नायक होते.  त्यांनी जिवाई आणि मल्हारला आधार दिला.

मल्हार आठ वर्षांचा झाला. तो रानात मेंढ्या चरायला नेई. एकदा एका झाडाखाली मल्हार झोपला होता. जिवाई दुपारी भाकरी घेऊन आली तेव्हा तिने एक अपूर्व दृष्य पाहिले. एक जातीवंत नाग आपल्या फणीचे छत्र, मल्हारच्या डोक्यावर धरून वेटोळे घालून बसला होता. जिवाई भीतीने अर्धमेली झाली. तिने आजुबाजूच्या लोकांना बोलावले. सर्वांनी ते दृष्य पाहिले. माणसांची गजबज ऐकून नाग शांतपणे निघून गेला. जिवाईला जो तो म्हणू लागला, '“बाई ग, हा पोर फार भाग्यवंत निघणार आहे. हा राजा होईल.'' मल्हारच्या मामांनी त्यादिवसापासून त्याला रानात पाठवले नाही. घोड्यांवर देखरेख करण्याचे काम दिले. मल्हार घोडे राखण्यात पटाईत झाला. 

काही वर्षांनी जिवाई वारली; पण मामांनी भाचा मल्हार याचे शौर्य जाणले. त्याची शूराची  निधडी छाती ओळखली आणि आपली कन्या गौतमाबाई हिचा विवाह मल्हारशी करून दिला. मल्हार मोठ्या शुभवेळेला  घोड्यावर बसला. त्याने पुण्यापासून दिल्लीपर्यंत शौर्य गाजवले. पराक्रमाने मल्हारणव खरंच माळव्याचे राजे झाले. मेंढपाळाचे प्रजापाल झाले.

                                                                           संदर्भ : महाराष्टाचे शिल्पकार तेजस्विनी अहिल्याबाई होळकर,महाराष्ट राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ,मुंबई.  

मल्हारराव होळकरांच्या आधीचा काळ

 २. तेजस्विनी अहिल्याबाई होळकर - मल्हारराव होळकरांच्या आधीचा काळ

तेजस्विनी अहिल्याबाई होळकर 

आधीचा काळ

इतिहासाने पानोपानी...
जिची गाईली गाथा!
होळकरांची तेजस्वी ती...
पुण्यश्लोक माता!


२. मल्हारराव होळकरांच्या आधीचा काळ

सुमारे अडीचशे वर्षांपूर्वी मोहम्मद शहाची राजवट चालू होती. त्यावेळी माळवा प्रांतावर, दयाबहादूर राज्य करीत होता. मोहम्मद शहा सुखोपभोगात दंग होता. मोंगलांचे विस्तृत साम्राज्य अत्यंत स्वार्थी आणि लोभी माणसांच्या हातात सापडले होते. दयाबहादूर त्यातलाच एक! हा प्रजेचा अतोनात छळ करीत असे. त्याच्या अत्याचारांना प्रजा अंगदी कंटाळून गेली होती. 

दयाबहादूरच्या राज्यात मोगल सप्राटांतर्फे राव नंदलाल यांना प्रमुख अधिकारी नेमण्यात आले. कर वसूल करण्याचे काम तेच करीत. आपल्या फौजेसह ते इंदुरास रहात. त्यामुळे 'दयाबहादूर प्रजेवर करत असलेले अत्याचार, त्यांना समक्ष दिसत. त्यांना प्रजेचा हा छळ सहन करणे कठीण होत होते. राव नंदलाल दयाबहादूरला सतत समजावत. अत्याचार, छळ थांबव अशी विनंती करीत. पण स्वार्थी दयाबहादूर लोभाने पिसाट झाला होता. अखेर राव नंदलाल बादशहांकडे गेले. त्यांना माळव्याची दयनीय स्थिती सांगितली. पण बादशहा आपल्या अधिकाऱ्यांवर वचक ठेवू शकला नाही. अधिकाऱ्यांना धाक उरला नव्हता. अखेर राव नंदलाल निराश होऊन परत आले. 

बादशहाने राव नंदलालांची तक्रार ऐकून घेतली नाही हे कळताच दयाबहादूरला आनंद झाला. तो अधिकच शिरजोरी करू लागला. राव नंदलाल दयाळू होते. माळव्याच्या लोकांचा छळ त्यांना बघवेना. राव नंदलाल बादशहाला दरवर्षी २५००० रुपयांचा वसूल देत. तो त्यांनी बंद केला आणि बादशहास कळवले की, 'माळव्याच्या लोकांवर दयाबहादूरकडून जे अन्याय चालू आहेत ते यापुढे सहन केले जाणार नाहीत. आपल्या पाठिंब्यामुळेच दयाबहादूर शिरजोर झाला आहे.' पण बादशहा केवळ उपभोगात दंग होता. त्याला हे ऐकण्यास वेळ नव्हता. कारवाई करण्यास वेळ नव्हता.

त्या काळात थोरले बाजीराव पेशवे, प्रजेच्या सुखासाठी, साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत होते. राव नंदलाल यांनी पेशव्यांना पत्र पाठवून माळव्यातील लोकांचे हाल त्यांना कळवले. बादशहा आणि दयाबहादूर यांच्याकडून होत असलेल्या प्रजेच्या छळाची पूर्ण वार्ता कळवली आणि पुढे लिहिले की, 'आपण जर माळव्यावर चढाई केली तर मी आपणास सर्व तऱ्हेची भदत करेन.' थोरले बाजीराव अत्यंत शूर होते. त्यांनी लगेच मल्हारराव होळकरांना माळव्यावर चढाईसाठी पाठवले. 

राव नंदलाल यांनी भेरूघाटाच्या मार्गाने सैन्यास माळव्यात घुसविले. हे बघताच दयाबहादूर राव नंदलाल यांचे पाय धरू लागला. त्यांना अनेक प्रलोभने दाखवली. अधिकाराची पदे देऊ केली. पण राव नंदलाल आपल्या निश्चयापासून तसूभरही दूर गेले नाहीत. दयाबहादूर अखेर भीतीने फौजेसकट पळाला आणि अखेर १२ ऑक्टोबर १७३१ रोजी मारला गेला. मल्हारावांनी माळव्यावर मराठ्यांचा झेंडा रोवला.

त्याच काळात अफगाण, फ्रेंच उदयास येऊ लागले होते. त्यांनी व्यापाराच्या निमित्ताने भारतात प्रवेश केला होता. इंग्रजांचे पाऊलही पुढे पडत होते. सिंध, पंजाब, काश्मीर यांवर अधिकार करत अहमदशाह अब्दाली पुढे सरकत होता. पोर्तुगालने काही स्थाने घेतली होती. उत्तर भारताची स्थिती खालावत चालली. सर्वत्र अराजक आणि अशांतता पसरली होती. यामुळे शूर मराठ्यांच्या शौर्याला, पराक्रमाला जणु आमंत्रणच मिळाले. मराठ्यांनी याचा पुरेपूर फायदा घेतला.

त्या काळात महाराष्ट्रात फार एकी होती. नसानसातून जणु काही शौर्य पराक्रम सळसळत होता. पेशव्यांचा झेंडा भारतभर फडकवण्यासाठी त्याचे हात शिवशिवत होते. याच काळात पेशव्यांनी भरपूर पैसा आणून आधी आपले राज्य शक्तिमान केले. चौथाई, सरदशमुखी वसूली केली. उत्तर भारतात पेशव्यांचा वचक बसवला. अशा रीतीने आपले सामर्थ्य वाढवून पेशव्यांनी बलाढ्य फौजेसह दिल्लीवर मोर्चा नेला. २८ फेब्रुवारी १७१९ रोजी, पेशव्यांनी बादशहाच्या वाड्याला वेढा दिला. 

२० मार्च रोजी त्यांनी बादशहाकडून तीन सनदा मिळवल्या. त्याद्वारे पेशव्यांना विस्तिर्ण प्रदेशात चौथाई आणि सरदेशमुखी करवसूलीचे अधिकार मिळाले. यावेळी मल्हाराव होळकर पेशव्यांबरोबर होते. मल्हाररावांनी शौर्याची शर्थ केली. ते पेशव्यांचे विश्वासू मित्र झाले. त्यांना बहुमोल अनुभव मिळाला. याच वेळी बाळाजी विश्वनाथ या थोरल्या पेशव्यांचा मृत्यू होऊन १७२० मध्ये बाजीराव पेशवे गादीवर आले. त्यांच्याशी मल्हाररावांचे भावासारखे प्रेमसंबंध निर्माण झाले. हे मल्हाररव होळकर म्हणजेच, अहिल्यादेवी होळकरांचे सासरे. मल्हारराव होळकरांचा पुत्र खंडेराव याच्याबरोबर अहिल्यादेवींचा विवाह झाला. आणि अहिल्याबाईंच्या तेजस्वी गाथेची सुरवात झाली.

                                                                           संदर्भ : महाराष्टाचे शिल्पकार तेजस्विनी अहिल्याबाई होळकर,महाराष्ट राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ,मुंबई.   

कर्मयोगिनी अहिल्याबाई

 १. तेजस्विनी अहिल्याबाई होळकर - कर्मयोगिनी अहिल्याबाई 

तेजस्विनी अहिल्याबाई होळकर 

Ahilyadevi

इतिहासाने पानोपानी...
जिची गाईली गाथा!
होळकरांची तेजस्वी ती...
पुण्यश्लोक माता!


१. कर्मयोगिनी अहिल्याबाई

लोकमाता, पुण्यश्लोक, देवी, गंगाजळ निर्मळ, या सगळ्या पदव्या, अहिल्याबाई होळकरांना लोकांनी अर्पण केल्या होत्या. मनापासून, हृदयापासून! कुठलाही पदवीदान समारंभ न होताही, या पदव्या आज दोनशे पेक्षा जास्त वर्षे टिकून आहेत. टिकणार आहेत. अत्यंत प्रेमाने त्यांनी सामान्य माणसाचे हित बघितले. प्रजेतील गरिबांना जास्तीत जास्त सुखाने जगता यावं, इकडे लक्ष दिले.

त्या धार्मिक होत्या हे तर, सर्वांना माहित आहे, परंतु एक राज्यशासक म्हणून त्यांचे कर्तृत्व फार महत्त्वाचे आहे. अपार शहाणपण आणि तडफ असणारी ती अलौकिक खरी होती. खंबीर मन आणि चातुर्य यामुळे, अनेक संकटे त्यांनी पार केली. न्यायदान तर इतके अचूक की, भांडणाऱ्या  दोन्ही बाजू त्यांना दुवा देत. रणनीतीची त्यांना जाण होती. एका नजरेत हिशोब करण्यात त्या तरबेज होत्या. प्रजावत्सलता आणि परदु:खाने व्याकूळ होणारं मन, त्यांना लाभलं होतं. 

त्या स्वत: रणांगणात युद्धाला. उतरत! तोफा ओतणे,'जंबुऱ्याच्या' गोळ्या तयार करणे, याचे शास्त्र त्यांना माहीत होते. घोड्यावर स्वार होण्याचे कौशल्य तर होतेच, पण त्यांनी स्रियांचे सैनिकदलही तयार केंले होते. मातीवर, देशावर निष्ठा, बाणेदार वृत्ती, साधी राहाणी, उच्च चरित्र  हे त्यांचे विशेष! 

त्यांचे कौटुंबिक जीवन अत्यंत दुःखी, काळेकुट्ट असे होते, पण प्रशासन धवलशुभ्र , निष्कलंक असे!  त्या धार्मिक होत्या पण धर्मांध नव्हत्या. ठिकठिकाणचे घाट, देवळे, धर्मशाळा, विहिरी,रस्ते असे त्यांचे कार्य आहे. अन्नछत्रे आणि पाणपोया आजही चालू राहिल्या आहेत. अनेकजण आपली भूकतहान तिथे शांत करीत आहे. हे सारे कार्य जातीधर्मात अडकलेले नाही. सर्व धर्मियांसाठी त्यांनी मदत केली. म्हणूनच केवळ 'धार्मिक' इतकीच त्यांची ओळख नाही. 

त्यांच्या दुरदृष्टीमुळे त्यांनी केलेले कार्य आजही जिवंत आहे कारण मंदिरे, दर्गे, अन्नछत्रे वर्गैरै ठिकाणी त्या त्या कार्याच्या खर्चासाठी त्यांनी सालाना उत्पन्न करून ठेवले. त्यांची ही दूरदृष्टी चकित करणारी आहे. त्यांच्यात अनेक सद्गुण बहरास आलेले होते. अठरा सतींच्या किंकाळ्या आणि सर्व जीवलगांचे मृत्यू त्यांना बघावे लागले. शेवटी त्या एकट्या राहिल्या. संसाराचा हा उन्हाळा सोसून, ही बाणेदार स्त्री, कुणालाही शरण न जाता कर्तव्यकठोर असा कर्मयोग आचरत राहिली. प्रजेचं सुख बघत राहिली. दुःखाला खंबीरपणे सामोरे जातांनाही आपले कर्तव्य ठामपणे त्यांनी केले. हे सर्व प्रत्येक मराठी माणसाला सामर्थ्य, शक्ति देणारे आहे.

                                                                            संदर्भ : महाराष्टाचे शिल्पकार तेजस्विनी अहिल्याबाई होळकर,महाराष्ट राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ,मुंबई.   

बुधवार, २२ जुलै, २०२०

राजे सयाजीराव गायकवाड

राजे सयाजीराव गायकवाड

पूर्व इतिहास

दीडशे वर्षे भारतावर ब्रिटिशांचे राज्य होते. परकीय सत्तेचे जोखड जुगारून मातृभूमीस मुक्‍त करण्याचे काम अनेक देशप्रेमी समाजपुरुषांनी केले. देशभरातील सामान्य जनता या स्वातंत्र्यलठ्यात क्रांतिकारकांच्या पाठीमागे उभी राहिली या काळात बहुतांशी राजे आणि संस्थानिक ब्रिटिश सत्तेची मर्जी राखत आपले मांडलिकत्व शाबीत करण्यात हांजीहांजी करीत होते. बाकीचे ऐश्वर्यात मश्गुल होते. यात अपवाद होते महाराष्ट्राचे एक सुपुत्रराजे सयाजीराव गायकवाड. त्यांनी एकट्याने देशभरातील क्रांतिकारकांना मदत केली. स्वातंत्र्यपूर्व काळातील साठ वर्षांचा हिंदुस्थानचा असा हा इतिहास सयाजीराव गायकवाड या देशप्रेमी राजाच्या गौरवशाली  कालखंडाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही.

छत्रपती शिवरायांच्या अनेक पराक्रमी मावळ्यांनी हिंदवी स्वराज्याचे निशाण अटकेपार नेले. त्यात होते शिंदे, घोरपडे, निंबाळकर, दाभाडे आणि गायकवाड मराठी सेनेने सेनापती दाभाडे यांच्या नेतृत्वाखाली उत्तरेत मुसंडी मारली, तेव्हा दामाजी गायकवाड या मराठा सरदाराने गुजरातेतील मोगलांना काठेवाडपर्यंत  हरविले आणि बडोद्यात गायकवाड घराण्याची सत्ता सुरू झाली. गायकवाड हे मूळचे पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगरजवळच्या दावडी गावाचे .

मराठे आणि अहमदशहा अब्दालीत १७६१ साली तिसरी  लढाई झाली. यात मराठी सेनेचा एकीच्या अभावी मोठा पराभव झाला. हरलेल सैन्य सैरावैरा पांगले. या लढाईत मराठ्यांच्या बाजूने बडोद्याचे दामाजीराव व त्यांचे बंधू प्रतापरावही होते. पराभवानंतरच्या पळापळीत दोघा भावांत फाटाफूट झाली. दामाजीराव गायकवाड कसेतरी एकटे बडोद्यात परतले. प्रतापराव बरेच दिवस परागंदा होते. नंतर ते फिरत फिरत. नाशिक जिल्ह्यातील कवळाणा गावात स्थायिक झाले. शेतीबाडी करू लागले. अशा प्रकारे बडोद्याच्या गायकवाडांची एक शाखा खानदेशात वाढू लागली.

मधल्या काळात बडोद्यात खंडेराव गायकवाड बडोदा गादीवर होते. जमनाबाई त्यांच्या राणी. अल्पशा आजाराने खंडेरावांचे देहावसान झाले. त्यांना मूलबाळ नसल्याने, त्यांचे बंधू मल्हारराव गादीवर आले. मल्हाररावांत राज्य सांभाळण्याचे गुण नसल्याने प्रजा जुलूम, अत्याचाराने जेरीस आली. याच काळात मल्हाररावांनी एका ब्रिटिश अधिकाऱ्यास सरनतातून विष पाजले, असा त्यांच्यावर आरोप करण्यात आला. चौकशी होऊन ब्रिटिश सरकारने मल्हाररावांना पदच्युत केले. खंडेरावांच्या पत्नी जमनाबाईंना दत्तक पुत्र घेण्याची परवानगी सरकारने दिली.गायकजाडांची एक शाखा खानदेशात वाढू  लागली.

मधल्या काळात बडोद्यात खंडेराब गायकबाड बडोदा गादीवर होते. जमनाबाई त्यांच्या राणी, अल्पशा आजाराने खंडेराबांचे देहाबसान झाले. त्यांना मूलबाळ नसल्याने, त्यांचे बंधू मल्हाराब गादीवर आले. मल्हारराबांत राज्य सांभाळण्याचे गुण नसल्याने प्रजा जुलूम, अत्याचाराने जेरीस आली. याच काळात मल्हाररावानी एका ब्रिटिश अधिकाऱ्यास विष पाजले, असा त्यांच्यावर आरोप करण्यात आला. चौकशी होऊन ब्रिटिश सरकारने मल्हारराजाना पदच्युत केले. खंडेराबांच्या पत्नी जमनाबाईंना दत्तक पुत्र घेण्याची परजानगी सरकारने दिली. दत्तकपुत्र अल्पवयीन आणि गायकवाड घराण्यातला असावा, अशी अट टाकली. बडोद्यात गायकवाडांची काही घरे होती. त्यांची चारही मुले वयाने मोठी होती.. गायकवाडांचे एक घर कवळाणाला असल्याचे माहीत होते. नाशिकच्या कलेक्टरांना सूचना गेली. मालेगावजवळच्या कवळाण्यात ते घोड्यावर आले. गावात काशीराव गायकवाडांना भेटले. गायकवादांची चार मुले बंदोबस्तात बडोद्यास पाठविली.

निवड व राज्याभिषेक

बडोद्यात राजमाता जमनाबाईसाहेब यांनी एकेका मुलाला बोलावले. प्रत्येकास विचारले, "तुम्ही इथं कशाला आलात?'' पहिला गोंधळला. दुसरा म्हणाला, “माहीत नाही.'' तिसऱयाने सांगितले, “शिकायला आलोय.'' शेवटी बारा वर्षांचा गोपाळ महाराणींसमोर आला. त्या गोपाळला निरखू लागल्या. त्याचा चेहरा शांत होता. चेहऱ्यावर हुशारीची चमक दिसत होती. डोळ्यांत आत्मविश्वास जाणवला. जमनाबाईंच्या प्रश्‍नावर तो त्यांच्याकडे धीटपणे बघून म्हणाला, "मी राजा बनण्यासाठी आलो आहे."  गोपाळचा आत्मविश्वास बघून जमनाबाई चकित झाल्या: त्यांनी आनंदाने मनोमनी गोपाळची निवड केली. दिवाण आणि बरोबरच्या मंडळींचा सल्ला घेऊन गोपाळची दत्तकपुत्र म्हणून निवड केली. कवळाण्याच्या मंडळींना बडोद्यात आणले. दत्तकविधान होऊन त्याच दिवशी २७ मे १८७५ला राज्याभिषेक झाला. कवळाण्याचा शेतकऱ्याचा पोरगा दैवयोगाने बडोद्याचा राजा झाला. राजाचे नाव ठेवले सयाजीराव तिसरे.

अक्षरओळख नसलेला हा किशोरराजा राज्यकारभार आणि अक्षर-अंकज्ञान शिकू लागला. राजमाता, केशवराव पंडित आणि भाऊ मास्तरांनी याची चांगली सुरुवात केली. चार महिन्यांनी वऱ्हाडचे शिक्षण संचालक इलियट हे मुख्य शिक्षक म्हणून आले. चांगले शिक्षक लाभल्याने मेहनती सयाजीरावास शिक्षणाने नव्या जगाची ओळख झाली. शिक्षण हा तिसरा डोळाच आहे, हे या तरुण राजाने नेमके ओळखले. अठराव्या वर्षी प्रत्यक्ष राज्यकारभार हाती आला आणि राजाने प्रथमच राज्यभर दौरा केला. राज्याची पाहणी केली. प्रजेची सुख-दुःखे जाणून घेतली. गावातील गरीब शेतकरी, जंगलातले आदिवासी अन्‌ अस्पृश्य प्रजेची दयनीय अवस्था बघून त्यांना आपले कवळाणा खेडे आठवू लागले.


सामाजिक, राजकीय कारकीर्द

धर्माच्या नावाने माणसांनी अनिष्ट रूढी, चालीरीती वर्षांनुवर्षे लादल्या आहेत  हे समजून घेतले. धर्मखाते सुरू करून सुधारणांचा केल्या . पुरोहितांना धर्मखात्याची परीक्षा सक्‍तीची केली. पास  होणाऱ्यांनाच  परवाना दिला जाई. पुरोहिताने यजमानास धर्मविधी व  मंत्राचा अर्थ  देशी भाषेत सांगणे सक्तीचे केले. राजवाड्यात वेदोक्त विधी सुरू केले.

ब्राह्मणेतरांसाठी वेदोक्तपाठशाळा काढल्या. संन्यास घेण्यासाठी नियम केले. बालविबाहबंदी, विधवा पुनर्विवाह, मुला-मुलींचे विवाहाचे. वय, दानधर्म कायदा, अस्पृश्यांना मंदिर आणि सरकारी कार्यालयात मुक्‍त प्रवेश हे कायदे केले. दानधर्माच्या नावाखाली महिन्यात दीड लक्ष रुपयांची खिचडी ब्राह्मण आणि मुसलमानांना वाटली जाई. ती बंद करून अपंग, निराधार, गरजूंना प्रमाणपत्र देऊन मदत सुरू केली. सयाजीरावांनी केलेल्या ह्या सुधारणा आणि कायदे युरोप-अमेरिकेसारख्या पुढारलेल्या देशांहुन  सुधारलेले होते, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून ठेवले आहे.

साहित्य, कला, संस्कृती ही राष्ट्राची संपत्ती आहे, असे सयाजीराव मानत. संगीत, शिल्पकला, लोककला, प्राच्यविद्या आणि हस्तकला हा आमचा सांस्कृतिक वारसा आहे. याच्या संवर्धनासाठी त्यांनी सढळ हाताने मदत केली. तसेच ते लेखक-प्रकाशक आणि कलावंतांचे पोशिंदे झाले. हिंदुस्थानात स्वतंत्र भाषांतर शाखा काढून उत्तमोत्तम ग्रंथांचे देशी भाषांत अनुवाद करून घेतले. क्रीडाकोश, राज्यव्यवहारकोश, आहारकोश आणि प्राचीन ग्रंथांचे प्रकाशनही बडोद्यातून केले.

मुलांना शालेय जीवनापासून व्यायामाची सवय हवी म्हणून शाळांतून क्रीडाशिक्षण सक्तीचे केले. गावोगावी व्यायामशाळा उघडल्या. महिलांसाठीही मोठ्या गावांत खास व्यायामशाळा काढल्या. शेतकर्‍यांच्या मुलांसाठी शेतीविषयक कौशल्य शिक्षणाचे वर्ग, शेतकी शाळाही सुरू केल्या. शेतकी उपयोगी जनावरांच्या हिंसेस कायद्याने बंदी केली. महिला शिकल्या पाहिजेत म्हणून प्रौढ महिलावर्ग सुरू केले. मुस्लिम महिलांसाठी जनाना वर्ग काढले.

लोकांचे आरोग्य जपण्यासाठी मोफत औषधांची सोय केली. हिंदू विधवा स्त्रीबरोबर कुटुंबातील मुलींना, बहिणींना माहेरच्या मिळकतीचा हक्क कायद्याने दिला. जात आणि जातपंचायतीचे निर्बंध कायद्याने दूर केले. सोळा वर्षांखालील मुलांना बिडी, सिगारेट, तंबाखू विकण्यास बंदी केली. कोणत्याही रस्त्यावरून बाद्य बाजबिण्याचा नागरिकांना हक्क आहे, असा कायदा केला. स्वातंत्र्यपूर्व काळात बडोद्यात धारा सभा (कायदे मंडळ) स्थापन केली.
 
राजे  वारंवार परदेशात जात होते. जगात जे जे त्यांना नवे आढळले ते बडोद्यात आणू लागले. ब्रिटिश सरकारच्या हिंदुस्थानातील  प्रमुख  जनरल गव्हर्नर लार्ड कर्झन यांना हि बाब खटकली . त्यांनी आदेश काढला, “देशातील राजांना परदेशात जायचे असल्यास त्यांनो अगोदर सरकारची परवानगी घ्यावी." राजे सयाजीराज गायकवाड हे. स्वाभिमानी होते. देशप्रेमाचा संस्कार झालेले. इस्ट इंडिया कंपनी आणि बडोदा सरकारात १८०२ साली पहिला मित्रत्वाचा करार झाला, तो 
राजे सयाजीरावांनी अभ्यासला होता. तोच करार पुढे ब्रिटिश सरकारने स्वीकारल्याने आपण वरिष्ठ सरकारचे मांडलिक नसून बडोद्याचे सार्वभौम राजे आहोत, ही भावना सयाजीरावांच्या मनात पक्की रुजली होती.

या काळात अरविद घोष हे बंगाली क्रांतिकारक सयाजीरावांचे खाजगी सचिव  होते. 
राजे सयाजीरावांनी कर्झन यांना पत्राने कळविले, “मी तुमचा नोकर राही. मी ब्रिटिश  सरकारचा मित्र आहे. आमच्या फिरण्या-वागण्यावर बंधने घालण्याचा आपणास अधिकार नाही.”

कर्झनसारख्या गव्हर्नर जनरलशी सयाजीराबांनी जो संघर्ष केला; त्यांच्या हिमतीला तोड नाही, असे सयाजीराबांच्या पदरी सदतीस वर्षे नोकरी केलेल्या रियासतकार गो.स. सरदेसाई यांनी लिहून ठेवले आहे.

अनेक गोष्टी सयाजीराबांनी हिंदुस्थानात प्रथम केल्या आहेत. सक्तीचे मोफत प्राथमिक शिक्षण सुरू करून शिक्षणाच्या माध्यमातून परिवर्तनाची सुरुवात करणारे ते हिंदुस्थानात पहिले आहेत. त्यांनी पहिल्यादा शेतीखाते सुरू केले. शेती मालांना चांगले दर मिळावे  म्हणून शेतकरी पतपेढ्या सुरू केल्या. शेतकऱ्यांचा पहिला सहकारी कारखाना मांडी येथे उभारला .


विविध  क्षेत्रांतील हुशार माणसाचा संच बडोद्यात जमविला. एवढेच नाही तर जगातील  उत्तम शिल्पकार, ग्रथालय शास्त्रतज्ज्ञ, नगररचनाकार, बागबगिचातज्ञ् , चित्रकलातज्ज्ञ, भाषाशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ यांना सन्मानाने नोकरीस ठेवून त्यांच्या ज्ञानाचा उपयोग करून घेतला. हे करत असताना महाराजांनी उभ्या    आयुष्यात  देशभरातील सर्व महत्त्वाच्या युगपुरुषांना कोट्यवधींची सढळ हाताने मदत र केली. दादाभाई नौरोजी, नामदार गोखले, न्या. रानडे, लो. टिळक, महात्मा फुले, महात्मा गांधी, सुभाष बाबू, लाला लजपतराय, पं. मदन मालवीय, महर्षी  वि.रा.शिंदे , डॉ. बाबासाहेब आंबडेकर , कर्मवीर भाऊराव पाटील, योगी अरविंद, रवी वर्मा, मादाम कामा.... ही यादी खूप मोठी आहे.

डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली. सावित्रीबाई फुले, दादाभाई नौराजी आणि वि.रा. शिंद्यांना अडचणीच्या काळात पेन्शन देऊन  मदत केली. आज महाराष्ट्रात बहुजनांच्या शिक्षणासाठी उभ्या राहिलेल्या बहुतेक चे शिक्षणसंस्था सुरू करण्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या राजे सयाजीरावांची प्रेरणा आणि  मदत मिळाली आहे, हा इतिहास आहे.

राजे  सयाजीराव हे रयतेच्या पैशावर हौसमौज करणारे राजे नव्हते. कर रयतेकडून मिळणारा शेतसारा आणि इतर करांचे उत्पन्न हे लोककल्याणासाठीच ने बापरण्याचे सूत्र आयुष्यभर त्यांनी पाळले. ते कमालीचे कला आणि हिशेबी होते असे रियासतकारांनी लिहन ठेवले आहे. राजवाड्यातील कुटुंबातील या मंडळींची नेहमी तक्रार असे, “ महाराजांचा बाहेरच्यांसाठी मदतीचा हात सैल या आहे; पण घरातल्या खर्चासाठी मात्र तो जड आहे.'' लंडनमध्ये शिकणाऱ्या आपल्या राजपुत्रासही महिन्याला ठरावीक रक्कम पाठवित. झालेला खर्च लिहुन ठेवण्याची राजपुत्रास सूचना होती.

राजे सयाजीराव गायकवाड हे त्याकाळातील एक विचारवंत राजे होते.
आयुष्यभरात  ते कोणत्याही व्यसनाचे शिकारही झाले नाहीत, जनकल्याणातच माझा मोक्ष आहे असे ते सागत त्यांनी जगभर  प्रवास आणि उत्तम पुस्तकांच्या संगतीचे  आयुष्य घालवले. विद्वान माणसांचा संच आणि जगातील सर्व विषयांच्या पुस्तकांचा संग्रह त्यांनी जमवला.

थोर क्रांतिकारक अरविंद घोष, जगप्रसिद्ध अर्थशास्त्रज डॉ.  आर. सी, दत्त, रियासतकार सरदेसाई, महात्मा फुले याचे कार्यकतं ,शामचद्र घामणस्कार ,माधवरावासारखे भाषाशास्त्रज्ञ,डॉ, बोर्डनसारखे अमेरिकन ग्रंथालयशास्त्राचे तज्ज्ञ, खासेराव  जाधघवासारखे शेती आणि विज्ञानातील तज्ज्ञ ही काही उदाहरणे सांगता येतात.

जगातील पहिल्या विमान बांधणीस आणि प्रयोगास मदत केली. हे आपणास माहीतच नाही, तळपदे नावाचे संस्कृत पंडित पुण्यात  राहत होते . त्यांनी विमानाचा प्रकल्प तयार केला, न्यायमूर्ती रानडे तळपदेना घेऊन बडोसद्यास  गेले. सयाजीरावांनी महत्त्व ओळखून या प्रकल्पास अर्थसाहाय्य केले . एप्रिल १८९५ साली. मुंबईच्या चौपाटीवर पहिल्या मानवरहित विमानाने पहिले  उड्डाण केले गेले सयाजीराव आणि रानडे या प्रयोगास जातीने हजर  होते. ब्रिटिश  सरकार या प्रयोगाने बिथरले. दुसर्‍या दिवशी तळपदेंना अटक झाली.
तळपदेना मनोरुग्ण ठरविले. रानडे-सयाजीरावांना समज दिली. यानंतर आठ वर्षांनी राइट बंधूंनी विमान उड्डाणाचा प्रयोग केला. जगातील पहिल्या विमानउड्डाणाची व भारतीय शास्त्रज्ञांची आणि त्याला मदत करणार्‍या सयाजीरावांची कोठेही नोंद नाही, हा दुर्दैवी इतिहास आहे.

गरीब आणि वंचितांसाठी काम करणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटलांकडे महाराजांचे लक्ष होते. त्यांनी भाऊरावांस मदतही केली होती; पण प्रत्यक्ष भेटीचा योग  लांबला. कर्मवीर भाऊराव पाटलांनी सयाजीराव महाराजांना सातारा य्रेथील  शाहू छत्रपती बोर्डिंगला भेट देण्यासाठी बोलावले होते. यावेळी महाराज आवर्जून आले. आमराईत मुलांच्या कुडाच्या झोपड्या उभ्या होत्या. शंभर मुले महाराजांच्या स्वागतासाठी उभी होती. हारतुरे झाले. आंब्याच्या झाडाखाली  खुर्च्या टाकल्या होत्या. भाऊराव महाराजांचे स्वागत करत म्हणाले, “श्रीमंत महाराजसाहेब, माझ्यासारख्या फकिराच्या आमंत्रणास मान देऊन या संन्याशाच्या  झोपडीत आलात. १९०६ ला मी आपले वृत्तपत्रात भाषण वाचले. आपण म्हणालात, “या देशास  उर्जितावस्था येण्यासाठी गरीब आणि अस्पृश्य मुलाना  शिकविले पाहिजे.” तेव्हाचे मी निश्चय केला, गरीब-अस्पृश्य मुलाना शिकवायचं  आणि हे काम सुरू केलं.आपली मदत स्वीकारली. आपणच आमचे प्रेरणास्थान आहात .

राजांनी साठ वर्षे सलग राज्य केले . साठ वर्षांच्या हीरक महोत्सव कार्यक्रम त्यांच्या चाहत्यांनी साजरा केला .या कार्यक्रमासाठी देशभरातील मान्यवरास निमंत्रणे गेली. शहराबाहेर मैदानात मोठा शामियाना उभारला होता. महाराज आणि महाराणींचा सजवलेला रथ सभेच्या ठिकाणी आला. महाराजांचे स्वागत झाले. प्रजाजनांचे प्रेम आणि आदराने त्यांना गहिवरून आले .सर्वांवर नजर फिरवून  महाराज शांतपणे बोलू लागले,
“आम्ही साठ वर्षांपूर्वी कवळाणा जन्मगावाहन बडोद्यात आलो. राजा बनलो. नंतर शिकलो. शिक्षणाने आम्हाला तिसरा डोळा लाभला. ते शिक्षण आम्ही प्रजेला. दिलं. अज्ञान आपला आहे. शिक्षणाने त्यावर मात करा. प्रजाकल्याणातच आम्ही मोक्ष शोधला. देशासाठी एकी हवी. जातिधर्माची भांडणं आपण सोडली पाहिजे . देशाचे आणि आपले चारित्र्य निष्कलंकित हवे. आम्ही आमच्या परी ते जपले. नियम मोडले की शिक्षा होते. निसर्गातही असेच घडते. दुष्काळ आणि अवर्षण ही शिक्षाच आहे. पाणी सोन्याहन मौल्यवान आहे. जपून वापरा. संपल तर कशानेही विकत मिळणार नाही. खुळ्या चालीरीती सोडा. शिक्षणाने  आणि ज्ञानाची कास धरा. ग्रामविकास हेच राष्ट्रकार्य आहे, शेतीउद्योग आमच्या देशाचा प्राण आहे. कारभाऱ्याने ह्याचे ध्यान ठेवावे. आज जग झपाट्यानं पुढं जात आहे. आपण मागे राहता कामा नमे. विकसित देशांबरोबर येण्यासाठी शिक्षण आणि विज्ञान हाच मार्ग आहे. ह्याची कास धरली नाही, तर आपण जगाच्या पन्नास-साठ वर्ष मागे पडू. बलसंपत्न भारताचे माझे स्वप्न आहे. एकेकाळी भारत संपन्न, बलशाली देश होता. ते वैभव पुन्हा मिळावे. ते आमचे तरुण-तरुणीच पूर्ण करतील. ही मुलेच आमची खरी संपत्ती आहे. त्यांना मी एक यशाचा मंत्र सांगत आहे. जीवनात यशस्वी होण्यासाठी ही चार सूत्रे अंगीकारावी , स्वत:ला झोकून देऊन आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करा ,त्याला प्रामाणिक पणाची जोड द्या, देशप्रेम विसरू नका आणि शेजार्‍याशी बंधुभावाने बागा. यातूनच उद्याचा  बलसंपन्न भारत घडणार आहे ."
सयाजीराव महाराजांनी आपले बोलणे संपविले.

सयाजीराव  महाराजांचे हे स्वप्न आपणाला पूर्ण करावयाचे आहे.

संदर्भ : महाराजा सयाजीराव गायकवाड ,दूरदृष्ट राजा , प्रसिद्ध लेखक बाबा भांड
**********************************************************************************

रविवार, १९ जुलै, २०२०

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले

ज्ञानज्योती सावित्रीबाई  फुले

आज जगभर स्त्रियांच्या मानवी हक्कांचा प्रश्‍न ऐरणीवर आलेला आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये स्त्रियांनी भरारी घेतलेली आहे. असे कोणतेही क्षेत्र नाही की जेथे स्त्रिया गुणवत्तेत पुरुषांच्या  तुलनेत मागे आहेत. प्रश्‍न फक्त संधीचा आहे. पुरुषी वर्चस्वाच्या मानसिकतेमुळे अनेकदा स्त्रियांना डावलले जाते. १७२ वर्षांपूर्वी स्त्रीशिक्षण, ज्ञानसत्ता, सामाजिक न्याय, जातिनिर्मूलन, समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांच्या प्रस्थापनेसाठी ज्यांनी सामर्प्रितपणे कार्य केले त्यात सावित्रीबाई अग्रणी होत्या.

जोतीराव आणि सावित्रीबाई हे एक विलक्षण आगळेवेगळे दांपत्य होते. देशातील समग्र स्त्री - शूद्रातिशूद्र वर्गाची शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक चळवळ उभारण्याचे ऐतिहासिक काम या जोडप्याने केले. पर्यायी संस्कृतीची प्रस्थापना हे त्यांचे जीवनध्येय होते. त्यांच्या कामाचे मोल सांगताना 'दि पूना ऑनब्झर्व्हर अँन्ड डेक्कन विकली' या वर्तमानपत्राने दीडशे वर्षांपूर्वी लिहिले होते की, हे काम म्हणजे  'हिंदू संस्कृतीच्या इतिहासातील एका नव्या युगाचा आरंभ होय.'' खऱ्या अर्थाने ही एका भारतीय क्रांतिपर्वाची सुरुवातच होती.

जोतीरावांनी सावित्रीबाईंना शिकविले, पहिली भारतीय शिक्षिका बनविले. सार्वजनिक जीवनात येण्यासाठी प्रोत्साहन दिले हे खरेच आहे. जोतीरावांच्या नेतृत्वाखाली सावित्रीबाईंनी अनेक महत्त्वपूर्ण चळवळी केल्या असल्या तरी दरवेळेला त्यांच्यामध्ये जोतीराव नेता - सावित्रीबाई अनुयायी असेच नाते होते असे नाही. स्वत: जोतीरावांनी केलेल्या नोंदीनुसार बर्‍याच वेळेला सावित्रीबाई नेत्या होत्या, आणि जोतीराव कार्यकर्ते म्हणून काम करीत होते.

सावित्रीबाई देशातील पहिल्या शिक्षिका बनल्या तेव्हा त्या अवघ्या अठरा वर्षांच्या होत्या. शिक्षिका म्हणून विनावेतन काम करताना त्यांना किती अपार छळ सोसावा लागला ते सर्वांना माहीतच आहे. स्त्री शिक्षणाच्या या मिशनमध्ये त्यांचा सहभाग नोंदवताना तत्कालीन वृत्तपत्रे म्हणतात, या पतिपत्नींना अनेकदा जेवायलाही फुरसत मिळत नसे. या शिक्षणहक्क चळवळीत त्यांच्यासोबत जसे उच्चवर्णीय सहकारी होते तसेच दलित-मुस्छिम सहकारीही होते. लहूजी वस्ताद साळवे, राणबा महार, गणू शिवाजी मांग, धुराजी अप्पाजी चांभार, फातिमा शेख, उस्मान शेख, मुन्शी गफार बेग , लिजिट आदींचे योगदान फार महत्त्वाचे होते.

त्यांनी 'फिमेल नेटिव्ह स्कूल्स' आणि 'दि सोसायटी फॉर प्रमोटिंग दि एज्युकेशन ऑफ महार्‌स, मांग्ज अन्ड एक्स्ट्रॉज' अशा दोन शिक्षण संस्था सुरू केल्या होत्या. त्या फक्त संस्थाचालक किंवा शिक्षिका - मुख्याध्यापिका नव्हत्या तर त्या देशातील पहिल्या महिला शिक्षणतज्ज्ञही होत्या. त्यांच्या शैक्षणिक विचारांची दखल अनेक वर्षांपर्यंत घेण्यात न आल्याने फक्त एक सामान्य शिक्षिका एवढेच त्यांचे स्थान होते असे मानले गेले.
" शाळांमध्ये मुले उपयुक्त व्यापार व हस्तकला शिकतील अशा उद्योगांशी औद्योगिक विभाग संलग्न असावा "
 हा त्यांचा विचार आजही किती महत्त्वाचा आहे हे वेगळे सांगायला नको. शिक्षणामुळे स्वावलंबी, स्वतंत्रपणे आणि आनंदाने जगण्याशी क्षमता यायला हवी .जीवनातील खरे - खोटे कळू लागले पाहिजे. खोटेपणा अन्याय शोषण यांच्याविरुद्ध संघर्ष करण्याची हिंमत यायला हवी. शिक्षणापासून लाभ व सुख मिळाले पाहिजे. शैक्षणिक गळती रोखण्यासाठी त्यांनी मुलामुलींना पगार देण्याची व्यवस्था  केली होती मुलाच्या आईवडिलांना शिक्षणाचे महत्व कळावे यांसाठी त्यांनी स्वतःच्या घरात  स्त्री - पुरुषांसाठी १८५४ साली प्रौढ साक्षरता अभियान सुरू केले होते.

शिक्षण मोफत, सक्तीचे, सार्वत्रिक आणि तळापासून दिले जावे असा आग्रह धरणारे हे संपूर्ण आशिया खंडातले पहिले आदर्श जोडपे होय. शैक्षणिक गळतीची एकूण सोळा कारणे शोधून ती दूर, करण्यासाठी त्यांनी काटेकोर उपाययोजना केल्या. ताराबाई शिंदे यांनी 'स्त्री - पुरुष तुलना' हा ग्रंथ लिहून स्त्री मुक्तीचा पाया घातला. मुक्ता साळवे यांच्या १८५५ च्या निबंधाने दलित साहित्याचे दालन सुरू झाले. तानूबाई बिर्जे य़ा पहिल्या भारतीय महिला संपादक बनल्या. सावित्रीबाई रोडे ही दलित महिला शतकापूर्वी समग्र चळवळीचे नेतृत्व करू लागली.

सावित्रीबाईंनी स्त्री हक्कांच्या  अधिकाराच्या प्रस्थापनेसाठी चालवलेल्या मोहिमा आजही प्रेरणादायी आहेत. विधवा पुनर्विवाह, विधवांच्या बाळंतपणासाठी आणि त्यांच्या अपत्यांच्या संगोपनासाठी 'बालहत्या प्रतिबंधक गृह' सुरू करणे, विधवांचे केशवपन थांबवण्यासाठी नाभिक बांधवांना संघटित करून त्यांचा संप घडविणे, दुष्काळात अनाथ मुलामुलींच्या प्रतिपालनासाठी व्हिक्टोरिया बालाश्रम' चालवणे, लग्न समारंभातील अवडंबर, हुंडा, बडेजाव रोखण्यासाठी सत्यशोधक विवाह पद्धती सुरू करणे यात सावित्रीबाईंचा पुढाकार होता.

पहिला सत्यशोधक विवाह २५ डिसेंबर १८७३ रोजी लागला तो सावित्रीबाईंच्या नेतृत्वाखाली. त्यातील    मंगलाष्टकांमध्ये, 'स्थापाया अधिकार या बायकांचे झटतसे मी सदा, अर्पाया न भी मी सर्वस्व कदा.''अशी वराने प्रतिज्ञा करण्याची जोतीराव, सावित्रीबाईंची क्रांतिकारक विचारधारा आजही कालसुसंगत आहे.

जोतीरावांच्या हयातीत आणि निधनानंतर सावित्रीबाईंनी सत्यशोधक चळवळीचे नेतृत्व केले. त्यांच्या नेतृत्वगुण, संघटन चातुर्य आणि लेखन प्रतिभा यांची दखल समाजाने फार उशिरा घेतली. त्यांचे काव्यफुले, जोतीरावांची भाषणे, पत्रे, बावनकशी सुबोध रत्नाकार' हे मौलिक साहित्य सावित्रीबाईंच्या श्रेष्ठ प्रतिभेची साक्ष देतात. स्त्री-पुरुष समतेचा आणि शांततामय सहजीवनाचा पारदर्शक नमुना म्हणून या दोघांकडे पाहता येईल. जोतीरावांच्या मृत्यूनंतर त्यांनी स्वत: पार्थिवाला अग्नी दिला. एका स्त्रीने अंत्यसंस्कार करण्याचा हा प्रसंग चटका लावणारा आहे.

दुष्काळ, जातीय दंगली, प्लेगची साथ अशा संकटांमध्ये सावित्रीबाई कायम कार्यरत राहिल्या. १८९७ च्या प्लेगच्या साथीमध्ये शेकडो आजारी मुलामुलींना औषधोपचार करताना त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून काम केले. त्यांचे दत्तक पुत्र डॉ. यशवंत यांना या कामात त्यांनी सोबत घेतले.

मुंढव्याच्या दलित समाजातील पांडुरंग बाबाजी गायकवाड याला त्यांनी स्वत:च्या पाठीवरून दवाखान्यात उचलून नेले. त्याला वाचवले. जणू “ मेरा पांडुरंग नही दुंगी” असे त्यांनी प्लेगला बजावले. पांडुरंगाला वाचवताना या संसर्गजन्य आजाराने त्या घेरल्या गेल्या आणि काम करता करता त्यांना देह ठेवावा लागला. आयुष्यातील पन्नास वर्षे रात्रंदिवस समाजासाठी झुंजणारी ही 'ज्ञानज्योती' १० मार्च १८९७ रोजी पंचतत्त्वात विलीन झाली.

जोतीरावांपेक्षा त्यांच्या पत्नीचे कौतुक करावे तेवढे थोडेच होईल. त्यांची योग्यता काय सांगावी ? आपल्या पतीबरोबर त्यांनी संपूर्ण सहकार्य केले व वाट्यास येतील त्या सर्व हालअपेष्टा भोगल्या. उच्चवर्णीयांतील उच्चशिक्षण घेतलेल्या स्त्रियांतही अशा प्रकारची त्यागी स्त्री आढळून येणे कठीण आहे. त्या उभयतांनी लोककार्यार्थ आपले सारे जीवन खर्च केले आहे.'' असे पत्र महर्षी मामा परमानंद यांनी बडोद्याच्या महाराजा सयाजीराव गायकवाड यांना ३१ जुलै १८९० रोजी लिहिले होते.

आधुनिक शिक्षणतज्ज्ञ, प्रतिभावंत कवयित्री, समाजसंघटक, स्त्री हक्कांची प्रस्थापना करणाऱ्या, समाज क्रांतिकारक असणाऱ्या सावित्रीबाईंनी जोतीरावांच्याबरोबरीने भारतीय समाजाला आधुनिक बनविण्यात पुढाकार घेतला होता. आज स्त्री हक्कांची चळवळ गतिमान होत असताना सावित्रीबाईंच्या लेकी अनेक क्षेत्रांत पुढे असलेल्या बघून त्यांना नक्कीच आनंद झाला असता.

महिला सक्षमीकरण, धोरण निर्मिती आणि निर्णय प्रक्रियेत सहभाग यात आपण बरीच मजल गाठली असली तरी अजून खूप काम बाकी आहे. सावित्रीबाई या स्त्रियांच्या मानवी अधिकाराच्या प्रतीक बनलेल्या आहेत. स्त्री भ्रूणहत्या, कौटुंबिक हिंसाचार, सार्वजनिक जीवनातील अत्याचार असे अनेक प्रश्‍न सोडविण्यासाठी सावित्रीबाईंचे विचार आणि कार्य आपल्याला प्रेरणादायी आहेत आणि राहतील.

                                                संदर्भ :ज्ञानज्योती सावित्रिबाई फुले : स्त्री हक्काच्या प्रणेत्या , प्रा . हरी नरके

शुक्रवार, १७ जुलै, २०२०

हिंदू धर्मातील विविध पंथ संप्रदाय

हिंदू धर्मातील विविध पंथ  संप्रदाय

वैष्णव संप्रदाय

विष्णूला परमेश्‍वर मानून त्याची उपासना करणाऱ्या  पंथाला किंवा संप्रदायाला 'वैष्णव संप्रदाय' असे म्हणतात. हा संप्रदाय व्यापक अर्थाने भागवत धर्म' या नावाने ओळखला जातो. वेदवाड्मयात विष्णूला 'त्रित्रिक्रम' (तीन पावलांमध्ये  विश्‍व व्यापून टाकणारा अर्थात वामनावतार) म्हटले गेले. त्यानंतरच्या काळात विष्णू हा यज्ञरूप आणि सर्व देवतांमध्ये श्रेष्ठ आहे, अशी श्रद्धा निर्माण झोली. ऐतरेय ब्राह्मण ग्रंथात या श्रद्धेचे मूळ आहे. विष्णूने वेळोवेळी दहा अवतार घेऊन पृथ्वीवर निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीत आपली विधायक भूमिका निभावली, असा लोकविश्‍वास आहे. 

पृथ्वी वर प्रलय झाला तेव्हा मत्स्यावतार घेऊन मनूचे (मानवाचे) रक्षण केले, देव-दानव युद्धात समुद्रमंथन प्रसंगी कूर्मावतार धारण करून पाण्यात बुडणाऱ्या पृथ्वीला वर काढण्यासाठी वराहावतार, प्रल्हादाच्या रक्षणासाठी नरसिंहावतार, तीन पावलांमध्ये बळिराजाला पाताळात लोटण्यासाठी वामनावतार, सहतस्त्रार्जुनाला मारण्यासाठी आणि दुष्ट क्षत्रियांचा नाश करण्यासाठी परशुरामाबतार धारण केला. तसेच रावणाच्या विनाशासाठी घेतलेला रामावतार, कंसाच्या विनाशासाठी कृष्णावतार, यज्ञ हिंसेचा अतिरेक थांबवून अहिंसा तत्त्व जगाला सांगण्यासाठी बुद्धावतार धारण केला. शिवाय दुष्ट शक्‍तींचा नाश करून धर्म स्थापना करण्यासाठी कलियुगाच्या अखेरीस विष्णूचा कल्की अवतार हा दहावा अवतार होईल असे कल्की पुराणात म्हटले आहे.

हरिवंश, विष्णुपुराण, भागवत ग्रंथ हे वैष्णव संप्रदायाचे प्रमुख ग्रंथ आहेत. सर्वसाधारणपणे गुप्त साम्राज्यात (इ.स. ३०० ते ५५०) वैष्णव संप्रदायाचा उदय झाला असे मानले जाते. याचकाळात हिंदू, बौद्ध आणि जैन हे तिन्ही धर्म प्रचलित झाले. हिंदू धर्माच्या पुनर्घटनेचे कार्य प्रगतीपथावर होते. या काळात वैदिक धर्माची तत्त्वे सामान्य लोकांना समजावी म्हणून मनस्मृती, याज्ञवल्क्यस्मृती असे अनेक स्मृतिग्रंथ लिहिले गेले.

रामायण आणि महाभारत ग्रंथांना गुप्त काळात सध्याचे रूप प्राप्त झाले. त्रिदेव संकल्पना (ब्रह्मा, विष्णू आणि शिव) रूढ झाली. अवतार कल्पनेनुसार वराह, वामन, नरसिंह, राम, इत्यादी विष्णूच्या अवतारांची पूजा प्रचारात आली. वैदिक यज्ञयाग मागे पडून पौराणिक धर्माचे अनुकरण वाढले. दैनिक उपासनेमध्ये भक्तीला प्राधान्य मिळू लागले. स्वतः गुप्त राजे हिंदू धर्मातील भागवत धर्माचे ( वैष्णव संप्रदायाचे) अनुयायी होते. त्यामुळे वैष्णव संप्रदायाला महत्त्व प्राप्त होऊने त्याचा बंगाल, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात विशेष प्रसार झाला. 

दक्षिण भारतातील आळवार भक्‍त 

तमीळ भाषिक वैष्णव संतकवींच्या परंपरेला आळवार असे म्हणतात. आळवार म्हणजे ईश्वराच्या प्रेमसागरात बुडून गेलेला भक्‍त होय. हे आळवार इ.स. ५०० ते ८०० या काळात होऊन गेले. दक्षिण भारतातील वैष्णव सांप्रदायिक बारा आळववारांना आचार्यांपेक्षा अधिक मान देतात. बाराआळवारांनी रचलेली सुमारे चार हजार पद्ये दिव्य प्रबंधम्‌' (अरूळिच्वॅयल) यां नावाने नाथमुनींनी नवव्या शतकात संकलित केली. आजही दक्षिण भारतातील वैष्णव मंदिरांमध्ये त्यांचे गायन केले जाते. हा ग्रंथ वैष्णव सांप्रदायिक वेदाइतका पवित्र मानतात.

वरील बारा आळवारांमध्ये सर्व जाती वर्णाचे लोक समाविष्ट होते. आंडाळ आळवार ही एक स्त्री असून  तिला “दख्खनची मीरा' म्हटले जाते. जो सर्वभावे ईश्वराला शरण जातो त्याचे ईश्‍वर रक्षण आणि उद्धार करतो, असा ईश्‍वरभक्तीचा साधा सुलभ मार्ग आळवारांनी सांगितला. भारतात भक्‍तिपंथाची सुरुवात आळवारांनी केली असे एक मत असून आळवारानंतर झालेल्या “आचार्य परंपरे'ने वैष्णव संप्रदायाच्या भक्‍तिपंथाचे तत्त्वज्ञान विकसित्त केल्याचे मानले जाते. नाथमुनी, यमुनाचार्य, रामानुजाचार्य, निंबाकाचार्य, मध्वाचार्य, वल्लभाचार्य, गौरांग चैतन्य महाप्रभू, स्वामी रामानंद या आचार्यांनी इसवीसनाच्या नवव्या शतकापासून भारतात वैष्णव संप्रदायाचा विकास केला. उत्तर आणि दक्षिण भारतातील भक्‍ती आंदोलनांना एकत्रित करणारा दुवा म्हणून स्वामी रामानंदांचे कार्य उल्लेखनीय आहे. 

महाराष्ट्रातील वैष्णव संप्रदाय 

भागवत धर्म किंवा वैष्णव संप्रदायान्तर्गत ज्यांचा समावेश होतो असे काही उपासना पंथ महाराष्ट्रात निर्माण झाले. त्यामध्ये

(१) वारकरी, (२) महानुभाव, (३) समर्थ हे प्रमुख आहेत.

वारकरी संप्रदायाने उपास्य दैवत मानलेला विठ्ठल हा कृष्णस्वरूप आहे. महानुभाव पंथात कृष्णोपासना केली जाते. विष्णूचा अवतार असलेल्या रामाची उपासना समर्थ संप्रदायात केंद्रस्थानी मानली जाते. या तीन उपासना पंथांनी महाराष्ट्राच्या प्रादेशिक सीमा कमी अधिक प्रमाणात ओलांडल्या.


शैव संप्रदाय

“शिवा” ला परमेश्‍वर मानून त्याची उपासना करणाऱ्या पंथ किंवा संप्रदायाला 'शैव संप्रदाय' असे म्हणतात. शिवा हा संपूर्ण भारतात सर्व जाती-जमातींकडून पूजला जाणारा “महादेव' आहे. शैव संप्रदायांतर्गत पाशुपत पंथ, अघोरी पंथ, कापालिक पंथ, नाथ संप्रदाय, काश्मिरी शैव, नयन्मार शैव, विर॑ शैव (किंवा लिंगायत) या उपपंथांनी भारतभर शिवसंप्रदायाचा प्रसार केला.

वेद वाड्मयात 'रुद्र' या देवतेची स्तुती करणारी तीन सूक्ते आढळतात. डॉ. मॅक्डोनल यांनी 'रुद्र' आणि 'अग्नी' यांच्यातील साम्यावरून 'रुद्र' हा विनाशकारी झंझावाताचे प्रतीक असल्याने म्हटले आहे. डॉ. रा. गो. भांडारकर यांनीही 'रुद्र' देवतेला सृष्टीतील विध्वंसक शक्तीचे प्रतीक म्हटले आहे. अर्थर्ववेदात रुद्राला 'पशुपती' आणि 'महादेव' ही विशेषणे भ्रथमच लावण्यात आली. त्यानंतरच्या काळात त्याला 'शिव', “शिवतर', 'शंकर', 'गिरिकांत', 'गिरीश', इत्यादी नावे देण्यात आली. वैदिक रुद्रालाच 'अग्नी' या अर्थाने पृथ्वी, अंतरिक्ष आणि द्यौ या तीन ठिकाणी जन्मणारा म्हणून 'त्र्यंबक' असे नाव प्रचलित झाले.

भारतात शिवाची उपासना प्रामुख्याने लिंग स्वरूपात केली जाते. त्याचे मूळ सिंधू संस्कृतीत आढळते. शिवलिंग हे जननेंद्रियाचे प्रतीक आहे. वैदिकांनी वैदिकेतरांची (सिंधू संस्कृतीतील लोकांची) लिंगोपासना आत्मसात केली आणि तीच पुढील काळात भारतीय संस्कृतीत रूढ झाली. रामायण ग्रंथात शिवाची महादेव, महेश्वर, शंकर, त्र्यंबक, इत्यादी नावे आढळतात. तर महाभारत ग्रंथात शिवाच्या प्राप्तीचे मार्ग म्हणूनं योग आणि तपश्‍चर्या या साधनांना महत्त्व दिलेले आहे.

पौराणिक वाड्मयात “शिव' आणि 'पार्बती* यांच्या ऐक्याचे तत्त्वज्ञान मांडलेले असून त्यांच्या उपासनेचा भक्तिमार्ग कथन केला आहे. याच काळात भारतात अनेक शिव मंदिरे स्थापन होऊन त्यांच्यात शिवलिंगाचे पूजन होऊ लागले.

सोमवार हा शिवाचा वार, त्याला बेलपत्र वाहावे, त्याच्यासाठी उपवास करावे, त्याच्या नावाने कपाळावर आडवे गंथ लावावे, त्याला अभिषेक करावा आणि त्याप्रसंगी रुद्रपाठ म्हणावा,

इत्यादी व्रतवैकल्ये पुराण काळापासून रूढ झाली.इसवी सनाच्या सहाव्या शतकापासून तेराव्या शतकापर्यंत शिवाच्या उपासनेत विविधता आली. तो 'दक्षिणामूर्ती' , “महेशमूर्ती', 'त्रिमूर्ती', महासदाशिव', “अर्धनारी नटेश्‍वर', “महाकाल', 'नटराज', इत्यादी विविध रूपांमध्ये वेगवेगळ्या 'लोकसमूहात मान्यता पावला. महाराष्ट्रातील 'मल्लारी', “मार्तंड', 'खंडोबा', 'ज्योतिबा', 'रवळनाथ' ही शिवाचीच रूपे (अवतार) आहेत. कर्नाटकात त्याला 'मैलार' म्हणतात.

म्हणूनच वेगवेगळ्या प्रांतांतील शिवोपासकांना पवित्र वाटणारीशिवमंदिरे 'बारा ज्योतिर्लिंगे' म्हणून सर्व परिचित आहेत. त्या त्या ठिकाणी जाऊन, त्यांची यात्रा करणे हे पुण्यप्रद मानले जाते. सौराष्ट्रातील सोरटी सोमनाथ, आंध्रातील मल्लिकार्जुन, मध्य प्रदेशात उज्जैन येथील महाकालेश्वर आणि नर्मदेकाठचे ओंकारेश्वर, उत्तर प्रदेशातील काशी विश्वेश्वर, केदारेश्वर, महाराष्ट्रातील भीम शंकर, त्र्यंबकेश्‍वर, परळी वैजनाथचे वैजनाथ, हिंगोलीचे नागेश्वर, वेरुळचे घृष्णेश्वर आणि तामीळनाडूचे रामेश्‍वर अशी महादेवाची भारतभर पसरलेली ज्योतिर्लिंगे आहेत.

शैव संप्रदायाची वरील बारा ज्योतिर्लिंगे भारतातील विविधतेतील एकता व्यक्‍त करणारी आहेत. पर्वतराज हिमालयापासून कन्याकुमारीच्या समुद्र किनाऱ्यापर्यंत विविध प्रांतांत त्यांची स्थापना झाली. काही ज्योतिर्लिंगे पवित्र नद्यांच्या किनाऱ्यावर आहेत. अनेक पौराणिक आणि ऐतिहासिक संदर्भांनी ती ओळखली जातात. त्यांच्यावरून भारताची धार्मिक आणि सांस्कृतिक एकात्मता दिसून येते.


शैव संप्रदायातील विविधता

शैव संप्रदायात एका शिवाचीच उपासना केंद्रस्थानी आहे. त्यामुळे सर्व प्रमुख शैव संप्रदायाचे

(१) पाशुपत आणि

(२) आगमिक

असे मुख्य प्रकार पडतात. पाशुपताबरोबर अघोर कापालिक आणि नाथ संप्रदायांचा उल्लेख केला जातो. आगमिक प्रकारात काश्मिरी शैव मत, कर्नाटकातील लिंगायत किंवा वीरशौव आणि तामीळनाडूमधीळ नायन्मार यांचा समावेश होतो. शैव संप्रदायातील वरील पंथोपपंथ इसवी सनाच्या सहाव्या शतकापासून तेराव्या शतकापर्यंत निर्माण झाले.


(१) पाशुपत पंथ

गुजरातमधील कायारोहण क्षेत्रात होऊन गेलेला लकुलीश किंवा नकुलीश हा शिवाच्या अठरा अवतारांपैकी आद्य असून त्याने पाशुपत मताची मांडणी केली. शैव संप्रदायात पाशुपत पंथ हा सर्वात प्राचीन असल्याचे मानले जाते. मानवी जीवनातील दुःखान्त ज्ञान आणि वैराग्या मुळे होत नसून केवळ शिवप्रसादाने होतो, अशी या पंथाची श्रद्धा आहे. शिव हाच जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय घडवून आणतो; म्हणून ज्याला दुःखान्त हवा त्याने शिवाची उपासना करावी, अशी या संप्रदायाची धारणा आहे. पाशुपतांच्या धार्मिक आचारात भस्माला विशेष महत्त्व आहे. भस्मस्नान म्हणजे खरा यज्ञ होय असे ते मानतात, 'ओम नमः शिवाय' हा शिवमंत्र, विभूती आणि रूद्राक्ष धारण करणे हे प्रत्येक शिवभक्ताचे कर्तव्य मानले जाते.


(२) अघोरी पंथ

या पंथात शिवाची अघोरीश्वर म्हणून उपासना,केली जाते. त्याचा उगम गुजरातमध्ये अबू येथे झाला. चांमुडा ही  या पंथाची देवता असून तिला नरबळी देण्याची प्रथा होती. जादुटोणा आणि मंत्र तंत्राला या पंथात विशेष महत्त्व आहे. अठराव्या शतकातील किनराम यांनी लिहिलेला "विवेकसार* ग्रंथ या पंथात प्रमाण मानला जातो. सध्या या पंथियांची संख्या थोडी असून ती भारतभर विखुरलेली आहे.


(३) कापालिक पंथ

कपाली म्हणजे मानवी कवटी धारण करणारा शिव या पंथात पूजला जातो. अशा शिवाचे उपासक कापालिक म्हणून ओळखले जातात. त्यांचे मुख्य केंद्र शैल पर्वत होते. या पंथाचे अनुयायी मानवी कवटी बाळगून तिच्यातून अन्न, मद्य, मांस यांचे सेवन करतात. नरबली, स्मशानवास, मद्य, मांस सेवन हा या पंथाचा आचार आहे. कापालिक पंथाचा फारसा विस्तार झाला नाही. शंकराचार्यांनी त्यांच्याशी वाद करून त्यांना पराभूत केले. त्यामुळे त्यांच्या उपासनेला मोठ्या प्रमाणात पायबंद बसला.


(४) नाथ संप्रदाय

'नाथ संप्रदाय हा भारतभर पसरलेला एक अत्यंत महत्त्वाचा संप्रदाय आहे. त्याचा उगम इसवी सनाच्या आठव्या शतकापासून बाराव्या शतकापर्यंतच्या काळात झाला. हा शैव तत्त्वज्ञानावर आधारित संप्रदाय असून आदिनाथ परमेश्‍वर शिव त्याचा उद्गाता आहे. अशी सांप्रदायिकांची श्रद्धा आहे. नाथ म्हणजे रक्षण करणाऱ्या स्वामींचा सांप्रदाय होय. योगमार्गाने सिद्धावस्था प्राप्त करून घेणे हे या संप्रदायातील साधकांचे ध्येय मानले जाते. हा संप्रदाय 'सिद्ध संप्रदाय', 'योग संप्रदाय' , “अवधूत संप्रदाय', 'गुरू संप्रदाय', इत्यादी विविध नावांनी ओळखला जातो.

नाथ संप्रदायातील सिद्ध पुरुष

या संप्रदायात नऊ या संख्येला अत्यंत महत्त्व दिलेले आहे. त्यावरून नवनाथ हा शब्द सर्वपरिचित झाला आहे. 'गोरक्षसिद्धान्त संग्रह', 'नवनाथ भक्तीसार ' हे नाथ सांप्रदायिकांचे पवित्र ग्रंथ आहेत. 'गोरक्षसिद्धान्त संग्रह* या ग्रंथात नवनाथांच्या दोन गणना याद्या) पुढीलप्रमाणे सांगितल्या आहेत.

१) आदिनाथ, (२) मत्स्येंद्रनाथ, (३) उदयनाथ, (४) दण्डनाथ, (५) सत्यनाथ, (६) संतोषनाथ,

(७) कूर्मनाथ, (८) भवनार्जि (९) गोरक्षनाथ. (आ) (१) गोरक्षनाथ, (२) जगन्नाथ, (३) जालंदरनाथ,

(४) नागार्जुन, (५) सहस्त्रार्जुन, (६) दत्तात्रेय, (७) देवदत्त, (८) जडभरत, (९) मत्स्येंदर, -


पैकी मत्स्येंद्रनाथ आणि गोरक्षनाथ यांचे कार्य महत्त्वपूर्ण

आहे. त्यांचा काळ अनुक्रमे ९ वे १०वे शतक आणि १० वे ११ वे शतक असा मानला जातो. आदिनाथांनी गोरक्षनाथांना दीक्षा दिली.

नाथ संप्रदायाचे सिद्धान्त आणि साधना . नाथ संप्रदायात पुढील महत्त्वाचे सिद्धान्त आहेत.

(१) शाक्‍तियुक्‍त शिव हेच अंतिम सत्य आहे.

(२) शिव आणि शक्‍ती अभिन्न आहेत.

(३) जे ब्रह्मांडात आहे ते पिंडात आहे.

(४) पिंड आणि ब्रह्मांड यांचे ऐक्य म्हणजे सिद्धावस्था होय.

(५) योगसाधनेत गुरुचे स्थान अनन्यसाधारण आहे.

नाथ संप्रदायात शिवोपासनेला सर्वोच्च स्थान आहे. त्याचप्रमाणे दत्तात्रय, भैरव, कालभैरव, अंबा, जगदंबा ही त्यांची काही उपास्यदैवते आहेत. नेपाळमध्ये मत्स्येंद्रनाथांची अवलोकितेश्वराच्या रूपात पूजा केली जाते. गोरक्षनाथांची मंदिरे भारतात अनेक ठिकाणी आहेत.

नाथ संप्रदायात (१) जोगी (२) अवधूत (३) कानफाटे, इत्यादी शाखा आहेत. हे सांप्रदायिक कुंडलिनी शक्‍ती जागृत करून समाधी स्थिती प्राप्त करण्याची साधना करतात. ते मंत्रयोग, इहयोग, लययोग आणि राजयोग या चार योगांचे आचरण करतात.

शिवाला कुल नाही, तो निर्गुण-निरंजन आहे. त्यामुळे ईश्वरतत्त्व हे कुल, जात, वर्ण आणि धर्म यापलीकडे आहे ही नाथपंथाची मुख्य शिकवण होती. प्रखर वैराग्य, विशुद्ध चरित्र, सदाचार आणि ब्रह्मचर्य यांना महत्त्व देऊन या पंथियांनी तत्कालीन समाजातल्या अनैतिक, अनाचारी प्रवृत्तींना आळा घातला. विशेष म्हणजे हिंदू-मुस्लीम ऐक्याचा गोरक्षनाथांनी पाया घातला, त्यांच्या कार्यातून कबीर, ज्ञानेश्‍वर आदि संतांनी प्रेरणा घेऊन धर्मप्रेरणणेतला मानवी मूल्यांचा, समता-बंधुभावाचा पाया विस्तृत केला.आगमिक वर्गातील शैब संप्रदाय

वैष्णव, शैव, शाक्त, इत्यादी संप्रदायांनी आपापल्या आचार विचारांच्या मार्गाचा आधार म्हणून जे साहित्य निर्माण केले त्यास '*आगम' असे म्हणतात. (वैदिक धर्माच्या अशा साहित्याला “निगम' म्हणतात.) शैव संप्रदायातील जे पंथ “ज्ञान', 'योग', 'क्रिया' आणि 'चर्या' यांच्या संदर्भात विशिष्ट तत्त्वज्ञान मांडतात त्यांचा 'आगमिक वर्ग” मानला जातो. त्यात काश्मिरी शैव, नयन्मार शैव, वीरशैव (किंवा लिंगायत) यांचा समावेश होतो.

(१) काश्मिरी शैवमत : इसवी सनाच्या आठव्या शतकात काश्मीरमध्ये वसुगुप्त याने 'शिवसूत्र' आणि 'स्पंदन कारिका' हे ग्रंथ लिहून एका नव्या शैवमताची स्थापना केली. या मतानुसार शिव हा सर्वशक्तिमान असून तो आपल्या इच्छेप्रमाणे जगाची उत्पत्ती आणि प्रलय घडवतो. जीवात्मा आणि परमात्मा यांच्यात भेद नसून परमात्म स्वरूपाच्या ज्ञान प्राप्तीसाठी शिवभक्ती हा उपाय आहे. पुढे दहाव्या शतकात सोमानंद याने 'प्रत्यभिज्ञा' हे नवे शैवमत प्रस्थापित केले. त्यासाठी शिवदृष्टी' हा ग्रंथ प्रमाण मानला जातो. शिवाची नितांत उपासना केल्यावर साधकाच्या मनात 'मीच शिव आहे' अशी प्रत्यभिज्ञा (जाणीव) निर्माण होते. काश्मिरी शैवमत योग साधनेवर विशेष भर देते.

(२) नायन्मार शैव संत : दक्षिण भारतातील त्रेसष्ट शैव संतांना “नायन्मार' (धनी किंवा देव) म्हटले जाते. हे नायन्मार इसवी सनाच्या दुसऱ्या शतकापासून नवव्या शतकापर्यंत होऊन गेले. ते सर्व विविध जाती धर्माचे होते. त्यांच्याविषयी सर्वसामान्य माणसे आजही आदर व्यक्‍त करतात. नायन्मारांनी शिवभक्‍तीपर विपुल काव्यरचना केली. पुढील चार नायन्मार महत्त्वाचे मानले जातात.

१) अप्पर : हा शूद्र कुळातील होता. (२) सुंदरर : हा ब्राह्मण होता. (३) माणिक्क बाचकर : हा मदुरेचा प्रधान होता. (४) ज्ञान संबंधर : याने बालपणापासून शिवभक्तीपूर्ण काव्यरचना केली. शेक्किळार या शैवसंताने बाराव्या शतकात 'पेरियपुराणम्‌? या ग्रंथात सर्व त्रेसष्ट नायन्मारांची चरित्रे लिहिली. या ग्रंथ तमीळ शैव पंथात पवित्र मानला जातो. सर्वांवर प्रेम करावे, समाजसेवेसाठी आपले जीवन अर्पण करण्याची सिद्धात ठेवावी, अहिंसा पाळावी, प्रत्येकाला व्यक्‍्तीविकासाची संधी द्यावी, स्त्रियांना स्वातंत्र्य द्यावे असे या शैवमताने मांडलेले उदात्त सिद्धान्त आहेत.

(४) लिंगायत संप्रदाय किंवा विरशैवपंथ : ज्या काळात महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाचा विकास होत होता त्याच काळात, इसबी सनाच्या बाराव्या शतकात कर्नाटकात लिंगायत संप्रदाय उदयाला आला. वारकरी संप्रदायाला वैष्णव विचारांचे तर लिंगायत संप्रदायाला शैव विचारांचे अधिष्ठान लाभलेले आहे. त्याचा विस्तार प्रामुख्याने दक्षिण भारतात झालेला आहे. या संप्रदायाचे अनुयायी आपल्या अंगावर शिवलिंग धारण करतात म्हणून त्याला लिंगायत संप्रदाय म्हणतात. हा संप्रदाय “वीरशैव संप्रदाय” म्हणूनही ओळखला जातो. त्याचे आणखी नाव 'शिवशरण संप्रदाय' असेही आहे.

शिव हा सर्वशक्तिमान आहे, जीव हा शिवाचा अंश आहे, झाडाला जसे फूल व फळ येते तशी शिवापासूनच जगत उत्पन्न झाले आहे असे हा पंथ मानतो. जगाची उत्पत्ती वा विनाश होतो ही कल्पना वीरशैवांना मान्य नाही. जगाचा शक्‍तिविकास किंवा शक्‍तिसंकोच होतो हे त्यांचे मत आहे. 'ओम नमो शिवाय” हा एकमेव उपासना मंत्र या पंथाने स्वीकारला. भकक्‍तिमार्गाचे सहा टप्पे (षटस्थल) नैतिक जीवनाचे पाच आचारधर्म (पंचाचार) आणि साधनेचे आठ संस्कार (अष्टावरण संस्कार) सांगून वीरशैवांनी आपल्या पंथियांना सदाचरणाची शिकवण दिली.

अलीकडेच कर्नाटकात सापडलेल्या दोन ताप्रपटांवरून रामय्या आणि बसवेश्वर यांनी लिंगायत संप्रदायाची स्थापन केली असे सिद्ध झाले. त्यांचा कालखंड इसवीसनाचे बारावे शतक आहे. या दोहोंपैकी रामय्या हे संप्रदायाचे संस्थापक आणि बसवेश्वर सुधारक असल्याचे सर्वमान्य झाले आहे.

बसवेश्वरांनी विरता स्वीकारून शैव पंथातील अनेक विकृती दूर केल्या. लोकांना शिव भक्‍तीकडे आकर्षित करण्याचे कार्य बसवेश्वरांनी केले.

कर्नाटक या आपल्या कर्मभूमीत बसवेश्वरांनी (११३१-११६७) लिंगायत संप्रदायाचे पुनरुज्जीवन केले. धर्म, समाज, तत्त्वज्ञान, साहित्य, राजकारण, इत्यादी क्षेत्रात त्यांनी क्रांतिकारक कार्य केले. त्यांना वर्णभेद, वर्गभेद, यज्ञयागातील पशुहत्या मान्य नव्हती. 'शिव' हाच एकमेव ईश्वर असल्याची घोषणा करून त्यांनी शिवोपासनेचा पुरस्कार केला. एकाच देवाची भक्‍ती करा, भूतदया दाखवा, परोपकार करा अशी त्यांची शिकवण होती.

बसवेश्वरांनी कल्याण (कर्नाटक राज्य) येथे स्थापन केलेली 'शिवानुभव मंटप? ही संघटना धर्मांच्या जागतिक इतिहासातील एक अनन्यसाधारण संस्था मानली जाते. तिथे वेगवेगळ्या जाती, धर्म, व्यवसायातील लोक आणि अनुयायी एकत्र जमत आणि विविध विषयांवर चर्चा करीत. या माध्यमातून त्यांनी लोकजागृती घडवून आणली. चातुर्वण्य व्यवस्थेला आव्हान देऊन आंतरजातीय रोटी-बेटी व्यवहाराला बसवेश्वरांनी उत्तेजन दिले. त्यांनी बालविवाहांना विरोध करून विधवा विवाहांचा पुरस्कार केला. आपल्या संप्रदायात त्यांनी सर्व जातीधर्माच्या स्त्री पुरुषांना प्रवेश दिला. काश्मीरपासून केरळपर्यंत मठ स्थापना करून बसवेश्वरांनी समर्थ संघटनशक्‍्ती

निर्माण केली. 'शारीरिक श्रम हाच कैलास (स्वर्ग) आहे असा त्यांचा एक महान सिद्धान्त होता. त्याला 'कायकबे कैलास' असे म्हणतात. त्यामुळे त्यांच्या तत्त्वज्ञानात भिक्षावृत्तीला वाव नव्हता. मोक्षासाठी अरण्यात जाण्याची गरज नाही असे ते मानत. ज्ञानेशवरांप्रमाणे बसवेश्वरांनी ग्रंथनिर्मितीसाठी लोकभाषा कन्नडचा स्वीकार केला.

अल्लमप्रभू (इ.स. १२ वे शतक) यांनी वीरशैव संप्रदायाचा प्रसार केला आणि तत्कालीन रूढी, अंधश्रद्धा,

अज्ञान यावर कठोर टीका करून समाजात विवेकनिष्ठ जाणीव- जागृतीचे कार्य केले. त्यांना सिद्धावस्था प्राप्त झाल्यावर बसवेश्वरांनी वीरशैवांच्या धार्मिक संघटनेच्या (शिवानुभव मंटप) अध्यक्षस्थानी नियुक्‍त केले.

सारांश, वीरशैव संप्रदायाने जाती-धर्मातील विषमता दूर करून, त्यांच्यातली तेढ घालवून रोटी-बेटी व्यवहार घडविण्यापर्यंत प्रागतिक पाऊल टाकले. श्रमनिष्ठा हे धर्ममूल्य म्हणून रुजविले हा प्रगत विचार नवा होता.

महानुभाव संप्रदाय

महाराष्ट्रात उगम पावून मध्य भारत, पंजाब, काबूल कंदाहारापर्यंत प्रसार पावलेला “महानुभाव संप्रदाय' हा एक महत्त्वाचा संप्रदाय आहे. त्याचा प्रारंभ चक्रधरांनी इसवी सनाच्या तेराव्या शतकात केला. हा संप्रदाय प्रारंभी 'महात्मा पंथ' “परमार्ग', 'भटमार्ग' या नावाने ओळखला जात असे. या संप्रदायाला पंजाबात 'जय कृष्णी पंथ' तर गुजरातेत 'अच्युत पंथ' असे म्हणतात. या संप्रदायात कृष्णोपासना आणि दत्तोपासना केली जाते. गीता आणि भागवत हे ग्रंथ प्रमाणग्रंथ आहेत. हा द्वैतवादी संप्रदाय असून संन्यास मार्गावर अधिक भर देणारा आहे.

महानुभाव संप्रदायाच्या तत्त्वज्ञानाची रूपरेषा

हे तत्त्वज्ञान द्वैतवादावर आधारित म्हणजे परमेश्‍वर आणि भक्त वेगवेगळे असतात असे मानणारे आहे. चक्रधरांनी “ज्ञीव', 'देवता', 'प्रपंच' आणि 'परमेश्‍वर' हे चार स्वतंत्र ' पदार्थ मानले. त्यांची माहिती पुढीलप्रमाणे -

(१) जीव : जीव अनंत असून परमेश्वराच्या ज्ञानाने किंवा भक्तीने त्यांना मुक्‍ती मिळते. जीवाला मिळणारा मोक्ष कोणत्याही कर्मराहाटीचे फळ नसते.

(२) देवता : देवता अनंत असून त्यांचे ८१ कोटी, सव्बा लाख दहा या संख्येचे देवताचक्र आहे. दत्तात्रेय व भगवान कृष्ण या दोन देवता सोडल्यास इतर देवता नित्यबद्ध आहेत. जीवांना त्यांच्या कर्माची फळे देणे हे त्यांचे कार्य आहे.

(३) प्रपंच : प्रपंचाचे कारणरूप आणि कार्यरूप असे भेद पडतात. तो त्रिगुणात्मक (सत्त्व, रज, तम युक्‍त) आणि पंचभौतिक (पृथ्वी, पाणी, तेज, वायू आणि आकाशयुक्‍त) आहे. कारणरूप प्रपंच अव्यक्त, अनादी आणि अनित्य असून कार्यरूप प्रपंच अनित्य आणि मिथ्या आहे.

(४) परमेश्‍वर : ब्रह्म, माया आणि ईश्‍वर मिळून परमेश्‍वर होत असून तो अनादीनित्य स्वतंत्र पदार्थ आहे. तो सत्‌ चित्‌ आणि आनंद या तीन लक्षणांनी युक्‍त आहे. परमेश्‍वर देहधारी अवतार घेऊन जीवांचा उद्धार करतो.महानुभाव तत्त्वज्ञानानुसार मुक्‍तीनंतरही जीवाचे स्वतंत्र अस्तित्व टिकून राहते. त्याच्या उद्धाराचे ज्ञान आणि भक्‍ती असे दोन मार्ग आहेत. ज्ञान प्राप्त. झाल्यानंतर जीवाने सर्व संग परित्याग करून 'अनुसरण' करावे. त्याने पुढील द्वादश धर्माचा त्याग करावा. (१) देशधर्म, (२) ग्रामधर्म, (३) जातीधर्म, (४) कुळधर्म, (५) वर्णधर्म, (६) आश्रमधर्म, (७) पुराणधर्म, (८) आगमधर्म, (९) प्रवृत्तीधर्म (१०) निवृत्तीधर्म, (११) युगधर्म, (१२) राज्यधर्म.

ज्ञानापेक्षा भक्‍ती श्रेष्ठ आहे, अशी महानुभाव संप्रदायाची श्रद्धा आहे.

महानुभाव संप्रदायाचा आचारधर्म

याला चक्रधरांनी “असती परीचा मार्ग' म्हटले आहे.(कसे असावे व कसे राहावे याची रीत म्हणजे आचार होय.)

त्याची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे-

(१) संन्यासप्रवणता : ही चारही वर्णातील स्त्री-पुरुषांसाठी खुली आहे.

(२) निवृत्तीपरता : विषय सुखांचा संपूर्ण त्याग म्हणजे निवृत्तीपरता होय,

(३) भिक्षावृत्ती : भिक्षान्त हे पवित्राचे पवित्र असते.

(४) आहिंसाधर्म: कधीही कोणालाही शब्दानेही दुखवू नये.

(५) स्मरणभक्ती : रात्रंदिवस परमेश्‍वराचे नाम, लीळा, मूर्ती आणि चेष्टा यांचे स्मरण करावे.

(६) गुरुभक्ती : आचार्य (गुरू) साधकाला अनिष्टाकडून इष्टाकडे नेणारा असून तो परमेश्वराची जागा घेऊ शकत नाही.

महानुभाव संप्रदायाची अवतार आणि पंचकृष्ण कल्पना

या संप्रदायात पुढील चार अवतार मानले जातात,

१) कृत युगातील हंसावतार

२) त्रेता युगातील दत्तावतार

३) वापर युगातील कृष्णावतार

४) कलियुगातील चक्रधरायतार

या संप्रदायाच्या तत्त्वज्ञानात "पंचकृष्ण' संकल्पना प्रचलित आहे. त्यानुसार (१) भगवान कृष्ण, (२) दत्तात्रेय प्रभू,

(३) चांगदेव राऊळ (४) द्वारावतीचे गोविंद प्रभू, (५) पैठणचे चांगदेव राऊळ म्हणजे चक्रधर हे 'पंचकृष्ण' आहेत. आपल्या संप्रदायाचे आदिकारण दत्तात्रेय प्रभूंनी द्वारावतीच्या चांगदेव राऊळांना दर्शन देऊन ज्ञानशक्‍ती दिली. त्यांच्यापासून गोविंद प्रभूंनी आणि गोविंद प्रभूंपासून चक्रधर स्वामींनी उपदेश घेऊन ज्ञानशक्ती मिळविली, अशी सांप्रदायिक धारणा आहे.महानुभाव संप्रदायाचा विस्तार आणि सद्य:स्थिती चक्रधर स्वामी (इ.स. ११९४ ते १२७२) हे एक अत्यंत प्रभाबी संघटक होते. त्यांनी या संप्रदायाची स्थापनाकरून अनेक शिष्य एकत्र केले. लोकभाषा मराठीचा अवलेंब करून समाजातील सर्ब स्त्री -पुरुषांपर्यंत आपला संप्रदाय नेऊन पोचवला. सर्वसामान्यांना एक नव्या भक्‍तीविचार शिकवला.

त्यांच्यानंतर नागदेवाचार्य, बाईदेव बास, कवीश्वर बास, परशराय बास या आचार्यांनी आपल्या परीने संप्रदायाच्या लौकिकात भर घातली. पुढील काळात या संप्रदायात तेरा आम्नाय (शाखा) निर्माण झाले. त्यापैकी उपाध्ये आणि कवीश्वर हे दोन आम्नाय प्रमुख मानले जातात.

विसाव्या शतकात महानुभाव संप्रदायात पुनश्चनवचैतन्य निर्माण झाले असून संप्रदायाचा विस्तार भारतात आणि भारताबाहेर वेगाने झाला आहे. त्याचे तत्त्वज्ञान आजही अबाधित असले तरी काळानुरूप त्यात अनेक परिवर्तनेही झाली आहेत.

महानुभाव संप्रदायाने भारताच्या विविधतेत आणि धार्मिक व सांस्कृतिक वारशात फार मोठी मोलाची भर घातली. या संप्रदायाची उभारणी चक्रधर स्वामींच्या आचारविचारांतून आणि सूत्र वचनांमधून झाली. उत्तर काळात त्यांचे संकलन 'होऊन संप्रदायाचे तत्त्वज्ञान आकाराला आले. सूत्रपाठ, दृष्टान्त पाठ, स्थानपोथी, इत्यादी ग्रंथांमधून ते विसाव्या शतकापर्यंत आले. त्याचप्रमाणे मराठी साहित्याला समृद्ध करणारे, गतकालीन जीवन दर्शन घडविणारे अंनेक सुंदर ग्रंथ महानुभाव संप्रदायातच निर्माण झाले.


वारकरी संप्रदाय

भारतीय जनजीवनात परंपरा ही एक अत्यंत महत्त्वाची शक्ती आहे. ती जुन्या आचार विचारांना नव्या स्वरूपात साकार करते. महाराष्ट्रात उगम पावलेला “वारकरी संप्रदाय' हे याचे उत्तम उदाहरण आहे. वेद कालातील विष्णू देवतेचे पुढे भजनपूजन पुराणकाळात टिकून राहिले. पुढे गुप्त काळात त्यातून भागवत धर्म' अस्तित्वात आला. गुप्त काळात वैष्णव संप्रदायाची मुहूर्तमढ झाली. यादवकाळात परंपराप्राप्त भागवत धर्म आणि वैष्णव संप्रदायाचे महाराष्ट्रात 'वारकरी संप्रदाया'त रूपांतर झाले. त्याच्या प्रभावाची परंपरा अबाधित राहून तो आजही टिकून आहे.

पंढरपूर येथील विठ्ठलाची उपासना करणाऱ्या संप्रदायाला “वारकरी संप्रदाय' असे म्हटले जाते. आषाढी, कार्तिकी, माघी किंवा चैत्र शुद्ध एकादशीला, गळ्यात तुळशीमाला घालून नियमाने पंढरपूरला जाणार्‍याला "वारकरी" असे म्हणतात. हा संप्रदाय 'वैष्णव धर्म', 'वैष्णव संप्रदाय', “भागवत धर्म', भागवत संप्रदाय', 'माळकरी पंथ' अशा विविध नावांनी ओळखला जातो.भक्त पुंडलिकापासून हा संप्रदाय सुरू झाला. त्याचा कालखंड अद्यापही एकमताने निश्‍चित झाला नसला तरी तो ज्ञानेश्‍वरांआधी किमान ५० वर्षे होऊन गेला असे मानले जाते.

वारकरी संप्रदायाचा उगम भक्त पुंडलिकाशी संबंधित अशा एका लोककथेशी आहे. तो लोहदंड क्षेत्री (पंढरपूरला) माता पित्याची सेवा करीत असताना भगवान कृष्ण आणि रुक्मिणी विठ्ठल रखुमाईच्या रूपात त्याच्यासमोर येऊन उभे राहिले. आपल्या सेवेत खंड पडू नये म्हणून भक्त पुंडलिकाने त्यांच्यासमोर वीट फेकली. तिच्यावर विठ्ठल रखमाई उभे राहिले.

त्याची मातृपितृभक्ती पाहून प्रसन्न होऊन देवाने त्याला वर मागायला सांगितले. तेव्हा भक्‍त पुंडलिकाने त्यांना 'येथेच उभे राहून अज्ञानी जनांचा उद्धार करावा' असा वर मागितला. त्याच्या इच्छेनुसार देव तेथेच उभे राहिले. अशी ही साधी सरळ लोककथा आहे.

या संदर्भात तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी म्हणतात, धर्मेतिहासाच्या दृष्टीने फार सूचक अशी कथा आहे. ईश्वराकडे पाठ फिरविलेला माणूस माता पित्याची सेवा करतो आणि त्यातच त्याला ईश्‍वर, विश्‍वाचा नियंता प्रसन्न होऊन भेटतो. नैतिक सत्यात विश्वाचे पारमार्थिक सत्य गर्भित असते, असा त्याचा तात्त्विक अर्थ निघतो.' (महाराष्ट्राची सत्त्वधारा). माउली ज्ञानेश्‍वरांच्या ज्ञानेश्वरी या ग्रंथातील उदात्त शिकवणीतून वारकरी संप्रदाय महाराष्ट्रातील जनता जनार्दनापर्यंत अल्पावधीत जाऊन पोचला.

वारकरी संप्रदायाच्या विकासाचे कालखंड

भक्त पुंडलिकाविषयी ऐतिहासिक माहिती निश्‍चित होत नसल्याभुळे वारकरी संप्रदायाच्या इतिहासाचे

(१) ज्ञानेश्‍वरपूर्व कालखंड,

(२) ज्ञानेश्वर-नामदेव कालखंड,

(३) भानुदास- एकनाथ कालखंड,

(४) तुकाराम कालखंड आणि

(५) तुकारामोत्तर कालखंड असे कालखंड मानले

जातात. यादृष्टीने संत बहिणाबाईचा अभंग अर्थपूर्ण आहे.

संतकृपा झाली | इमारत फळा आली |

ज्ञानदेवे रचिला पाया । उभारिले देवालया ॥

नामा तयाचा किंकर । तेणे केला हा विस्तार ।

जनार्दन एकनाथ । खांब दिला भागवत ।

तुका झालासे कळस । भजन करा सावकाश |

वारकरी संप्रदायाचे तत्त्वज्ञान या संप्रदायात 'गीता', 'भागवत', 'ज्ञानेश्‍वरी' , 'एकनाथी भागवत' आणि 'तुकारामांची गाथा' या ग्रंथांना अत्यंत पवित्र मानले जाते. त्यातील विविध आचार-विचार सूत्रांमधून वारकरी संप्रदायाचे तत्त्वज्ञान साकार झाले. त्याची ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे -


(१) माउली विठ्ठल : हरिहर ऐक्याचे प्रतीक : हरी (कृष्ण) आणि हर (शिव) यांचे ऐक्य विठ्ठल देवतेत आहे. या श्रद्धेतून वैष्णण आणि शैव संप्रदायाच्या आचार विचाराचा संगम वारकरी संप्रदायात झालेला आहे, हे स्पष्ट होते.

(२) चिद्विलासवाद : याची मांडणी ज्ञानेश्‍वरांनी केली. चित्‌ म्हणजे जाणीव अथवा चैतन्य होय. हे चैतन्य विश्‍वातील नाना पदार्थांच्या रूपाने विनटलेले आहे. सर्वत्र केवळ आतमत्वाचे स्फूरण असून अनुभवात जेव्हा ज्ञाता, ज्ञानविषय आणि ज्ञान ही त्रिपुटी उरत नाही तेव्हा एकरस अमृताचा अनुभव शिल्लक राहतो. तीच एक वस्तू म्हणजे अंतिम तत्त्व होय.

अशेष जग म्हणजे त्या एका वस्तूची प्रभा असते. या विचारसरणीला चिद्‌विलासवाद असे म्हणतात.


(३) कर्मयोग : प्रत्येकाने परमेशवरार्पण बुद्धीने कर्माचरण करावे. कर्म त्यागापेक्षा त्याग बुद्धीने केलेले कर्माचरण श्रेष्ठ आहे. चित्त शुद्ध आंणि बुद्धी स्थिर ठेऊन प्राप्त कर्तव्यकर्म पार पाडले पाहिजे.

(४) भक्तियोग : ईश्‍वर विश्वरूपाने भासतो. या ज्ञानाने व्यापक विश्‍वात्मक परमेश्वराची स्वकर्मांनी होणारी भक्‍ती हीच खरी भक्ती आहे. तिला ज्ञानयुक्‍त भक्‍ती असे म्हणतात. भक्तीच्या क्षेत्रात उच्च नीच भाव नसतो. परमेश्वराची मुख्य उपासना म्हणजे सगुण भक्‍ती आहे. तिच्यामुळे आपल्या हृदयात भगवंताची मूर्ती प्रकट होते.

(५) नाम महिमा : नाम महिमा हा भक्तियोगाचा गाभा आहे. नाम हेच देवाचे द्वार असून त्याच्यामुळे चार युक्‍ती (सरूपता-सलोकता- समीपता-सायुज्यता) प्राप्त होतात. नाम हे समाधीचे साधन आहे. तेच कर्म आणि ब्रह्म आहे. नाम- स्मरणामुळे मनावरील इतर विषयांचे संस्कार पुसून आत्म्याचे संस्कार दृढ होतात. 'रामकृष्ण हरी' हा वारकरी संप्रदायाचा एक मुख्य मंत्र आहे.

वारकरी संप्रदायाचा आचारधर्म

हा संप्रदाय महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर विस्तार पावलेला आहे. त्याचा आचारधर्म अत्यंत साधा, सरळ, सोपा आणि सुलभ आहे. तो पुढीलप्रमाणे -

(१) विठ्ठल हे एकमेव दैवत असून सर्वांनी त्याची उपासना करावी.

(२) 'रामकृष्ण हंरी' हा मंत्र नेहमी जपावा.

(३) वारीला जाताना गळ्यात तुळशीमाळ, कपाळावर गोपीचंदन आणि बुक्का, आणि खांद्यावर पताका वा गवावी,

(४) सत्पात्र गुरुकडून मंत्रदीक्षा घ्यावी.

(५) परस्त्री मातेसमान मानावी.

(६) मांसाहार वर्ज्य करावा.

(७) एकादशीचा उपास करावा.

(८) दररोज हरिपाठ म्हणावा.

(९) भजन कीर्तनांना उपस्थित राहावे.

(१०) वर्षातून एकदा पंढरपूर, आळंदी, इत्यादी तीर्थक्षेत्रांची वारी करावी .

(च) इतर काही संप्रदाय

(१) देवी संप्रदाय (शक्‍ती-संप्रदाय) : या प्राचीन संप्रदायाला 'शक्तिपूजक संप्रदाय' असेही म्हणतात. काही शतकांपूर्वी 'शाक्‍त पंथ' किंवा 'शाक्‍त संप्रदाय' प्रभावी होता, तोही या संप्रदायाशी निगडित आहे. देवी ही शक्‍तीची देवता मानली जाते. इतर देवांप्रमाणे देवीनेही दुष्टांच्या नाशासाठी आणि सज्जनांच्या रक्षणासाठी अनेक अवतार घेतले. ती महासरस्वती (सत्त्वगुणी), महालक्ष्मी (राजसगुणी) आणि महाकाली (तामसगुणी) या रूपांमध्ये पूजली जाते,

सप्तशती: या ग्रंथात तिच्या तिन्ही रूपांचे दर्शन घडते.देवीच्या उपासनेचे दोन मार्ग सांगितले जातात.

(१) वैदिक उपासनेत नवरात्रोत्सव, गायत्री मंत्र पठण, नित्य आणि नैमित्तिक पूजा यांचा समावेश होतो.

(२) तांत्रिक उपासनेमध्ये कुंडलिनीशक्‍ती जागृत करणे, शक्‍ती आणि शिव यांचे ऐक्य साधणे, वेगवेगळी बीजाक्षर यंत्रे तयार करणे या कृती श्रद्धापूर्वक केल्या जातात. ही उपासना सुक्ष्म आणि कष्टसाध्य आहे. तांत्रिक उपासना करणार्‍या कौल संप्रदायाचा वाममार्गी पंथ अनाचारप्रधान मानला जातो. त्यात पंच मकारांची (मद्य, मांस, मत्स्य, मुद्रा आणि मैथुन) साधना केली जाते. या पंथात देवीला ललिता, महाभैरबी, आनंदभैरबी, त्रिपुर सुंदरी म्हटले जाते. समयाचार या दुसर्‍या पंथात चक्र पूजा महत्त्वाची आहे. या पंथाचे देवीला तारा, मणितारा मानतात. तसेच त्रिकोण, वर्तुळ, चतुष्कोन, इत्यादी आकृत्यांमधून रहस्यमय चक्रे निर्माण करून त्यांची साधना करतात.संपूर्ण भारतात देवी ही एक ग्रामदेवता म्हणून सर्वपरिचित आहे. अमरनाथ (काश्मीर), कांची (तामीळनाडू), कामाख्या (आसाम) या तीन प्रमुख शक्‍्तिपीठांप्रमाणे महाराष्ट्रातही साडेतीन शक्‍तिपीठांना (कोल्हापूर, तुळजापूर, माहूर आणि सप्तशृंग गड) मान्यता आहे.


(२) गाणपत्य संप्रदाय : गणपतीला उपास्यदेवता मानणाऱ्या संप्रदायाला गाणपत्य संप्रदाय असे म्हणतात. हा संप्रदाय इसवी सनाच्या पाचव्या ते नवव्या शतकात उदयाला आला. या संप्रदायाचे पुढील सहा भेद आहेत.

(१) महागणपती, (२) हरिद्रा गणपत्नी, (३) उच्छिष्ट गणपती, (४) नवनीत गणपती, (५) स्वर्ण गणपती, (६) संतान गणपती,

या संप्रदायात गुप्त आणि प्रकट या दोन मार्गांनी उपासना केली जाते. तसेच गणपतीला शिवाचा प्रतिस्पर्धी आणि सर्व देवांमध्ये श्रेष्ठ मानले जाते. डब्ल्यू वार्ड यांच्यामते, बंगालमधील ज्या हिंदूंनी गणपतीची 'विघ्नकर्ता' या रूपाऐवजी “विघ्नहर्ता” या रूपात उपासना सुरू केली तेच गाणपत्य या नावाने ओळखले जाऊ लागले. गुप्त काळात (इ.स. सहावे शतक) गणपती 'ही शुभदेवता बनली. त्या आधी गणपतीचे वर्णन काही ठिकाणी विघ्नकर्ता असे होत असे. याच काळात गणपती देवता आणि तिच्या उपासनेचा प्रसार भारताबाहेर तिबेट, चीन, जपान, कोरिया, इत्यादी देशांमध्ये झाला. शंकराचार्यांनी (इ.स. आठवे शतक) गणपतीचा समावेश पंचायतन पूजेत केला.

महाराष्ट्रात अष्टविनायक मंदिरे वेगवेगळ्या गावी असून गाणपत्य संप्रदायात ती पवित्र क्षेत्रे मानली जातात. केरळमधील गणपती मंदिरांना होमपुरे म्हणतात. तेथे गणपतीसमोर नित्य होम केला जातो. दक्षिण भारतात गणपतीची उपासना मोठ्या प्रमाणात प्रचलित आहे. भारतातील सर्व हिंदूमध्ये गणपतीला शुभकार्यप्रसंगी अग्र पूजेचा मान दिला जातो.गृत्समद क्रषी हे आद्य गाणपत्य असून मुद्गल, भ्रूशुंडी, वरेण्य, हे पुराणकालीन अणि मोरया गोसावी, गोसावी नंदन, गणेश योगींद्र (गुजरात) हे इतिहासकालीन थोर गाणपत्य आहेत.

(३) दत्त संप्रदाय : दत्त संप्रदाय इसवी सनाच्या चौदाव्या शतकात अस्तित्वात आला. ब्रह्मा-विष्णू-महेश या तीन दैवतांच्या वैशिष्ट्यांचे एकत्रीकरण दत्तात्रेय देवतेत झाले. हा समन्वय इ.स.च्या दहाव्या शतकात झाला असावा, त्याआंधी महाभारत आणि मार्कंडेय पुराणात त्याची विविध वर्णने आढळतात. विष्णूने दत्तावतार घेतला. शिव हे दत्ताचे गुरू आहेत. इ. समजुतीही प्रचलित आहेत. त्यांना ब्रह्म पुराणाचा आधार सांगितला जातो. पुराणात भार्गव, परशुराम, अलर्क, कार्तवीर्य, सहस्त्रार्जुन, प्रल्हाद, यदू आणि आयु हे दत्तात्रेयाचे शिष्य असल्याचे म्हटले आहे. तसेच दासोपन्त वल्लभ, नरसिंह सरस्वती, अक्कलकोटचे स्वामी आणि माणिक प्रभू या इतिहासकालीन सत्पुरुषांना दत्तात्रेयाचे अवतार मानले जाते.

महाराष्ट्रात दत्तोपासनेला प्रारंभ महानुभाव संप्रदायाने केला. त्यांच्या दृष्टीने दत्त ही एकमुखी चतुर्भुज देवता आहे. बाराव्या शतकापासून भारतात सूफी संप्रदायाचे प्राबल्य वाढू लागले. अनेक हिंदू पीराला नवस करून त्याची पूजा करू लागले. या पार्श्वभूमीवर वल्लभ (इ.स. १३२० -१३५०) यांना दत्तात्रेयाचे पहिले अवतार म्हणतात. त्यांच्यानंतर नरसिंह सरस्वती (इ.स. १३७८ - १४५८) यांनी दत्तोपासनेला संघटित रूप देऊन 'दत्त संप्रदाय प्रवर्तित केला. 'गुरुचरित्र' या संप्रदायाच्या प्रमाण ग्रंथामध्ये या दोघांना दत्ताचे अवतार म्हटले आहे. मूळामध्ये परंपरेने जो 'गुरुमार्ग' चालत आला होता त्यालाच दत्त संप्रदाय असे म्हटले जाते.

दत्त संप्रदायाचे प्राबल्य प्रामुख्याने महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात आजही दिसून येते. माहूर ( दत्तात्रेयाचे शयनस्थान) लाड कारंजे ( नरसिंह सरस्वतींचे जन्मस्थान) “औदुंबर' नरसोबाची वाडी (नरसिंह सरस्वतींचे १२ वर्षे वास्तव्यस्थान) गाणगापूर (नरसिंह सरस्वतींनी पूजिलेल्यादत्त पादुका) ही दत्त सांप्रदायिकांची प्रमुख तीर्थक्षेत्रे आहेत. 'काही प्रमुख दत्तोपासकांमध्ये सरस्वती गंगाधर, जनार्दन स्वामी, एकनाथ, मुक्तेश्वर, दासोपंत, निरंजन रघुनाथ, नारायण महाराज जालवणकर, माणिक प्रभू, अक्कलकोटचे स्वामी, वासुदेवानंद सरस्वती, आदींचा समावेश होतो.

(४) समर्थ संप्रदाय : या संप्रदायाचे प्रवर्तक रामदास स्वामी (इ.स. १६०८ - १६८१) आहेत. त्यांनी विष्णूचा कृष्णासारखाच दुसरा प्रभावी अवतार *राम' हे उपास्य दैवत केंद्रस्थानी धरून समर्थ संप्रदायाचे प्रवर्तन केले. सतराव्या शतकातील प्रतिकुल राजकीय, पारमार्थिक आणि सामाजिक परिस्थिती या संप्रदायाचे कारण ठरली. हा संप्रदाय आदिनारायण - महाविष्णु - हंस - ब्रह्मदेव - वशिष्ठ - रामचंद्र-रामदास अशी गुरू परंपरा मानतो. या संप्रदायात प्रभु रामचंद्रांबरोबर हनुमान आणि तुळजा भवानी या उपास्य देवतांची उपासना केली जाते. पंचवटी आणि टाकळी (नाशिक), अयोध्या (उत्तर भारत), रामेश्वर (दक्षिण भारत), जांब (मराठवाडा), चाफळ, शिवथर घळ, शिंगणवाडी, दहिफळ, परळी आणि सज्जनगड (सातारा परिसर) ही या संप्रदायाची पवित्र तीर्थस्थाने आहेत.

रामदास स्वामींनी महाराष्ट्रात अकरा मारुतींची स्थापना करून बालोपासनेचा प्रसार केला. त्याचप्रमाणे त्यांनी ११०० मठ स्थापन करून आपल्या कार्याला भक्कम अधिष्ठान प्राप्त करून दिले. त्यांचे मठपती हे धर्म आणि लोकशिक्षणाचे प्रभावी काम करीत असत.

“दासबोध हा समर्थ संप्रदायाचा प्रमाण ग्रंथ असून त्यात संप्रदायाचे तत्त्वज्ञान सविस्तर मांडलेले आहे. 'पाहावे आपणासी आपण, या नाव ज्ञान', “अविनाश ते ब्रह्म सगुण', नासे ते माया सगुण', इत्यादी अनेक सूत्रांमधून हे तत्त्वज्ञान स्पष्ट होते. आपल्या अनुयायांनी सदगुरू करून सगुणभक्‍ती आणि निर्गुणोपासना करावी, कर्मयोग स्वीकारून महाराष्ट्र धर्म वाढवावा अशा प्रकारचा साधना मार्ग रामदासांनी सांगितला आहे.

संदर्भ : यशवंतराव चव्हाण मुक्त विदयापीठ पुस्तक HIS285-2

सर्वाधिक वाचलेले लेख