रविवार, ४ ऑक्टोबर, २०२०

मध्ययुगीन महाराष्ट्रातील धार्मिक जीवन

मध्ययुगीन महाराष्ट्रातील धार्मिक जीवन

मध्ययुगीन महाराष्ट्रातील धार्मिक जीवन

मध्ययुगात सर्वत्र माणसाचे जीवन हे धार्मिक श्रद्धा, रूढी, आचार यांच्यात पूर्णपणे गुरफटलेले होते. मध्ययुगीन 

मराठी समाज याला अपवाद नव्हता. मात्र या समाजाची निष्ठा कोणत्या तरी एका तत्त्वावर किंवा पंथावर केंद्रित 

झालेली नव्हती तर अनेक पंथोपंथांनी आपापली वेगळी चूल मांडली होती, आपापले स्थान प्रस्थापित केले होते. 

इस्लामी राज्यकर्त्यांच्या अधूनमधून उद्‌भवणाऱ्या अतिरेकाचा अपवाद सोडला तर या विविध पंथात संघर्ष झाला 

नाही. मतभेद जरूर होते, एकमेकांना उघड वा प्रच्छन्न विरोधहि हे पंथ करीत होते परंतु एकूण समाजस्थिती ही

शांततापूर्ण सहजीवनाची होती. याला प्रमुख कारण म्हणजे बहुसंख्य समाजाचे पंथोपपंथ हे प्राचीन भारतीय 

विचारधारातून उद्भवलेले होते. राष्ट्रकूट-यादव यांच्या राजवटींबरोबर वैदिक धर्माला विहीत असे यज्ञयागादि आचार 

लुप्न झाले होते. त्यांची जागा पौराणिक धर्माने--भक्ती मार्गाने घेतली होती. पंढरपूरचा विठ्ठल संप्रदाय, दत्त संप्रदाय, 

रामभक्ती, हे या परंपरेतील. 

वीरशैव हे  शिवाचे उपासक, वेदप्रामाण्य न मानणारे. महानुभाव पंथ हा असाच सीमारेषेवरील. जैन पंथ हा

स्पष्टपणे अवैदिक. इस्लाम हा भारतबाह्य जन्माचा आणि सूफी संप्रदाय हे इस्लामचेच अपत्य. 

या सगल्यया धर्मात व पंथात या काळात मोठमोठे साधुसंत होअून गेले, त्यांनी विपुल वाड्मयनिर्मिती

केली, त्यांची देवालये, दर्गे भक्तमंडळींचे आकर्षण झालेली होती. अशा तर्‍हेचे वैभव न लाभलेला एक धर्म बहुजन 

समाजाच्या आचारविचारावर अधिराज्य करीत होता. याची पाळेमुळे अतिप्राचीन परंपरात रुजलेली होती. त्याचा प्र

भाव जबरदस्त होता, तरीहि आजवरच्या मराठी धार्मिक इतिहासात त्याची दखल घेण्यात आलेली नाही. हा धर्म 

म्हणजे 'लोकधर्म' याचे वाड्मय मुख्यत: मौखिक स्वरूपात होते व तसेच हस्तांतरित होत होते-- ते म्हणजे पदे, 

कहाण्या इ. या सर्वांचा उल्लेख तत्कालीन वाड्मयात, संतसाहित्यात केवळ निषेधपरच आहे पण त्यावरून 

लोकधर्माचा प्रभाव किती जबरदस्त होता याची कल्पना येते. त्याची सविस्तर चर्चा पुढे केली आहे.

धार्मिक जीवनाचा विचार करताना प्रथम विचारात घ्यावा लागतो तो वैष्णव पंथ, त्यातल्या त्यात वारकरी पंथ . 

श्रीविष्णूचे, त्याहिपेक्षा श्रीकृष्णाचे 'विठ्ठल' स्वरूपातील ध्यान हे या पंथाचे केंद्रस्थान -विठ्ठलाचा निवास भीमा तीरावर 

पंढरपूर येथे. विठ्ठल हा बालकृष्णाचे, 'गोपाल' कृष्णाचे रूप आहे अशी सर्वसाधारण समजूत आहे. परंतु 

विठ्ठलमूर्तीचे स्वरूप, तिचा अर्थ आणि काळ याविषयी संशोधकात एकमत नाही. भक्तजनातही निरनिराळी मते

आढळतात . एक गोष्ट जाणवते ती अशी की या पंथाची स्थापना अकराव्या-बाराव्या शतकात झाली असली तरी 

त्याला विशेष मान्यता व लोकप्रियता तेराव्या शतकापासून लाभली. महामुभावांच्या वाड्मयात बीर विठ्ठलाचा 

उल्लेख  आहे असे एक मत आहे--ते या पंथाचे महत्त्व दर्शविते. ज्ञानदेवांच्या, पण मुख्यत: नामदेवाच्या अभंगात 

विठ्ठलाची भक्ती ओतप्रोत भरलेली आहे. यादव नृपती रामचंद्र हा, 'चौऱ्याशीचा लेख' म्हणून प्रसिद्ध असलेल्या 

शिलालेखात स्वत:ला 'पांडरीफडमुख्य' असे म्हणवून घेतो. 

 या पंथाला अफाट लोकप्रियता लाभली ती त्याने सांगितलेल्या ईशप्राप्नीच्या सुलभ मार्गामुळे आणि केंद्रस्थानी 

 असणाऱ्या देवतेच्या “मानवी रूपामुळे  त्यांनी महानुभव पंथासारखी आत्यंतिक संन्यासाची आवश्यकता सांगितली 

नाही, नाथ पंथीयांसारखी खडतर योगसाधना सांगितली नाही. संसारात राहून, रोजचे व्यवहार सांभाळून इष्ट देवतेचे 

भजन, पूजन, स्मरण. दर्शन असे सोपे आचार सांगितले आणि त्या देवतेवर निष्ठा, तिची भक्ती ही मुक्ती मिळवून 

देण्यास पुरेशी आहेत  असे आश्‍वासन दिले. देवताही सुलभ, सुगम अशी होती-आकर्षक होती. श्रीकृष्ण हा माणूस 

म्हणून वागत होता, सगळ्या गोष्टी करत होता. 

कुसूक्षेत्रावरील तत्त्वज्ञ श्रीकृष्ण एवढेच त्याचे रूप राहिले असते तर त्याला इतकी 

लोकप्रियता मिळाली असती असे वाटत नाही. बालकृष्ण म्हणून त्याच्या लीला, गोपालकृष्ण म्हणून त्याचे साहस, 

गोपीसखा हा प्रेमभाव या सगळ्या गोष्टींपर्यंत सामान्य माणसे सहज पोचू शकत होती. महाभारतातील गीतेचा 

प्रवक्ता श्रीकृष्ण हा बुद्धिगम्य होता तर भागवत पुराणातील कृष्णरूप हे भावगम्य होते. या काळात भारतात भक्ती 

संप्रदायाची जी लाट आली तिचे श्रद्धास्थान श्रीकृष्णच होता तो यामुळे. वारकरी पंथाच्या वाढीमध्ये आणखी एक गोष्ट 

ध्यानात घ्यावी लागते--त्याची सामाजिक बाजू. या देवतेचे भक्त हे मुख्यत: एका विशिष्ट समाजगटातून आलेले 

दिसतात. तसेच या देवतेचे मुख्य उत्सव किंवा उपासना दिवस हे या वर्गाची ऐहिक सोय बघूनच उत्पन्न झालेले 

आहेत. हे उत्सव म्हणजे आषाढी आणि कार्तिकी एकादशी. शेतकीच्या कामात उसंत मिळण्याचेच हे महिने

आहित-वारकरी पंथाच्या अनुयायात संख्येने सर्वांधिक आहेत शेतकरी. त्याखालोखाल. त्या व्यवसायाशी संबंधित 

असे “गोपाल' (मेंढपाळ धनगर नव्हेत ! ) दिसतात. ड्तर समाजांना, जातींना त्यांची विशिष्ट दैवते आहेत, संबंधित 

यात्रा, उत्सव आहेत. धनगर मंडळी ही खंडोबाची-त्यातल्या त्यात जेजूरीच्या खंडोबाची उपासक आहेत तर मातंग 

समाजाची यात्रा पालीच्या खंडोबाच्या मंदिरात भरते.

वैष्णव पंथापैकी आणखी दैवते म्हणजे नृसिंह, रामचंद्र आणि दत्तात्रे. रामचंद्राला बरे दिवस येण्यासाठी मध्ययुगाच्या 

शेवटापर्यंत थांबावे लागले. बहुतेक मराठी कवींनी व संतकवींनी रामायणाच्या आवृत्त्या काढल्या असल्या तरी समर्थ 

रामदासांचे कार्य सुरू होईपर्यंत 'राम-संप्रदाय' उत्पन्न झाला नव्हता. नंतर्रह त्याला फारशी लोकप्रियता लाभली 

नाही. 

दत्तात्रेयाला अनुयायी अवश्य होते, जनार्दनस्वामी, एकनाथ, मुक्तेश्‍वर ही सगळी मंडळी दत्तात्रेयाचा अनुग्रह झालेली

 होती. श्रीपाद-श्रीवळुभ आणि श्रीनरसिंह सरस्वती हे प्रख्यात दत्तभक्त, महाराष्ट्रातील दत्तोपासनेचे प्रवर्तक म्हणता

 येतील असे. मात्र दत्तात्रेय हा कधीही खऱ्या अर्थाने बहुजनांचे उपास्य दैवत झाला नाही. कदाचित, सोवळ्या- 

ओवळ्याच्या कडक कल्पना, वर्ण व जाति यांचे स्तोम या सगळ्यांमुळे दत्तपंथीयांची संख्या मर्यादितच राहिली. 

नरसिंह आदि अवतारांची स्थिती याहूनही वाईट होती. देवीची उपासना सर्वत्र होत असे, माहूर (मातापूर),

कोल्हापूर, तुळजापूर, सप्तशृंगी अशा पीठातून भाविकांचा ओघ असला तरी तो मुख्यत: कौटुंबिक, कुळाचाराचा 

भाग म्हणून, शिवाय ती बऱ्याच अंशी कामनिक उपासना होती. देवीच्या भगतांची (भुते इ.) वेगळी जात असली तरी 

वारकरी  पंथासारखा एखादा पंथ, समाजगट उत्पन्न झालेला दिसत नाही. गणेश दैवत प्राचीन काळापासून ज्ञात 

असले तरी  त्याच्या पूजाअर्चेला मोठ्या प्रमाणाबर सुरवात झाली ती पेशवेकाळानंतर. महादेव, शिव, शंकर 

यासारख्या अनेक नावाने भगवान शंकराची पूजाअर्चा प्राचीन काळापासून चालू होती. गावोगाव शिवाची मंदिरे 

होती. किंबहुना यादव  काळात निर्माण झालेली अंबरनाथ, बळसाणे, सिन्नर अशासारख्या ठिकाणची प्रमुख मंदिरे 

शिवाचीच होती.

वैष्णवांचा जसा वारकरी पंथ तसा केवळ शिवाचीच उपासना करणारा पंथ महाराष्ट्रात निर्माण झाला नाही. 

कर्नाटकामध्ये श्रीबसवेश्‍वरांनी स्थापन केलेल्या वीरशैव किंवा लिंगायत पंथाचे अनुयायी मराठवाडा, सोलापूर 

यासारख्या कर्नाटकाच्या नजीकच्या भागात प्रामुख्याने आढळतात. परंतु एकूण लोकसंख्येच्या मानाने त्यांची संख्या 

कमीच आहे. जैन धर्मीयांची संख्या कमीच होती परंतु या 'धर्माला राजमान्यता, राजाश्रयही लाभलेला दिसतो. 

राज्यकर्त्यांचा धर्म म्हणजे इस्लाम, या धर्माचे दोन पंथ म्हणजे सुन्नी आणि शिया. या दोघांचे नित्याचे आचार बरेचसे 

सारखेच होते परंतु सुन्नी हे परधर्मीयांविषयी कडवे तर शिया हे तुलनेने मवाळ म्हणावेत असे. निजामशाहीत व 

कुतुबशाहीत शिया पंथीयांना महत्त्वाचे स्थान होते. शाह ताहीर यांच्या प्रभावामुळे निजामशहांनी शिया पंथ हा 

अधिकृत शासकीय पंथ ठरविला होता ” करबलच्या लढाईत हौतात्म्य प्राप्र झालेल्या हसन व हुसेन यांचे ताजिये 

काढून शोकदिन पाळण्याची प्रथा सगळ्याच सलतनतीत मान्यता पावली. हे झाले विशिष्ट तत्त्वज्ञान वा देवता यांना 

मानणाऱ्या विविध पंथांचे ढोबळ चित्र, या सर्वांपलिकडे जाणारा धर्म, वर सांगितल्याप्रमाणे 'लोकधर्म'. समाजाचा एक 

फार मोठा वर्ग असा होता की ज्याला यापैकी कोणत्याच एका पंथामध्ये विशेष स्वारस्य नव्हते. शिवाय अनेक लोक 

असेहि होते की ज्यांनी यापैकी 'सबादा पंथ स्वीकारला असला तरी परंपरागत लोकधमांचे आचार, कुलाचार ते 

पाळतच होते. घरात पिढ्यान्‌पिढ्या चालत आलेल्या आचारांचा त्याग करणे त्यांना मानवणारे नव्हते, या धर्माचे 

उपासक हे मुमुक्षु- मोक्षप्राप्रीची अपेक्षा करणारे नव्हते. त्यांना परमेश्वरप्राप्तीची ओढ नव्हती. त्यांची अपेक्षा आणि 

त्यांच्या देवदेवता अगदी खर्‍याखऱ्या 'इहवादी' होत्या. त्या लौकिक जीवनाशी दृढपणे बांधलेल्या होत्या, त्यातूनच 

उद्‌भवलेल्या होत्या. त्यांना कुलदेवता, ग्रामदेवता, क्षेत्रपाल, यक्ष अशी अनेक नावे होती किंवा त्यांच्या अनेक कोटी 

होत्या. माणसाच्या रोजच्या जीवनाशी त्यांचे अतूट नाते होते. रोज उठून अनपेक्षित संकटे येत, कधी अतिवृष्टी तर 

कधी अवर्षण; विहीरीचे पाणी अचानक आटे, शेजारून एरवी शांतपणे वहात असणार्‍या ओढ्याला एकाएकी पूर 

लोटे आणि काठावरचे एखादे गुरू, मूल ओढून नेई, पटकी, देवी यासारख्या रोगराया पसरत आणि हे सगळे 

कोणत्या ना कोणत्या देवतेच्या 'अवकृपे' मुळे होई. त्यातल्या त्यात एक बरे होते की देवतेचे जसा कोप होई तशी ती 

प्रसन्नहि होत असे ! जे जे आपल्याला प्रिय ते आपल्या देवतांनाहि प्रिय असणारं, निदान असायला हवे, अशा गाढ 

विश्वासामुळे, श्रद्धेमुळे, भाजीभाकरीपासून तो बोकडारेड्यापर्यंत सर्व तऱ्हेचे नैवद्य दिले जात. शिवाय पितर होते- 

त्यांच्या इच्छा अपूर्ण, अतृप्त राहिलेल्या असत त्या पूर्ण करून त्यांना संतुष्ट करणे भाग होते. अन्यथा ते शाप देत, 

भूतपिशाच्च बनून छळ करीत. या सगळ्या मंडळींनी आपल्या मनाप्रमाणे वागावे म्हणून त्यांना प्रसन्न करून घेणे 

भाग होते. पण नेमक्‍या कोणत्या देवतेचा कोप झाला आहे आणि तिला कसे प्रसन्न करून घ्यावे याची कल्पना 

सगळ्यांना कशी असणार ? त्यांची मागणी काय आहे, त्या कशामुळे कोपल्या हे सामान्य माणसाला समजण्यासारखे

 नव्हते. यासाठी कोणीतरी माहितगार, वाटाड्या हवाच. प्रत्येक देवतेचा 'प्रवक्ता' हवा-भगत हवा. तो तज्ज्ञ. त्याच्या 

अंगच्या शक्तीमुळे तो देवतेशी बोलू शकत असे, त्यांना प्रसन्न करून घेत असे. त्याच्या सांगण्याप्रमाणे नैवेद्य, बळी 

द्याबयाचे, दानधर्म करावयाचा, नवस करायचा आणि फेडायचा. पुष्कळ देवता लहरी असत, आपली जागा सोडून 

एखाद्याच्या शरीरात प्रवेश करीत, त्यांच्या अंगात संचार करीत आणि त्याच्या तोंडून आपल्याला काय हवे नको ते 

वदवीत. या मध्यस्थाचा महिमा मोठा - 1) देवतेचा हा खास विश्‍वातला माणूस, त्याच्या सांगण्याप्रमाणे करणे, त्याचा 

मान राखणे, त्याला प्रसन्न ठेवणे भाग असे. या सर्व देवदेवता अगदी खऱ्या अर्थाने 'अनादि' होत्या. त्यांचा जन्म केव्हा, 

कोठे झाला याचे कोणालाच स्मरण नाही. समाजाची सामूहिक स्मृती पोचते तेथपासून त्यांचा वावर चालू असलेला 

दिसतो. समाजाला त्यांचा दृढ असा परिचय होता. लोकमानसात त्यांचे स्थान पक्के होते. याचा परिणाम असा झाला 

की जे 'उच्च' 'अभिजात' असे धर्मपंथ उत्पन्न झाले. त्यांना या देवदेवतांचा स्वीकार करणे भाग पडले. बौद्ध, जैन, 

हिंदू, कोणताहि धर्म वा पंथ असो, या लोकदेवतांना बाजूला सारणे अशक्यच झाले. त्यांच्याशी काहीतरी संबंध 

जोडून दाखबिल्याशिवाय या नव्या पंथांविषयी लोकांना *आपुलकी' वाटणे शक्‍य नव्हते. मग त्यांना यक्ष, यक्षी, वृक्षी, 

अशी नावे देवून, आणि कोणाला आपल्या देवतेचे द्रारपाल, रक्षक असे स्थान देवून तर कोणाला वहान तर कोणाला 

लांछन (चिन्ह) बनवून आपापल्या देवताकुलात स्थान दिले. परंतु त्यामुळे त्यांचे लोकमानसातले, आचारातले त्यांचे 

स्थान यत्किंचितही कमी झाले नाही. उलट जनक आणि दत्तक अशा दोन्ही घरात त्यांचे माहात्म्य वाढत गेले. त्यांची 

संख्या अपरंपार वाढत गेली.  वारकरी पंथाच्या संतांनी तसेच समर्थ रामदासांनी या देवतांना 'क्षुद्रदेवता' संबोधून 

त्यांचा वारंवार निषेध केला आहे. या निषेधवचनांची पुनरूक्ती आणि त्यांची धार लक्षात घेतली तर या 'क्षुद्र' देवताचा 

समाजजीवनावर केवढा जबरदस्त पगडा मध्ययुगात होता हे स्पष्ट होते. आजही तो तेवढाच दृढ आहे.  थोडे 

घराबाहेर, गावाच्या शिवेबाहेर पडून पाचदहा खेडेगावात हिंडून पाहिले तर, वीर, जाखाई, जोखाई आणि त्यांचे 

असंख्य नातेवाईक यांचे दर्शन घडू शकते. त्यांच्या आसपास वावरणारे भगत, भुते, पोतराज यांची गाठ पडते. 

चारपाचशे वर्षांपूर्वी या 'लोकधर्माचे' सामाज्य किती विस्तृत होते याची कल्पना यावयाची असेल तर मोठाल्या 

संतांची निषेध-वचने पहावीत.

माझी मूर्ती निफजवी । ते घराचे कोनी बैसवी ।

आपण देवोदेवी । यात्रे जाय ॥

नित्य आराधन माझे । काजी कुळदेवता भजे ।

पर्वविशेष कीजे । पूजा आना ॥।

माझे अधिष्ठान घरी । आणि बोवसे आनाचे करी ।

पितृकार्यावसरी | पितरांचा होय |

एकादशीच्या दिवसी । जेतुला पाडु आम्हासी ।

तेतुलाचि नागांसी । पंचमीच्या दिवसी |

चौथ मोटकी पाहे । आणि गणेशाचाचि होये ।

चाबदसी म्हणे माये । तुझाचि बो दुर्गे ॥।

नित्य नैमित्तिके कर्मे सांडी । मग वैसे नवचंडी ।

आदित्यवारी वाढी । बहिरा पात्री ॥

पाठी सोमवार पावे । आणि बेलेसी लिंगा धावे ।

ऐसा एकलाचि आघवे । जोगबी जो ॥

ऐसा अखंड भजन करी । उगा नोहे क्षणभरी ।

अवघेन गावद्वारी । अहेव जैसी ॥

-- संत ज्ञानेश्‍वर


हे झाले ज्ञानेश्‍वरांचे बोल. एकनाथ महाराज म्हणतात--

“ देव म्हणती मेसाबायी । पूजाअर्चा करिती पाही ।

नैवेद्य बाहती नारळ । अवघा करिती गोंधळ ।

मेंढरे बोकडे मारिती । सुकी रोटी तया म्हणती ।

बळेचि आणिताती अंगी । नाचतात शिमगा सोंगा ।

आलो ऐकोनी खंडोबाची थोरी ।

वाघा होवोनी मज मागा म्हणती वारी ।

एका जनार्दनी मज भेटवा पंढरीराव ।

-- संत एकनाथ


यानंतर साक्ष तुकाराम महाराजांची, ती आणखीच तिखट--

नव्हे जाखाई जोखाई । मायराणी मेसाबाई ।

वळिया माझा पंढरीराव । जो या देवांचाहि देव ॥

रंडीचंडी शक्ती । मद्यमांसे भक्षिती ।

बहिरब खंडेराब । रोटी सुकीसाठी देव ।

गणोबा विक्राळ । लाडुमोदकांचा काळ ।

मुंजा म्हैसासुरे । हे तो कोणी लेखी पोरे ।

बेताळे फेताळे । जळो त्यांचे तोंड काळे ।

तुका म्हणे चित्ती । धरा रखुमाईचा पती ॥'

--संत तुकाराम

बर म्हटल्याप्रमाणे या देवतांची उपासना कामनिक, विशिष्ट हेतूच्या पूर्ततेसाठी आणि त्यांची पूजाअर्चा ही 

प्रसंगविशेषी, कारणपरत्वे होत असे. गुरूपूजा, पितरपूजा ही नैमित्तिकातून नित्यात येत असे. या पूजा, ही 

व्रतवैकल्ये  ही एकेका घरात चालत आलेली असत आणि त्यांना “कुलाचार' ही पदवी प्राप्त होई. एकदा ही प्रतिष्ठा 

प्राप्र झाली की त्यातून कोणाचीही सुटका नसे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Do not enter the spam link in the comment box

सर्वाधिक वाचलेले लेख