About us

मराठी बाणा बद्दल थोडस


भारत देश हा अनेक संघ राजे मिळून बनला आहे. या सर्व संघ राज्यांपैकी महाराष्ट्र हे भारतातील तिसरे मोठे राज्य आहे. भारताची ऐतिहासिक ,भोगोलिक ,सामाजिक, राजकीय,  कला व साहित्यिक,  वैज्ञानिक ,आर्थिक, पर्यावरणीय , व्यक्तिविशेष  इत्यादी माहिती हि मोठ्या प्रमाणात इंगजी व हिंदी या भाषेत आहे. 
भारतचा हा वारसा तसेच आपल्या महाराष्ट्राचा याच क्षेत्रातील वारसा खूप मोठा आहे. 

महाराष्ट्राला ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत चोखमेळा ,संत एकनाथ आणि संत तुकाराम या वारकरी धार्मिक चळवळीतील मराठी संतांचा, जो महाराष्ट्र किंवा मराठी संस्कृतीचा एक आधार आहे, यांचा दीर्घ इतिहास आहे.

१७ व्या शतकात मराठा साम्राज्याचे संस्थापक राजा छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांची स्थापन केलेले हिंदवी स्वराज्य हे भारत देशास साठी कायम मार्गदर्शक राहील.

महाराष्ट्र राज्यात अनेक संस्कृती आहेत, ज्यात हिंदू, मुस्लिम, बौद्ध, शीख, ख्रिश्चन इत्यादींशी संबंधित संस्कृतींचा समावेश आहे. शिवलिंग, खंडोबा, देवी आणि भगवान विठ्ठल म्हणून भगवान गणेश, मारुती, महादेव, हिंदूंनी उपासना केलेल्या अनेक देवता ची तीर्थ क्षेत्रे आहेत.

मराठवाडा, विदर्भ, खानदेश आणि कोकण अशा विविध भागात महाराष्ट्र विभागलेला आहे. मराठी भाषा, लोकगीते, भोजन आणि जातीच्या वेगवेगळ्या बोलींच्या स्वरूपात प्रत्येकाची स्वतःची सांस्कृतिक ओळख आहे.

महात्मा फुले, लोकमान्य टिळक, आगरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अशा अनेक समाज सुधारकांचा वारसा आहे.

भारताची ,महाराष्ट्राची, तसेच जागतिक स्तरावरील उपतुक्त अशी ऐतिहासिक ,भोगौलिक ,सामाजिक, शैक्षणिक ,राजकीय व इतर सर्वच क्षेत्रातील माहिती हि डिजिटल जगात इंग्रजी च्या तुलनेत मराठीत खूपच कमी प्रमाणात उपलब्ध आहे.

आपाली मातृभाषा हि ज्ञानभाषा व्हावी हि मनात एक प्रामाणिक आशा आहे. मराठी जर ज्ञान भाषा व्हावी असे वाटत असेल तर मराठी माहिती स्रोत वाढले पाहिजेत.

सद्य स्थिती अनेक मराठी डिजिटल स्रोत उपप्लब्ध आहेत मात्र त्यांची संख्या इतर इंग्रजी स्रोता पेक्षा कमी आहे . त्यामुळे आम्ही यात खारीचा वाटा म्हणूस सुरवात केली आहे.

भारताची ,महाराष्ट्राची, तसेच जागतिक स्तरावरील उपतुक्त अशी ऐतिहासिक ,भोगौलिक ,सामाजिक, शैक्षणिक ,राजकीय व इतर सर्वच क्षेत्रातील माहिती मराठीत उपलब्ध व्हावी या साठी मराठी बाणा ने एक छोटस पाऊल टाकलं आहे.

त्यासाठी म्हणावेसे वाटते कि ,

बोलावे शुद्ध, ऐकावे शुद्ध,
वाचावे शुद्ध, लिहावे शुद्ध,
मराठीच्या उद्धारासाठी,
कंबर कसुनी आम्ही कटिबद्ध.  

हाच आमुचा " मराठी बाणा  "

जय महाराष्ट्र  ..... जय भारत  .....


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Do not enter the spam link in the comment box

सर्वाधिक वाचलेले लेख